RAVINDRA BHAGAWATE

About Author


RAVINDRA BHAGWATE HAS WRITTEN FOR THREE MARATHI FILMS VIZ.SUKHI SANSARACHI BARA SUTRE, EK MARATHI MANOOS AND VEES MHANJE VEES. BESIDES HE HAS WRITTEN SCREENPLAY DIALOGUES FOR MARATHI SERIALS LIKE ‘ YAALAA JEEVAN AISE NAAV’ , ‘ VEDH’ ETC. HIS PROFESSIONAL PLAY ‘ QUEENMAKER ‘(DIRECTED BY RAJAN TAMHANE) WAS APPRECIATED WIDELY BY THE CRITICS.HIS PLAY ‘SEEDLESS’ WON A.B. MARATHI NATYA PARISHAD’S FIRST PRIZE WORTH RS. 21,000/-IN A SCRIPTWRITING STATE LEVEL COMPETITION. HIS PLAY ‘ DOUBLE LIFE’ ALSO WON PRIZES IN SOME OTHER SCRIPTWRITING COMPETITIONS . HE HAS ALSO WRITTEN FOR STATE DRAMA COMPETITION AND ONE ACT PLAY COMPETITIONS. HIS SHORT STORIES AND POEMS ALSO FIND SPACE IN RENOWNED MAGAZINES. THE NEXT ON OUR PUBLICATION LIST IS ‘ GONE TOMORROW ‘ BY LEE CHILD TRANSLATED BY HIM.

रवींद्र भगवते यांनी आतापर्यंत ‘सुखी संसाराची बारा सूत्रे’ , ‘ एक मराठी माणूस ‘ आणि ‘ वीस म्हणजे वीस ‘ या तीन मराठी चित्रपटांचे पटकथा संवाद लेखन केले असून ‘याला जीवन ऐसे नाव’, ‘वेध’ आणि काही मालिकांचेही लेखन केले आहे. त्यांचे ‘क्वीनमेकर’ हे राजन ताम्हाणे दिग्दर्शित व्यावसायिक नाटक समीक्षकांनी प्रशंसापात्र ठरवले होते. त्यांच्या ‘सीड्लेस’ या नाटकाला अ.भा. मराठी नाट्यपरिष्देचे नाट्यलेखनाचे रु.21000 चे प्रथम पारितोषिक प्राप्त होते. डबल लाइफ या नाटकानेही नाट्यलेखनाची पारितोषिके इतरत्र मिळविली आहेत.याबरोबरच त्यानी राज्य नाट्यस्पर्धा, एकांकिका स्पर्धांसाठी लेखन केले आहे. त्यांच्या काही कथा आणि कविताही साप्ताहिकांमधून, मासिकांमधून प्रकाशित होत असतात. रवींद्र भगवते यांनी अनुवादित केलेले, जगप्रसिद्ध लेखक ‘ली चाइल्ड ‘यांचे ‘गॉन टुमॉरो’ हे पुस्तकही प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
Sort by
Show per page
Books not found in this category.

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोहोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
मिलिंद रोहोकले

फारच छान आहे