DAINIK LOKSATTA 01-12-2019 फ्रँकलिन समजून घेण्यासाठी...
मानवी आयुष्य सुखावह करण्यासाठी आवश्यक असणारे शक्य तितके सारे काही एकाच आयुष्यात साध्य करणारे बेंजामिन फ्रँकलिन हे एक जगप्रसिद्ध असं प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व. अमेरिकेत सार्वजनिक क्षेत्रातील अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा, सारवजनिक ग्रंथालये अशा यंत्रणांपासून अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. खरं तर बेंजामिन यांचा जन्म एका गरीब कुटुंबातला. दारिद्र्याशी झगडत, पडेल ती कामं करत ते जीवन कंठत होते. मात्र या परिस्थितीपासून जगातील एक प्रभावशाली व्यक्ती बनेपर्यंतचा त्यांचा प्रवास खडतर होता. अनेक नाट्यमय वळणं त्यात आली. मात्र त्यामुळे बेंजामिन यांची जीवनदृष्टी अधिक प्रगल्भ होत गेली. वयाच्या बाराव्या वर्षापासून मुद्रक असलेल्या भावाच्या व्यवसायात मदत करताना त्यांनी जो अनुभव कमावला, त्यामुळेच पुढे ते मुद्रण व्यवसायातही यशाची भरारी मारू शकले. ‘नाही रे’पासून ‘आहे रे’पर्यंतचा त्याचा हा प्रवास समजून घेण्यासाठी ‘बेंजामिन फ्रँकलिन’ हे आत्मचरित्र उपयुक्त आहे. सई साने यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. ‘बेंजामिन फ्रँकलिन - एक आत्मचरित्र’ ...Read more
Eknath Marathe मी एकदा वाचलेले पुस्तक परत वाचत नाही पण हे एकमेव पुस्तक त्याला अपवाद आहे. चारदा वाचले आहे. मुलांना मानगूट पकडून वाचायला लावले आहे !