Allan Pease, Barbara Pease

About Author

अ‍ॅलन आणि बार्बरा पीस यांनी लिहिलेल्या एकूण चौदा पुस्तकांपैकी आठ बेस्टसेलर ठरली आहेत. त्यांचे साहित्य पन्नास भाषांमध्ये प्रसिद्ध होऊन जवळजवळ शंभर देशांतील वाचकांपर्यंत पोहोचले आहे. त्यांच्या पुस्तकांच्या दोन कोटींहून अधिक प्रती आतापर्यंत विकल्या गेल्या आहेत. या दोघांनी लिहिलेले व्हाय मेन डोन्ट हॅव अ क्लू अ‍ॅण्ड विमेन ऑल्वेज नीड मोअर शूज हे पुस्तकही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अ‍ॅलन पीस हे जन्माने ऑस्ट्रेलियन असून व्यवसायानिमित्त तीस देशांमध्ये त्यांचे सतत भ्रमण चालू असते. यशस्वी होण्याचा मंत्र ते गेली तीस वर्षे जगाला शिकवीत आहेत. सहा बीबीसी सायन्सच्या कार्यक्रमांचा विषय ते करीत असलेले कार्य हा आहे. बार्बरा पीस या अनेक बेस्टसेलर पुस्तकांच्या लेखिका व सहलेखिका आहेत. त्या ऑस्ट्रेलियन तरुणांना बॉडी लँग्वेज व संभाषण कौशल्ये शिकवतात. त्या अत्यंत यशस्वी मॉडेल व विक्री क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहेत. आपल्या पुस्तकातील माहिती अचूक व परिपूर्ण असावी यासाठी हे दोघे भरपूर मेहनत घेतात. त्यासाठी ते देशोदेशीच्या एक्स्पर्ट्सना भेटतात, लोकांच्या मुलाखती घेतात, सेमिनार्स घडवून आणतात. म्हणूनच त्यांची पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरतात.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
WHY MEN DON’T LISTEN AND WOMEN CAN’T... Rating Star
Add To Cart INR 140

Latest Reviews

DONGRI TE DUBAI
DONGRI TE DUBAI by S.HUSSAIN ZAIDI Rating Star
Ranjeet Waghmare

तस्करी, गोळीबार, खंडणी, एन्काऊंटर आणि बरंच काही... -------- मुंबईच्या डोंगरी भागातील एका पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा, पोलिसांचा वापर करून मुंबईत दादागिरी करतो. मुंबई पोलिसांच्या सहकार्याने कैक दोन नंबर धंदे, अनेक वस्तूंची तस्करी करतो. मुंबई पोलिसांकरव (एन्काऊंटर च्या माध्यमातून) विरोधकांना संपवतो. पुढे मुंबईत बॉम्बस्फोट अन मुंबईतून दुबईला पलायन, पाकिस्तानात आश्रय आणि शेवटी मुंबई पोलीसच त्याच्या मागावर. असा थक्क करणारा प्रवास म्हणजे लेखक एस. हुसैन झैदी यांचं `डोंगरी टू दुबई` हे दाऊद वरील पुस्तक. या पुस्तकामध्ये `दाऊद`ला डॉन करण्यापर्यंत छोटा राजन, छोटा शकील व त्याचे मित्र, मद्रासी गुंडांच्या व पठाणांच्या टोळ्या, दाऊद-गवळी यांच्या गॅंग मधील टोकाची दुश्मनी, हाजी मस्तानची दहशत, 1960 साली दारूच्या धंद्यातून वर्षाला 12 कोटी रुपये कमावणारा वरदराजन, तर बाबू रेशीम, रमा नाईक आणि अरुण गवळी यांची BRA ही टोळी. मन्या सुर्वे, करीम लाला अशा अनेक गुंडांच्या टोळ्यांमध्ये कधी दोस्ती तर जास्त करून दुश्मनी. विरोधकांवर गोळीबार, खून हे नित्याचेच. `खून का बदला खून` हे सूत्र ठरलेले. कहर म्हणजे भर दिवसा हायकोर्ट व तुरुंगात जाऊन विरोधकांवर गोळीबार करून बदला घेणे. तर वेळप्रसंगी स्वतःचा बचाव करण्यासाठी काही गुंडांचे देशो-देशी पलायन. खंडणीसाठी उद्योजक, बिल्डर, बॉलिवूडकरांना धमक्या, अपहरण. वेळप्रसंगी खून हे या जगातील उठाठेवी. या सर्वांचा निपटारा व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून एखाद्या गुंडाचा नियोजित पद्धतीने एन्काऊंटर करणे (थोडक्यात पोलिसांकडूनही खुनच) असे हे `याच जगातील वेगळे जग` `डोंगरी ते दुबई` या पुस्तकात डोकावल्यास समजू शकते. एका वेगळ्या व फिल्मी स्टाईल परंतु सत्य अशा जगाचा प्रत्यय आपणास या पुस्तकातून येतो. सर्वकाही ईथे सांगणे योग्य नाही, बाकी वाचनाची आवड असणाऱ्यांनी हे पुस्तक नक्की वाचून बघावे. ...Read more

ASHRU
ASHRU by V. S. KHANDEKAR Rating Star
UMA NIJSURE

पुस्तकाचे नाव - अश्रू लेखक - वि.स. खांडेकर ही कहाणी आहे एका सामान्य , नाकासमोर चालणार्या अर्थातच गरीब असलेल्या ध्येयवेड्या शिक्षकाची. प्रेमळ बायको , खाष्ट सावत्र आई , उडाणट्प्पू भाउ, प्रेमात पडलेली बहिण, आठ वर्षाचा मुलगा , जुगारी मित्र दिगंबर , लबड ढोंगी पापासाहेब, अपर्णा, गायकवाड हे विद्यार्थी अशी भरपूर पात्र कादंबरीत आहेत .जणू काही एखाद्या मराठी सिरियल चा मसाला. मुलाला साधी सायकल ही घेऊन देता येत नाही म्हणून अश्रू ढाळणारा हा नायक. ध्येयवादाचे चटके त्याला बसतात. त्याच्या डोळ्यतून अश्रू येतात. पण ते अश्रू हेच तो आपले वैभव मानतो. अकरावी बारावीत असताना ही कादंबरी पहिल्यांदा वाचली . आणि खांडेकरांची मिळतील तेवढी सगळी पुस्तके वाचून काढली. अश्रू तला नायक आज़च्या दुनियेत दुर्मिळ झालाय म्हणजे इतकं आदर्श कोणी आज दिसतही नाही. तरीही ही कादंबरी परत परत का वाचावीशी वाटते कळत नाही. कदाचित खांडेकरांच्या लेखणी ची किमया असेल. मुखपृष्ठ अर्थातच चंद्रमोहन कुलकर्णी यांचे आहे . त्यांचे मुखपृष्ठ असले की पुस्तक घ्यावेसे वाटतेच . असो . आपल्या पैकी बऱ्याच जणांनी हे पुस्तक वाचलं असेलच पण ज्यांनी अज़ून वाचलेलं नाहीये त्यांनी नक्की वाचावे.- उमा निजसुरे ...Read more