Girija Keer

About Author

Birth Date : 05/02/1900

गिरिजा कीर यांची १०२ पुस्तके प्रसिद्ध असून त्यात बालवाङ्मयाची २९ पुस्तके आहेत. पुरस्कार – एकूण पुरस्कार ४९, त्यातले ४ राज्य पुरस्कार. महत्त्वाचे पुरस्कार – ह.ना. आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार – साहित्य परिषद, पुणे. कमलाबाई टिळक पुरस्कार – पुणे मराठी ग्रंथालय. अभिरुची पुरस्कार – मराठी वाङ्मय परिषद बडोदे. श्री अक्षरधन स्त्री-साहित्यिका पुरस्कार, मुंबई. आत्मचरित्राला चार पुरस्कार – (गोवा, परभणी, कोरेगाव, को.म.सा.प. इत्यादी). ग्रंथोत्तेजक संस्था, पुणेतर्फे २०१२ साली जन्मठेप या पुस्तकास पुरस्कार. सन्मान – वणीच्या पहिल्या लेखिका संमेलनाच्या उद्घाटक. बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा (कोल्हापूर, सेलू, सावंतवाडी या ठिकाणी). अ.भा. मराठी साहित्य संमेलनात कथाकथन सत्राच्या अध्यक्षा (चंद्रपूर, अमरावती, आवास, महाबळेश्वर). कथाकथनाचे २०००च्यावर कार्यक्रम, अमेरिकेत कथाकथन सम्राज्ञी असे मानपत्र. ठाणे जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा. श्री शारदा ग्रंथप्रसारक संस्था, फोंडा – गोवा आयोजित लेखिका संमेलनाच्या अध्यक्षा. कोकण मराठी साहित्य परिषद – मुंबई जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा. इंदिराजी वीरांगना अ.भा. महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा – पुणे. १६ वर्षे आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक प्रकल्पात सहभाग. १२ वर्षे जन्मठेपेच्या गुन्हेगारांसाठी तुरुंगात जाऊन कैद्यांशी सुसंवाद व समुपदेशन (येरवडा जेल – पुणे; आधारवाडी जेल – कल्याण; अग्वाद जेल – गोवा; कळंबा जेल – कोल्हापूर). बालगुन्हेगारांसाठी कथाकथन ( जन्मठेप , इथं दिवा लावायला हवा , राखेतली पाखरं ही तीन पुस्तकं सामाजिक कार्याच्या अनुभवावर प्रसिद्ध). समाजकार्यासाठी एकूण ६ पुरस्कार व सन्मान. सह्याद्री वाहिनीवर, झी व ई-टीव्ही अशा वाहिन्यांवर दीर्घ मुलाखती. दूरदर्शन व आकाशवाणी यांवर अनेक कार्यक्रम. मुंबईतल्या अनेक शाळांतून फिरून, मराठी वाचन-लेखन यावर चर्चा, कृतिसत्रे. मराठी कथा, मुलाखती यांचे हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगु या भाषांत भाषांतरे. उडिया भाषेत मनबोली या कथासंग्रहाचे मनकथा या नावाने भाषांतर. कथाजागर या कथासंग्रहाचे उर्दू भाषांतर प्रसिद्ध होणार आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
AKASHVEDH Rating Star
Add To Cart INR 150
JANMATHEP Rating Star
Add To Cart INR 150

Latest Reviews

FOUR SEASONS
FOUR SEASONS by SHARMILA PHADKE Rating Star
Shruti Tambe

फोरसीझन्स वाचली. आवडली. पुरवून वाचली. बरेच दिवस ती संपूच नये असं वाटत होतं. अभयारण्यं पाहिलेली आहेत. पण ग्रासलॅन्डचं नैसर्गिक, वरवर अनाकर्षक वाटणारं सौंदर्य, अभयारण्यामुळे उखडून टाकले गेलेले साधेभोळे लोक, निसर्गासोबत जगणारे आदिवासी-राक्षसी विकासाचया कल्पना आणि अतिशय संवेदनशीलतेनं हे पाहून बदलणारी एमराल्ड!-हे सुरेख बांधलं गेलंय. सगळ्यात मनाला भिडली उभ्याआडव्या पसरलेल्या माळरानांची वर्णनं-टोचऱ्या, खुरट्या गवतापासून ते मोठ्ठ्या वृक्षांपर्यंतची सगळी दुनिया सांभाळणारं माळरान. भारत हा खरं तर निम्मापाऊण माळरानच आहे. या माळरानाची शान असणारे तरस, कोल्हे, लांडगे, हरणं, ससे-सगळंच मनोहारी. तुम्ही हे सगळंच रेखाटलंयत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुंदरबन, मुंबई, माळरान आणि इटली ही जगं वेगळीही आहेत आणि एकात्मही. हे तुम्ही मनाला भिडेल आणि पोहचवेल असं सांगितलंय. कादंबरीचे तुकडे वाचतावाचता मुंबईकर विकासवादी मुलगी ते मानवी जीवन, स्थलांतरं, शोषण, अगतिकता, नैसर्गिकता, प्रयत्नवाद हे समजून घेणारी एक प्रगल्भ शहाणिव हळूहळू तिच्यात कशी येते ते तुम्ही उलगडून दाखवलंय. कामासाठी सध्या पश्चिम महाराष्ट्रातल्या अभयारण्यात फिरत्येय. ओसाड होत चाललेली माळरानं, बेमुर्वत फोफावणारी ऊसशेती, जंगलात माणसं घुसत गेल्यानं धुपणारा निसर्ग, "मोठ्ठ्या" विकासाच्या स्वप्नात आंधळी झालेली मध्यमवर्गीय लक्षावधीची झुंड यात तुमची फोर सीझन्स एक समजुतदार, प्रगल्भ असा सूर लावते. इतकं सुरेख प्रवाही गद्य बऱ्याच दिवसांनी वाचायला मिळालं ते तुमच्या या कादंबरीमुळे. त्याबद्दल थॅंक्यू. आणि तुम्ही यापुढेही असंच सकस आणि सरस लिहित राहाल अशी शुभेच्छा. आपली, श्रुती तांबे ...Read more

FOUR SEASONS
FOUR SEASONS by SHARMILA PHADKE Rating Star
Veena Gavankar

ब-याच दिवसांनी एक खूप छान कादंबरी वाचायला मिळाली.शर्मिला फडकेंची फोर सीझन्स.लेखिकेची भाषा अतिशय समृद्ध. ओघवती शैली.वर्तमान आणि भूतकाळाच्या अनुभवांचा सुंदर गोफ.भविष्याचं सकारात्मक सूचन.लेखिकेचा पर्यावरणाचा अभ्यास,`निसर्गाचं शहरीकरण `होण्यातील धोक्यांच इशारा..सारं काही वाचताना खिळवून ठेवतं.खूप तयारीनं अभ्यासून लिहिलेली ही कादंबरी मला अतिशय आवडली.अभिनंदन शर्मिला फडके. खूप लिहा.शुभेच्छा. ...Read more