* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: PARVANAS JOURNEY
 • Availability : Available
 • Translators : APARNA VELANKAR
 • ISBN : 9788177667521
 • Edition : 3
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 152
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
 • Available in Combos :DEBORAH ELLIS COMBO 9 BOOKS
Quantity
IN PARVANA’S JOURNEY, THE TALIBAN STILL CONTROL AFGHANISTAN, BUT KABUL IS IN RUINS. PARVANA’S FATHER HAS JUST DIED, AND HER MOTHER, SISTER, AND BROTHER COULD BE ANYWHERE IN THE COUNTRY. PARVANA KNOWS SHE MUST FIND THEM. DESPITE HER YOUTH, PARVANA SETS OUT ALONE, MASQUERADING AS A BOY. SHE SOON MEETS OTHER CHILDREN WHO ARE VICTIMS OF WAR — AN INFANT BOY IN A BOMBED-OUT VILLAGE, A NINE-YEAR-OLD GIRL WHO THINKS SHE HAS MAGIC POWERS OVER LANDMINES, AND A BOY WITH ONE LEG. THE CHILDREN TRAVEL TOGETHER, FORGING A KIND OF FAMILY OUT OF SHEER NEED. THE STRENGTH OF THEIR BOND MAKES IT POSSIBLE TO SURVIVE THE MOST DESPERATE CONDITIONS. ROYALTIES FROM THIS BOOK WILL GO TOWARD AN EDUCATION FUND FOR AFGHAN GIRLS IN PAKISTANI REFUGEE CAMPS.
...तेवढ्यात आणखी धमाके झाले. जमीन पुन्हापुन्हा हादरत होती. मुलांच्या डोळ्यांदेखत नेम धरून फेकल्यासारखा, त्यांच्या घरावरच बॉम्ब पडला. धूळ, धुराने भरलेला आगीचा लोळ आकाशात झेपावला... परवानाने उभारलेल्या तिच्या छोट्याशा दुनियेचे जळके तुकडे चौफेर विखुरले... एकमेकांना घट्ट बिलगून भेदरलेली मुलं रात्रभर खडकांच्या आडोशाला बसून राहिली. आकाशात घरघरणारी विमानं चेकाळल्यासारखी आग ओकत होती. संपूर्ण रात्र धुमश्चक्री चालली होती. धमाके थांबले, तेव्हा सकाळ झाली असावी. समोर फक्त धुमसणारी आग... धूर... आणि धूळ... दादी नव्हती. घर नव्हतं. काहीच नव्हतं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #JYOTSANALELE #BIOGRAPHY &TRUESTORIES #THEBREADWINNER #SHOUZIA #PARVANA #MUDCITY #APARNAVELANKAR#DEBORAHELLIS #PARVANAS JOURNEY #MEGHANADHOKEIAMATAXI #डेबोराएलिस
Customer Reviews
 • Rating StarVaishnavi Potdukhe

  I have found the book to be fascinating and stimulating at the same time. Hardly have I ever read books of such caliber of writing. Your books are an excellent piece of writing even though originally written by Deborah Ellis. The choice of words ad way of expression is just अप्रतिम. Again, I would just like to express my deepest thanks that because of you such amazing work could reach millions of people. From the time when I was 12 years old, I`ve read these three books innumerable number of times and yet I find myself crying at certain events. I am sure just the way it has changed my life for the better, it has for others as well. ...Read more

