* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: PRATIDWANDWI
 • Availability : Available
 • ISBN : 9788177665765
 • Edition : 3
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 152
 • Language : MARATHI
 • Category : SHORT STORIES
 • Available in Combos :ASHA BAGE COMBO 3 BOOKS
Quantity
HE REMEMBERED ANU, RIGHT FROM THE BASE OF HIS HEART. NOW HE WAS APPROACHING A STEP FURTHER EVERYDAY ON THE PATH OF GETTING WELL. VERY SOON HE WILL NOT BE NEEDING ANU, AND HE KNEW THAT. BUT IT WAS SOMETHING BEYOND HIS NEED. HE REALISED THAT IT WAS NOT HER TOUCH THAT HE WAS CRAVING FOR. IT WAS BEYOND ANY LONGING. IT WAS A BEAUTIFUL PICTURE. IN IT, THERE WAS HIS ROOM UPSTAIRS, THE CEILING, THE WALLS, WINDOW, THE TERRACE NEXT DOOR, THE LADY ON THE TERRACE, HER DAILY EXERCISE, HER BABY, THE LIVELY TREES, AND ANU… HER TIMELY ROUTINE VISIT FOR HIS THERAPY, THE DIALOGUES WHICH NEVER OCCURRED. THIS PICTURE WAS DRAWN NOT BY THE KARTIK WITHIN HIM BUT SOMEONE ELSE WITHIN HIM. HE NEEDED EVERYTHING TO BE IN THE PROPER PLACE PRECISELY. HE NEEDED EVERYTHING AS IT WAS EVEN THOUGH THERE WAS NO TRUE BONDING IN THEM.
त्याला अनूची तीव्र अशी आठवण आली. तो लवकरच पूर्ण बरा होत होता आणि आता तिची तशी गरज राहणार नव्हती. पण तिची ही आठवण त्या गरजेपलीकडचीच होती हे त्याला आतून लख्ख समजले. तिची आठवण तिच्या त्याला वाटणाऱ्या स्पर्शाच्या ओढीचीही नव्हती. त्याही पलीकडली होती. त्याची वरची खोली, छत, भिंती , खिडकी, बाजूची गच्ची, ती बाई, तिचा व्यायाम, ते मूल, ती सळसळणारी झाडे आणि अनू, तिची चार वाजताची येण्याची वेळ, तिचा नि त्याचा घडलेला, न घडलेला संवाद हे सगळे एकच चित्र होते. त्याच्यातल्या कार्तिक नसलेल्या दुसऱ्या कोणीतरी ते काढले होते. त्याला गरज होती ती या सगळ्यांच्या एकत्रित असण्याची. भले त्या एकमेकांत काही अनुबंध न का असेना!
Video not available
Keywords
#NISATLELE #AASHA BAGE # PAULVATEVARLEGAON #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #PRATIDVANDVI
Customer Reviews
 • Rating StarSAPTAHIK SAKAL 25-02-2006

  अस्तित्वाचा अर्थ शोधणाऱ्या कथा... आशा बगे या अनेक वर्षे सकस कथालेखन करणाऱ्या एक मान्यताप्राप्त लेखिका आहेत. त्यांची कथा समकालीन प्रश्नांना स्वत:च्या खास पद्धतीने भिडते; त्यामुळे त्यांची कथा वेगळेपणाने उठून दिसते. ‘प्रतिद्वंद्वी’ या संग्रहात त्यांच्य चार दीर्घकथा समाविष्ट आहेत. ‘प्रतिद्वंद्वी’ हे शीर्षक असलेली एकही कथा यात नाही. तेव्हा या चारही कथांमधील