* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: PAPAER CRANES
 • Availability : Available
 • ISBN : 9788184983944
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 256
 • Language : ENGLISH
 • Category : BIOGRAPHY
 • Sub Category :
 • Discount : Individual(Login to get best discount offers.)
Quantity
Drawing on Cheryl`s diary from the time, PAPER CRANES tells the story of Jonathan`s extraordinary courage and the koenig family`s unceasing drive to help him defy the ominous predictions. set against the backdrop of Cheryl`s heartfelt grief, denial and anger, the book outlines their desperate search for knowledge in the area of recovery from traumatic brain injury. At the same time she and her husband were forced to deal with the trials and tribulations of the legal system, in their search for justice for their son. This inspirational and uplifting story demonstrates that with right attitude it is possible to determine your own destiny regardless of what life throws in your path.
हि एका आईने आपल्या मुलाला भयंकर आजारातून वाचविण्यासाठी केलेल्या धडपडीची कहाणी आहे. एका अपघातात लेखिका शेरील यांचा मुलगा जोनाथनच्या मेंदूला जबर मार बसतो. अशा अतर्क्य परिस्थितीतून त्याला जगवण्यासाठी केलेल्या असामान्य धडपडीची कथा म्हणजे हे पुस्तक.
Video not available
Keywords
Customer Reviews
 • Rating StarMAHARASHTRA TIMES 18-05-2013

  एका आईच्या जिद्दीची कहाणी… मुलांच्या भल्याचा, उज्ज्वल भविष्याचा तिन्ही त्रिकाळ विचार करणाऱ्या पालकांनी या मुलांच्या बाबतीत काही विपरीत घडले तर काय, या शक्यतेची कल्पनाही केलेली नसते. पण तसे काही झालेच तर अशा संकटांना सामोरे जायचे बळ एकवटणे हाही पालकतवाचा अविभाज्य भागच असतो. शेरील क्रोएनिग या ऑस्ट्रेलियन महिलेचे ‘पेपर क्रेन्स’ हे आत्मकथन अशाच एका आईच्या जिद्दीची गोष्ट आहे. अपघातात शरीर व मेंदूलाही गंभीर दुखापत झालेल्या आपल्या मुलाला पुन्हा त्याच्या पायावर उभं करणं, त्याच्या आवडीच्या जवळ जवळ प्रत्येक गोष्टीत त्याला पुन्हा पारंगत कारणं, हे असाध्य काम साध्य करण्याचा प्रवास हे पुस्तक मांडलं. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स भागात राहणारे, शेरील आणि रॉबर्ट कोएनिग यांचं सुखवस्तू असं कुटुंब, स्वत:च्या कष्टांच्या जोरावर या टप्प्यावर येऊन पोहोचलेलं हे जोडपं जोनाथन आणि खिस या दोन वाढत्या वयाच्या मुलांच्या संगोपनात रमलेलं असतानाच ११९७ सालच्या उन्हाळी सुट्टीत १२ वर्षांच्या जोनाथानला घराजवळच्या रस्त्यावर कारची धडक बसली. त्यात जोनाथनच्या मेंदूच्या पेशींना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर लगेचच कोमामध्ये गेलेल्या जोनाथनच्या वाचण्याची, वाचला तरीही पुन्हा सर्वसामान्य आयुष्य जगण्याची आशा डॉक्टरांनी सोडूनच दिलेली असताना शेरील मात्र ही गोष्ट मान्य करायला तयार नव्हत्या. आपल्या मुलाला कसंही करून मृत्यूच्या तावडीतून सोडवून आणण्याचा निर्धार केल्यापासून पुढच्या पाच-सहा वर्षामध्ये त्याला खरोखरीच स्वत:च्या पायावर उभं करण्याच्या प्रवासातील अथक प्रयत्नांचे तपशील शेरील यांनी आपल्या पुस्तकात मांडले आहेत. मूल मोठं होताना, त्याने केलेली प्रत्येक पहिली गोष्ट आई-वडिलांसाठी अतीव आनंद देणारी असते. शेरील यांनी याच सगळ्या गोष्टी आपल्या लाडक्या मुलासाठी दुसऱ्यांदा पार पाडल्या. जोनाथनची कोमामधील अवस्था, त्यातून त्याचं बाहेर पडणं, आजूबाजूला पाहून लोकांना ओळखणं, हातपाय हलवणं, तोंडातून शब्द उच्चारणं, मान सावरणं या सगळ्या लहान लहान गोष्टी त्याने पुन्हा कराव्यात यासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल सांगतानाच, या सर्व प्रक्रियेमध्ये स्वत:ला जाणवणाऱ्या वेदनाही त्यांच्याकडून सहजच व्यक्त होतात. पण पुस्तकाच्या शीर्षकामध्ये म्हटल्याप्रमाणेच ही गोष्ट एका आईच्या जिद्दीची आहे. त्यामुळे या लहान लहान प्रयत्नांत यश मिळाल्यानंतर तिथेच न थांबता आपल्या मुलाला सायकल चालवणं, पोहणं, टेनिस खेळणं, धावणं, इतकेच नव्हे तर त्याचं शिक्षणही पुन्हा सुरू करणं या अशक्य कोटीतल्या गोष्टींसाठी त्या निरंतर प्रयत्न करताना दिसतात. या प्रवासात आलेले कुटुंबीयांचे, सुहृदांचे, डॉक्टर आणि प्रशिक्षकांचे आश्वासक अनुभव शेरील यांनी मांडले आहेत. जोनाथानला त्याच्या बरं होण्याच्या प्रयत्नांमध्ये त्याची शाळा, शिक्षक आणि शाळेतील इतर विद्याथ्र्यांच्या शुभेच्छा आणि मदतीचा खूप उपयोग झाला. या मुलांनी जोनाथनला वेळोवेळी लिहिलेल्या सुंदर पत्रांचा समावेशही या पुस्तकात केला आहे. त्यांनी शाळेच्या प्रार्थनागृहात लावलेल्या हजारो शुभेच्छादर्शक कागदी सारस पक्ष्यांवरूनच पुस्तकाचं नाव दिलं गेलं आहे. मात्र, त्याचवेळी अशा दुखण्याशी झगडणाऱ्या व्यक्तींबाबत असवेदनशीलता दाखवून, त्यांचा आधीच खचलेला आत्मविश्वास आणखी खच्ची करणाऱ्यांवर टीकाही केली आहे. जोनाथनच्या दुखण्याच्या सावलीमध्ये मोठा होणारा, आई-वडिलांचे काहीसे दुर्लक्षच होऊनही त्याचा कडवटपणा मनात न ठेवणरा, उमद्या स्वभावाचा धाकटा मुलगा खिस याचंही लोभस व्यक्तिचित्र शेरील यांनी आपल्या पुस्तकात चितारलं आहे. या सर्व अनुभवकथनामध्ये शेरील यांचे प्रसंगावधान प्रामुख्याने लक्षात राहते. अशा अपघातांमधून बऱ्या होणाऱ्या व्यक्तींना समजूतदारपणा किंवा नैराश्य अशा भावना जाणवू शकत नाहीत हे गृहीतक नाकारत अपघातांच्या आठवणीने कुढणाऱ्या आपल्या मुलासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत त्या घेतात. मेंदूला होणाऱ्या दुखापतीबद्दलचे लिखित साहित्य, इंटरनेटवरील माहिती वाचणे, नव्या उपचारपद्धतीला सकारात्मक विचारांनिशी सामोरे जाणे या गोष्टी शेरील न थकता करताना दिसतात. वैद्यकीय उपचारांची दिशा ठरविताना, घेतलेले महत्त्वाचे निर्णय, परीक्षा घेणाऱ्या प्रसंगांमध्ये चित्त शांत ठेवण्याची वृत्ती, शेरील यांनी आपल्यावर ओढवलेल्या या संकटाशी झगडतानाच मिळवलेली आहे हे जाणवून त्यांच्या चिकाटीचे विशेष कौतुक वाटते. पूर्ण वेळ आपल्या मुलाच्या समुपदेशकाच्या भूमिकेत राहताना प्रसंगी स्वत:ला येणारे नैराश्य धिटाईने झटकून टाकणारी ही आई वाचकालाही प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची प्रेरणा देते. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BAAJIND
BAAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
Patel Dhirendra

