* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: TICHI SAVALI
 • Availability : Available
 • ISBN : 9788184989939
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 96
 • Language : MARATHI
 • Category : POEMS
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
LOVE AND ITS EXPERIENCES AS A TOPIC ARE COMMON CHOICES OF GAZAL WRITERS ,THE LOVE COMES FROM DIFFERENT RELATIONS LIKE LOVE FOR MOTHER,GIRLFRIEND,FRIENDS ETC.DURING THE PHASE OF MATURITY PERSON EXPERIENCES THE RAINBOW OF TRUE LOVE COLOURS. IN CHILDHOOD LOVE REMAINS IMMATURE AND SENSITIVE BUT AS THE PERSON GROWS UP IT TAKES UP THE SHAPE OF PROPER BEAUTY.THE GAZALAKAR OF ABOVE BOOK IS YOUNG HOWEVER THE GAZALS OF HIS BOOKS ARE FAR MATURE AND BEAUTIFUL IN COMPARISON WITH HIS CONTEMPORARIES IN SAME FIELD.
प्रेयस अनुभूतींच्या विविध छटांचे सूत्रबद्ध शब्दांकन हाच गजलविद्येेचा मूलभूत विषय होय. विभिन्न नाते संबंधाने हे प्रेम साकारते. वात्सल्य, ममता, सख्य, हास्यइ. इंद्रधनुष्यी रंगांतून माणूस प्रेयस अनुभव घेतअसतो. तारुण्यावस्थेत ते बरेचसे अल्लड वअतिसंवेदनशील असते. त्यात परस्परआकर्षण व सौंदर्यासक्तीचाअंशअधिक जाणवतो. परिपक्वतेनंतरही भावना चिंतनात्मकरूप धारण करते. प्रस्तुत संठाहाचा गजलकार स्नेहदर्शन तरुण असूनही त्याच्या या संग्रहातील रचना, त्याच्या समकालीनांहूनअधिक परिपक्व व समंजसआहेतआणि त्यामुळेच त्या लक्षणीय ठरतात.
अंकुर गझल संग्रह पुरस्कार २०१६

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TICHISAVALI #TICHISAVALI #तिचीसावली #POEMS #MARATHI #SNEHDARSHAN "
Customer Reviews
 • Rating StarNEWSPAPER REVIEW

  गर्द घनांची तिची सावली... धुळ्याचे दर्शन शहा एक तरुण होतकरू गजलकार नुकताच प्रकाशित झालेला ‘तिची सावली’ नावाचा त्यांचा गजलसंग्रह आज आपल्याकडे आला आहे. हा त्यांचा पहिलाच संग्रह ज्यामध्ये ८१ गजलांचा अंतर्भाव आहे. या संग्रहाला डॉ. राम पंडित यांची सुंदर ्रस्तावना लाभली आहे. हा संग्रह त्यांनी आपल्या कुटुंबीयांना अर्पण केला आहे. स्वत:च्या व्यथा, वेदना, दु:ख यांच्या भोवती सोडलेली प्रतिभेची वलयं त्यांच्या गजलेत आणि शेरामध्ये शब्दबद्ध झालेली दिसतात. त्यांचा हा शेर पाहा. यातना माझ्या जवळ येते खुशीने मी तिला माझी सखी समजून बघतो या वेदनांच्या वलयामधून त्यांना बाहेरही पडायचंय. तसा त्यांचा प्रयत्नही दिसतो. पण पुन्हा त्यातच ते अडकत जाताना दिसतात. बंध ना अपुला सुटावा वादळे येता व्यथेची मी तुला आधार द्यावा अन् मला तू सावरावे रसिकांशी सहज संवाद करताना ते दिसतात. एखाद्या जवळच्या व्यक्तीला आपलं हृदगत सांगावे इतक्या सहजपणे ते शेरातून व्यक्त होतात. गजलेशी त्यांचं घट्ट नातं आहे. पाहा सोडला संबंध ऐसा मी तिचा माझ्यासवे रुप मी आहे तिचे अन् सावली माझी गजल या गजलांमध्ये काही गजला अक्षरगण वृत्तात तर काही मात्रा वृत्तात आहेत. त्या सर्वच आत्मनिष्ठ आहेत. या सर्व गजलांवर दु:खाची सावली पसरल्यासारखी वाटते. का असा धुंदीत असतो रोज मी सखये तुझ्या पाहिजे मज वेगळे मी मागतो काहीतरी अशा तरल रचनांची या तरुण गजलकाराकडून अपेक्षा करू या. ‘स्नेह’ असे नाव या कवीने घेऊन मक्ताही पेश केला आहे. मुखपृष्ठ, छपाई, साईज सुंदर असलेल्या या संग्रहाचं मन:पूर्वक स्वागत. -अ‍े. के. शेख ...Read more

