Shop by Category FICTION (407)RELIGIOUS & SPIRITUALS (31)DRAMA (3)HORROR & GHOST STORIES (14)COOKERY, FOOD & DRINK (6)DICTIONARY (1)POLITICS & GOVERNMENT (21)FICTION,TRANSLATED INTO MARATHI (2)INTERVIEWS (1)NOVEL (8)View All Categories --> Author CATHERINE COLLINS ()AAVTI NARAYAN ()SHYAMALA GHARPURE ()SUNITA DEVASTHALI ()LEE IACOCCA ()JOHN F LOVE ()DR. SUCHIT KELKAR ()VRUSHALI PATWARDHAN ()MADHUKAR RAMCHANDRA PRADHAN ()RESHMA KULKARNI-PATHARE ()MARK & DELIA OWENS ()
Latest Reviews SHANTARAM by GREGORY DAVID ROBERTS Nitin Marathe अभिनय व लेखनाची आवड , प्रथमोपचारा चे ज्ञान आणि सामान्य लोकांच्या भले पणावर विश्वास असणारा हा तरुण. प्रस्थापित सत्ते विरूद्ध उठाव करता करता वाईट संगतीमुळे ड्रग च्या नशे चा बळी,त्या मुळे बँका लुटायचे सत्र , घट स्फोट व शेवट तुरुंगात. पण नंतर हा ऑस्ट्ेलिया मधून तुरुंग फोडून फरार होतो व बनावट पासपोर्ट वर 1982 मध्ये भारतात प्रवेश करतो. मुंबई मध्ये काही दिवस सामान्य हॉटेल मध्ये राहिल्यावर मराठी मित्राबरोबर जळगाव च्या जवळ मित्रा च्या गावात सहा महिने मुक्काम. या दिवसात मराठी वर शिव्यांच्या बारकाव्या सहित प्रभुत्व. इथेच मित्रा ची आईने शांताराम असे बारसे करते. गावाकडून परतल्यावर कुलाब्याच्या झोपडपट्टीत मुक्काम कारण बरोबर आणलेला पैसा खतम. तिथे याच्या लिंडसे या नकली नावाचे " लिन बाबा " असे नामकरण त्याचा मित्र करतो.विदेशी नागरिकांना currency बदलून देणे ,गांजा हशीश पुरवणे असे उद्योग करून गुजराण करू लागतो. या ही दिवसात झोपडपट्टीत प्राथमिक वैद्यकीय सेवे करता दवाखाना चालवतो आणि तेथील स्थानिक लोकांच्या जीवनाशी सर्वर्था ने एकरूप होऊन जीवनाचा आनंद घेत असतो . या माणसाने मुंबई तील फोर्ट भागातील गल्ली न गल्ली पाया खालून घातली. लिओपोल्ड या इराणी कॅफे / बार मध्ये तासन तास विदेशी मित्रां बरोबर पडीक. मुंबई तील गुन्हेगारी,त्या मध्ये इराणी , अफगाणी , लेबानिस , पाकिस्तानी आणि नायजेरी टोळ्यांचा सहभाग. विदेशी चलन , बनावट पासपोर्ट / विसा , ड्रग राकेट आणि वेश्याव्यवसाय या सर्व गैर धंद्या ची सखोल माहिती. या सर्व गोष्टी वाचून आपण चकित होऊन जातो. आपल्याला मुंबई च्या गुन्हेगारी विश्वाचे नागडे दर्शन होते. या नंतर त्याचे प्रेमप्रकरण आणि मैत्रिणी करता कुंटन खान्या च्या मॅडम बरोबर पंगा घेतल्या मुळे हा हकनाक आर्थर रोड च्या जेल मध्ये पिचत पडतो. जेल मधले त्याचे अनुभव वाचून अंगावर अक्षरशः शहारे येतात. local डॉन पैसे देऊन याची सुटका करवतो. नंतर हा त्या डॉन साठी foreign currency आणि बनावट पासपोर्ट च्या धंद्यात काम करू लागतो. आता पैसा त्याच्या पायाशी लोळत असतो. या पुस्तकात जागोजागी जीवन , मित्र, प्रेम आणि ईश्वरा विषयीचे तत्वज्ञान , भारतीय लोकां चा जगण्यातल्या साध्या साध्या गोष्टीचा आनंद घ्यायची वृत्ती आणि मुंबई तील झोपडपट्टी मधील दादागिरी ते आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी अशा वेगवेगळ्या गोष्टी हातात हात घालून वावरत आहेत. कौतुक याचे वाटते की हा विदेशी माणूस झोपडपट्टी किंवा भारतातली गरिबी याची तक्रार करत नाही तर येथील लोकांच्या जिंदादिली मुळे , आयुष्य जगणं कसे सोपे होते ते सांगतो. भारतीय लोक दिवस भर हिंदी गाणी गात , चित्रपट बघत , वेग वेगळे सण साजरे करत जीवनाचा उत्सव करतात असे त्याला वाटते. आजही मुंबई ला तो आपले Home town मानतो. शेवटी तो डॉन च्या आग्रहा मुळे अफगाणिस्तान मध्ये तेथील युद्धात भाग घेण्यास जातो. हा सर्व भाग अविश्र्वनिय आहे. शेवटी ही एक कादंबरी आहे पण यातील बराचसा भाग लेखकाने अनुभवला आहे. आपल्याच मुंबई ची आणि तेथल्या रगेल आणि रंगेल जनतेची ग्रेग आपल्याला वेगळीच ओळख करून देतो. