* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BAPUNJINCHI AMAR KAHANI
  • Availability : Available
  • ISBN : 9789386745361
  • Edition : 1
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 72
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Available in Combos :R. V. SHEVADE GURUJI COMBO SET
Quantity
"INDIA; A LAND OF GREAT PEOPLE; SAINTS AND PATRIOTS; SAGES AND SOCIAL WORKERS; IN THE STRUGGLE OF FREEDOM, ENDLESS NUMBER OF PEOPLE SACRIFICES THEMSELVES COMPLETELY AND TOTALLY; MANY REMAIN ANONYMOUS TODAY; THE GREAT LEADERS SHOULDERED THE RESPONSIBILITY OF LEADING THE COMMON PEOPLE AND IGNITE THEIR MINDS WITH UNCOMMON WILL TO FIGHT FOR THE FREEDOM; NEITHER THE COMMON MEN, NOR THE WOMEN, THE CHILDREN OR THE LEADERS HESITATE TO OFFER THEIR LIVES AT THE FEE OF MOTHER INDIA, IN AN ATTEMPT TO FREE HER FROM THE CLUTCHES OF THE BRITISH. WE OWE THE INDEPENDENCE, PROSPERITY AND HERITAGE TO THEM. THIS BOOK ALLOWS US TO MEET SOME OF THESE LEADERS; IT ALSO BRINGS IN RENOWNED WORLD-FAMOUS PERSONALITIES ACROSS NATIONS. I AM SURE THAT YOU ARE EAGERLY WAITING TO INTERACT WITH THEM. "
"भारत देश ही अनेक थोरवीरांची, संतांची, स्वातंत्र्यसैनिकांची आणि समाजसेवकांची भूमी आहे. पारतंत्र्यात खितपत पडलेल्या आपल्या देशाला यांसारख्या अनेक नेत्यांनी प्राण पणाला लावून स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांच्यामुळेच आपला देश समृद्ध व संपन्न झाला. या पुस्तकांमधून हे सगळेजण खास तुमच्या भेटीला येत आहेत, इतवंÂच नाही, तर आपल्या देशाबरोबर जगातल्याही काही थोर व्यक्तींना आपण भेटणार आहोत. मग या जगावेगळ्या माणसांची भेट घ्यायला तुम्ही तयार आहात ना!"
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
BAPUJINCHI AMAR KAHANI , R.V.SHEVADE GURUJI, CHILDREN LITERATURE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 17-06-2018

    थोरांच्या चरित्रांची नेटकी मांडणी... आपल्या कथांमधून, कथाकथनातून लहान मुलांमध्ये मराठी साहित्य रुजवण्यात रा. वा. शेवडे ऊर्फ शेवडे गुरूजी यांचा मोठा वाटा आहे. थोर व्यक्तींचं जीवनसार किशोरवयीन मुलांना समजावं या हेतूनं अशा २१ पुस्तकांची मालिकाच त्यांनीलिहिली. ती एकत्रित स्वरूपात मेहता प्रकाशनानं भेटीला आणली आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक चरित्र मुलांना समजेल अशा भाषेत, चित्रांचा भरपूर वापर करून लिहिले गेलं आहे. थोर व्यक्तींच्या जीवनातले महत्त्वाचे प्रसंग घेऊन त्यातलं नाट्य हेरून त्यात संवादांची पेरणी करण्यात आली आहे. प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी त्या थोर व्यक्तीचं रेखाचित्रही मुलांना रंगवण्यासाठी देण्यात आलं आहे. मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी ही चरित्रमालिका नक्कीच उपयुक्त ठरेल. आधुनिक भारतावर प्रभाव टाकणारे महात्मा गांधी यांचं चरित्रही उलगडून दाखवणारी पुस्तक या मालिकेत आहेत. ‘राजा हरिश्चंद्र’ नाटकानं प्रभावित झालेल्या ‘मोयिन्या’ शाळेत शेजारील मित्राचं उत्तर पाहून आपली चूक दुरुस्त करायला तयार होत नाही. तो त्याला लबाडी समजतो, वाईट मित्रांच्या संगतीनं केलेल्या चुका प्रांजळपणे पालकांसमोर कबूल करतो. हा ‘मोयिन्या’ म्हणजेच मोहनदास करमचंद्र गांधी! गांधीजींच्या जीवनातील असे अनेक प्रेरणादायक प्रसंग ‘बापूजींची अमर कहाणी’ या पुस्तकात आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CRIMINALS IN UNIFORM
CRIMINALS IN UNIFORM by SANJAY SINGH, RAKESH TRIVEDI Rating Star
Dinesh Singh

Outstanding writing very well factual presentation of issues

ASHRU
ASHRU by V. S. KHANDEKAR Rating Star
Shashi sanap

अश्रू ही कादंबरी वाचून पूर्ण झाली.. अतिशय सुंदर व मार्मिक वि. स. खांडेकरांच साहित्य लेखन टिळक,मा.गांधी,नेहरू,आगरकर यांचा विचाराचा प्रचंड प्रभाव असलेलं टिळकांच्या आग्रह खातर शिक्षक झालेला शंकर मुख्य पात्र,प्रेमळ निस्वार्थी पत्नी उमा,सावत्र असून भवाच्या पत्नीवर जीव देणारी सुमित्रा , केवळ अहिंसा ने स्वतंत्र मिळणार नाही असा मानणारा ,क्रांती विचारक भाऊ अरविंद आणि लक्षवेधक शंकर चा मित्र दिगंबर .. अश्रू कादंबरी ही मुळात प्रत्येकांच्या घरात घडणारी गोष्ट आहे,किती ही अडचणी आल्या तरी देखील घरातला कर्ता मात्र कधीही विचलित होत नाही तो त्यांच्या विचारांवर ठाम राहतो, अश्या वेळी त्याला घरातील मंडळींची साथ देखील तशीच मिळते..शंकर हा खूप प्रामाणिक पात्र आहे,बहिणीचे लग्न,मुलाची सायकल,पत्नी साठी एक पातळ ,शाळेतील स्वखर्चाने फी भरणारा विद्यार्थी प्रिय शिक्षक... समाजातील काही लोकांनी पैसेच्या मोहात ओढण्याचा देखील प्रयत्न यामध्ये केलेला आहे।। शेवट मात्र अश्रू ठिपकन येणारा आहे.. अश्रू आहेत म्हणून तर या जगात प्रीती,भक्ती,सेवा,त्याग व्यतीचे स्वभाव गुण आहेत... ...Read more