PRASAD OAK

About Author

Birth Date : 17/02/1975


PRASAD PRABHAKAR OAK IS AN ACTOR, DIRECTOR, WRITER, SINGER, ANCHOR, POET AND FILM PRODUCER. IN 2007 HE PARTICIPATED IN SA RE GA MA PA (CELEBRITY ROUND) AND WON, BECAME AJINKYATARA. HE RECEIVED TWO FILMFARE AWARDS (BEST DIRECTOR AND BEST FILM; 2018) AND NATIONAL FILM AWARD FOR BEST FEATURE FILM IN MARATHI FOR THE MOVIE KACCHA LIMBU. OAK HAS WORKED IN MORE THAN 80 TELEVISION SERIALS. IN 2008 HE PARTICIPATED IN REALITY SHOW DHINKA CHIKA AS A JUDGE. IN JUNE 2012 HIS SHOW BHANDA SUAKHYABHARE COMPLETED 500 EPISODES.

"मराठी सिनेसृष्टीतील एक चिरतरुण कलाकार. चतुरस्र अभिनेता, उत्तम गायक, निवेदक, कवी, निर्माता आणि ख्यातनाम दिग्दर्शक. एक डाव धोबीपछाड, हाय काय नाय काय, दोघात तिसरा आता सगळं विसरा, फर्जंद, स्माइल प्लीज, धुरळा आणि पिकासो इ. गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका. वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, बेचकी आणि नांदी या नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका. झी मराठीवरील वादळवाट, अवघाचि संसार आणि पिंपळपान इ. मालिकांमधून अभिनय. झी मराठी सारेगमपचे सेलिब्रिटी पर्वाचे विजेतेपद. सध्या सोनी मराठीवरील हास्यजत्रा हा त्यांचा कार्यक्रमही विशेष गाजत आहे. फर्जंद मधील बहिर्जी नाईक आणि आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर मधील प्रभाकर पणशीकरांची भूमिका विशेष गाजली. कच्चा लिंबू (२०१७) या प्रसाद ओक दिग्दर्शित सिनेमाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हिरकणी (२०१९) आणि चंद्रमुखी (२०२२) हे त्यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे प्रचंड गाजले. लवकरच त्यांचा ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावरील चरित्रपट रसिकांच्या भेटीस येत आहे. "
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MAZA ANAND Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोहोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
मिलिंद रोहोकले

फारच छान आहे