LAXMIKANT DESHMUKH

About Author

शिक्षण : एमएस्सी, एमए (मराठी साहित्य), एमबीए, आयआयएम, बेंगलोर प्रशासकीय कारकिर्द : १९८३ उपजिल्हाधिकारी, २००२मध्ये भारतीय प्रशासन सेवेमध्ये पदोन्नती, २००९ ते २०१२ जिल्हाधिकारी कोल्हापूर, जून, २०१२पासून व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ पुरस्कार : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, आमटे वाचन मंदिर, इचलकरंजी, अच्युत बन पुरस्कार, नांदेड, वाङ्मय चर्चा, बेळगांव, नगर वाचनालय कादंबरी पुरस्कार, अहमदनगर, राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार महत्त्वाचे पुरस्कार : नासकॉम सोशल ऑनर पुरस्कार (२०१०), मंथन २०११ दक्षिण आशियायी पुरस्कार प्रकाशित पुस्तके : कादंबरी : सलोमी, अंधेरनगरी, ऑक्टोपस, होते कुरूप वेडे, इन्किलाब विरुद्ध जिहाद कथासंग्रह : कथांजली, अंतरीच्या गूढगर्भी, पाणी! पाणी!!, नंबर वन, अग्निपथ, सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी (राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट कथा संग्रहाचा पुरस्कार) संकीर्ण : दूरदर्शन हाजिर हो! (बालनाट्य), मराठवाडा मुक्तिसंग्राम (संपादित), बखर भारतीय प्रशासनाची प्रशासन नामा (वैचारिक) इंग्रजी साहित्य : THE REAL HERO & OTHER STORIES (२००८), सामाजिक कार्य : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष (१९९५), अक्षर प्रतिष्ठा परभणी या साहित्य विचार व्यासपीठाची स्थापना, कोल्हापूर येथे शाहू स्मारकाचे पुर्नज्जीवन व विस्तार, व्याख्यानमाला, साहित्यिक गोष्टी व जिल्हा संमेलनाचे आयोजन, अक्षर अयान या नावाचा दिवाळी अंकाचे संपादन (२०१३) मराठवाडा साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून निवड
Sort by
Show per page
Books not found in this category.
X

Latest Reviews

BHABNAGULO
BHABNAGULO by TASLIMA NASREEN Rating Star
Chandrakant Kavathekar

हे पुस्तक एका स्वतंत्र मनोवृत्तीच्या संवेदनशील स्त्री लेखिकेचे काही विशिष्ट घटनांवर केलेल्या परखड भाष्यांची नोंद आहे.आशयाची पुनरावृत्ती व काहीसे अरण्यरूदन वाटणारी शैली हे ठळक दोष जाणवत असूनही लेखिकेची तळमळ व प्रत्येक प्रश्नाला भिडण्याची वृत्ती जाणवत ाहते.व म्हणूनच एकदा तरी हे पुस्तक वाचायला हवे असे.Chandrakant Kavathekar ...Read more

SARPACHA SOOD
SARPACHA SOOD by SUDHA MURTY Rating Star
Yashashri Rahalkar

पुस्तक:- सर्पाचा सूड लेखन :- सुधा मूर्ती अनुवाद:- लीना सोहोनी प्रकाशन :- मेहता प्रकार:- कथासंग्रह महाभारत हा अनेक कथांचा महाकोष म्हणावा लागेल इतकी लहानमोठी कथानके आणि उपकथानके त्यात आहेत. बहुतेक युद्ध आणि त्याची पार्श्वभूमी ह्यासंबंधी कथा आपलया वाचनात सहजी येतात पण काही कथानके अशीही आहेत जी फारशी प्रचलित नाहीत त्याच सगळ्या कथांना ह्या संग्रहात सुधाजींनी समाविष्ट केले आहे ... त्या मनोगतात अगदी प्रामाणिकपणे मांडतात की ह्या सगळ्या कथा लहानपणी त्यांनी आजीकडून ऐकलेल्या कथा आहेत... एकूण 34 कथांचा ह्यात समावेश आहे... त्यातल्या काही कथा कदाचित आपल्या पिढीच्या वाचनात आल्याही असतील जसे जन्मेजयाचा सर्पयज्ञ, यक्षाचे प्रश्न वगैरे पण सध्या जी मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताहेत त्यांच्यासाठी सगळ्याच कथा नवीन आहेत... खरेतर हे बालसाहित्य नाही पण मुलांना वाचायला द्यायला हवे इतके छान आहे... कथा रंजक पद्धतीने सांगितल्या आहे आणि काही तर खरेच नवीन आहेत जशी उडुपी राजा, बार्बारीक, घटोत्कचाची चतुराई, अर्जुनाची नावे... भन्नाट आहेत. जेमिनी ऋषींची माहितीही मला ह्याच पुस्तकातून झाली. कुरु वंश त्याचे नाव कसे पडले, वंशावळ अगदी सोपे करून मांडले आहे. मला सुधा मूर्तींच्या लेखनाचे एक वैशिष्ट्य कायम भावते ते म्हणजे आपली संस्कृती, आपली मूल्ये त्याची पाळेमुळे ह्यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे आणि ती त्या प्रभावीपणे मांडत जातात. लीनाजींचा अनुवाद नेहमीसारखा चपखल... कुठेही ओढून ताणून दिलेले शब्दाला शब्द नाहीत...👍 महाभारतातल्या ह्या फारश्या प्रचलित नसणाऱ्या कथा .. जरूर वाचा! ✒️यशश्री रहाळकर, नाशिक ...Read more