आशयसूत्र व्यक्त करणारे हे शीर्षक आहे. आशा बगे यांच्या कथा व्यक्तींचे भावसंबंध हळुवारपणे व्यक्त करण्यात रस घेतात. एका व्यक्तीमध्येही अनेक व्यक्तित्वे दडलेली असतात. ही व्यक्तित्वे कधी टोकाची विरोधी - परस्परांना परकी वाटणारी अशी असू शकतात. अशा प्रकारची जाणीव व्यक्त करणाऱ्या यातील कथा शीर्षकामुळे लक्ष वेधून घेतात. ‘दुसरा’ या कथेत अपघात झाल्यामुळे रोजच्यापेक्षा वेगळे जीवन जगणारा कार्तिक स्वत:कडे अधूनमधून रोखून पाहत आहे. त्याला लाभलेला निवांतपणा त्याला अंतर्मुख करीत आहे. त्याची पत्नी, मुली, फिजिओथेरपिस्ट यांच्याशी कार्तिकचे असणारे नाते लहानसहान प्रसंगांतून प्रकाशात येत जाते. तो भोवतालच्या अर्थशून्य घटनांची संगती लावण्याचा खेळ जणू खेळत असतो. त्याची मनोवस्था सूक्ष्मपणाने रेखाटण्यातच कथा विशेष लक्ष घालते. त्यातूनच त्याचे अस्तित्वाविषयीचे नवे भान एखाद्या कवडशासारखे चमकून जाते. ‘किती दूर’ ही कथा वास्तवातल्या एका प्रश्नाला भिडते. अपयश न पचवता येणाऱ्या तरुण पिढीची व्यसनांकडे होणारी घसरण हा आजचा एक सामाजिक प्रश्न आहे. अशी तरुण मुले यशस्वी लोकांचा द्वेष करतात. यशप्राप्तीसाठीची आवश्यक ती वाट न चोखाळता ते जगावर आणि स्वत:वर सूड घेतल्यासारखे वागू लागतात. या कथेतील यशस्वी डॉक्टर दांपत्याचा सुजय हा अशाच तरुणांचा प्रतिनिधी आहे. मेडिकलला प्रवेश मिळवूनही तो बेगुमानपणे वागतो. परिणामत: त्याला होस्टेलमधून काढले जाते. त्याची आई डॉ. ललिता, त्यांच्याकडील आश्रित मनुताई आणि सुजय यांच्यातील विसंवाद व्यक्त करणारी ही कथा एका वळणाशी बदलते. सुजयशी वागताना ललिताची होणारी कोंडी आणि आपल्या बेपर्वा मुलीशी सरळ संबंध तोडणाऱ्या मनुतार्इंविषयीचे भाव सूक्ष्मपणे बदलत जातात. त्याच्या स्वभावातले कंगोरे अनेक प्रसंगातून कथेत जिवंत होत गेले आहेत. ‘निर्मोही’ ही कथा अनुराधाबाई आणि त्यांच्या सोबतीला आणलेली वृद्धाश्रमातील तरुणी कृष्णा यांचे नातेसंबंध चित्रित करते. वृद्धाश्रमाचे वातावरण, अनुराधाबार्इंच्या मुलीचा स्वार्थीपणा आणि कृष्णाचा निर्मोहीपणा यांच्या दर्शनातून कथा भरीव होत जाते. कृष्णाला सुसंस्कृत रूप देऊन घडवू पाहणाऱ्या अनुराधाबाई आणि कृष्णाची खाण्याची वासना वगळता असलेला नि:संगपणा यांच्यातील विरोधी रंग नजरेत भरतो. अनुराधाबार्इंच्या जगण्याच्या तत्त्वज्ञानाला शह देण्याचे काम करून कृष्णा निघून जाते. ही कथा व्यक्तिचित्रणप्रधान ठरते. ‘सखी’ ही कथा देवी व शशी या दांपत्याची कथा आहे. त्यांचा जय हा मुलगा घर सोडून निघून गेलेला आहे. संगीताची जाणकार, मनापासून कोणतेही काम करणारी देवी मुलाला एका मर्यादेपर्यंत समजून घेऊ शकते. तिचे डायरी लेखन, तिची मैत्रीण, पतीशी तिचे असलेले उत्कट