* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386745705
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : BUSINESS & MANAGEMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DR. GIRISH WALAVALKAR`S BOOK `C.E.O CHYA KEBIN MADHOON...` ELUCIDATES THE IMPACT OF ECONOMIC DEVELOPMENTS ON CHANGING LIFESTYLES, PRIORITIES, AND  WAY OF THINKING OF A COMMON MAN.  CONTINUOUS EXPANSION AND DEVELOPMENT OF VARIOUS ORBITS IS THE CONSTANT FEATURE OF THE UNIVERSE. THIS HOLDS TRUE FOR INDUSTRY, TECHNOLOGY, ECONOMICS, POLITICS, SOCIAL STRUCTURE AS WELL AS FOR OUR INDIVIDUAL PERSONAL LIFE.  IN LAST FEW YEARS , THE WORLD  ESPECIALLY INDIA IS CHANGING ECONOMICALLY, POLITICALLY AND SOCIALLY  WITH A SPEED AND ACCERELATION WHICH WAS NEVER IMAGINED BEFORE. THESE  CHANGES ARE INFLUENCING COMMON MAN`S LIFE DIRECTLY. HIS LIFE STYLE, PRIORITIES AND CONCEPTS ARE  CHANGING DRASTICALLY.  `C. E. O. CHYA KEBIN MADHOON...` PROVIDES A GUIDELINE TO ADAPT TO THESE CHANGES AND IN TURN  IMPROVE THE QUALITY OF LIFE. AT THE SAME TIME, IT ALSO EXPLAINS THE NEED OF KEEPING OUR ROOTS INTACT TO ACHIEVE LASTING MENTAL PEACE IN THE THE WORLD WHICH IS BECOMING MORE AND MORE COMMERCIAL AND PRAGMATIC DAY BY DAY.
जागतिक स्तरावरील आर्थिक घडामोडी, चलनवाढ तसेच देशांतर्गत राजकारण यामुळे अर्थव्यवस्था, उद्योग, तंत्रज्ञान, समाजावस्था यांत व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माणसाच्या खासगी जीवनावर होणारे त्याचे परिणाम यांचा सखोल अभ्यास करून लिहिलेल्या माहितीपूर्ण लेखांनी त्यांनी आपल्या वाचक वर्गाला अद्ययावत केले आहे. विकासामुळे आपले जीवन समृद्ध झाले. आधुनिक तंत्रज्ञान हा प्रगतीचा पाया ठरावा. संगणकामुळे सुखकर झालेल्या जीवनशैलीमुळे भारतीय तरुणांमध्येदेखील नवीन मनोवृत्तीचा विकास होत आहे. आधुनिकता आत्मसात करत आजची पिढी फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमांच्या वापरातून नवीन पिढीच्या गरजा ओळखून त्या दृष्टीने आपल्या व्यवसायाच्या कक्षा विस्तृत करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवत आहे. डॉ. वालावलकर यांनी बदललेल्या या परिस्थितीवर दृष्टी टाकली आहे. आपल्या अनेक लेखांत त्यांनी निरनिराळ्या महत्त्वाच्या विषयांवर आपली भूमिका विशद केली आहे. ‘स्विस बँकांची वादग्रस्त व्यावसायिकता’ या आपल्या लेखात आर्थिक सत्ता, तिची राजकारणाशी होणारी सांगड आणि त्यानंतर निर्माण झालेले सार्वभौमत्व म्हणजेच जणू स्विस बँक, हे दाखवून दिले आहे. या आपल्या लेखातील अवैध मार्गाने मिळालेला पैसा, त्यांचा व्यवहार यात भारतीयांची गुंतवणूक व मोदी सरकारने वठविलेली भूमिका या गोष्टी वाचनीय आहेत. ‘नवीन संसाधने’मध्ये त्यांनी आधुनिकीकरणामुळे (MODERNISATION) प्राप्त झालेल्या निरनिराळ्या सोयी-सुविधांविषयी विस्तृत लिहिलेले आहे. ओला, उबर कॅब्स इत्यादामुळे वेळी-अवेळी घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना ही सुविधा कशी अधिक सुखमय वाटते, याची माहिती दिली आहे. परदेशातील कथा-कादंबऱ्यादेखील आता भारतात सहज उपलब्ध आहेत. सुप्रसिद्ध ‘मिल्स आणि बून’च्या कादंबऱ्याचा प्रादेशिक भाषा स्वीकारून भारतात झालेला गृहप्रवेश डॉ. वालावलकर यांनी अप्रतिमरीत्या मांडला आहे. सध्या माणसांचे शेड्यूल इतके बिझी झाले आहे की, कुटुंब वा निरनिराळे ग्रुप्स एकत्र बाहेर जाणे, सहज भेटणे हे आता दुर्मीळ झाले आहे. त्यामुळे करमणुकीचे मार्गदेखील इंटरनेटपुरते मर्यादित राहिले आहेत. मनोरंजनासाठी वेबटेलिव्हिजनच्या सीरीजमध्ये लोक कसे गुंतलेत त्याचे उत्तम दर्शन आपल्याला ‘वेबसीरीज करमणूक ऑनलाईन’मध्ये वालावलकरांनी घडविले आहे. या सर्व सोयी-सुविधांसाठी पैसा महत्त्वाचा आहे. संपत्तीचा, मालमत्तेचा साठा करायला सुरुवात झाली आहे. LAVISH LIFESTYLE साठी अमाप कष्ट करण्याची तयारी तरुण वर्ग दाखवत आहे, हे एका दृष्टीने योग्य आहे. पण त्याचबरोबर विलासी वृत्तीमुळे हाच पैसा पाण्यासारखा खर्च करण्याकडेही त्यांचा कल वाढतोय. श्रीमंती आणि संतोष याची सांगड घातल्यावरच सुख चालून येते. आपल्या ‘उद्योगी श्रीमंती’मध्ये डॉ. वालावलकर यांनी ही सद्य परिस्थिती अभिव्यक्त केली आहे. माणसाच्या अपेक्षा वाढल्या की त्यातून मागण्या वाढत जातात. त्यात नैसर्गिक आपत्ती, राजकारणातील अस्थिरता, आकस्मिक उद्भवणाऱ्या आपत्ती यामुळे वाढणारी महागाई याच्या झळादेखील सर्वसामान्य नागरिकांना शेकून काढतात. सुस्थितीतील लोकांचा कणादेखील महागाईने वाकला जातो. डॉ. वालावलकर यांनी कराडमध्ये अर्धपोटी राहणाऱ्या कामगारांवर प्राप्त परिस्थितीमुळे झालेल्या अत्याचाराचे दर्शन घडले, त्याविषयीही लिहिले आहे. जैवतंत्रज्ञानामधल्या या संशोधकाने नावाजलेल्या कंपन्यांत जबाबदारीची पदे भूषविताना, आपल्या अनुभवाच्या चष्म्यातून अभ्यासलेले जीवनातील विविध टप्प्यांतील निरीक्षण आपल्या लेखांमध्ये शब्दबद्ध केले आहे. आर्थिक, राजकीय विषयांवरील त्यांच्या लेखनातून त्यांनी वास्तविकतेचे आकलन केले. ही माहिती भरपूर प्रमाणात देशांतर्गत आणि परदेश प्रवास आणि विविध क्षेत्रांतल्या अनेक स्तरांवरच्या लोकांच्या भेटीगाठी आणि चर्चा, यामधून त्यांना मिळालेली आहे. हे लेख ज्यांच्याभोवती लिहिले गेले आहेत, ते विषय आणि घटना वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित आहेत. परंतु समोर येत असलेल्या एका सर्वव्यापी स्थित्यंतराचे ते निदर्शक आहेत. या स्थित्यंतरामुळे उद्याच्या औद्योगिक, राजकीय, आणि आपल्या वैयक्तिक जीवनातल्या यशाच्या संकल्पना आणि नियम आमूलाग्र बदलणार आहेत. त्यातूनच उद्याच्या औद्योगिक, राजकीय आणि सामजिक अवकाशाची संरचना आणि आपल्या जगण्याच्या समृद्धतेचं सूत्र सापडणार असल्याचे लेखक सांगतो.

No Records Found
No Records Found
Keywords
BRAND#FACEBOOKCHYA SANVADALA HAVA SAYYAM# BANDAR UDYOGACHYA LATA# BHARTIYA VAHAN UDYOGACHI GHODDAUD# SARKARCHYA HATAT SIGARET# SHEETPEYANCHI TAHAN# CHAINEECHA VYAVHAR# SUNDAR MI HONAR, KODAK FILMCHA ROOL SAMPALA, WEBSERIES- EK KARAMNOOK, BHARTIYA CHITRAPATANCHA NAVA PADADA, IPL, UDHYOGI SHRIMANTI#SHIKHARAPARYANTCHYA VATCHALISATHI# KARANCHA SWARG# UMBARTHTYAVARCHI MAHAGAI# BHRASHTACHARACHE VASTAV# FLY OVER# JAPAN# BHARAT CHIN#ENGLISH BUSINESS #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 12-05-2019

    आर्थिक आलेखाचा लेखसंग्रह... मागील दोन दशकांत भारतात झालेल्या उदारीकरणाने अतिशय वेगाने आर्थिक आणि सामाजिक बदल घडले. त्याचे पडसाद सामान्य माणसाच्या जीवनावर पडून त्याच्या जीवनशैलीतही फरक पडला. डॉ. गिरीश वालावलकर यांचे ‘सी.ई.ओ.च्या केबिनमधून’ हे पुस्तकनेमके काय बाबींवर भाष्य करत आर्थिक विकासाचे सामान्य माणसांच्या जीवनावरील परिणाम स्पष्ट करते. एवढंच नाही तर बदलत्या परिस्थितीला प्रसन्नतेने स्वीकारून जीवनशैली उंचावण्यासाठी मार्गदर्शनही करते. यातील विविध विषयांवरील लिहिलेल्या एकोणपन्नास लेखांतून खूप माहितीपूर्ण ऐवज खुमासदार शैलीत वाचायला मिळतो. लेखकाने स्वत: नावाजलेल्या कंपन्यामध्ये ‘सीईओ’ पदावर काम केले असल्याने त्याच्या अनुभवी नजरेने न्याहाळलेल्या निरीक्षणांनी पुस्तकाची खोली वाढली आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 03-02-2019

    भौतिक जगताचा लेखाजोखा... आपल्या आसपासचं जग झपाट्याने बदलत आहे. बदलणाऱ्या जगाचा परिणाम माणसांच्या दैनंदिन आयुष्यावरसुद्धा होत आहे. या स्पर्धात्मक जगात अनेक उदयोन्मुख कंपन्या स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करत आहेत. कुठलीही परिस्थिती असो या कंपन्यंची वार्षिक उलाढाल काही कोटींच्या घरात असते. आपल्या भोवतालच्या या जगावर डॉक्टर गिरीश वालावलकर यांनी ‘सी.ई.ओ.च्या केबिनमधून या पुस्तकाद्वारे क्ष-किरण टाकला आहे. डॉक्टर गिरीश वालावलकर यांनी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम केले आहे. त्यांनी आसपासच्या जगाचं सूचक पद्धतीने निरीक्षण करून त्यासंदर्भात अनेक वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिले. ते लेख एकत्रितरीत्या या पुस्तकात समाविष्ट आहेत. या पुस्तकातल्या बऱ्याच गोष्टींचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात असतो. परंतु त्यावर सखोल आणि संशोधनात्मक लेखन वाचून आपल्याला या गोष्टींची नव्याने माहिती मिळते. सध्या ऑनलाइन विश्वात धुमाकूळ घालणाऱ्या वेबसीरिजचं विश्व त्यांनी आपल्या लेखातून मांडलं आहे. त्याचबरोबर आजही लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ‘अमूल’ कंपनीची वाटचाल त्यांनी आपल्या लेखातून स्पष्ट केली आहे. तसेच व्हिडिओ गेम्सची वेगळी दुनिया आणि या क्षेत्रातली व्यावसायिकता त्यांनी उलगडली आहे. त्याचबरोबर ओला, उबरसारख्या टॅक्सी क्षेत्रातल्या कंपनीची व्यवसाय उलाढाल स्पष्ट केली आहे. तसेच हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीचं त्यांनी डोळसपणे निरीक्षण केलं आहे. राजकारणामध्ये असलेला उद्योगसमूहांचा प्रभाव यांनी स्पष्ट केला आहे आणि हिंदुस्थानी ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेवर त्यांनी भाष्य केलं आहे. या पुस्तकातील लेख वाचून लेखकांची आसपासच्या जगाकडे पाहण्याची अभ्यासू मनोवृत्ती दिसून येते. लेखकांनी प्रत्येक गोष्टीमधील सूक्ष्म घटकांचा अभ्यास करून त्यावर आपलं मत मांडलं आहे. ही मतं मांडतांना त्यांनी विशिष्ट कंपनीच्या इतिहासाचा संदर्भ घेऊन त्या कंपनीच्या सध्याच्या नफा-तोट्यांवर सोप्या भाषेत आकडेवारीच्या आधाराने लेखन केलेले आहे. त्यामुळे हे लेखन वरवरचं न वाटता या लेखांना एक विश्वासर्हता प्राप्त होते. लेखक स्वत: सी.ई.ओ. म्हणून अनेक वर्षे काम करत असल्याने कामानिमित्त त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या. त्यामुळे या अनुभवांचा आणि कामाचा पूरेपूर वापर त्यांनी आपल्या लेखांमधून केलेला आहे. त्यांनी अनेक बाबतीत मांडलेली मते विचार करण्यास भाग पाडतात. एका गोष्टीचा अनेक अंगांनी आणि विविध बाजूंनी त्यांनी विचार केला आहे. सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. तसेच प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर विठ्ठल कामत यांचे शुभाशीर्वाद या पुस्तकाला मिळाले आहेत. आपण रोज जगत असलेल्या जगातील अनेक अज्ञात गोष्टी या पुस्तकामुळे कळून येतात. त्यामुळे ज्यांना या व्यावसायिक क्षेत्रात स्वत:चं अस्तित्व निर्माण करायचं आहे त्यांनी हे पुस्तक आवर्जून संग्रही बाळगण्यासारखं आहे. – देवेंद्र जाधव ...Read more

  • Rating StarVinay V Nandurdikar

    आज वाचून पूर्ण...या पुस्तकामुळे निश्चितच महत्त्वाच्या विषयांची ओळख होते, विषयाचे महत्त्व आणि गांभीर्य लक्षात येते.

  • Rating Starलोकप्रभा, 30 मार्च २०१८

    ‘सी.ई.ओ.च्या केबिनमधून’ या डॉ. गिरीश वालावलकर लिखित पुस्तकातून कॉर्पोरेट जगाची एक वेगळी झलक पाहायला मिळते. एकूण ४३ प्रकरणे असणाऱ्या या पुस्तकात आपल्या आजूबाजूला घडणारे आर्थिक बदल, त्यातून निर्माण होणाऱ्या विकासाच्या संधी आणि त्याचे देशातल्या प्रत्येकस्तरातल्या नागरिकांच्या जीवनशैलीवर होणारे परिणाम याचे ओघवत्या भाषेत वर्णन करण्यात आले आहे. लेखकाला अनेक बहुराष्ट्रीय कंपन्याच्या सी.ई.ओ. आणि संचालक पदांवर काम करण्याचा अनुभव असल्याने हे पुस्तक अतिशय अभ्यासपूर्ण झालंय. पुस्तकातल्या लेखांच्या विषयांमध्ये वैविध्य आहे. ‘उद्योगी श्रीमंती’ या लेखाची स्वतःची नीतिमूल्यं जपूनसुद्धा संपत्ती कमावता येते, हे विविध उद्योगपती आणि त्यांनी आपली औद्योगिक साम्राज्ये उभी करण्यासाठी वापरलेले मार्ग यांची उदाहरणे देऊन विशद केलं आहे. ‘स्विस बँकांची वादग्रस्त व्यावसायिकता’ या लेखात स्विस बँकांची व्यवसाय करण्याची पद्धती आणि त्यांच्या ग्राहकांचं जगभर पसरलेलं जाळं याविषयी सविस्तर चर्चा केली आहे. ‘इंग्लिश बिझनेस’ या लेखामध्ये ब्रिटिश लोकांच्या मानसिकतेवर प्रकाशझोत टाकला आहे. आज आपल्या देशात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. आपल्या तरुणांजवळ एखादी नवी कल्पना असेल आणि प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी असेल, तर ते शेकडो कोटी रुपयांची उलाढाल करणारी कंपनी उभी करू शकतात हे ‘नावीन्यपूर्ण कल्पनेवर आधारलेली उद्योजकता’ या लेखात व्हाट्सअ‍ॅप आणि फेसबुकचे उदाहरण देऊन लेखकाने स्पष्ट केले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या प्रकारची मानसिकता जोपासावी लागते, त्याचा उहापोह ‘शिखरापर्यंतच्या वाटचालीसाठी’ या लेखात केले आहे. लेखक सांगलीसारख्या एकेकाळच्या छोट्या गावातून आलेले आहेत. त्यांना स्वतःला शाळेत जाण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट करायला लागायची. आज शेकडो कोटी बाजारमूल्य असणाऱ्या वंâपन्यांच्या सी.