Anne Frank

About Author

Birth Date : 12/06/1929
Death Date : 01/01/1945


ANNELIES MARIE "ANNE" FRANK WAS A GERMAN-BORN JEWISH GIRL WHO KEPT A DIARY IN WHICH SHE DOCUMENTED LIFE IN HIDING UNDER NAZI PERSECUTION. SHE IS A CELEBRATED DIARIST WHO DESCRIBED EVERYDAY LIFE FROM HER FAMILY HIDING PLACE IN AN AMSTERDAM ATTIC.

अ‍ॅन प्रँÂक यांचा जन्म जर्मनीमधील प्रँÂकफर्ट येथे झाला. नाझीवादाची बळी ठरलेली अ‍ॅन प्रँÂक जगभर प्रसिद्ध झाली ती तिच्या लिखाणामुळे. नाझींच्या छळाचे वर्णन असलेली तिची ‘डायरी’ जगभर गाजली. पुढे त्यावर आधारित अनेक नाटके व चित्रपट निघाले. दुसNया जागतिक महायुद्धात जर्मनीने नेदरलँडवर कब्जा करेपर्यंत प्रँÂक कुटुंब नेदरलँडमध्येच होते. १९४० मध्ये या कुटुंबाने नाझी सैन्यापासून वाचण्यासाठी ओटो प्रँÂक यांच्या कार्यालयातील तळघरात आश्रय घेतला होता. तिथे अ‍ॅन प्रँÂकने आपली ‘डायरी’ लिहिली दोन वर्षानंतर तेथून बाहेर पडल्यावर त्यांनी निर्वासित छावण्यात आश्रय घेतला. तेथेच मार्च १९४५ मध्ये अ‍ॅन प्रँÂक आणि तिची बहीण मार्गेट प्रँÂक यांचा मृत्यू झाला. नाझींच्या अत्याचारांनंतरही प्रँÂक कुटुंबातील अ‍ॅन प्रँÂकचे वडील ओटो प्रँÂकच जिवंत राहिले. अ‍ॅमस्टरडॅमला परत आल्यानंतर त्यांना अ‍ॅन प्रँÂकची ‘डायरी’ सापडली. ती त्यांनी १९४७ मध्ये प्रसिद्ध केली. डच भाषेत लिहिलेले हे लिखाण १९५२ मध्ये ‘द डायरी ऑफ ए एन्ग गर्ल’ नावाने इंग्लिशमध्ये पहिल्यांदा भाषांतरीत झाले. त्यानंतर अनेक भाषांत याचे भाषांतर झाले आहे. ही डायरी अ‍ॅन प्रँÂकला तिच्या १३ व्या वाढदिवसाला भेट दिली होती. त्यामध्ये तिने १२ जून १९४२ पासून १ ऑगस्ट १९४४ पर्यंत जीवनातील घटनांची नोंद केली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DIARY OF ANNE FRANK Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more