 • Rating StarPRAVHNA ANUBHAV MASIK , MARCH 2007

  अफगाण युद्धाने कुस्करलेल्या कळ्यांची कहाणी... अफगाणिस्तान हा सतत युद्धाच्या छायेत असलेला देश. तालिबान्यांनी या देशाचे लचके तोडलेच, पण अमेरिकेच्या हल्ल्यानंतर या देशाचा मोठा विद्ध्वंस झाला. लाखो माणसं बेघर झाली, कायमची जायबंदी झाली. हवाई हल्ल्यांमध्य घरं बेचिराख झाली. रक्ताची माणसं कायमची तुटली. तालिबान्यांच्या अत्याचारामुळे अफगणिस्तानातल्या मुलींच्या चेहऱ्यावर न कळत्या वयात बुरखा आला,, मुलींचं शिक्षण बंद झालं. कधीकाळी सफरचंदांच्या सुंदर बागा परसात असलेल्या, शेतीवाडीने समृद्ध असलेल्या अफगाण माणसावर दुसऱ्याच्या मदतीने, दुसऱ्याच्या तुकड्यावर जगण्याची वेळ आली. या सर्वांमध्ये जास्त होरपळली ती लहान मुलं. तालिबान्यांनी, अमेरिकेच्या विमानांनी आणि रणगाड्यांनी लाखो मुलांना पोरकं केलं. त्यांचे हात-पाय तोडले. कित्येकांचे जीवही घेतले. तीव्र नैराश्याच्या गर्तेत कित्येकांच्या भावना बोथट झाल्या आहेत. अजूनही कित्येक मुलं आपले युद्धामुळे दुरावलेले अब्बू-अम्मी परत भेटतील, या आशेवर आहेत. खायला अन्न आणि प्यायला पाणी मिळण्याची मारामार आहे. कुजलेलं मांस, गवत इतकंच नव्हे तर कागदही कित्येक भरकटलेल्या लहान मुलांच्या ‘मेजवानी’ साधनं झाली आहेत. या परिस्थितीत जगणाऱ्या चिमुरड्यांचं अत्यंत हृद्य असं दु:ख डेबोरा एलिस या अमेरिकन लेखिकेने आपल्या ‘द ब्रेडविनर’, ‘परवानाज् जर्नी’ आणि ‘मड सिटी’ या तीन पुस्तकांमधून मांडलं आहे. अफगाणिस्तानमधल्या परवानाची कहाणी सांगणारं परवानाज् जर्नी हे पुस्तक जेन अ‍ॅडॅम्स पीस अ‍ॅवॉर्डचं मानकरी ठरलं. या तीनीही पुस्तकांचा अनुवाद अपर्णा वेलणकर यांनी केला आहे. ‘परवाना’ व ‘शौझिया’ या पुस्तकांमधून वाचकांना भेटलेल्या परवाना आणि शौझिया या तेरा वर्षांच्या दोघी मैत्रिणी वाचकांच्या जिवाला चटके लावून जातात. अफगाण युद्धात बेचिराख झालेली आयुष्यं सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोन चिमुरड्या मुली आहेत. त्यांची कहाणी वाचून आपण थक्क होतो. आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबात सुरक्षित असलेल्या या दोघी मैत्रिणी मोठेपणी फ्रान्समध्ये जाऊन लॅव्हेंडर फुलांच्या बागेत बागडण्याचं स्वप्न रंगवत असतात, आयफेल टॉवरवर एकमेकींना भेटायचं ठरवत असतात. पण त्यांची ही स्वप्नं धूळीला मिळतात. एक धमाका होतो आणि या दोन मैत्रिणींची ताटातूट होते. त्यांची घरं बेचिराख होता. घरदार उद्ध्वस्त होतं. निळ्या फुलांच्या बागेत बागडण्याचं त्यांचं स्वप्न स्वप्नचं