AKALPITA RAUT - DESAI

About Author

AKALPITA RAUT-DESAI HAS DONE M.A. IN MARATHI, HINDI AND KONKANI LANGUAGES. THIS DEGREE HAS BEEN OBTAINED. HAS TAUGHT FOR 30 YEARS AS HEAD OF KONKANI DEPARTMENT AT CARMEL WOMENS COLLEGE, MADGAON (GOA). MORE THAN 150 REVIEWS HAVE BEEN PUBLISHED IN NEWSPAPERS. THE NOVEL NIRANJANI MAN RAMLE IN MARATHI AND THE CHILDRENS NOVEL RAJA SHIVCHHATRAPATI, THE BIOGRAPHY OF KALIDASA IN KOKANI, KALIDAS PRATIBHA AND THE NOVEL RUPREKHAVANI PARABRAHM, ARE BOOKS NAMED AFTER HIM. DR. SHAHU CHHATRAPATI. HE HAS TRANSLATED JAISINGRAO PAWARS BIOGRAPHY INTO KONKANI. CURRENTLY, SHE IS WORKING ON A KONKANI-MARATHI DICTIONARY, ONE VOLUME OF WHICH HAS BEEN COMPLETED. THE BIOGRAPHY KALIDAS PRATIBHA WAS WRITTEN BY T.M. PAI RECEIVED MANIPAL FOUNDATION 2022 BEST BOOK AWARD. HE HAS RECEIVED MANY AWARDS FOR EXCELLENT STREET DRAMA.

अकल्पिता राऊत-देसाई यांनी मराठी, हिंदी, कोकणी या तीन भाषांमध्ये एम.ए. ही पदवी प्राप्त केली आहे. मडगाव (गोवा) येथील कार्मेल महिला महाविद्यालयात कोकणी विभागप्रमुख म्हणून तीस वर्षे अध्यापन केले आहे. वर्तमानपत्रांतून दीडशेपेक्षा जास्त समीक्षालेख प्रसिद्ध झाले आहेत. मराठीत ‘निरंजनी मन रमले’ ही कादंबरी आणि ‘राजा शिवछत्रपती’ ही बाल कादंबरी, कोकणीमध्ये ‘कालिदास प्रतिभा’ हे कालिदासाचे चरित्र आणि ‘रूपरेखाविणे परब्रह्म’ ही कादंबरी, ही पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. ‘शाहू छत्रपती’ या डॉ. जयसिंगराव पवार यांच्या चरित्रग्रंथाचे त्यांनी कोकणीत भाषांतर केले आहे. सध्या कोकणी-मराठी शब्दकोशाचे काम त्या करत असून, त्याचा एक खंड पूर्णत्वास गेला आहे. ‘कालिदास प्रतिभा’ या चरित्रग्रंथाला टी.एम. पै. मणिपाल फाउंडेशन तर्फे २०२२ चा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे. उत्कृष्ट पथनाट्याचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
ADHARMAKAND Rating Star
Add To Cart INR 270

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर