Beau Riffenburgh

About Author

Birth Date : 12/01/1955


BEAU RIFFENBURGH IS AN AUTHOR AND HISTORIAN SPECIALIZING IN POLAR EXPLORATION. HE IS ALSO AN AMERICAN FOOTBALL COACH AND AUTHOR OF BOOKS ON FOOTBALL HISTORY.

बॉ रिफेनबर्ग इतिहासतज्ज्ञ असून संशोधन प्रवास विशेषत: अ‍ॅन्टार्क्टिक, आर्क्टिक आणि अप्रिÂका यांच्याशी निगडित संशोधन प्रवास हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांचा जन्म कॅलिफोर्निया, अमेरिका येथे झाला आणि युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिजच्या स्कॉट पोलर रिसर्च इन्स्टिट्यूटमधून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. तिथेच ते चौदा वर्षे ‘पोलर रेकॉर्ड’ या ध्रुवीय संशोधनाच्या जगातल्या सर्वांत जुन्या जर्नलचे संपादक म्हणून कार्यरत होते. ‘निमरॉड : अर्नेस्ट शॅकलटन अ‍ॅन्ड द एक्स्ट्रॉऑर्डिनरी स्टोरी ऑफ द १९०७-०९ ब्रिटिश अ‍ॅन्टार्क्टिक एक्स्पिडिशन’ आणि ‘द मिथ ऑफ द एक्सप्लोअरर’ या दोन मान्यताप्राप्त पुस्तकांचे ते लेखक आहेत. ‘एनसायक्लोपीडिया ऑफ अ‍ॅन्टार्क्टिक’ या ग्रंथाचेही संपादन त्यांनी केले असून संशोधन प्रवासाशी संबंधित आणखी अन्य सहा पुस्तकांमध्ये त्यांचे योगदान आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MRUTYUSHI SHARYAT Rating Star
Add To Cart INR 240

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more