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ... मराठी वर प्रेम करणाऱ्या ग्रेग ने मराठी अनुवाद केलेली प्रकरण ऐकून हे भाषांतर आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट भाषांतर आहे अशी अपर्णा वेलणकर यांना पावती दिली. कारण ही कादंबरी 38 भाषांमध्ये translate झाली आहे. अपर्णा ताईंचे कौतुक जेवढे करावे तेवढे थोडेच , कारण आपण अस्सल भारतीय गोष्ट वाचतोय असे वाटते. ...Read more SWAMI by RANJEET DESAI Prashant Gosavi पानिपतच्या भीषण हानी नंतर नानासाहेब पेशवे देखील गेले आणि अवघ्या सोळाव्या वर्षी माधवराव पेशवे झाले. स्वामी ने अक्षरशः सर्व रूप दाखविली. सुरुवातीला काकांमुळे असहाय झालेले, निजामाचा बंदोबस्त करणारे, राक्षसभुवनच्या लढाईत स्वतः सामोरे गेलेले माधवराव शेवटचया पानांमध्ये रमा माधव यांचे नाते. दक्षिणेत निजाम हैदर यांचा बंदोबस्त करून पानिपत चे अपयश धुवून काढत उभ्या हिंदुस्थानावर मराठ्यांचा भगवा डौलाने फडकावणारे माधवराव वाचून अभिमान वाटला. इंग्रजांचे मनसुबे लक्षात ठेवून त्यांना दूर ठेवणारेही माधवराव. मराठेशाहीचा एक अनमोल हिरा वाचायला मिळाला याचा खूप आनंद झाला. रमा माधवचे तर कमाल प्रेम आहे. एकमेकांकडे काही न मागणारे दोघे. रमाबाईंना नदी काठचा सुंदर प्रदेश माधवरावांना दाखवायचा असतो पण जबाबदारीने जमत नाही. पुस्तकाच्या शेवटी जे वर्णन आहे त्याने गळा दाटून येतो. रमाबाई तो प्रदेश पाहतात पण माधवरावांच्या चितेवरून सती जाताना. रणजित देसाईंना मनापासून धन्यवाद मराठेशाहीचा एक अनमोल हिरा पुस्तकात साठविल्याबद्दल. नमस्कार........ ...Read more
SHANTARAM by GREGORY DAVID ROBERTS Nitin Marathe अभिनय व लेखनाची आवड , प्रथमोपचारा चे ज्ञान आणि सामान्य लोकांच्या भले पणावर विश्वास असणारा हा तरुण. प्रस्थापित सत्ते विरूद्ध उठाव करता करता वाईट संगतीमुळे ड्रग च्या नशे चा बळी,त्या मुळे बँका लुटायचे सत्र , घट स्फोट व शेवट तुरुंगात. पण नंतर हा ऑस्ट्ेलिया मधून तुरुंग फोडून फरार होतो व बनावट पासपोर्ट वर 1982 मध्ये भारतात प्रवेश करतो. मुंबई मध्ये काही दिवस सामान्य हॉटेल मध्ये राहिल्यावर मराठी मित्राबरोबर जळगाव च्या जवळ मित्रा च्या गावात सहा महिने मुक्काम. या दिवसात मराठी वर शिव्यांच्या बारकाव्या सहित प्रभुत्व. इथेच मित्रा ची आईने शांताराम असे बारसे करते. गावाकडून परतल्यावर कुलाब्याच्या झोपडपट्टीत मुक्काम कारण बरोबर आणलेला पैसा खतम. तिथे याच्या लिंडसे या नकली नावाचे " लिन बाबा " असे नामकरण त्याचा मित्र करतो.