MRUNAL KASHIKAR-KHADAKKAR

About Author


MRUNAL KASHIKAR-KHADAKKAR HAS DONE HER POSTGRADUATE STUDIES IN LAW AND MANAGEMENT FROM PUNE UNIVERSITY. SHE HAS EXPERIENCE IN THE COURT AND CORPORATE WORLD. DUE TO HER PASSION FOR TEACHING, SHE HAS TAUGHT MBA FULL-TIME FOR TEN YEARS IN RENOWNED EDUCATIONAL INSTITUTIONS IN AND OUTSIDE PUNE. SHE ALSO HAS EXPERIENCE IN CAREER-RELATED COUNSELING. SHE CURRENTLY WORKS AS A FREELANCE WRITER AND TRANSLATOR. HER WRITINGS ON PERSONALITY DEVELOPMENT, CAREER, MORAL STORIES, ETC. HAVE BEEN PUBLISHED IN VARIOUS NEWSPAPERS AND MAGAZINES AS SERIALS. ALONG WITH THIS, SHORT STORIES, ESSAYS AND SHORT STORIES HAVE ALSO BEEN PUBLISHED IN MAGAZINES AND NEWSPAPERS.

मृणाल काशीकर- खडक्कर यांनी पुणे विद्यापीठातून कायदा आणि व्यवस्थापनशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, . त्यांना कोर्ट आणि कॉर्पोरेट जगताचा अनुभव आहे. अध्यापनाच्या आवडीमुळे पुढे दहा वर्ष त्यांनी पुण्यातील व पुण्याबाहेरीलही नामवंत शैक्षणिक संस्थांमध्ये एम.बी.ए. ला पूर्णवेळ अध्यापन केले आहे. तसेच, त्यांना करियर संबधित कौन्सेलिंगचा अनुभव आहे. सध्या त्या फ्रीलान्स लेखक आणि अनुवादक म्हणून काम करतात. व्यक्तिमत्व विकास, करियर, नैतिक कथा, इ. विषयांवर लिखाण विविध वर्तमानपत्रातून व मासिकांतून सदरांच्या रुपात प्रकाशित झाले आहे. याबरोबरच स्फुट, ललित आणि लघुकथाही मासिकातून आणि वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CHIRANTAN YASHACHE 10 NIYAM Rating Star
Add To Cart INR 380

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
सुरेश काळे

कालपासून मानसीने भाषांतरित केलेलं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेलं पेरुमाल मुरुगन् यांच्या मूळ तमिळ पुस्तकाचं मराठीत भाषांतर वाचायला घेतलं आणि काय सांगू? खालीच ठेववेना! त्याची ओघवती भाषा व आधुनिक कम्प्युटर आणि मोबाईल ह्यांनी घातलेला गोंधळ, रुण पिढीवर केलेली जादू यांनी भारावून गेलो. एक उत्तम पुस्तक वाचनात आलं, असं वाटू लागलं. ते बऱ्याच जणांच्या बाबतीत डोळ्यात अंजन घालणार ठरेल असं वाटलं. विशेषतः किरकिर करणाऱ्या, सतत रडत राहणाऱ्या लहान मुलांना मोबाईलची सवय लावणाऱ्या पालकांना हा मोठा झटकाच आहे. यातील नायक कुमारासुर हा असुर-संगणक नावाच्या राक्षसाच्या मायाजालाला म्हणजेच इंटरनेटपासून जेवढा स्वतःला दूर ठेवत जातो तसतसा तो त्यातच गुंतत जातो. त्याचा मुलगा हा संगणकतज्ज्ञ बनू पाहतो. त्याला म्हणजे नायक मेघासला कोणकोणत्या दिव्यातून प्रवास करावा लागतो याचे या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात चित्रण केले आहे. भाषांतरकाराने पण त्याच्या ओघवत्या शैलीने त्याचे प्रामुख्याने वर्णन छान केलंय. विशेषतः कॉलेजची विद्यार्थी वर्गाप्रती आणि आपल्याच महाविद्यालयाने पहिल्या वर्गात यावे याची केलेली व्यवस्था अतिशय वास्तववादी झाली आहे. असे घडू शकते आणि सर्वसामान्य माणसाला ही मायावी महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस कुठल्या दर्जाचे विद्यार्थी घडवतात आणि त्यांच्या जीवाशी खेळतात हे कळून येईल इतके प्रभावी चित्रण ह्यात केले आहे. एका ज्वलंत विषयाला आपल्या सडेतोड भाषेने व लेखणीने जनतेपुढे आणण्याबद्दल अत्यंत आभार! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
...ए.के.देशमुख, पेनसिल्वेनिया (यु.एस.ए.)

`छाटितो गप्पा` हे मी वाचलेलं जी.बी.देशमुखांचं पाचवं पुस्तक. अमेरिकेत मुलीकडे मुक्कामी आलो असता मिळालेल्या निवांत वेळेत मी हे पुस्तक वाचलं. पुस्तक वाचताना खुप मजा वाटली. लेखकापेक्षा मी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे मला अमरावती शहराची रचना, तिथली संस्कती आणि इतर संदर्भात त्या काळी झालेला विकास लेखकाच्या आधी अनुभवण्याची संधी मिळाली होती. राजेंद्र कॉलनी अस्तित्वात आल्यापासूनच माझ्या परिचयाची होती आणि तिथल्या घर क्र. १० मधे काही काळ माझा निवास देखील होता. `छाटितो गप्पा` वाचताना अंबागेट ते राजेंद्र काॅलनी दरम्यान अनेक वेळा सायकल किंवा सायकल-रिक्षाने केलेल्या येरझारा आठवल्या. त्या वेळी अमरावतीचा बहुचर्चित रेल्वे पुल देखील बांधला गेला नव्हता. "छाटितो गप्पा " हे पुस्तक मला अमरावती मधील माझ्या महाविद्यालयातील मोरपंखी दिवसात घेऊन गेले. त्या दिवसात अनेक जागी दिलेल्या भेटिंची पुन्हा एकदा उजळणी झाली. तेव्हाची व आजची अमरावती नजरेसमोर तरळू लागली. आयुष्यात अशा लहान सहान गोष्टी आपण सर्वच अनुभवत असतो पण लेखकाने त्या पुस्तक रुपात अत्यंत खुमासदार पद्धतीने वाचकांसमोर आणल्या. म्हणून लेखकाचे विषेश अभिनंदन व आगामी लेखनाकरीता खुप खुप शुभेच्छा. ...Read more