* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171619689
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 876
  • Language : MARATHI
  • Category : CLASSIC
  • Discount : Individual(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHIVSENA CHIEF BALASAHEB THACKERAY WAS KNOWN FOR HIS FEARLESS, OUTSPOKEN , FREE STYLE OF SPEECH . HIS POLTICS BASED ON HINDUTVA & INTER STATE MIGRATION SETS NEW PATTERNS IN THE POLITICS OF MAHARASHTRA . SO BALASAHEB THACKERAY’S EVERY STATEMENT WAS ALARM FOR THE POLITICAL CHANGES DURING HIS ERA. BALASAHEB THACKERAY SPOKE HIS MIND IN MANY FREEWHEELING INTERVIEWS GIVEN TO SAMANA EDITOR SANJAY RAUT . THESE INTERVIEWS ARE MOST IMPORTANT DOCUMENTATION OF MAHARASHTRA POLITICS. THE BOOK NAMED ‘EKVACHANI PART 1&2 WILL REMIND BALASAHEB THACKERAY’S ERA TO ITS READERS .
हिंदुत्वाच्या जोरावर ज्यांनी महाराष्ट्राची सत्ता मिळवली आणि केंद्रातही शिवसेनेला सत्तेत आणलं, त्या शिवसेनेचा अनेक वर्षं चेहरा असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या परखड मुलाखती ‘एकवचनी’ या पुस्तकात संजय राऊत यांनी एकत्र केल्या आहेत. बाळासाहेबांचा सडेतोड स्पष्टवक्तेपणा जो जगद्विख्यात होता, तो विशेषत्वाने या मुलाखतींमध्ये जाणवला आहे. कडवा हिंदुत्ववाद, दंगली, गँगवार याविषयी त्यांनी आपली मते परखडपणे मांडली आहेत. शरद पवार, सोनिया गांधी, राजीव गांधी, इंदिरा गांधी यांसारख्या नेत्यांवर प्रखर टीका केली आहे. पक्षांतर करणाऱ्या छगन भुजबळांसारख्या नेत्याचेही त्यांनी वाभाडे काढले आहेत. भ्रष्टाचार, बेरोजगारी या समस्यांवरही त्यांनी आपली मते मांडली आहेत. शिवसेना मतभेद, भाजपबरोबर असणारे सबंध या राजकारणाशी संबंधित प्रश्नांना उत्तरे देतानाच देवधर्म, नास्तिकता, श्रद्धा, कुटुंब यांविषयीही ते भरभरून बोलले आहेत. मराठी अस्मितेचा अभिमान बाळगणाNया बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू या मुलाखतींमधून समोर येतात. शिवसेनेची धोरणं, शिवसेनेचे आचारविचार, अपेक्षा यांसोबतच शिवसेनेचा इतिहास, भविष्यकाळ या सर्वांविषयी बाळासाहेबांची मतं आणि विचार या मुलाखतींमधून प्रकट होतात.

No Records Found
No Records Found
Keywords
BALASAHEB THAKARAY, SANJAY RAUT, HINDISAM, SHIV-SENA, MAHARASHTRA, CONGRESS, SHARAD PAWAR, SONIAGANDHI, INDIRA GANDHI, RAJEEV GANDHI, PAKISTAN, POLITICS, BRIBERY, SAMANA, SHIVRAI, BABARI, RAM MANDIR, INTERVIEW, MELAVA, MUMBAI MUNICIPAL, CORPORATION, BJP, RAJ THAKARAY, UDDHAV THAKARAY, MEDIA, ELECTION , SAVARKAR, HINDUISAM, KASAB, TERORISAM, AJIT PAWAR,YUVASHAKTI, FARMERS, MNS, CARTOONS, MEDIA, WORKERS, MANISHANKAR
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    बाळासाहेब ठाकरे यांच्या घणाघाती मुलाखती... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ‘सामना’ चे संपादक, आणि १९९४ पासून संजय राऊत हे कार्यकारी संपादक आहेत. बाळासाहेबांना दैनिकाच्या दैनंदिन कामकाजाकडे पाहण्याएवढी उसंत मिळणे अशक्यच; त्यामुळं कार्यकारी संपादक ज कोणी असेल त्यालाच बाळासाहेबांची मानसिकता लक्षात घेऊन, त्यांच्या मनातले जाणून रोज अग्रलेखाची ‘लाईन’ ठरवणे क्रमप्राप्त असते. संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या वृत्ती-प्रवृत्तीला साजेलसे स्वत:चे व्यक्तिमत्व ‘सामना’ ची सूत्रे हाती आल्यावर घडवले आहे. सामना वाचला जातो तो शिवसेनेचे मुखपत्र म्हणून, बाळासाहेबांच्या मतांचे व्यासपीठ म्हणून! कार्यकारी संपादकाच्या वैयक्तिक मतांसाठी सामना कोणी वाचावा, अशी अपेक्षाही नसते; त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्याच भूमिकेत शिरून, त्यांच्याच भावभावनांना व धोरणात्मक व्यूहाला संपादकीय शब्दरूप देण्यातील कौशल्य उत्तमप्रकारे संजय राऊत यांनी प्रकट केले आहे, आणि