ई.ओ. आणि संचालकसारख्या मोठ्या पदापर्यंत पोहोचलेल्या लेखकाला मोठ्या कष्टाने मोठे होणे म्हणजे काय असते हे चांगले माहित आहे. हे पुस्तक लेखकाला असणारे फक्त आर्थिक भान दाखवते का? तर नाही. त्यांच्या सामाजिक जाणिवासुद्धा प्रचंड जागरूक असल्याचा प्रत्यय पुस्तक वाचताना येतो. याचे एक उदाहरण येथे देता येईल. ‘उंबऱ्यावरची महागाई’ या प्रकरणात कराडला काही दिवस राहात असताना त्यांच्या घराजवळच्या वस्तीतल्या माथाडी कामगारांशी त्यांची बNयांपैकी ओळख झाली. आपली कुटुंबे खेड्यात सोडून रोजीरोटीसाठी ते कराडमध्ये येऊन राहिले होते. हे कामगार एका तात्पुरत्या उभारलेल्या ताडपत्रीच्या हॉटेलात रात्री जेवायला जायचे. महागाईमुळे हॉटेल मालकाने दर वाढवल्याने त्या कामगारांवर झुणका भाकर खाण्याऐवजी फक्त भाकर मिर्ची खाण्याची वेळ आली. कधी कधी तर त्यांना अर्धपोटीही झोपावे लागायचे. सामान्य माणसावर होणारे महागाईचे परिणाम विशद करताना दिलेले माथाडी कामगारांचे वास्तवादी उदाहरण हे लेखकाचे आर्थिक बाबींवरचे विवेचन उथळ नसून देश आणि नागरिक त्याच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते. ‘चित्राच्या व्यापाराचे रंग’ या लेखामध्ये आपण केवळ एक कलाकृती म्हणून पाहात असलेल्या पेटिंग्जमागे किती सखोल व्यावसायिक आराखडे असतात ते उत्तम रीतीने समजावून सांगितलं आहे. जर्मनीमध्ये पहिल्यांदा गेल्यावर लेखक ज्या टॅक्सीत बसतात ती ‘मर्सिडीस बेन्झ’ असते. टॅक्सीचा ड्रायव्हर सांगतो की, जर्मनीमध्ये ‘मर्सिडीझ बेन्झ’ ही दुय्यम दर्जाची गाडी समजली जाते आणि ती टॅक्सी म्हणून वापरली जाते. भारतात अति श्रीमंतांची गाडी म्हणून मान्यता असलेल्या ‘मर्सिडीझ बेन्झ’बद्दलच, ती गाडी जिथे बनते त्या देशातीलच हे स्थानिक मत’ लेखकाप्रमाणेच आपल्यालासुद्धा आश्चर्याचा धक्का देऊन जातं. ‘उद्योग जगतात काटकसर हा फार महत्त्वाचा गुण मानला जातो. कष्ट करून श्रीमंत झालेली माणसं ही कधी अनाठायी खर्च करत नाहीत आणि जी करतात ती श्रीमंत राहात नाहीत. हा अतिशय महत्त्वाचा संदेश ‘उद्योगी श्रीमंती’ या प्रकरणात लेखक देऊन जातात. फक्त कॉर्पोरेट क्षेत्र विंâवा व्यवस्थापकीय शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्र्यांनीच नाही तर अगदी सामान्य माणसानेही वाचावे आणि त्याला सहजगत्या समजावे असे हे पुस्तक आहे. आज आपल्याभोवतीचे जग विलक्षण वेगाने बदलते आहे. या बदलत्या जगाची गती समजून घेऊन स्वतःची उन्नती करून घेण्यासाठी हे पुस्तक प्रेरणा देते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या आर्थिक बदलांचे परिणामकारकपणे विवेचन करणाऱ्या पुस्तकाची मराठी साहित्यात असलेली कमतरता डॉ. गिरीश वालावलकर लिखित ‘सी.ई.ओ.च्या केबिनमधून हे पुस्तक नक्कीच भरून काढते. लेखकाची भाषाशैली साधी आणि सरळ आहे. त्यामुळे ती थेट मनाला भिडते. स्वतःचे काही अनुभव लेखकाने मिश्किल आणि मनोरंजक शब्दात सांगितेले आहेत. ते वाचताना वाचकाला खेळकर प्रसन्नता जाणवत राहते. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more