विदेशी नागरिकांना currency बदलून देणे ,गांजा हशीश पुरवणे असे उद्योग करून गुजराण करू लागतो. या ही दिवसात झोपडपट्टीत प्राथमिक वैद्यकीय सेवे करता दवाखाना चालवतो आणि तेथील स्थानिक लोकांच्या जीवनाशी सर्वर्था ने एकरूप होऊन जीवनाचा आनंद घेत असतो . या माणसाने मुंबई तील फोर्ट भागातील गल्ली न गल्ली पाया खालून घातली. लिओपोल्ड या इराणी कॅफे / बार मध्ये तासन तास विदेशी मित्रां बरोबर पडीक. मुंबई तील गुन्हेगारी,त्या मध्ये इराणी , अफगाणी , लेबानिस , पाकिस्तानी आणि नायजेरी टोळ्यांचा सहभाग. विदेशी चलन , बनावट पासपोर्ट / विसा , ड्रग राकेट आणि वेश्याव्यवसाय या सर्व गैर धंद्या ची सखोल माहिती. या सर्व गोष्टी वाचून आपण चकित होऊन जातो. आपल्याला मुंबई च्या गुन्हेगारी विश्वाचे नागडे दर्शन होते. या नंतर त्याचे प्रेमप्रकरण आणि मैत्रिणी करता कुंटन खान्या च्या मॅडम बरोबर पंगा घेतल्या मुळे हा हकनाक आर्थर रोड च्या जेल मध्ये पिचत पडतो. जेल मधले त्याचे अनुभव वाचून अंगावर अक्षरशः शहारे येतात. local डॉन पैसे देऊन याची सुटका करवतो. नंतर हा त्या डॉन साठी foreign currency आणि बनावट पासपोर्ट च्या धंद्यात काम करू लागतो. आता पैसा त्याच्या पायाशी लोळत असतो. या पुस्तकात जागोजागी जीवन , मित्र, प्रेम आणि ईश्वरा विषयीचे तत्वज्ञान , भारतीय लोकां चा जगण्यातल्या साध्या साध्या गोष्टीचा आनंद घ्यायची वृत्ती आणि मुंबई तील झोपडपट्टी मधील दादागिरी ते आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी अशा वेगवेगळ्या गोष्टी हातात हात घालून वावरत आहेत. कौतुक याचे वाटते की हा विदेशी माणूस झोपडपट्टी किंवा भारतातली गरिबी याची तक्रार करत नाही तर येथील लोकांच्या जिंदादिली मुळे , आयुष्य जगणं कसे सोपे होते ते सांगतो. भारतीय लोक दिवस भर हिंदी गाणी गात , चित्रपट बघत , वेग वेगळे सण साजरे करत जीवनाचा उत्सव करतात असे त्याला वाटते. आजही मुंबई ला तो आपले Home town मानतो. शेवटी तो डॉन च्या आग्रहा मुळे अफगाणिस्तान मध्ये तेथील युद्धात भाग घेण्यास जातो. हा सर्व भाग अविश्र्वनिय आहे. शेवटी ही एक कादंबरी आहे पण यातील बराचसा भाग लेखकाने अनुभवला आहे. आपल्याच मुंबई ची आणि तेथल्या रगेल आणि रंगेल जनतेची ग्रेग आपल्याला वेगळीच ओळख करून देतो. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ... मराठी वर प्रेम करणाऱ्या ग्रेग ने मराठी अनुवाद केलेली प्रकरण ऐकून हे भाषांतर आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट भाषांतर आहे अशी अपर्णा वेलणकर यांना पावती दिली. कारण ही कादंबरी 38 भाषांमध्ये translate झाली आहे. अपर्णा ताईंचे कौतुक जेवढे करावे तेवढे थोडेच , कारण आपण अस्सल भारतीय गोष्ट वाचतोय असे वाटते. ...Read more
SWAMI by RANJEET DESAI Prashant Gosavi पानिपतच्या भीषण हानी नंतर नानासाहेब पेशवे देखील गेले आणि अवघ्या सोळाव्या वर्षी माधवराव पेशवे झाले. स्वामी ने अक्षरशः सर्व रूप दाखविली. सुरुवातीला काकांमुळे असहाय झालेले, निजामाचा बंदोबस्त करणारे, राक्षसभुवनच्या लढाईत स्वतः सामोरे गेलेले माधवराव शेवटचया पानांमध्ये रमा माधव यांचे नाते. दक्षिणेत निजाम हैदर यांचा बंदोबस्त करून पानिपत चे अपयश धुवून काढत उभ्या हिंदुस्थानावर मराठ्यांचा भगवा डौलाने फडकावणारे माधवराव वाचून अभिमान वाटला. इंग्रजांचे मनसुबे लक्षात ठेवून त्यांना दूर ठेवणारेही माधवराव. मराठेशाहीचा एक अनमोल हिरा वाचायला मिळाला याचा खूप आनंद झाला. रमा माधवचे तर कमाल प्रेम आहे. एकमेकांकडे काही न मागणारे दोघे. रमाबाईंना नदी काठचा सुंदर प्रदेश माधवरावांना दाखवायचा असतो पण जबाबदारीने जमत नाही. पुस्तकाच्या शेवटी जे वर्णन आहे त्याने गळा दाटून येतो. रमाबाई तो प्रदेश पाहतात पण माधवरावांच्या चितेवरून सती जाताना. रणजित देसाईंना मनापासून धन्यवाद मराठेशाहीचा एक अनमोल हिरा पुस्तकात साठविल्याबद्दल. नमस्कार........ ...Read more