राहून जातं. तालिबान्यांच्या भीतीपोटी या दोघीही मैत्रिणी मुलाच्या वेशात वावरत असतात. लांबसडक केस कापून टाकतात. शौझिया पाकिस्तानातल्या निर्वासितांच्या छावणीत पळून जाते तर परवाना अफगाणिस्तानातच नरकयातना सोसते. पण या दोघींचा एकमेकांशी संवाद संपत नाही. आयुष्यात आलेल्या नवीन संकटांचा, नवीन घडामोडींचा उल्लेख त्या एकमेकींना लिहिलेल्या पत्रात करतात. ही पत्रं पोहोचवायला पोस्टमन कुठे असतो? जवळच्याच पिशवीत या मुली एकमेकींना लिहिलेली पत्रं जपून ठेवत असतात, एकमेकीला भेटल्यावर ती देणार असतात. शौझियाला पाकिस्तानात भटकताना आलेले अनुभव, तिला भेटलेली अन्नासाठी भांडणारी तिच्या देशातली निर्वासित मुलं मनाला चटका लावून जातात, तर परवानाला अफगाणिस्तानात अम्मीला शोधताना क्षणेक्षणी द्यावी लागणारी झुंज आपल्याला व्यथित करून जाते. हाय अल्ला, काय वेळ आणलीस तू या देशावर? एक छोटी मुलगी कळवळून मेली इथं; तिची अम्मीसुद्धा असू नये तिच्याबरोबर? हे परवानाच्या आईचे शब्द काळीज चिरून जातात. अतिशय सहज सोप्या भाषेत अनुवाद केलेली ही पुस्तकं वाचताना परवाना आणि शौझियाबरोबर आपणच प्रवास करतो आहोत असं वाटून जातं. चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या मुखपृष्ठांमुळे अफगाणिस्तानातली भीषणता लक्षात येते. प्रत्येकाने विकत घेऊन वाचावं असे हे पुस्तक आहे. ...Read more

 • Rating StarMAHARASHTRA TIMES 21-01-2007

  छळछावण्यातल्या जिवंत कहाण्या... तालिबानी राजवटीच्या छळकहाण्या लोकांना माहीत होत्या. तिथल्या हुकूमशहांची जुलमी राजवट आणि अमेरिकन सैन्याकडून होणारे बॉम्बहल्ले यामुळे उद्ध्वस्त झालेल्या जगाची माहितीही मिळाली. याच अंधेर नगरीत मुलींच्या वाट्याला आलेले अतयाचार आणि त्यांचं दु:ख प्रथमच या पुस्तकांच्या निमित्ताने लोकांसमोर आलं. केस कापून, मुलांचे कपडे घालून आपल्या कुटुंबाला जगवण्याची धडपड करणाऱ्या अफगाणी मुलीची कहाणी डेबोरो एलीस या लेखिकेने शब्दबद्ध केली. तिच ‘द ब्रेडविनर’ म्हणून मराठी वाचकांसमोर आली. त्या पुस्तकाला वाचकांचं प्रेम लाभलं. ‘द ब्रेडविनर’ पुस्तकात उल्लेख झालेल्या परवाना आणि शौझियाची कहाणीही तितकीच चटका लावणारी आहे. त्यांच्याही कहाणीला मराठी शब्दरूप देण्यात आलं आहे. शौझिया आणि परवाना दोघीही मैत्रीणीच. पण त्यांची कहाणी समांतर रेषेत घडते आणि दोन वेगवेगळ्या पुस्तकांतून वाचायला मिळते. शौझियाच्या आयुष्यातलं दु:ख कमी की परवानाच्या असा विचारही आपल्या मनाला करवत नाही. दोन्ही मुलींच्या आयुष्यात आलेले अनुभव चार भिंतीत आयुष्य काढणाऱ्या आपल्यासारख्यांचा थरकाप उडवते. ‘परवाना’ हा ‘द ब्रेडविनर’चा दुसरा भाग. परवानाची आई भावंडांपासून ताटातूट झाली आहे. अब्बू खंगून-,खंगून मेले. मृत्युच्या या तांडवाने ती अधिक खंबीर झाली आहे. तिला आपल्या