DR. KAMALKUMAR MAHAVAR

About Author


DR. KAMAL KUMAR MAHAWAR WAS BORN IN KOLKATA, INDIA. AFTER GRADUATING IN MEDICINE FROM KOLKATA MEDICAL COLLEGE IN 1996, HE OBTAINED HIS MS IN GENERAL SURGERY FROM THE PRESTIGIOUS PGIMER, CHANDIGARH. AFTER COMPLETING HIS POSTGRADUATE STUDIES FROM THE UNIVERSITY OF LIVERPOOL, DR. MAHAWAR WORKED AS A CONSULTANT GENERAL AND BARIATRIC SURGEON AT THE NATIONAL HEALTH SERVICE (CITY HOSPITALS SUNDERLAND NHS TRUST) IN LUCKNOW - ACTIVELY INVOLVED IN RESEARCH - FOR SEVERAL PRESTIGIOUS SCIENTIFIC JOURNALS - AND HIS COLUMN `ANTAGONIZER ON THE POPULAR WEB PLATFORM INDIA MEDICAL TIMES DEALS WITH ISSUES AFFECTING INDIAN HEALTHCARE IN VARIOUS WAYS. HE ALSO WRITES A BLOG FOR ETHEALTHWORLD.COM. BEING A PRACTICING MEDICAL DOCTOR HIMSELF, HE FOUND THE OPPORTUNITY TO REFLECT ON VARIOUS ETHICAL AND METHODOLOGICAL ISSUES PLAGUING HEALTHCARE IN INDIA AND CREATED `THE ETHICAL DOCTOR TO RAISE AWARENESS.

डॉ. कमल कुमार महावार यांचा जन्म भारतातील कोलकाता शहरात झाला. १९९६साली कोलकाता मेडिकल कॉलेजमधून वैद्यकिय क्षेत्रात पदवी प्राप्त करत, त्यांनी प्रतिष्ठित पीजीआयएमईआर, चंदीगड इथून जनरल सर्जरीमध्ये एमएस पदवी प्राप्त केली. लिव्हरपूल विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर, डॉ. महावार हे ळख्मधील नॅशनल हेल्थ सर्व्हिस (सिटी हॉस्पिटल्स सुंदरलॅन्ड एनएचएस ट्रस्ट) इथे कन्सल्टन्ट जनरल आणि बॅरिएट्रिक सर्जन म्हणून काम - संशोधनात सक्रियपणे सहभाग - अनेक प्रतिष्ठित वैज्ञानिक जर्नल्सचे – तसेच लोकप्रिय वेब प्लॅटफॉर्म इंडिया मेडिकल टाइम्सवरील त्यांचा `अ‍ॅन्टॅगोनायझर हा स्तंभ भारतीय आरोग्यसेवेवर विविधांगी परिणाम करणार्‍या विषयांवर आहे. ETHEALTHWORLD.COM.साठी ब्लॉग लिखाणदेखील ते करतात. स्वत: एक प्रॅक्टिसिंग मेडिकल डॉक्टर असल्यामुळे भारतातील आरोग्य सेवेला त्रास देणार्‍या विविध नैतिक आणि पद्धतशीर मुद्द्यांवर चिंतन करण्याची संधी त्यांना मिळताच ‘द एथिकल डॉक्टर’ची निर्मिती करून जनजागृती केली.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE ETHICAL DOCTOR Rating Star
Add To Cart INR 360

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोहोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
मिलिंद रोहोकले

फारच छान आहे