Suresh Patil

About Author

हे पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात `सामना दैनिकाद्वारे केली. प्रिंट मीडियाबरोबरच इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येही ते कार्यरत होते. उपसंपादक, वरिष्ठ सहसंपादक, न्यूज एडिटर आदी पदांवर त्यांनी काम केले आहे. शिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा (एमपीएससी) उत्तीर्ण होऊन ते महाराष्ट्र शासनाच्या सेवेत राजपत्रित अधिकारी म्हणूनही काही वर्षे कार्यरत होते. दाह बरोबरच त्यांची नक्षल बारी (कादंबरी), सायबाचा हनिमून (कथासंग्रह), जावयाची मुंडी (कथासंग्रह) ही पुस्तके मेहता पब्लिशिंग हाऊसकडून प्रकाशित होत आहेत. शिवाय पाणजंजाळ ही कादंबरीही प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांचे अगं, ये ना! हे नाटक मुंबईच्या नाट्यमंदार नाट्य संस्थेने घेतले आहे. सध्या ते चित्र-नाट्य क्षेत्रातही कार्यरत आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DAAHA Rating Star
Add To Cart INR 495

Latest Reviews

THE LAST GIRL
THE LAST GIRL by NADIA MURAD Rating Star
Mukundraj Kulkarni

एक मेंदू बधिर आणि मन सुन्न करणारे आत्मकथन नादिया ही 21 वर्षाची अल्लड येझदी तरुणी,विवाहाची आणि सुखी संसाराची स्वप्न पाहणारी.इराकमधील कोचा या छोट्या गावात राहणारी.आई,सहा भावंड,दोन बहिणी असं हे कौटुंबिक जिव्हाळा जपणार घर.या घराच्या सुखाला नियतीची दृष्टलागते.कारण इसिसची पापी दृष्टी या घरावर पडते.नुसती या घरावरच नाही तर संपूर्ण गावावर पडते.कारण मुस्लिमेतर म्हणजे येझदी बहुसंख्य असलेलं हे गाव असत.एका भयाण रात्री इसिसचे काळे झेंडे लावलेली ट्रकची रांग गावाची नाकेबंदी करते आणि सुरू होते भयाण राक्षसी अत्याचारांचे वेदनादायी पर्व.तरुणांना आणि म्हातार्यांना गोळ्या घालून मारले जाते.तरुणी आणि स्त्रिया या हैवानांच्या वासनेची शिकार होतात.10 वर्षांच्या मुलीपासून 50वर्षांच्या प्रौढेपर्यंत कोणीही यातून सुटत नाही, यांचा दोष एवढाच असतो हे काफिर असतात आणि धर्मपरिवर्तनास नकार देतात, नादियासह सर्वच मुलींवर असंख्य बलात्कार होतात.असह्य मारहाण,सिगारेट चे चटके ,मुली बेशुद्ध पडेपर्यंत सामूहिक बलात्कार.अक्षरशः या मुली नरकयातना भोगतात. हे सारं धर्माचा, हवाला देऊन केलं जातं.वाचताना आपल्यालाही अश्रू अनावर होतात. या नरकवासातून नादिया कशी सुटली ते मुळातून वाचण्याजोग आहे.तमाम सेक्युलरांनाही हे पुस्तक आवर्जून वाचायला दिल पाहिजे ...Read more

A PRISONER OF BIRTH
A PRISONER OF BIRTH by JEFFREY ARCHER Rating Star
Pranav Survase

प्रत्येकाने नक्की वाचाव अशी कादंबरी. मित्राचा खून केल्याच्या आरोपावरून तुरुंगात जाणाऱ्या व आश्चर्यकारकरीत्या बाहेर येऊन खऱ्या गुन्हेगाराला धडा शिकवणाऱ्या डॅनीची उत्कंठावर्धक कथा.अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणारी कादंबरी.