ISHMAEL BEAH

About Author


BORN IN SIERRA LEONE, ISHMAEL BEAH IS NOT ONLY A WRITER; BUT HE IS ALSO A HUMAN RIGHTS ACTIVIST. ISHMAEL BECAME POPULAR AS A WRITER DUE TO HIS BESTSELLING NOVEL A LONG WAY GONE. ISHMAEL BEAH SAYS, "I LIVE KNOWING THAT I HAVE BEEN GIVEN ANOTHER LIFE AND I JUST TRY TO HAVE FUN, BE HAPPY AND LIVE IT AS MUCH AS POSSIBLE;" THIS YOUNG WRITER, WHO IS ONLY 44 YEARS OLD, IS REACHING THE PEAK OF FAME WITH SUCH THOUGHTS. HIS NOVEL "RADIANCE OF TOMORROW" WAS PUBLISHED IN JANUARY 2014 AND IT WAS ALSO A FAVORITE OF THE READERS AND THE NOVEL PUBLISHED IN 2020 IS "LITTLE FAMILY"!

सिएरा लिओन इथे जन्मलेले इश्माएल बीह हे लेखक तर आहेतच; परंतु त्याचबरोबर ते मानवाधिकार कार्यकर्तेही आहेत. इश्माएल हे लेखक म्हणून लोकप्रिय झाले ते त्यांच्या "अ लाँग वे गॉन" या वाचकप्रिय कादंबरीमुळे. इश्माएल बीह म्हणतात, "मला दुसरं जीवन मिळालं आहे हे जाणून मी जगतोय आणि मी फक्त मजा करण्याचा, आनंदी राहण्याचा आणि शक्य तितकं हे सर्व जगण्याचा प्रयत्न करतोय;" अशा विचारांचे फक्त ४४ वर्षांचे हे तरुण लेखक प्रसिद्धीची शिखरं गाठत आहेत. त्यांची "रेडियंस ऑफ टुमॉरो" ही कादंबरी जानेवारी २०१४मध्ये प्रकाशित झाली असून तीसुद्धा वाचक पसंतीस उतरलेली आहे आणि २०२०मध्ये प्रकाशित झालेली कादंबरी आहे, "लिट्ल फॅमिली"!
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
A LONG WAY GONE Rating Star
Add To Cart INR 420

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोहोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
मिलिंद रोहोकले

फारच छान आहे