नाते, तिची शाळा या साऱ्यांना कथेत भरपूर वाव दिला आहे. तिचे भावजीवन समृद्ध आहे. तिच्या मुलापर्यंत यातले काय झिरपत आले आहे हे पाहता निराशाच पदरी येते. मात्र निरर्थकतेतही अर्थ शोधण्याचा तिचा छंद तिला जगण्याची उभारी देत राहतो. सखी हे येथे तिचे स्वत:शी असलेल्या अर्थपूर्ण नात्याचे प्रतीक वाटू लागते. या सर्व कथा विस्तृत आहेत. काहीसे संथ शैलीतले, काळाची गती अनेक स्पंदनांतून टिपणारे निवेदन आणि अर्थपूर्ण संवाद हे या कथांचे मुख्य विशेष आहेत. संगीत, साहित्य या कलांमधील सांस्कृतिक वारसा या कथांमध्ये सहज सामावला गेला आहे; त्यामुळे यातील लेखनशैली विदग्ध वाटते. खोल चिंतनाकडे वळणाऱ्या या कथांची प्रकृती अभिजात स्वरूपाची आहे; मात्र या कथांना सामाजिक वास्तवाच्या चित्रणाचे परिमाण मिळाले तर अधिक आशयघनता आली असती. जाणकार वाचक या पुस्तकाचे स्वागत करतील. -डॉ. नीलिमा गुंडी ...Read more

 • Rating StarMAHARASHTRA TIMES 26-02-2006

  हवा होता तोल... चौकटबद्ध वर्गवारी नाही करायची असं कितीही म्हटलं तरी स्त्रीकेंद्री कथांचा एक प्रवाह मराठीत निरंतर वाहत आला आहे आणि त्यातल्या काही लेखिकांनी तो अधिकाधिक समृद्ध केला आहे, असं निरीक्षण नोंदवावंच लागतं. आशा बगे हे त्यातलं एक नाव. त्यांचे प्रतिद्वंद्वी’ आणि ‘पाऊलवाटेवरले गाव’ हे दोन कथासंग्रह आले आहेत. कथासंग्रहाचे शीर्षक असलेल्या कथेचा अंतर्भाव साधारणत: संग्रहात असतो. हे दोन संग्रह त्याला अपवाद आहेत. मात्र शीर्षक नामाचं सूत्र संबधित कथासंग्रहात कधी सैल तर कधी घट्ट बंधात जाणवत राहतं. ‘प्रतिद्वंद्वी’मध्ये चार कथांचा समावेश आहे. ‘दुसरा’, किती दूर’, ‘निर्मोही’ आणि ‘सखो’ या चारही कथा विस्तारानुषंगाने दीर्घ कथा म्हणता येतील. आशा बगे यांच्या लिखाणाची एक रीत आहे, त्यानुसार या कथांमध्ये रुढार्थाने घटना फारशा नाहीत. त्या प्रामुख्याने दिसतो तो माणसांतला नातेसंबंधातला शोध घेण्याचा प्रयत्न. नात्यातला तोल राखताना आणि तो राखत स्वत:ला सावरताना माणसाच्या मनात उठणारी वादळं वा तरंग यांची विविध रूपं कथांमधून जागोजागी भेटत राहतात. अपघातामुळे अंथरुणाला खिळलेला आणि त्यातून सावरत असलेला कार्तिक, फिजिओथेरपिस्ट अन यांच्यातला नातेसंबंधांचा धुसरसा पट उभा राहतो तो संमिश्र भावभावनांच्या पार्श्वपटलावर. माणसाच्या सावरण्याच्या क्रियेवर ही कथा भाष्य करून जाते. लौकिकार्थाने वाया गेलेला आणि मनाला असंख्य अढीचे पीळ पडलेला मुलगा आणि त्याची आई यांच्यातल्या संबंधांचा आलेख सामोरा येतो तो किती दूर मधून ही आई स्वत: निष्णात डॉक्टर. तिच्या हातून रोज अनेक जन्म घडतात. पोटचा पोरगा मात्र तिच्यासाठी एखाद्या शापासारखा त्यांच्यातल्या संबंधांच्या आलेखात संघर्षाचे बिंदूचे