Mani Bhaumik

About Author

Birth Date : 30/03/1931

पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथल्या तामलुक खेड्यातील एका झोपडपट्टीत भौमिक यांचा जन्म झाला. चक्रीवादळे, महापूर, दुष्काळ व गरिबी आदी समस्यांना तोंड देत त्यांचे बालपण गेले. त्यांनी शिष्यवृत्तीच्या साहाय्याने आपले शिक्षण पूर्ण करत पदार्थविज्ञानात खरगपूर, आय.आय.टी. येथून पीएच.डी. मिळवली. १९५९मध्ये ते स्लोन शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात संशोधन करण्यास गेले. त्यांचे काम पाहून १९६८मध्ये `नॉरथ्रॉप कॉर्पोरेट, रिसर्च लॅबोरेटरी या जगप्रसिद्ध संस्थेने त्यांना आपल्याकडे काम करण्यासाठी बोलावले. तिथे भौमिक यांनी संशोधनातून जगातील अत्यंत कार्यक्षम असे पहिले एक्सायमर लेसर किरण तयार करणारे यंत्र निर्माण केले. या लेसर किरणांच्या साहाय्याने माणसाच्या बुबुळाच्या वक्र पृष्ठभागाला पाहिजे तसा आकार देण्याची शस्त्रक्रिया त्यांनी शोधली. यामुळे डोळ्यांचा नंबर जाऊन चश्मा किंवा लेन्सेस यांशिवाय माणसाला अधिक स्वच्छ दिसू लागते. या क्रांतिकारी शस्त्रक्रियेला लॅसिक (Lasik) असे नाव पडले. यामुळे भौमिक यांचे नाव जगभरात प्रसिद्ध झाले. त्यांचे अनेक संशोधननिबंध प्रसिद्ध आहेत. क्वांटम पदार्थविज्ञान, विश्वरचनाशास्त्र यांमध्ये लागणारे अद्भुत शोध व त्यांचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम या विषयांत त्यांना रस आहे. त्यांनी क्वांटम नावाची एक मालिका तयार केली असून, ती सध्या लोकप्रिय होत आहे. बंगालमध्ये भौमिक यांनी `भौमिक एज्युकेशनल फाउंडेशन स्थापन केले आहे. त्याद्वारे अत्यंत हुशार, पण गरीब विद्याथ्र्यांना दरवर्षी मदत केली जाते.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
PARMESHWAR EK SANKETIK NAV Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

VAISHAKH
VAISHAKH by RANJEET DESAI Rating Star
ANGHA ATUL KILLEDAR

रणजित देसाईंच्या अगदी सुरवातीच्या काळातला हा कथासंग्रह. ग्रामीण बाजाच्या या कथा रणजित देसाईंची भाषेवरची आणि माणसे निरखण्याची शैली दाखवतात. सर्व कथा वाचनीय. शाळेत असतानाच्या मे महिन्याच्या सुट्ट्या आठवल्या. हा कथासंग्रहसुद्धा तसाच हपापल्या सारखावाचून काढला. ...Read more

ANANDTARANG
ANANDTARANG by GRECHEN RUBIN Rating Star
DAINIK LOKMAT 15-09-2019

परिवर्तनाची बारा महिने... माणसाला मिळालेल्या आयुष्याला प्रवाहीपणे वरदान लाभले आहे. परंतु, कधी कधी माणूस एखाद्या चक्रव्यूहात अडकत जातो. एव्हाना त्याच्या आयुष्यात आनंद, समाधान, सुख, शांतता हे शब्द त्याला निरर्थक वाटू लागतात. ग्रेचेन रुबिनला पण आयुष्या्या एका विशिष्ट टप्प्यावरती अनपेक्षितपणे वेळेचे महत्त्व अधोरेखित होते आणि तिथून पुढे सुरू होतो त्याच्या आनंदाचा नवा शोध. त्याच परिवर्तनाच्या नांदीला हाताशी ती एक वर्ष हॅपीनेस प्रोजेक्टली वाहून घेते. आनंदी कसे व्हावे याविषयी उपजत आलेले शहाणपण, युगानुयुगाचे संशोधन आणि माहिती यांच्या आधारे तंत्रशुद्ध शिक्षण घेते. हा तिचा बारा महिन्यांचा प्रवास म्हणजे नेमकं काय आहे. त्यात तिने कोणते कोणते प्रयोग केले त्याची रोचक कहाणी म्हणजे आनंदतरंग हे पुस्तक. ...Read more