PERUMAL MURUGAN

About Author

Birth Date : 15/10/1966


PERUMAL MURUGAN IS THE STAR OF CONTEMPORARY TAMIL LITERATURE. AN AWARD-WINNING WRITER, POET AND SCHOLAR, HE HAS GARNERED BOTH CRITICAL ACCLAIM AND COMMERCIAL SUCCESS FOR HIS VAST ARRAY OF WORK. HIS NOVELS HAVE BEEN TRANSLATED INTO ENGLISH TO IMMENSE ACCLAIM, INCLUDING CURRENT SHOW, PYRE, SEASONS OF THE PALM, WHICH WAS SHORTLISTED FOR THE KIRIYAMA PRIZE IN 2005, AND ONE PART WOMAN, HIS BEST-KNOWN WORK, WHICH WAS SHORTLISTED FOR THE CROSSWORD AWARD, LONGLISTED FOR THE INAUGURAL NATIONAL BOOK AWARD FOR TRANSLATION AND WON THE PRESTIGIOUS ILF SAMANVAY BHASHA SAMMAN. A LONELY HARVEST AND TRIAL BY SILENCE-HIS TWO INGENIOUS PARALLEL SEQUELS TO ONE PART WOMAN-WERE SHORTLISTED FOR THE JCB PRIZE FOR FICTION 2019. A LONELY HARVEST WAS ALSO LONGLISTED FOR THE DSC PRIZE FOR SOUTH ASIAN LITERATURE 2019.

‘समकालीन तमीळ साहित्यातील तारा’ असं पेरुमल मुरुगन यांना म्हणावं लागेल. पारितोषिक प्राप्त लेखक, कवी आणि अभ्यासक असणार्या मुरुगन यांनी समीक्षकांकडून कौतुक प्राप्त केलं आहेच, शिवाय त्यांच्या विस्तृत लिखाणाला व्यावसायिक यशदेखील प्राप्त झालं आहे. त्यांच्या काही कादंबर्या इंग्लिश भाषेत अनुवादित झाल्या असून त्या अतोनात कौतुकाला पात्र ठरल्या आहेत. त्यापैकी ‘सीझन्स ऑफ द पाम’ या कादंबरीला २००५ सालचं ‘किरियामा’ पुरस्काराचं नामांकन मिळालं होतं तर क्रॉसवर्र्ड अॅवॉर्डसाठी त्यांचं सर्वोत्तम पुस्तक ‘वन पार्ट वुमन’ नामांकित झालं होतं. २०१५ सालचा बहुचर्चित ‘आयएलएफ समन्वय भाषा सन्मान’ त्या पुस्तकाला प्राप्त झाला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
ARDHANAARI Rating Star
Add To Cart INR 270
EKAKI SUGI Rating Star
Add To Cart INR 270

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
तेजस यादव

वाचला तो कर्ण ! आवडला तो कर्ण ! भावला तो कर्ण ...! दोन वर्षापुर्वी मृत्युंजय कादंबरी वाचून झालती . त्या कादंबरीने कित्येक जणांच आयुष्य कायापालट केल , हे मराठी साहित्य विश्व जाणून आहे . आता नुकतीच राधेय वाचून पुर्ण झाली . लेखक रणजित देसाई सुरवातीच ्हणतात .... " राधेय हे कर्णचरित्र नव्हे . प्रत्येकाच्या मनात दडलेला कर्ण असतो . माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी . भावकहाणी . याची सत्यता शोधायची झाली , तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही , कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत , तर त्यात हा कर्ण दिसेल ." मला कादंबरीत एक विशेष गोष्ट आवडली , ती म्हणजे कर्ण कुठेच वरचढ , रंगवून दाखवला नाही. त्याचे गुण दाखवले तसे त्याचे दोष ही दाखवले . नदीच्या प्रवाहावर वाहत जाणार त्याचं आयुष्य , त्याच दातृत्व , त्याच मित्रप्रेम , त्याचा मनाचा गाभारा , त्याचा आयुष्यी आलेली अहवेला वाचकांसं खुप काही शिकवून जाते . देसाईंची लेखणी इतकी प्रभावशाली आहे की ते कुरुक्षेत्राची युध्दभुमीही जिवंत झालेला भास होतो . मी जेवढा कर्ण वाचला तो मला सर्व आठवला ! मग तो ` शिवाजी सावंतांचा ` असो अथवा नटसम्राट मधील ` वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रजांचा ) . कादंबरी वाचून झाल्यावर कुसुमाग्रजांची ती ओळ आठवली कृष्ण - " अरे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री ह्या धरेवरच्या माणसांचे दिपस्तंभ.! तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठी , ह्या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात . खुप सुंदर वाचनीय , आणि भरभरुन शिकवनारी कादंबरी .... ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
Abhiram Bhadkamkar

महा-सम्राट "इतिहास वाचून माणूस बेभान होतो, भानावर येतोच असं नाही" हे (बहुधा) वि ग कानेटकर यांचे विधान मला कायमच महत्वाचे वाटते। प्रकाशनास काही महिने लोटले असले तरी निवांत ऐसपैस वेळ काढून वाचायची म्हणून बाजूला ठेवलेली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वा पाटील ह्यांची महासम्राट ही कादंबरी हातात घेतली आणि तिने झपाटून गेलो। ही कादंबरी बेभानही करते आणि एक भानही देते हे तिचे वैशिष्ट्य आहे. विश्वासरावांची शैली आणि त्यांची शब्दसंपत्ती ह्यावर नवे काय बोलणार? पण ही कादंबरी उभ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील घटनांचे केवळ चमकदार कथन यापुरती मर्यादित न राहता तत्कालीन सामाजिक व राजकीय परिसराचे भान देणारी ठरते। तेव्हाचा काळ बारीकसारीक तपशिलांसह उभा करते. ती छत्रपतींच्या तेजस्वी कर्तृत्वाला मुजरा तर करतेच पण त्यासोबत त्यांच्या जन्मापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्यातून आईसाहेबांच्या मनात उगवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अत्यंत अवघड, जवळजवळ अशक्यप्राय स्वप्नाच्या पाठलागाची वेगवान घडामोड चितारते. मुघलांचे डावपेच, खेळया नेस्तनाबूत करण्यामागची `अत्यंत योजनाबद्ध आखणी` मांडत जाते। ही कादंबरी माझे त्याकाळाबद्दलचे आकलन वाढवते. मऱ्हाटी मुलाखातला तत्कालीन निसर्ग यात येतो, तत्कालीन नातेसंबंध, समाजधारणा आणि परचक्राच्या दडपणाखालची उलघाल यातून त्या काळाचा पट मांडला जातो आणि इथेच कादंबरी केवळ एका युगपुरुषांचे चरित्रकथन न रहाता एका शतकाचा लेखाजोखा होऊन जाते। वेगळेपण आहे ते हेच की ही कहाणी महाराक्षसी लाटांविरुद्ध पोहून जात महासागरालाच बांधून घालणाऱ्या चिवट आशावादाची आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या बुद्धीचातुर्याची होत जाते। म्हणूनच ती एकाच वेळी बेभानही करते आणि भानही देते। कादंबरी संपते एक स्वल्पविराम देत... आता पुढचे भाग... त्याची अधीरता आणि उत्सुकता... डोळे दिपून जावेत अशा थोर व्यक्तिमत्वाचे चित्रण हे शिवधनुष्य होते, जे लिलया पेलले आहे... यात रेखाटलेली चित्रे अप्रतिम आहेत... घराघरात भक्तिभावाने ठेवावा आणि `अभ्यासावा` असा हा `झंझावात` आहे... ...Read more