VEENA DEV

About Author

Birth Date : 26/11/1900

डॉ. वीणा विजय देव या प्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दाण्डेकर यांच्या कन्या आहेत. पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात त्या मराठी विभागप्रमुख होत्या. तेथे त्यांनी ३२ वर्षे अध्यापनाचे कार्य केले. मराठी कथा-कादंबऱ्यांची नाट्यरूपे या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी त्यांना पीएच.डी. ही पदवी मिळाली. लेखन, संकलन आणि संपादन हे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी लीलया हाताळले असून, या संदर्भातील त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी गो. नी. दाण्डेकर यांच्यावर लिहिलेल्या आशक मस्त फकीर या व्यक्तिचित्रास महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीच्या त्या माजी सदस्य आहेत. त्यांना मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार तसेच साईरंग प्रतिष्ठानतर्फे कर्तृत्वगौरव पुरस्कार देण्यात आला. डॉ. वीणा देव ठाणे जिल्हा आणि विटा येथील ग्रामीण साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. साहित्य आणि कला क्षेत्रात विविध विषयांवर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली आहेत. मुलाखती घेणे, सूत्रसंचालन याद्वारे त्यांचा आकाशवाणी, दूरदर्शनवर सहभाग असतो. १९७५पासून गो. नी. दाण्डेकर लिखित विविध कादंबऱ्यांच्या अभिवाचनाचे ६५० हून अधिक कार्यक्रम त्यांनी केले आहेत. तसेच गो.नी.दा. यांच्या स्मरण-जागरणासाठी आपले पती विजय देव यांच्या मदतीने त्या मृण्मयी पुरस्कार, दुर्ग साहित्य संमेलन, गो.नी.दा. यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन अशांसारखे अनेक उपक्रम राबवीत असतात. मृण्मयी प्रकाशनातर्फे त्यांनी गो.नी.दा. यांच्या दुर्मीळ साहित्यकृती प्रकाशित केलेल्या आहेत.
Sort by
Show per page
Books not found in this category.
X

Latest Reviews

PACHUCHE BET
PACHUCHE BET by HERMAN MELVILLE Rating Star
Naresh Mohare

जेव्हा नविन नविन बेटानचा शोध लावला जात होता तेव्हा समुद्रा वरील बोटीतून 2खलाशी पळून जावुन जंगलात जातात आणि तेथे ते जंगलातील नर भक्षक लोकाना भेटतात आणि त्याच्या सोबत काढलेल्या दिवसाचे वर्णन लेखकाने येथे दिले आहेत. वेळ काढून नक्की वाचा.

BAAJIND
BAAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
Naresh Mohare

वाचताना छत्रपती शिवाजी महाराज आणि बहिर्जी नाईक यानी एखादी मोहीम पुर्ण करण्यासाठी कोण कोणत्या योजना आणि डावपेज करावे लागतात ते वाचताना वेळेचे भानच राहत नाही...