Siddhi Joshi प्रत्येक लेखकांची एक वेगळीच शैली असते. आणि त्याच शैलीमुळे त्या पुस्तकाचं ही वेगळच अस्तित्व तयार होऊन वाचकांसाठी ते पुस्तकं स्वतःहूनच त्याची गोष्ट डोळ्यांसमोर उभी करतो आणि आपण बसल्याजागी त्या पुस्तकात असलेल्या ठिकाणी जाऊन त्या माणसांना प्रत्यक्ष पाहूनयेतो.असच आज झालं माझ्याबाबतीत.
मी सकाळी एक पुस्तकं वाचायला घेतलं आणि बंगलोर ते लंडन ते अमृतसर असा प्रवास केला.सुधा मुर्ती ह्यांचे लेखन आणि प्रा. ए.आर.यार्दी ह्यांनी केलेला अनुवाद ह्या पुस्तकला एक अशी ताकद देऊन जातो आणि ती ताकद म्हणजे सहज सोप्प्या शब्दात केलेले वर्णन जे वाचकाचा आणि पात्रांचा थेट संवाद साधण्यात मदत करतो. एक मुकेश नावाचं पात्र ज्या पद्धतीने स्वतच्या अस्तित्त्वा बद्दल असलेला गुंता एक एक पाऊल टाकून सोडवतो. हे आपल्याला नकळत आपल्या आयुष्यात संयम हा किती महत्वाचा आहे हे शिकवून जातो. ह्या पुस्तकातला प्रत्येक शब्द एक वेगळाच उत्साह देऊन जातो आणि आपण हे पुस्तक शेवटपर्यंत वाचून मगच खाली ठेवतो. ह्या पुस्तकाने मला मी कशी असायला पहिजे हे शिकवलं.
- सिद्धी🙂 ...Read more
सुवार्ता सप्टेंबर २०२० ग्रेट ग्रेटाची गोष्ट....
ग्रेटा थुनबर्ग या १६ वर्षाच्या मुलीने एक विलक्षण धाडस केलं. स्विडनच्या ह्या पोरीने २० सप्टेंबर २०१९ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या म्हणजेच युनोच्या समितीपुढे घणाघाती वक्तव्य केलं, ते ऐहिक गोष्टीच्या मागणीसाठी नव्हे; तर पर्यवरण विस्कटून टाकून प्रदूषणाचा पुरस्कार करणाऱ्या एकूणच जगाच्या मानसिकतेवर बोट दाखवून. त्या दिवशी तिच्यासमोर जागतिक पातळीवरचे दिग्गज नेते बसले होते. जगाचे फौजदार ट्रम्पसाहेबही त्यात होते.
पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेतलेली ग्रेटा हिने तीन सूत्रे ह्या संदर्भात सांगितली आहेत.
पहिले सूत्र : वरवरची माहिती धोक्याची असते.
दुसरे सूत्र : कुठल्याही चांगल्या कार्याला स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे.
तिसरे सूत्र : जगाला शाबूत ठेवण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करा. आपल्या दैनंदिन जीवनात वावरताना तसेच उगवणाऱ्या दिवसाला सामोरे जाताना आपण किरकोळ गोष्टीपासून महत्वाच्या मोठ्या गोष्टींनासुद्धा तितक्याच गांभीर्याने घेतले पाहिजे असे तिचे सांगणे आहे. कमी बडबड करा आणि जास्त कृती करा असे ती सांगते. या पुस्तकात लेखकाने ग्रेटाच्या एका महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. हवामानातील बदल याबद्दल तिने माणसाच्या बेजबाबदार वागण्याला दोष दिला आहे. त्यासाठी ती जगभरातील अनेक महत्वाच्या देशांमध्ये फिरली. जागृती केली. काही ठिकाणी तिला कुत्सित टीकेचे धनी व्हावे लागले. तरीही तिने आपले हे मिशन आजपर्यंत चालू ठेवले आहे. तिच्या या मिशनची यशस्विता अशो की फ्रांस, जर्मनी, न्यूझिलंड या देशांनी कार्बन वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी खर्च वाढवण्यासाठी आपल्या अर्थसंकल्पात तजवीज केली आहे. ग्रेटाची आणखी एक `पी-पी-पी` त्रिसूत्री म्हणजे लोकसंख्या, प्रदूषण आणि प्राणिहत्या ही आहे. ग्रेटाने जगाला भावनिक आणि वस्तुनिष्ठ हाक देताना सांगितले की, `तुम्ही माझे ऐकू नका, पण विज्ञानाचे ऐका.` या तिच्या सादेला आज जगभरातील कोट्यवधी विद्यार्थी साद देत आहेत. `टाइम` मासिकाने तिला `टाइम पर्सन ऑफ द इअर` हा सन्मान दिला आहे.
`Skolstrejk For Klimatet` या तिच्या स्विडीश संदेशाचा अर्थ आहे : `School Strike for climate` हा संदेश घेऊन ती आज जगभर फिरत असते. `भविष्यासाठी शुक्रवार` ही शांतीची आणि पर्यावरणसंवर्धनासाठीची तिची अभिनव संकल्पना आहे. भारतातही पदमश्री सालूमारदा थिमाक्का या १०९ वर्षाच्या वृद्धेने आजवर सुमारे ८००० वृक्ष लागवड आपल्या पतीला सोबत घेऊन केली आहे. या श्रमिक महिलेने गाजावाजा ना करता आपले पर्यावरण मिशन चालू ठेवले आहे. थिमक्काच्या नावाने `लॉस एँजिलिस` आणि कॅलिफोर्निया येथे `थिमक्काज` रिसोर्सेस फॉर एन्व्हार्यमेंट एज्युकेशन` असा विभाग सुरु केला आहे. लेखकाने ग्रेटाच्या बाल तारुण्य सुलभ धाडसाची नोंद पुस्तकरूपाने घेतली आहे. ते चांगले आहे. ...Read more