* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: PARENTING THE OFFICE
 • Availability : Available
 • ISBN : 9788184982640
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 228
 • Language : ENGLISH
 • Category : BUSINESS & MANAGEMENT
 • Sub Category :
 • Discount : Individual(Login to get best discount offers.)
Quantity
Presents common management situations on a casebycase basis, with solutions that are effective, concise, and sometimes even fun. Many of the issues raised in the workplace are also common to family life, from the desire of the youngest to rival the oldest child to bullying and rivalry. PARENTING THE OFFICE equates these lessons learned from children to business and family life alike, using case histories to discuss applications and clarify problems.
N/A
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
 • Rating StarVYAPARI MITRA OCT-NOV.2016

  ‘पेरेंटिंग द ऑफिस’ हे डोरीस आणि फिलिप या डेव्हिडॉफ दांपत्याने स्वत:च्या डोनाल्ड आणि डग्लस या सुपुत्रांसमवेत लिहिलेले पुस्तक ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे. ऑफिस आणि कुटुंब या दोन ध्रुवाइतक्या भिन्न गोष्टी वाटत असल्या, तर सूक्ष्म अवलेकनानंतर त्यांच्यामध्ये समान प्रेरणा कार्यरत असल्याचे जाणवते. समाजातील कुठल्याही संस्थेचा मूळ गाभा हा त्यातील व्यक्ती असतात. त्यांच्यातील नातेसंबंध असतात. कुटुंब आणि ऑफिस यांच्यात मुलभूत फरकही असतात. पण दोन्हीतल्या साम्यस्थळांना केंद्रस्थानी ठेऊन या पुस्तकाचे लेखन केले आहे. कुटुंबातील भावंडांमध्ये असलेली चढाओढ, प्रतिस्पर्धा ऑफिसमधील कर्मचा-यांतही असते. या प्रतिस्पर्धेला सकारात्मकता व सलोख्याची जोड देऊन ती रचनात्मक पातळीवर नेता येते, हे या पुस्तकातून दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न झालेला आहे. हे पुस्तक दोन भागात लिहिले गेले असून पहिल्या भागात एक ते सात प्रकरणे आहेत आणि दुस-या भागात एक ते आठ प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरणाची सुरुवात लोकोत्तर विभूती आणि जगन्मान्य लेखक यांच्या एका वचनाने होते. त्यातील प्रत्येक वचन कुटुंब संस्था व उद्योगसंस्था यांच्यावर अत्यंत समर्पकपणे भाष्य करते. उदा. ‘ऑल फॉर वन, वन फॉर ऑल (पान क्र. ३३, ‘युनायटेड वुई स्टँड, डिव्हायडेड वुई फॉल’ (पान १०५) अशी अनेक वचने आहेत जी वाचकांना विचार करण्यास भाग पाडतात. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी व्यवस्थापनाने कर्मचा-यांना मार्गदर्शक ठरतील अशा टिप्स दिलेल्या आहेतच, शिवाय कर्मचा-यांनी व्यवस्थापनाला दिलेल्या सूचना सुद्धा आहेत. ज्या तितक्याच मार्गदर्शक आणि रचनात्मक आहेत. अशा सूचना देणे हा केवळ व्यवस्थापनाचा विशेषाधिकार नसून तो कर्मचा-यांचाही हक्क आहे, हे समानतेचे आणि खुल्या समाजव्यवस्थेचे तत्त्व या पुस्तकाद्वारे मांडले आहे. प्रत्येक प्रकरणात लेखक मंडळी ऑफिस नावाच्या कुटुंबाच्या संगोपनाची संकल्पना प्रत्यक्षात घडलेल्या गोष्टी आणि प्रसंग यांच्या माध्यमातून व्यक्त करतात आणि कुटुंबातील व ऑफिसातील स्पर्धा आणि चढाओढ यांना निरोगी बनवून दोन्हीचा विकास करता येतो हे दाखवतात. डेव्हिडॉफ दांपत्याच्या कौटुंबिक आणि उद्योगविषयक सुरुवात एकाच वेळी झाल्यामुळे त्यांना दोन्हीमध्ये समानता आढळून आली आणि त्या स्वानुभवातून ‘पेरेंटिंग द ऑफिस’ ही संकल्पना पुढे आली. यावर अनेक वर्षांचे विचारमंथन झाल्यानंतर त्यांच्या हाती काही सुवर्ण सूत्रे लागली. या सुवर्णसुत्रांची गुंफण म्हणजेच या पुस्तकाची सिद्धता. या संकल्पनेची मांडणी करताना वापरलेली तत्त्वे, ख-याखु-या लोकांनी कथन केलेल्या त्यांच्या कहाण्या मात्र निश्चितच नवीन आहेत. अनुभवाच्या कसोटीवर सिद्ध झालेली व्यवस्थापनाची सूत्रे निश्चितच क्रांतिकारक व मार्गदर्शक आहेत. ती यापूर्वी कोणत्याही पुस्तकात मांडली गेली नाहीत. पुस्तकाच्या पहिल्या भागात कुटुंबातील नातेसंबंधामागे असलेल्या प्रेरणाच ऑफिसमध्येही कार्यरत असल्याचे दाखविले आहे. घरातील भावंडांमध्ये असलेली चढाओढ व धुसपूस ऑफिसातील कर्मचा-यांतही कशी प्रकर्षाने जाणवते हे मांडलेले आहे. या साम्याकडे व्यवस्थापकांनी डोळसपणे पाहावे आणि त्या मागच्या कारणांची वस्तुनिष्ठपणे छाननी करावी, असे सुचविले आहे. अशा प्रकारच्या परिस्थितीला भविष्यात कधीतरी सामोरे जावे लागेलच हे गृहीत धरून उपाययोजना करावी. अशा उपाययोजना करण्यासाठी कोणते मार्ग अवलंबावे हे या भागात विस्तृतपणे दाखवले आहे. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