आईला शोधायचं आहे. पण त्यासाठी जगायला हवं. पोटाची आग भागवण्यासाठी काहीही करायला हवं. उद्ध्वस्त शहरात आपल्याला काही काम मिळणार नाही, हे माहीत असतानाही ती चिकाटीने काम मिळवत राहते. एका कुटुंबात तिला सहारा मिळतो. पण आजूबाजूच्या अराजकामुळे ही माणसं आपल्यातलं माणूसपणही विसरतात. त्याचे चटके या मुलांना बसले. ते वाचून आपणही अस्वस्थ होतो. परवानाच्या आयुष्यात घडलेल्या घटना आपल्या विचारांच्या पलीकडच्या आहेत. तिला घाण आणि अस्वच्छतेचा तिटकारा आहे. पण तिच्या आसपास बॉम्बस्फोटने छिन्नविछिन्न झालेले देह पडलेले असतात. त्यातही ती स्वच्छता राखयाचं काम करत राहते. पण त्याहीपेक्षा लक्षात राहते ती तिच्या आईला भेटण्याची धडपड. परवानाला तिची आई भेटते. लौकिकार्थाने तिथे तिची कहाणी संपते, तरीही तिच्या भयानक प्रवासातले अनुभव आपल्याला सुन्न करतात. दुसरं पुस्तक ‘शौझिया’, शौझियाच्या आयुष्यातही परवाना सारखीच फरफट झालेली पण तिचे भोग अधिक तीव्र असतात. त्यामुळे परवानासारखं हिच्या आयुष्यात चांगलं घडावं असं आपण मनोमन म्हणत राहतो. पण तसं घडत नाही. शौझिया एका छावणीत थांबलेली. फ्रान्समधल्या लॅव्हेंडरच्या जांभळ्या फुलांच्या शेतात जाण्याचं स्वप्न पाहणारी. त्याच स्वप्नात राहून सत्याचा सामना करायला तयार असलेली शौझिया परिस्थितीशी जुळवून घ्यायला मुळीच तयार नाही. वीरा मौसीच्या कणखर नजरेतून दूर कुठेतरी पळून जाऊ, असं शौझियाचं स्वप्न आहे. आणि ती पळतेय, याच प्रयत्नात तिच्या वाट्याला येतो तो तुरुंगवास आणि अनेक दुष्ट अनुभव. म्हणूनच शौझियासारखी अनेक मुलं परिस्थितीमुळे लहानपणीच परिपक्व झाल्याचं दिसतं. शौझियाच्या वाट्याला जांभळ्या फुलांचं शेत येत नाही. पण आपण, ती कुठे तरी सुखी असेल, अशा विचारात हे पुस्तक संपवतो. दोनही अनुवादित पुस्तकांची शैली ओघवती आहे. पुस्तकाच्या विक्रीतून मिळालेलं ठराविक उत्पन्न अशाच मुलांच्या मदतीसाठी वापरलं जातंय. -अर्पणा पाटील ...Read more

 • Rating StarDAINIK PRABHAT 01-04-2007

  अफगाण युद्धात हरवलेलं लहानपण... विस्तीर्ण वाळवंटाचा आणि खळाळत्या नद्यांचा, भाजीपाला, शेतीमुळे समृद्ध आणि संपन्न अफगाणिस्तान हा मध्य आशियातला चिमुकला देश. या देशावर आक्रमण करणाऱ्या घुसखोरांच्या टोळ्यांनी अफगाणिस्तानातली सारी समृद्धी निर्दयपणे पायाखाल तुडवली आणि तिथूनच या देशाचा इतिहास रक्तलांछित झाला. आज सतत युद्धाच्या छायेत असलेला देश अशीच अफगाणिस्तानातच ओळख झाली. तालिबान्यांनी या देशाचे लचके तोडलेच; पण अमेरिकेच्या हल्ल्यानंतर या देशाचा मोठा विध्वंस झाला. लाखो माणसं बेघर झाली, काही कायमची जायबंदी झाली. रक्ताची माणसं कायमची तुटली. तालिबान्यांच्या अत्याचारामुळे अफगाणिस्तानातल्या मुलींच्या चेहऱ्यावर न कळत्या वयात बुरखा आला आणि मुलींचं शिक्षणही बंद