बाळासाहेबांना रुचेल, शोभेल अशीच शैली घडवली आहे. क्वचितच कधी बाळासाहेबांची त्यांच्यावर खप्पामर्जी झाली असेल, इतक्या दोघांच्या वेव्हलेंग्थज् जुळलेल्या आहेत. बाळासाहेबांना शोभतील असे विचार बाळासाहेबांना शोभेल अशा आक्रमक शैलीत मांडण्याची ही कसरत संजय राऊत गेली सात-आठ वर्षे करीत आहेत. तरीही बाळासाहेबांची त्या त्या वेळची मते ही शिवसैनिकांना व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याच ठाकरी भाषेत हवी असतात. ही वाचकांची गरज लक्षात घेऊन संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या विस्तृत मुलाखती महिन्या-दोन महिन्याने सामनात देण्याचा परिपाठ ठेवला. इतर कोणीही घेऊ शकणार नाही, असं स्वातंत्र्य संजय राऊत यांनी या मुलाखतींच्या बाबतीत घेतले आणि बाळासाहेबांना अडचणीचे वाटणारे प्रश्नही विचारले आहेत. बाळासाहेबांनी हे प्रश्न संजय राऊत यांच्या मनातले नाहीत, सर्वसामान्य मराठी माणसाचे आहेत, असे समजून उत्तरे देऊन, सरसहा हाताळले, क्वचितच उत्तर देण्याचे त्यांनी टाळले, किंवा क्वचितच प्रश्नांना बगल दिली असे दिसते. एखाद्या दैनिकांत संपादकांच्या मॅरेथॉन मुलाखती वरचेवर येणे हा एकूण चमत्कारिकच प्रकार. पण ‘सामना’चे वैशिष्ट्य म्हणून त्याचा उल्लेख होऊ लागला. बाळासाहेबांचा बाणा रोखठोक बोलण्याचा! तशात मराठीचा घणाघाती वापर करण्याचा त्यांच्या स्वभाव. मुलाखतीत बोलताना एखादी शिवी वा बदनामीकारक विधान तोंडातून गेले तरी ते जसेच्या तसे छापा असा बाळासाहेबांचा आग्रह; त्यामुळे संजय राऊत यांच्या प्रश्नातही आडपडदा वा हातचे राखून न ठेवणे हा प्रकार नाही; त्यामुळे या मुलाखती वादळी व वादग्रस्तही ठरल्या. संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या एकूण ५२ मुलाखती त्यांच्यासाठी ते पंच्याहस्तीच्या पंधरा वर्षांत घेतल्या. पहिल्या दोन मुलाखती अनुक्रमे १९८७ व १९९२ मधील आहेत. परंतु पुढच्या पन्नास मुलाखती १ मे १९९४ पासून ३ जुलै २००१ या सात वर्षांतल्या आहेत. त्यात त्या त्या वेळच्या ज्वलंत समस्यांबाबतची बाळासाहेबांची मते त्यांच्या आक्रमक शैलीत व्यक्त झाली आहेत. या मुलाखतीच्या रूपाने बाळासाहेबांनी दीड हजारावर प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. शिवसेना, हिंदुत्व, सरकार, भाजपा, समाजवादी, काँग्रेस, विरोधी पक्ष, निवडणुका, मतदार, दौरे, शिवसेनेतील फाटाफूट, बंडखोरी भाजपा-शिवसेनेतील तणाव, पत्रकारिता, मीडिया, कामगारक्षेत्र, राज्यघटना, लोकशाही, खंडणी, दहशत, गँगवार, भ्रष्टाचार, ठाकरे यांच्या कुटुंबातील वाद, अवैध मार्गाने संपत्तीची जमवाजमव, शिवसैनिकांचे वर्तन, मुंबईचे मराठीपण, झोपडपट्ट्या, भूमिपुत्रांवरील अन्याय, त्या त्या वेळेचे राजकीय वातावरण व गणित, गोवारीचे हत्याकांड, दंगली, बॉम्बस्फोट, देशाचे नेतृत्व, रिमोट कंट्रोल, शेतमालाचे भाव, श्रीमंतांचे मित्र झाल्याचा आरोप, नोकरशाहीचा नाकर्तेपणा, राजकीय संन्यास, कुपोषणाने मृत्यू, कॉन्व्हेंट शाळा, महागाई, आर्थिक दिवाळखोरी, पक्षहिंसा, पाकिस्तान, काश्मीर, कारगिल, श्रीलंका व लिट्टे, दुकानांवरील मराठी पाट्या, खिस्ती मिशनरी, मुसलमानांचा मताधिकार काढून घेण्याचा आग्रह, तहलका, इस्लामचे आक्रमण, मणिपूरमधील बंड, एन्रॉन, श्रीकृष्ण आयोग, राज-उद्धव यांचे संबंध, नेपाळमधील राजवंश हत्या इ. कितीतरी विषय या मुलाखतीमध्ये आले आहेत. विषय पुन:पुन्हा आले आहेत स्वत:बद्दलसुद्धा ठाकरे यांनी वेळोवेळी काही बोलकी विधाने केली आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू त्यातून स्पष्ट होतात. या मुलाखतींमधून आपल्या सर्वच प्रश्नांची समाधानकारक किंवा मनासारखी उत्तरे मिळावीत, ही अपेक्षा करणे योग्य नाही. पारदर्शकतेलाही व्यावहारिक मर्यादा असतात; त्यामुळे काही ठिकाणी ‘बीटवीन द लाईन्स( वाचावे लागते. तशा जागाही खूप आहेत आणि अर्थपूर्ण, मार्मिक आहेत. असं खूप काही या मुलाखतींतून समोर येतं. ते विचारांना चालना देतं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book