Rajmohan Gandhi

About Author

Birth Date : 07/08/1935




‘सेंटर फॉर साउथ एशियन अँड मिडल ईस्टर्न स्टडीज’, इलिनॉइझ युनिव्हर्सिटी, अर्बना-शॅम्पेन, यूएसए येथे रिसर्च प्रोफेसर म्हणून राजमोहन गांधी कार्यरत आहेत. ते १९९७ सालापासून इलिनॉइझ विद्यापीठात राज्यशास्त्र आणि इतिहास या विषयाचे अध्यापन करत आहेत. सन १९९०-९२ या काळात ते राज्यसभेचे सभासद होते. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सर्वपक्षीय कमिटीसमोर अनुसूचित जाती-जमाती यांची स्थिती मांडण्याचे काम त्यांनी केले आहे. १९५६ सालापासून ते ‘इनिशिएटिव ऑफ चेंज’ या संस्थेशी संलग्न असून गेल्या अर्ध शतकाहून अधिक काळ ते लोकशाहीकरणासाठी, भ्रष्टाचार व विषमता यांविरुद्ध लढा देण्याच्या कार्यात सक्रिय आहेत. त्यांना भारत तसेच भारताबाहेरील विविध संस्थांकडून भाषणे देण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आमंत्रित करण्यात येते. आणीबाणीच्या काळात त्यांनी लोकशाही हक्कांसाठी लढा देण्याच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला. काही काळ त्यांनी मुंबईतून ‘हिम्मत’ नावाचे साप्ताहिकही चालवले. ९/११ नंतर पाश्चिमात्य राष्ट्र आणि इस्लामी देश यांच्यातील संबंध सुधारण्याच्या कार्यात त्यांचे विशेष योगदान आहे. त्यांची सखोल संशोधनात्मक लेखन केलेली पुस्तके प्रकाशित असून त्यांना साहित्य अकादमीसारख्या महत्त्वाच्या पुरस्कारांनी व मानसन्मानांनी गौरवण्यात आले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MOHANDAS Rating Star
Add To Cart INR 995

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
वैशाली देशमुख (पांडे), अमरावती.

काल लायब्ररीतून `छाटीतो गप्पा` हे लेखक जी.बी.देशमुखांचं पुस्तक घेतलं. एका बैठकीत वाचून संपवलं. साध्या, सोप्या, हलक्याफुलक्या भाषेत सांगितलेल्या रंगतदार गोष्टी वाचताना खूप मजा आली. जीवनाची लज्जत वाढवणाऱ्या आणि त्याचबरोबर अंतर्मुख करणाऱ्या या गप्पा लावाब आहेत! मनाला उभारी देणार असं हलकफुलकं पुस्तक क्वचितच हाती येतं. लेखकाला धन्यवाद. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
अविनाश कुळकर्णी, नागपूर.

जी.बी.देशमुख लिखीत `दुर्दम्य ` पुस्तक आज वाचलं. एका व्यक्ती विशेषचं इतक सरस आणि मार्मिक वर्णन लेखकाने ज्या शैलीत साकारलय ते फारच छान. पुस्तकातील शेवटची ४-५ पानं तर हृदय हेलावून टाकतात. लेखकाकडून असेच सुंदर,बहारदार आणी मार्मिक लेखन होत रहावं हीच दिच्छा. अप्रतिम. ...Read more