
SARVA by VYANKATESH MADGULKAR
Niren Apte पुणे आकाशवाणीमध्ये नाग आला आणि तो मारायला आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांनी व्यंकटेश माडगूळकरांना बोलावलं....
माडगूळकर बांबूच्या जंगलात हरवले. दूरदूरपर्यंत कोणी दिसेना, रात्र जंगलात काढायची वेळ आली. पण एका वाटेवर गायीचं शेण दिसलं आणि त्यावरून त्यांनी जवळच्य गावाचा रास्ता शोधला. माडगूळकरांनी एकदा अरण्यवाचन केलं. संपूर्ण रान वाचून आपल्यासमोर उभं केलं. हे सगळं वर्णन वाचायचं असेल तर त्यांचं " सरवा" पुस्तक वाचायला हवं.
पुस्तकाचं नाव सरवा ठेवलं आहे. कारण शेत तोडून झाल्यावर खाली जे दाणे, पीक उरतात त्याला सरवा म्हणतात. माडगूळकरांनी विपुल लेखन केलं. त्यातून जे उरलं ते त्यांनी `सामना` दैनिकाची लिहिलं आणि त्याचं हे पुस्तक आहे.
ह्या पुस्तकात प्राणी, वनस्पती ह्यांची अनेक निरीक्षणे आहेत आणि सोबत माणूसही वाचला आहे. त्यामुळे हे पुस्तक एकदा तरी वाचायला हवे.
...Read more
Archana Gore "बकुळा"
सुधा मूर्तींची प्रेम कथा, श्रीकांत आणि श्रीमती ची. साधी सरळ समजण्यासाठी सोपी वाचकाला खेळवून ठेवणारी. प्रेम तर आहेच पण संघर्ष देखील आहे त्या दोघांचा. यशाच्या मागे धावता धावता श्रीकांत खूप पुढे निघून जातो आणि श्रीमती मात्र तिथेच राहते मनाने. केचा शेवट अगदी चटका लावून जातो मनाला, स्तब्ध करून जातो, कारण श्रीमतीने घेतलेला एक निर्णय जो सहजा सहजी कोणीच घेणार नाही. श्रीकांत ने बकुळीची फुले जपली पण सुगंध नाही जपता आला त्याला.....
©अर्चना गोरे.. ...Read more