Santosh Rangapure महाभारता वरची बरीच पुस्तके वाचली आहेत परंतु एकलव्याची बाजू संपूर्ण पणे वाचावे असे बरयाच दिवसांपासुन डोक्यात होते आणि शरद दळवी लिखित `एकलव्य` पुस्तक सापडले आणि पुस्तकाने अक्षरशः झपाटून सोडले. एका शिष्याची गुरूप्रती अगाध, अगम्य श्रद्धा आणि तेही गुरू अनयाय करतोय हे माहीत असून देखील हे सर्व अक्षरशः थक्क करणारे आहे. एकलव्याने गुरुदक्षिणा म्हणून अंगठा दिला इथपर्यंत आपणा सर्वांनाच माहीत आहे परंतु अंगठा नसून देखील एकलव्य अर्जुन आणि कर्ण यांच्यापेक्षा उत्कृष्ट धनुर्धर होता युद्धात त्याने अर्जुनाला सळो की पळो करून सोडले हे वाचणे खूपच उत्कंठावर्धक आहे शिवाय एकलव्य निषादांचा राजा होता आणि आपले राज्य त्याने खूपच संतुलित पद्धतीने चालवून एक आदर्श निर्माण केला होता. अनेक माहित नसलेल्या गोष्टींचा उलगडा केल्याबद्दल लेखकाचे मनःपूर्वक आभार... मित्रांनो नक्कीच वाचा हे पुस्तक महाभारता मधील एक वेगळाच पैलू अनुभवायला मिळेल. ...Read more
Divya Marathi 07.12.19 एका मुलाचे हृदयस्पर्शी, भावस्पर्शी अनुभवकथन…
आत्मकथन किंवा अनुभवकथन हा वाचकप्रिय साहित्यप्रकार आहे. कथनकाराचं जीवन जवळून अनुभवण्याचा आनंद हा साहित्यप्रकार देतो. सर्वसाधारणपणे वृद्धत्वाकडे वाटचाल सुरू झाली, की माणसं आत्मकथन किंवा अनुभवकथनाचा मार्ग अुसरतात; पण एखाद्या व्यक्तीचं जीवन इतकं वादळी किंवा जगावेगळं असतं, की तारुण्यातच त्याला असं वाटतं, की आपल्या जीवनातील अनुभव लोकांसमोर मांडावेत. तीसवर्षीय सरू ब्रायर्लीलाही असंच वाटलं आणि त्याने आपले अनुभव ‘अ लाँग वे होम’मधून मांडले. हे अनुभव मराठीत अनुवादित केले आहेत लता प. रेळे यांनी ‘घरपरतीच्या वाटेवरती...’ या शीर्षकासह.
सरू मूळचा भारतातल्या मध्य प्रदेशातील खांडव्याचा. लहानपणी आपल्या मोठ्या भावाबरोबर ट्रेनमधून जात असताना तो हरवतो व कोलकत्त्याला अनाथाश्रमात पोहोचतो. तिथे असताना १९८७मध्ये एक ऑस्ट्रेलियन दांपत्य त्याला दत्तक घेते. आपल्या ऑस्ट्रेलियातील नव्या कुटुंबाबरोबर आनंदात राहत असूनसुद्धा भारतातल्या कुटुंबाबद्दलच्या त्याच्या आठवणी त्याला नेहमीच अस्वस्थ करत राहतात. पंचवीस वर्षांनी सरू आपल्या लहानपणीच्या पुसट आठवणींच्या जोरावर, ‘गुगल अर्थ` व ‘फेसबुक`च्या मदतीने भारतातील आपले गाव, घर शोधून काढतो. भारतात येतो व आई, भावंडांशी आपले संबंध पुनप्र्रस्थापित करतो.
ही कथा अद्भुत पण खरीखुरी आहे. त्याच्या गरिबीत काढलेल्या दिवसांची, हरवल्यानंतरची आणि कोलकात्याच्या अनाथाश्रमातील खडतर अनुभवांची, ऑस्ट्रेलियातल्या जीवनाची, आपले भारतातले मूळ गाव व कुटुंब शोधण्याच्या ध्यासाची, धडपडीची आणि अविरत प्रयत्नांची आणि हे सगळं करत असताना मनात उठलेल्या विचारांच्या कल्लोळाची! ही धडपड होती, आपण कोण आहोत, कुठून आलो, आपल्या भावाचं काय झालं ते शोधून काढण्याची व भारतातील कुटुंबीयांना तो अजून जिवंत आहे हे सांगण्यासाठी! त्याचा हा संघर्ष म्हणजे कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मिळेल ती संधी साधत, हार न मानता सतत प्रयत्न चालू कसे ठेवावेत, याचा वस्तुपाठच आहे.
या अनुभवकथनाच्या शेवटी सरू लिहितो, ‘कसंही पाहिलं तरी, माझं भारतात परत येणं व माझ्या आई-भावंडांचं जीवन डोळ्यांनी पाहणं, हा वैयक्तिक व सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न करणारा अनुभव आहे. विशेषतः मी माझ्या बहीण-भावाकडे बघतो, तेव्हा कुटुंबावर व नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करण्याच्या त्यांच्या पारंपरिक दृष्टिकोनाचं मला कौतुक वाटतं. शब्दांत सांगणं कठीण आहे; पण मला वाटतं, की उपनगरात अलिप्तपणे राहून व वैयक्तिक स्वातंत्र्यावर भर देता देता आपण पाश्चिमात्य देशांत काहीतरी हरवून बसलो आहोत.’ सरूचे हे विचार चिंतनीय आहेत. त्याचं कुटुंबाविषयीचं प्रेम मनाला स्पर्शून जाणारं आहे.
सरूचं हे आत्मकथन मुळातून वाचण्यासारखं आहे. लता रेळे यांचा अनुवाद उत्तम.
...Read more