अनेक. या आलेखाचा शेवटमात्र काहीसा वेगळा. एकूण आयुष्याचे सखाले भान देणारी कथा ‘निर्मोही’. सुखवस्तू आणि समृद्ध घरातल्या अनुराधाबाई आणि त्यांच्या मदतीसाठी (घरकामासाठी) वृद्धाश्रमातून ‘आणलेली’ सामान्य स्त्री कृष्णा. या दोघींच्या व्यक्तित्वं पूर्णत: निराळी. त्यांच्यातल्या संबंधाच्या निमित्ताने आशा बगे एक व्यापक अर्थाचं भान देऊन जातात. ‘सखी’ कथेत एका कुटुंबातल्या व्यक्तींच्या परस्पर संबंधांचं चित्रण आहे. परस्परांना आकळून घेता घेता स्वत:ला आकळून घेण्याचा प्रयत्न करणारी ही माणसं आहेत. ‘पाऊलवाटेवरले गाव’ मधल्या ‘केवडा’, ‘गाव’, ‘लग्न’, ‘अ‍ॅन्टिक’, ‘कलश’ या कथांमधल्या वर्तमानावर भूतकाळाची सतत सावली पडलेली दिसते. ‘पुन्हा एकदा जन्म’ आणि ‘अतिथी’ या दोन कथा मात्र वेगळ्या रीतीच्या आहेत. ‘केवडा’मध्ये प्रतिमांचा तरल आढळ आहे. सर्जनाचा पायरव ऐकवणारी ही कथा उत्तम उतरली आहे. लहानपणची पावलं ज्यांच्या घरात वावरली त्या काकू निवर्तल्याचं कळल्यानंतर त्या गावाला जाणारी अनू... काकुंशी जडलेलं तिचं नातं... अस या कथेचे विविध बिंदू आहेत. ‘लग्न’ ही कथा उलगडते बरीचशी पत्रांमधून. आंतरजातीय विवाहामुळे उठलेले कल्लोळ हे कथेच्या पृष्ठाभागी असले तरी त्या पल्याडचं असं बरंच काही ही कथा सांगू पाहते. ‘पुन्हा एकदा नवा जन्म’ मधली कावेरी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. ट्यूमर झाल्याने तिचं गर्भाशय काढून टाकलं आहे. हॉस्पिटलमधल्या मुक्कामात जुन्या आठवणींच्या निमित्ताने तिला स्वत:ला तिच्याच एका नव्या जन्माचं भान लख्खपणे येते. मात्र भोवतालात ते विरूनही जाते. ‘अतिथी’ मध्ये उतारवयात विवाह करण्यासाठी निघालेलं आणि अगदी जवळून मृत्यूचं दर्शन घडलेलं जोडपं आहे. या दोन्ही कथासंग्रहांचा समग्र विचार करायचा तर त्यात जमेच्या बाजू आहेत तशाच त्रुटीदेखील. मानवी नातेसंबंधांबाबतचं कुतूहल आणि आस्था कथांमध्ये आहे. अशा लिखाणात प्रतिमा-प्रतिकांचा वापर होत असतोच; तसाच तो इथेही आहे. असा वापर तरलतेने तोल राखून झाला तर कथा उंची गाठू शकते. या संग्रहांतल्या काही कथा त्यात काहीशा कमी पडतात. काही ठिकाणी प्रतिक-प्रतिमांचा वापर ढोबळ करकरीतपणे होतो. कथेच्या मूळ वृत्तीशी तो तादात्म्य पावू शकत नाही. त्यामुळे तरल पातळीवर चालत असलेल्या कथेची पावलं अचानक दुसऱ्या पातळीवर पोहोचतात. रसभंग तिथे होतो. हा तोल राखला गेला असता तर कथा अधिक उत्तम झाल्या असत्या. -राजीव काळे ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ARTHACHYA SHODHAT
ARTHACHYA SHODHAT by Viktor E. Frankl Rating Star
Krushna Sapate

