"ONE OF THE UNIQUE FEATURES OF THE PLAY`S PLOT IS A TRIO — A STORY THAT INTRODUCES THE DARK
WORLD HIDDEN WITHIN THE GLITZ AND GLAMOUR OF BOLLYWOOD, PAINTED BY THE CHARACTERS
THEMSELVES... WHICH EVENTUALLY TURNS OUT TO BE A SUSPENSE THRILLER LOVE STORY. RIGHT AT THE
BEGINNING OF THE PLAY, AS TAUGHT BY FILM PRODUCERS, A WRITER WHO WRITES COLORFUL LIES RATHER
THAN COLORLESS TRUTHS STEPS IN FRONT OF THE AUDIENCE. HE BEGINS TO TELL A STORY THAT WILL LEAVE
THE AUDIENCE CAUGHT IN A MAZE OF TRUTH AND ILLUSION! HE FIRMLY CLAIMS THAT THIS IS THE
FANTASTIC STORY OF THE NEXT PICTURE! IN ALL OF THIS, THE MOST CRUCIAL ROLE IS PLAYED BY THE
""DARK QUEEN"" (KALI RANI)... BUT THE SUSPENSE OF WHO SHE ACTUALLY IS REMAINS UNSOLVED
UNTIL THE VERY END... OR DOES IT REALLY GET SOLVED? TO CLEAR AWAY THIS CONFUSION, READ `KALI
RANI!`
"
"नाटकाच्या कथानकाची एक खासियत म्हणजे एक त्रिकुट - बॉलिवुडच्या झगमगाटात दडलेल्या काळ्या जगाची ओळख करून
देणारं आणि त्यांची त्यांनीच रंगवलेली एक कहाणी.. जी पुढे जाऊन ठरते एक सस्पेन्स थ्रिलर लव्ह स्टोरी.. नाटकाच्या सुरुवातीलाच
चित्रपट निर्मात्यांनी शिकवल्याप्रमाणे बिनरंगाच्या खऱ्यापेक्षा सप्तरंगी खोटं लिहिणारा लेखक प्रेक्षकांसमोर येतो. प्रेक्षकांना
खऱ्याखोट्याचा भूलभुलैय्या पडेल अशी एक कथा सांगायला सुरुवात करतो! खरं आणि खोटं यांचं बेमालूम कॉकटेल करीतकरीत तो
सर्वांना त्यांच्या राज्यात नेतो! हीच पुढच्या पिक्चरची फॅन्टॅस्टिक स्टोरी असंही ठामपणे सांगतो! या सगळ्यात महत्त्वाची भूमिका
असते ती काळ्या राणीची... पण ती नेमकी कोण याचा सस्पेन्स शेवटपर्यंत उलगडत नाही... का खरंच उलगडतो? या संभ्रमाला
दूर सारण्यासाठी वाचावं… काळी राणी!
"