Great Book must read

ANDHLYA BAICHE VANSHAJ
ANDHLYA BAICHE VANSHAJ by ANEES SALIM Rating Star
KIRAN BORKAR

ही आहे एका मुस्लिम कुटुंबात घडणारी कथा . कथेत एक आंधळी आजी आहे . तिच्या घरात ... मुलगी ..जावई ..आणि तिची नातवंडे राहातायत. तिचा एक नातू अमर या कथेचा नायक. तो नास्तिक आहे . नमाज पडणे त्याला मान्य नाही . आपला भाऊ आणि बहिणीबद्दल त्याला फारसे प्रेम नाही. स्वतःच्या स्वप्नरंजनात तो मग्न आहे .त्याने आपल्या मोठ्या बहिणीचा अपघाती मृत्यू अनुभवला आहे . तर नानीला झोपेचे औषध खिरीतून पाजताना आईला पाहिले आहे .वडिलांचा हृदविकाराच्या धक्क्याने झालेला मृत्यू पहिला आहे . वयाच्या सव्वीसाव्या वर्षी तो आपली कथा काल्पनिक श्रोत्यांना सांगतोय आणि या कथेतून बऱ्याच आठवणी बाहेर पडतात .हे पुस्तक म्हणजे एका कुटुंबाची गुंतवून टाकणारी कथा आहे . एका कुटुंबाची जगण्यासाठीची धडपड...भीती...कष्ट ...महत्त्वाकांक्षा अश्या सर्व गोष्टी आहेत . नायकाने ही कथा सांगताना विनोदाचा साज चढविला आहे . त्यामुळे त्यांचे संवाद वाचताना खूप हसू येते . "द हिंदू "चे 2013 सालचे पुरस्कार प्राप्त सर्वोत्कृष्ट पुस्तक . ...Read more