PRABHAKAR DEOSTHALI

About Author




प्रभाकर देवस्थळी मूळचे साताऱ्याचे. इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पहिली चार वर्षे भाभा अणुशक्ती केंद्रात नोकरी केली. त्याच दरम्यान नव्याने विकसित होणार्या संगणक क्षेत्राकडे आकर्षित झाले आणि पुढील पस्तीस वर्षं त्यांनी संगणक हेच आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले.नोकरीनिमित्त देशोदेशी भटकंतीचा वारंवार योग येतच होता. या भटकंतीत मुलींच्या शिक्षणासाठी त्यांच्या पत्नीला एका जागी स्थिर राहावे लागले आणि भटकंती बहुतांश वेळा एकट्यानेच करावी लागली. मनात बालपणापासून असलेली लेखन वाचनाची असलेली सुप्त आवड अशा एकटेपणात डोकं वर काढत होती. स्वयंपाकाची हातोटी होतीच. घरच्या अन्नाला आसुसलेल्या; पण तरीही नोकरी निमित्त घरापासून दूर राहणार्या अनेकांच्या व्यथा भोवताली जाणवत होत्या. अशांना उपयोगी ठरेल असे ‘आम्ही बल्लवाचार्य हे त्यांच्या लेखणीतून स्वानुभवातून साकारलेले पुस्तक अनेकांना आज अनेकांना मार्गदर्शक ठरत आहे.तूर्तास निवृत्त जीवनात आपल्या लेखनाचा छंद ते जोपासत आहेत
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DR. TOYS SMART PLAY SMART TOYS Rating Star
Add To Cart INR 430

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
वैशाली देशमुख (पांडे), अमरावती.

काल लायब्ररीतून `छाटीतो गप्पा` हे लेखक जी.बी.देशमुखांचं पुस्तक घेतलं. एका बैठकीत वाचून संपवलं. साध्या, सोप्या, हलक्याफुलक्या भाषेत सांगितलेल्या रंगतदार गोष्टी वाचताना खूप मजा आली. जीवनाची लज्जत वाढवणाऱ्या आणि त्याचबरोबर अंतर्मुख करणाऱ्या या गप्पा लावाब आहेत! मनाला उभारी देणार असं हलकफुलकं पुस्तक क्वचितच हाती येतं. लेखकाला धन्यवाद. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
अविनाश कुळकर्णी, नागपूर.

जी.बी.देशमुख लिखीत `दुर्दम्य ` पुस्तक आज वाचलं. एका व्यक्ती विशेषचं इतक सरस आणि मार्मिक वर्णन लेखकाने ज्या शैलीत साकारलय ते फारच छान. पुस्तकातील शेवटची ४-५ पानं तर हृदय हेलावून टाकतात. लेखकाकडून असेच सुंदर,बहारदार आणी मार्मिक लेखन होत रहावं हीच दिच्छा. अप्रतिम. ...Read more