Uma Gade सुप्रसिद्ध कथालेखक, गीतकार , संवादलेखक ,दिग्दर्शक गुलजार यांचा अप्रतिम कथासंग्रह .अत्यंत वाचनीय आहे
शिरीष पोळेकर संवेदना, सहिष्णुता आणि सहवेदना यांची प्रेरणादायी गुंफण - "कर हर मैदान फतेह"
दि. ३० डिसेंबर २०२० रोजी "कर हर मैदान फतेह" हे विश्वास नांगरे पाटील यांचे आत्मकथन पर पुस्तकाची "प्रथम" ऍडव्हान्स बुकिंग करण्याची संधी मला मेहता पब्लिशिंग हाऊस ने दिल आणि या पुस्तकाची प्रथम आवृत्ती दि. ०५ जानेवारी २०२१ रोजी मला समारंभपूर्वक मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी दिली. लगेचच पुढील दोन दिवसांमध्ये सलग दोन वेळा मी हे पुस्तक वाचले. मा. विश्वास नांगरे पाटील यांचे यापूर्वी प्रकाशित झालेले "मन मी है विश्वास` हे आत्मकथनही मी संपूर्ण वाचले आहे. तसेच YOUTUBE वरती सुद्धा त्यांची अनेक संभाषणे/व्याख्याने मी नेहमी ऐकत असतो.
"कर हर मैदान फतेह" हे त्यांचे नवीन पुस्तक म्हणजे संवेदना, सहिष्णुता आणि सहवेदना यांची प्रेरणादायी गुंफण आहे. एक IPS अधिकारी त्यांच्या कार्यात मग्न असताना संवेदना आणि सहवेदना सातत्यपूर्वक जपत राहतो आणि समाजामध्ये या दोन गोष्टींची फार मोठी गरज असल्याचे त्यांच्या कार्यातून सिद्ध करून दाखवून देतो हे आजच्या युगात खरोखरंच अत्यंत प्रेरणादायक आहे असे मला वाटते.
बीड जिल्ह्यातील एका मुलीच्या सत्काराच्या कार्यक्रमाला आवर्जून श्री. नांगरे पाटील उपस्थित राहिले कारण त्या मुलीने दहावीच्या परिक्षेत ९८.५ टक्के गुण मिळविले होते. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे हे मार्क त्या मुलीने स्मशानात पेटलेल्या चितेच्या उजेडात अभ्यास करून मिळविले होते.त्या मुलीला कुठलीही भीती न्हवती पण ध्येयाप्रती पेटलेले मन तिला दिशा दाखवत होते, खुनावत होते. त्या मुलीच्या आईला ९८.५ टक्के म्हणजे किती हे सुद्धा नीट कळत न्हवते. तिच्या सत्काराला श्री. विश्वास नांगरे पाटील आवर्जून उपस्थित राहतात आणि श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते सत्कार स्विकारुन सत्काराला प्रतिक्रिया देताना ती मुलगी म्हणते "मला सुद्धा साहेब हैद्राबादला जायचं आहे. पण मला हैदराबादेत `सैराट` मधल्या परश्या व आर्ची सारखं प्रेम प्रकरण करून पळून जायचं नाही, तर साहेब मला तुमच्यासारखं, सरदार वल्लभभाई पटेल अकादमीमध्ये IPS अधिकारी म्हणून ट्रेनिंग घ्यायला जायचं आहे आणि त्यासाठी पाठीवर शाबासकी राहू दे!" हा प्रसंग असेल. तसेच अत्यंत गरीब कुटुंबातील मुलीने वडिलांच्या अंगावर पडणाऱ्या खर्चाच्या भारातुन सुटका करण्यासाठी आत्महत्येचा अवलंब केलेला प्रसंग असेल, यातून समाजाला आपण काय देणे लागतो का? याबाबत या पुस्तकात प्रभाविपणे प्रभावीपणे मांडलेले विचार आणि यातून आपण समाजाला कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन करू शकतो यासाठी केलेले प्रेरणादायी लिखाण हे समाजाला नक्कीच मार्गदर्शकआणि प्रेरणादायी ठरेल असे मला वाटते.
या पुस्तकात श्री. विश्वास नांगरे पाटील यांनी आजच्या युगात Work Life Balance कसे सांभाळावे याबाबत व्यक्त केलेलं मत आणि त्यासाठी करावयाचे नियोजन याचे अत्यंत उपयुक्त लेखन केले आहे.
" सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही , सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिये!
मेरे सीने मे नही तो तेरे सीने मे ही सही , हो कही भी आग, लेकिन आग तो जलनी चाहिये!"
" Salute to this Brave Man - IPS Shri Vishwas Nangre Patil " ...Read more