Jane Gardam

About Author

Birth Date : 11/07/1928


JANE GARDAM WAS BORN IN YORKSHIRE AND LIVES IN KENT. SHE IS MAINLY KNOWN AS A NOVELIST. JANES BOOK OLD FILTH IN 2005 WAS NOMINATED FOR AN ORANGE PRIZE DURING HER LONG, SUCCESSFUL CAREER. HE WAS ALSO NOMINATED FOR THE BOOKER PRIZE FOR HIS BOOK GOD ON THE ROCKS. TWO OF HIS BOOKS, THE HOLLOW LAND AND QUEEN OF THE TAMBOURINE, WON THE WHEATBREAD NOVEL OF THE YEAR AWARD TWO YEARS RUNNING.

जेन गार्डम यांचा जन्म यॉर्कशायरमध्ये झाला असून त्या केंटमध्ये राहतात. कादंबरीकार म्हणून त्या प्रामुख्याने ओळखल्या जातात. आपल्या प्रदीर्घ, यशस्वी कारकिर्दीत जेन यांच्या ओल्ड फिल्थ इन २००५ ह्या पुस्तकाला ऑरेंज प्राइज नामांकन झाले होते. तसेच गॉड ऑन द रॉक्स या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना बुकर प्राइजचे नामांकन ही मिळाले होते. त्यांच्या द हॉलो लँड आणि क्वीन ऑफ द टँबोरिन या दोन पुस्तकांना दोन वर्षे व्हीटब्रेड नॉव्हेल ऑफ द इयर हे पारितोषिक मिळाले आहे. दोन वेळा हे पारितोषिक पटकावणाऱ्या त्या एकमेव लेखिका आहेत. त्यांच्या अनेक वर्षांच्या साहित्यसेवेची दखल घेऊन हेवूड हिल लिटररी प्राइज नेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. कादंबऱ्याप्रमाणेच लघुकथांचे लेखनही त्यांनी केले आहे. त्यांचा द पीपल ऑन द प्रिव्हिलेज हिल हा लघुकथासंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यातील त्याच नावाच्या प्रमुख कथेसाठी त्यांचे बीबीसी नॅशनल शॉर्ट स्टोरी अ‍ॅवॉर्डसाठी नामांकन होते. सन २००९मध्ये त्यांना ओबीई ने सन्मानित करण्यात आले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE MAN IN THE WOODEN HAT Rating Star
Add To Cart INR 350
TBC Classic Book

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more