झालं. या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीत सर्वाधिक नुकसान झालं ते लहान मुलांचं. आधी तालिबान्यांनी, नंतर अमेरिकेच्या विमानांनी आणि रणगाड्यांनी लाखो मुलांना पोरकं केलं. त्यांचं लहानपण हिरावून घेतलं. त्यांचे हात-पाय तोडले, कित्येकांचे जीवही घेतले. तीव्र नैराश्येच्या गर्तेत कित्येकांच्या भावना बोथट झाल्या आहेत. अजूनही कित्येक मुलं युद्धामुळे दुरावलेले आले अब्बू-अम्मी परत भेटतील, या आशेवर आहेत. खायला अन्न आणि प्यायला कुजलेलं मांस, गवत इतकंच नव्हे, कागद हीही कित्येक भरकटलेल्या मुलांच्या मेजवानीची साधनं आहेत. या भयाण परिस्थितीत जगणाऱ्या चिमुरड्याचं अत्यंत हृद्य असं दु:ख डेबोरा एलिस या अमेरिकन लेखिकेने आपल्या ‘द ब्रेडविनर’, ‘परवानाज् जर्नी’ आणि ‘मड सिटी’ या तीन पुस्तकांमधून मांडलं आहे. अफगाणिस्तानमधल्या परवान्याची कहाणी सांगणारं ‘परवानाज् जर्नी’ हे पुस्तक जेन अ‍ॅडॅम्स पीस अ‍ॅवॉर्डचं मानकरी ठरलं. या तीनही पुस्तकांचा ओघवता अनुवाद केला आहे अपर्णा वेलणकर यांनी. या पुस्तकांमधून वाचकांना भेटणाऱ्या परवाना आणि शौझिया या दोघी मैत्रिणींच्या आयुष्याबद्दल वाचताना आपल्या मनाला त्याचे चटके बसतात. अफगाण युद्धात बेचिराख झालेली आपली आयुष्यं सावरण्याचा आणि आपली स्वप्नं कधीतरी पूर्ण होतील, याची वाट बघणाऱ्या या दोन चिमुरड्या मुली. आपल्या साध्यासुध्या, मध्यमवर्गीय कुटुंबातल्या सुरक्षित वातावरणात राहत असताना मोठेपणी फ्रान्समध्ये जाऊन लव्हेंडर फुलांच्या बागेत बागडण्याचं स्वप्न दोघीही रंगवत असतात. तिथल्या आयफेल टॉवरवर एकमेकींना भेटायचंही त्या ठरवत असतात, पण एका धमाक्यात या दोन मैत्रिणींची ताटातूट होते आणि त्यांची घरं बेचिराख होतात. दोन मैत्रिणींनी रंगवलेलं सुंदर स्वप्न तिथंच तुटतं. तालिबान्यांच्या भीतीपोटी या दोघीही मुली मुलाच्या वेशात वावरत असतात. आपले सुंदर, लांबसडक केसही त्या कापून टाकतात. शौझिया पाकिस्तानातल्या निर्वासितांच्या छावणीत पळून जाते, तर परवाना अफगाणिस्तानातच नरक यातना सोसते. आयुष्याची एवढी वाताहात होऊनही या दोघींचा एकमेकींशी संवाद संपत नाही. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा, नवीन घडमोडींचा उल्लेख त्या एकमेकींना लिहिलेल्या पत्रात करत राहतात. पत्रं लिहूनही ती एकमेकींना पोहोचवण्यासाठीची सोय तरी युद्धात कुठे राहिलेली असते! मग जवळच्याच पिशवीत या मुली ही पत्रे ठेवत असतात आणि एकमेकींना भेटल्यावर ती देणार असतात. शौझियाला पाकिस्तानात येणारे अनुभव, तर परवानाला अफगाणिस्तानात अम्मीला शोधताना क्षणोक्षणी द्यावी लागणारी झुंज आपल्याला व्यथित करून जाते. अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत अनुवाद केलेली ही पुस्तकं वाचताना आपणही परवाना आणि शौझियाबरोबर प्रवास करतो आणि कधीतरी डोळ्यांत टचकन पाणी उभं राहतं. -वर्षा आठवले ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SHRIMAN YOGI