 • Rating StarMAHARASHTRA TIMES 16.10.16

  ‘मी स्वत:ला झुंजताना पाहिले होते,’ ‘दहा दिशांना मोद विहरतो, गीत तिचे गाताना, अन् अश्रूंचे घोट घोट मी गिळतो ती नसताना,’ ‘लोक हे सोडून गेले आज सारे, का असा उरलो इथे मी एकटा रे,’ अशा चिंतनशील गझलांचा अविष्कार या संग्रहात झालेला दिसतो. स्नेहदर्शन यांच्याया गझलांमध्ये प्रेमाचे विविध रंग दिसतात, तसेच विराह-वेदना-व्यथांचे प्रतिबिंबही पडलेले दिसते. जगण्याचा दाह आणि एकांताचा शापही शब्दांमधून प्रगटतो. मराठी भाषेची शोकांतिकाही गझलेतून व्यक्त केली आहे. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

THE LAST GIRL
THE LAST GIRL by NADIA MURAD Rating Star
Jatin Sanjay Kandalgaonkar

शांतता पुरस्कार विजेती नादिया मुराद हीची ही गोष्ट. उत्तरेकडील इराकमधील कोचो ह्या एका यजीदी लोकांच्या गावात तिचा जन्म झाला २०१४ साली आयसीस या दहशतवादी संघटनेकडून इराकमधील यजीदी लोकांच्या गावात हल्ला केला व त्यात तिच्या व तिच्यासारख्या अनेक मुलींी आयुष्य बरबाद झाले . अवघी एकवीस वर्षाची मुलगी तिने सोसलेल्या या अत्याचारांची कहाणी यजीदी धर्म हा काफिराचा धर्म आहे व तो जगातून नष्ट झाला पाहिजे असे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचे लक्ष होते इराक - इराण युद्धामध्ये अमेरिकीच्या सैनिकांना या यजिदी लोकांची सुरक्षा केली पण नंतर युद्ध संपल्यावर अमेरीकी सैनिक निघून गेले त्यांनतर स्थानीक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सीमेवर गस्त घालण्यास सुरुवात केली पण आयसीस च्या भीतीने ते पळून गेले. नंतर आयसीस कोचोमध्ये आल्यावर त्यांनी तेथील पुरुषांना व महिलांना बंदूकीच्या जोरावर ताब्यात घेऊन त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी हलवले . नंतर सगळ्या पुरुषांना एका ठिकाणी नेऊन गोळ्या घालण्यात आल्या. व नादिया सारख्या मुलींना घेऊन अज्ञात ठिकाणी हलवले तिथे जाऊन जबरदस्तीने धर्मांतर करून मुस्लीम बनवून त्यांना सैनिकांना विकले किंवा भेट म्हणून दिले तिथे त्यांच्यावर अमानुष शारीरिक अत्याचार केले व पळून जाण्याचा प्रयत्न केला तर अजून क्रुर अत्याचार करत असत . मग परत त्यांना दुसऱ्या सैनिकांना विकले जात असत. अशी ही साखळी चालू होती तिने व तिच्या मैत्रिणीने हे सगळे अत्याचार कशे सहन केले असतील? मग एके दिवशी तिला या क्रुर नरकातून पळण्याची संधी मिळाली व तिने तिकडच्या सैनिकांचे मोठ्या पायाचे चप्पल घालून पळू लागली व रात्री एका अनोळखी घराचे दार वाजवले ते तिला मदत करतील का ? या कशाचाही विचार न करता ति त्या घरात जाऊन तिची सगळी गोष्ट तिला सांगितली. ते कुटुंब होतं सुन्नी मुस्लीमाचं पण त्यांनी ते सगळं बाजूला ठेवून तिला तिच्या घरी आसरा दिला व आपला जीव धोक्यात घालून तिला तिच्या देशात सुरक्षित कसे पोहचवले याची ही कथा तिथून ती ब्रिटन आणि अमेरिकेत जाऊन संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आपले भाषण दिले व त्या भाषणाचे शेवटचे वाक्य होते की ` अशी कहाणी असलेली मी जगातील शेवटचीच मुलगी असावे ... द लास्ट गर्ल ...Read more

HIS DAY
HIS DAY by SWATI CHANDORKAR Rating Star
Mohini Joshi

ह्या पुस्तकाचा विषय तुमच्यासाठी वेगळा आहे.. कदाचित ह्या जगण्याला, असण्याला समाज काडीचीही किंमत देत नसेल. पण आम्ही आहोत.. स्त्री, पुरुष या जातीत मोडत नसलो तरी बाईमाणूस आहोत.. आजचा अभिप्राय " हिज डे" या पुस्तकासाठी .. मी स्वतः एक crossdresser आहे.. सवाती चांदोरकर या लेखिकेने आम्हा तृतीय पंथी लोकांची व्यथा ह्या पुस्तकातून मांडली आहे. .. कथेची सुरुवात होते ती हेलीना नावाच्या 20 वर्षीय लाजर, बुजरया आणि शारीरिक वाढ पूर्ण न झाल्यामुळे खचलेल्या, जगापासून अलिप्त रहाणार्‍या मुली पासून. मानसोपचार तज्ज्ञ म्हणून शिक्षण घेत असताना तिची मैत्री होते ती चमेली बरोबर जी एक तृतीय पंथी असते.. आणि जया जिला मुलींन बदल आकर्षण असते.. अश्या ह्या तिघींची कथा.. शरीर आणि मन दोन्ही भिन्न असणार्‍यांची ही कथा.. नक्किच वाचा.. मीही त्यातलीच आहे.. शरीर पुरुषी मन मात्र स्त्री च... ...Read more