Vijay Chavan
महाराजांच्या बद्दल काय लिहावं?
ज्यांच्यामुळे स्त्रियांच्या कपाळी कुंकू अन् पुरुषाच्या डोक्यावर फेटा आज दिसतोय असे शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र दर्शन घडविणारे पुस्तक "श्रीमानयोगी" तब्बल ११३२ पानांची ही चरित्र गाथा अन् ३९ पानांची प्स्तावना वाचणार्याने स्वतःला धन्य समजावे अन् ज्यामुळे आजवर अनेक सुसंस्कृत पिढ्या घडल्या अन् यापुढेही घडत राहतील असे सर्वांनी आवर्जून वाचावे.
ते गेलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे पण त्यांची शेवटची घटका जेव्हा जवळ येते तेव्हा काहीतरी चमत्कार व्हावा आणि हा राजा जगावा, या जगावेगळ्या राजाचं अलौकिक राजेपण असच बहरत राहावं असं वाटतं राहतं.
पण ते शक्य नाही म्हणून आपण कासावीस होतो, भरलेल्या डोळ्यांतले काही थेंब पुस्तकावर सांडतात, मोठ्या कष्टाने गळ्यात दाबून ठेवलेला हुंदका फुटतो , आणि आपला राजा आता जाणार , काही अपूर्ण स्वप्ने सह्याद्रीच्या कुशीत सोडून कायमचा जाणार म्हणून आपण कष्टी होतो..हळहळतो
पण त्यांचेच शब्द आपल्याला आधार द्यायला येतात - ` जशी श्रींची इच्छा!`
महाराज डोळे उघडतात. मनोहारी दूर दिसते.
राजे विचारतात, ` मनु ,काय करतेस पोरी?`
` पाय चेपतेय राजे..` हुंदका आवरत मनु म्हणते.
` मग मला का जाणवत नाही...` राजे एवढं बोलतात आणि देह सोडतात.
सह्याद्री एवढा माणूस....हो माणूसच. आणि म्हणूनच महत्वाचा. खूप खूप महत्वाचा... या पिढीसाठी आणि येणाऱ्या हजार पिढ्यांसाठी... आता असं होतंय की पुस्तकाची महती सांगावी की राज्याचं माहात्म्य सांगावं ?
लिखाणही काय भारदस्त...म्हणजे राजेंच्या जीवना सारखं राजबिंड...अस्सल...
राजेंच्या तलवारी सारखं....धारदार
राजेंच्या डोळ्यातल्या स्मितासारख...आशादायी
जिजाऊच्या प्रेसेन्स सारखं....प्रेमळ, प्रेरणादायी
आणि मावळ्यांच्या ह्रदयासारखं...भक्तिपूर्ण, निर्मळ आणि ताकदवान... आणि राजेंच्या कर्तुत्वाबद्दल किती बोलावं..?
काय काय बोलावं...?
अक्षर कळायला लागल्यावर हे पुस्तक पाहिले वाचायला हवं होत, असं वाटायला लावणारं, मोजक्या पुस्तकांतील एक पुस्तक...श्रीमान योगी..
मी उशिरा वाचलं...तुम्ही तरी लवकर वाचा...
...Read more
Swapnaja Pawar मी वाचले आहे हे पुस्तक .....
वाचताना त्यांचे हाल पाहून काही ठिकाणी अंगावर शहारा येईल पण जरी ही भयावह आणि वेदनादायक सत्य कथा असली तरी त्याचा दुसरा पण एक परिणाम आहे .....
जपानचा जलद विकास झाला आणि जपान सैनिकांच्या विळख्यात जाण्यापासून वाचला ....
मानवी अस्तित्वाच्या बाबतीत एक विसंगती आहे की अतिशय कठीण, जीवनाची परीक्षा बघणाऱ्या वेदनेच्या अंधारातही माणसाला प्रगतीच्या वाटेवर नेणारे , आनंददायी असे लखलखीत क्षण सापडतात ...📖
...Read more