SHRIMAN YOGI by RANJEET DESAI Rating Star
Aaditya Patil

खरंतर छत्रपती शिवाजी महाराज हा मराठी वाचकांचा आणि लेखकांचा आवडीचा विषय . मराठी साहित्यात अनेक लेखकांनी शिवचरित्र वाचकांपुढे सादर केले.स्मरणात राहावे असे बाबासाहेब पुरंदरे, गजानन मेहेंदळे, वा.सी. बेंद्रे अशा लेखकांनंतर प्रसिद्ध लेखक ` स्वामी ` कार रणजत देसाई ह्यांनी अतिशय प्रेरणादायी कादंबरी स्वरूप शिवचरित्र वाचकांपुढे ठेवले. छत्रपती शिवराय हे महाराष्ट्रासाठी आदरयुक्त तेवढंच लाडकं व्यक्तिमत्व. शिवरायांचा जीवन काळ अगदी नजरेसमोर उभे राहील अशी कादंबरी लिहली आहे. आपल्या लेखन शैलीने प्रत्येक प्रसंग जिवंत करण्याची प्रतिभा लेखकांमध्ये आहे. त्यावर नरहर कुरुंदकर ह्यांची प्रस्तावना म्हणजे सोने पे सुहागा म्हणता येईल. रणजित देसाई ह्यांनी जेव्हा ह्या कादंबरीला हात घालण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा नरहर कुरुंदकरांनी मार्गदर्शक पर सूचना देणारे पत्र प्रस्तावना म्हणून दिली आहे. कादंबरी बद्दल बोलायचं झालं तर ११००+ पानांची ही कादंबरी वाचकास जागीच खिळवून ठेवते. शिवचरित्रातील घटना माहीत नाही असे किमान महाराष्ट्रात तरी कोणी सापडणार नाही. सर्व घटना, घटनाक्रम माहीत असताना सुद्धा कादंबरी मनाला अनामिक हुरहूर लावून ठेवते. गोष्ट सुरू होते ती भोसले आणि जाधव ह्यांच्या वैरापासून. त्यानंतर लखुजी जाधवांचा मृत्यू,शिवरायांचा जन्म, शहाजीराजांचा दुसरा विवाह,शिवरायांचे बालपण हा काळ सरतो. नंतर जिजाऊ - शिवबाची बंगळूरास शहाजी राजांशी भेट , त्यातच शहाजीराजांनी शिवबाला दिलेली जहागीरदारी इथून सुरू होते शिवरायांची राजकीय कारकीर्द व स्वराज्य स्थापनेची वाटचाल. पुढे रोहिडेश्र्वर येथील शपथ, तोरणेची मोहीम, स्वराज्याचा शुभारंभ अशा दिशेने वाटचाल करत स्वराज्याची पायाभरणी करतात. शिवरायांच्या परक्रमाची चाहूल ऐकत निजामशाही व आदिलशाही धसका घेउन मातब्बर सरदारांना शिवरायांवर चालून पाठवतात. पुढे अफजल वध, पन्हाळ्याचा वेढा , घोडखिंडची लढाई , स्वराज्यावर चालून आलेले मिर्झाराजे जयसिंग, पुरंदरचा तह अशी यथोचित मांडणी लेखकांनी केली आहे. पुरांदराच्या तहाने ढासळलेले राज्य न डगमगता पुन्हा नव्या जोमाने उभे करणारे शिवराय मनाला भावतात. आग्र्याच्या कैदेत बादशहाच्या हातावर दिलेल्या तुरी, राजांचे अनेक गुण दर्शवतात. ह्या सर्व सुख दुःखाच्या काळात शिवरायांना अनेक लोकांची सोबत लाभली. शिवरायांना जन्मनारी माता जिजाऊ , घडविणारे दादाजी कोंडदेव , पत्नी सईबाई ह्यांचं मृत्यूही मनाला चटका लावून जातो. अनेक वीर स्वराज्य निर्मिण्यासाठी खर्ची पडले . राजे विशाळगडावर जोपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत मृत्यूलाही उसंत न देणारे बाजीप्रभू देशपांडे, जेधे आणि ३०० बांदल सेना , राजांच्या कोंढाणा स्वराज्यात असावा ह्या. इच्छे खातर आपल्या मुलाचे लग्न बाजूला सारून मृत्यूला कवटाळणारे तान्हाजी , साल्हेर - मुल्हेरचा लढाईत पराक्रमाची शर्थ करणारे रामजी पांगेरा , पुरंदरच्या लढाईत धारातीर्थी पडलेले मुरारबाजी , अवघ्या साठ मावळ्या निशी पन्हाळा सर करणारे कोंडाजी फर्जंद, वेगाने शत्रूच्या गोटात दौडणारे प्रतापराव गुजर आणि सहा मराठी वीर ह्या आणि अशा हजारो मावळ्यांच्या रक्ताने न्हाऊन हे स्वराज स्थापन झाले. शूरता आणि राज्य कारभार ह्या दोन्ही गोष्टीत पारंगत असणारे पेशवे मोरोपंत पिंगळे, मुजुमदार, अनाजी दत्तो न्यायाधीश निराजीपंत , चिटणीस बाळाजी आवजी ह्यांची गुण स्वभाव सुद्धा तेवढ्याच प्रभावी पने लेखकांनी वाचकांसमोर मांडली आहे. आजारपणातील शिवरायांनी स्वतःशी केलेले संवाद तर अस्सल बावनकशी सोन आहे ह्या संवादासाठी लेखकांना कितीही पुरस्कार दिले तरी कमीच. कादंबरी वाचताना शिवरायांचे अनेक पैलू उलगडत जातात. अगदी लहान वयात खंडोजी बल्लाळ व त्याच्या भावांसोबत केलेलं राजकारण , शिवरायांची राजकारणी मुत्सद्दीपणा दर्शवतं . शिवरायांच्या सर्व धर्म समभाव चा सुद्धा प्रत्यय येतो. बजाजी निंबाळकर ह्यांचे धर्म पुनरागमन ह्यामुळे शिवरायांचे धर्मशास्त्रातील ज्ञान व आप्त स्वकियांबद्दल वाटणारा जिव्हाळा जाणवतो. संतश्रेष्ठ तुकोबा राया , समर्थ रामदास , काशी पंडित विद्वान गागाभट्ट ह्यांच्याशी असलेलं सख्य सुद्धा जवळून अनुभवायला मिळतं. अविरत कष्ट करण्याची तयारी , अफाट लोकसंग्रह, प्रजेबद्दल करुणा , उदंड आत्मविश्वास , कर्तव्य कठोरता, दूरदर्शी दृष्टी हे सर्व सामवलेले शिवराय हे एक युगपुरुष जाणवतात. त्यामुळे समर्थांनी केलेले शिवरायांचे वर्णन अगदीच अचूक वाटते : निश्र्चयाचा महामेरू | बहुत जनांसी आधारु | अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी ||१|| परोपकरचीया राशी | उदंड घडती जयाशी | जयाचे गुण महत्वशी | तुळणा कैशी. ||२|| ...Read more

ADAM
ADAM by RATNAKAR MATKARI Rating Star
Annasaheb Barde Patil

कालच वाचून झालं...! पुस्तक सुरुवातीला थोडं अश्लील वाटलं पण नंतर वाचत गेल्यावर काही गोष्टी खूप समजल्या आणि आवडल्या. यामध्ये कोंदटलेली पुरुषी मानसिकता दाखवली आहे. पुरुषी मानसिकता आणि त्याबद्दलची न समजावून घेता बनवलेली विकृत धारणा अश्या बऱ्याच गोष्टींा जबरदस्त उलगडा लेखकांनी केलेला आहे एकंदरीत यामध्ये काही मर्यादेनंतर पुरुषाने काही गोष्टी का आणि कशा प्रकारे सोडून द्यायला हव्यात की जेणेकरून नंतर स्वतः उध्वस्त होण्यापासून तुम्ही स्वतः लाच रोखू शकता हे सांगण्याचा यामध्ये खूप मोठ्या आशेने लेखकाने प्रयत्न केला आहे. ...Read more