नाझी छळ छावण्यांमध्ये आपलं मरणप्राय जीवन जगत असताना देखील आशेचा एक किरण लेखकाला कसा तगवून होता. जीवनाचा अर्थ शोधताना आपण काय करायला हवं याचं मार्मिक वर्णन लेखकाने लोगोथेरपीच्या माध्यमातून केलं आहे. अनेकांच्या जीवनाला कलाटणी देणारं "अर्थाच्या शोधा" हे पुस्तक आपणास या काळात नवी उमेद देईल. डॉ.कृष्णा सुभाष सपाटे ...Read more

SANCTUS
SANCTUS by SIMON TOYNE Rating Star
Harshada Gore

एक षडयंत्र, ज्याची निर्मिती तीन हजार सालांपासुन आहे, एके दिवशी Samuel ने तुर्कीच्या रुईन शहरात एक प्राचीन धार्मिक गढी असलेल्या डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केली. ही आत्महत्या news channels वर प्रसारित केली गेली, संपूर्ण जग या आत्महत्येला साक्ष होते परंतु केवळ काही मूठभर लोक या आत्महत्येमागील प्रतिकात्मक अर्थ शोधू शकले. या दुःखद घटनेने कॅथीरन मान आणि तिचा मुलगा Gabriel, जे धर्मादाय लोक आहेत आणि न्यूयॉर्कमधील गुन्हे रिपोर्टर लिव्ह अ‍ॅडमसन यांचे जीवन एकत्र आणले. त्यांनी प्रकटीकरणाचा प्रवास सुरू केला, ते जे उघड करणार आहेत ते सर्व काही बदलेल ... Sanctus एक अतिशय अनोखी कथा सांगते.पहिली गोष्ट म्हणजे, बहुतेक धार्मिक / षड्यंत्र thrillers ला विपरीत, Sanctus एक अलौकिक कथा आहे. दुसरे म्हणजे, या शैलीतील बर्‍याच कादंबर्‍या खर्‍या धार्मिक संस्थांसह वास्तविक ऐतिहासिक ठिकाणी घडतात. सॅंक्टस मधील कथा एका काल्पनिक शहरात घडली आणि ही कथा एका काल्पनिक, धार्मिक व्यवस्थेभोवती फिरली. म्हणूनच, मला वाटते की सँक्टसने या शैलीमध्ये काहीतरी नवीन आणले आहे. शिवाय काल्पनिक, धार्मिक सुव्यवस्थेबद्दल एक कथा सांगून, सँक्टस यांनी वाचकांसाठी पुस्तकाची मजा घेण्यासाठी एक जागा तयार केली. Simon Toyne ने उत्तम प्रकारे लिहिलेल्या, काल्पनिक कथेसह ही थीम कुशलतेने परिधान केली. कथेची गती वेगाने जाते आणि छोट्या अध्यायांच्या उत्कृष्ट वापरामुळे ती आणखी वाढविली गेली आहे. त्याच वेळी हे पुस्तक संशयास्पद आणि धक्कादायक आहे कारण एक गूढ वातावरण सतत कथेला कवटाळते. हे कथानक अधिक घट्ट होत गेल्याने वाचकांना गूढ उत्तरावर अधिकाधिक उत्सुकता निर्माण होईल. पुस्तकाच्या शेवटी लेखकाने रहस्येमागील सत्य कसे प्रकट केले ते मला विशेषतः आवडले. जेव्हा मी या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर पोहोचले तेव्हा मी ते वाचणे थांबवू शकत नाही, कारण मला फक्त पुस्तकाच्या अंतिम कोडेचे उत्तर शोधायचे होते. जेव्हा अखेरीस गूढतेचे उत्तर उघड झाले तेव्हा तर फार interesting वाटले कारण ते पूर्णपणे अनपेक्षित होते. मी म्हणेन की मी वाचलेल्या चांगल्या धार्मिक थ्रिलर्सपैकी एक आहे सँक्टस. ज्यांना वेगवान, धार्मिक / षडयंत्र थ्रिलर्स वाचण्यास मजा येते, त्यांच्यासाठी मी सँक्टसची शिफारस करते. ...Read more