PARVA
PARVA by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
Veerashri Vaidya - Karandikar

#पर्व #डॉ_एस_एल_भैरप्पा दैवी चमत्कार , शाप , वर या महाभारतातील गोष्टीना फाटा देत त्यावेळी घडलेल्या घटना , प्रसंग ,परिस्थिती त्याचा वस्तूनिष्ठ अर्थ लावून डॉ भैरप्पा यांनी `पर्व` लिहिले आहे आहे. महत्वाच्या मुख्य पात्रांना माणूस म्हणून मांडले आहे.यासाठी महाभारतातील प्रसंग जिथे जिथे घडले तिथे त्यांनी भेटी दिल्या. अनेक अपरिचित रूढी, परंपरा त्यांना दिसून आल्या ,ज्या महाभारत कालीन जीवनात होत्या. कादंबरीमागील लेखकाचा अभ्यास ,तर्कसुसंगत विश्लेषण अगदी प्रस्तावनेपासून दिसून येते. मूळ महाभारत फार परखड आहे ,ते कोणाचेच गुण -दोष लपवत नाही, अगदी भगवान श्रीकृष्णाचे सुद्धा. व्यासांनी सगळ्या पात्रांबद्दल तटस्थपणे लिहिले आहे. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित डॉ भैरप्पांनीही नेमका हाच तटस्थपणा कादंबरीतही कायम ठेवला आहे. कोणत्याही एकाच व्यक्तीवरचे लिखाण म्हणजे त्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण महाभारत बघण्यासारखे होते. यातून त्या पात्राबद्दल गुणांचे उदात्तीकरण आणि त्यामुळे दोष झाकोळणे हे होतेच , पण समग्र वाचले तर कळते महाभारत ग्रे शेड चे आहे , प्रत्येकाचे गुण-दोष असणारे. `पर्व ` ने ही हेच सूत्र कायम राखले आहे. महाभारताच्या व्यक्तिरेखांबाहेर जाणारी वेगळी अशी कोणीही व्यक्ती नाही असे म्हणतात. अगदी खरे आहे. महाभारत हे चिरंतन आहे. आपण सगळेच दैनंदिन आयुष्यात त्यातले कुठले ना कुठले पात्र जगत किंवा वठवत असतो. कधी भीष्म , कधी धृतराष्ट्र तर कधी कृष्ण सुद्धा ! पात्र चांगले किंवा वाईट असं न बघता, ते जे वागले , त्यांनी जे निर्णय घेतले - त्याचे परिणाम कसे झाले ? आपल्याला त्यांच्याकडून अपेक्षित असलेले असे योग्य निर्णय कोणते होते ? तसे योग्य निर्णय आपण दैनंदिन आयुष्यात वेळ आली तर घेतो का ? , घेऊ शकतो का ? याचे चिंतन हेच त्यातून हाती येणारे सार आहे असे मला वाटते . हे नाही जमलं तरी किमान, परीक्षण करून वागणें हे आपल्या हाती नक्कीच आहे. उमा कुलकर्णी यांच्या उत्तम अनुवादामुळे मराठी भाषेत `पर्व` आपल्यापर्यन्त नेमकेपणाने पोहोचले आहे. महाभारत काळे वा पांढरे नाही तर ग्रे शेड चे आहे. म्हणजे कुठलीच व्यक्ती पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट नाहीये त्यात. दुर्दैवाने आपल्याला वाचताना पचत नाही ते. एकच रंग बघायला आणि समजायला सोपा असतो. म्हणूनही काहींना `पर्व ` रुचत नाही. © वीरश्री वैद्य - करंदीकर ...Read more

VAISHAKH
VAISHAKH by RANJEET DESAI Rating Star
Chetan Koli

खूप मस्त आहे हे पुस्तक... छोट्या कथा आहेत, पण लालित्यपूर्ण आहेत.