- GOADOOT 9-8-2009
गुजरातमधील छोट्या खेड्यापासून ‘रिलायन्स’च्या साम्राज्यापर्यंतचा विलक्षण टप्पा सर करणाऱ्या धीरूभाई अंबानी यांच्या कर्तृत्वाची ओळख साऱ्या जगाला आहे. त्यांचं कार्यविषयक तत्त्वज्ञान नेमकं कसं होतं, हे मेहता प्रकाशनच्या ‘धीरूभाईझम’ या पुस्तकातून प्रतित होतं. त्याविषयी...
एखादी व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाची शिखरं पादाक्रांत करते त्यावेळी तिची वाटचाल इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. तिच्या वाटचालीचा धांडोळा घेताना अनेकांना यशाचा मूलमंत्र सापडतो. आजवर अशा अनेक दिग्गजांच्या यशोगाथा शब्दबद्ध झाल्या आहेत. ‘धीरूभाईझम’ हे मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित करण्यात आलेलं असंच एक पुस्तक. ए. जी. कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे.
‘धीरुभाईझम’ हे शीर्षकच फार बोलकं आहे. आजपर्यंत आपण अनेक ‘इजम’ ऐकले, वाचले आहेत, पण हा ‘धीरुभाईझम’ जगावेगळा म्हणावा लागेल. आज रिलायन्स उद्योगाचा दबदबा केवळ भारतातच नव्हे तर साऱ्या जगामध्ये आहे. या उद्योगाच्या उभारणीमागील धीरूभाई अंबानी यांचे अथक कष्ट, जिद्द सर्वश्रुत आहेत. फारसं औपचारिक शिक्षण न लाभलेले धीरूभाई स्वतःच एक चालतं बोलकं विद्यापीठ होते, असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं ठरणार नाही. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख साऱ्या जगाला आहेच. पण त्यांचं कार्यविषयक तत्त्वज्ञान नेमकं काय होतं, याचा परिचय ए. जी. कृष्णमूर्ती यांनी ‘धीरुभाईझम’द्वारे करून दिला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद करताना मूळ शीर्षक कायम ठेवण्यात आलं आहे.
धीरुभार्इंनी ज्या उमेदीने व्यवसाय केला, अनेक संकटांवर मात केली आणि ‘आम्ही माणसांच्या भरवशावर धोका पत्करतो’ हे जीवनसूत्र मानले त्याची स्पष्ट झलक या पुस्तकाद्वारे मिळते. पुस्तकाला ज्येष्ठ उद्योगपती आणि धीरुभार्इंचे सुपुत्र मुकेश अंबानी यांची प्रस्तावना लाभली आहे. संपूर्ण हयातीत धीरुभाई ‘आशा हे तुमचं सर्वांत शक्तिमान शस्त्र आहे, तर आत्मविश्वास ही सर्वांत मोठी जमेची बाजू आहे’ असं सांगत राहिले. मुकेश अंबानी यांनी हे सूत्र उचलून धरताना धीरुभार्इंच्या आयुष्यातील अनेक टप्पे जवळून वर्णन केले आहेत. ‘गुरू’ या चित्रपटातून धीरुभार्इंना समांतर असे एक व्यक्तिमत्व चितारण्यात आले आणि त्यामुळे त्यांची यशोगाथा रूपेरी कहाणी बनून जगापुढे आली. या कहाणीचा तपशिलवार घेतलेला मागोवा ‘धीरुभाईझम’ मध्ये घेण्यात आला आहे.
या पुस्तकाचे ए. जी. कृष्णमूर्ती हे मुद्रा कम्युनिकेशन्स या जाहिरात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. अंबानी परिवाराशी त्यांचा निकटचा संबंध आहे. त्यामुळे ‘धीरुभाईझम’ नेमका काय होता, याची त्यांना चांगली कल्पना आहे. एकूण १५ प्रकरणांमधून हा ‘धीरुभाईझम’ उलगडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. प्रत्येक प्रकरण सुटसुटीत, नेमक्या शब्दांमध्ये मांडण्यात आलं असून त्याची शीर्षकही लक्षवेधी आहेत. या प्रत्येक शीर्षकातून धीरुभार्इंचं कार्यविषयक तत्त्वज्ञान प्रतित होतं. ‘बाह्या सरसावून मदतीला पुढं व्हा’, ‘तुमच्या टीमसाठी सुरक्षाकवच बना’, ‘गाजावाजा न करता कल्याणकारी कार्य करा, भव्य स्वप्न बघा, पण डोळे उघडे ठेवून बघा’, अशी शीर्षकं फार बोलकी आहेत. भव्य-दिव्य गोष्टी साध्य करण्यासाठी धीरुभाईप्रमाणे फक्त साध्या, सोप्या तत्त्वज्ञानावर निष्ठा ठेवणं पुरेसं आहे, असं लेखकाने म्हटलं आहे आणि ते खरंही आहे. धीरुभार्इंची जीवनकहाणी हे सकारात्मक वृत्तीच्या सामथ्र्यांचं मूर्तीमंत उदाहरण असून आजचं ‘रिलायन्स’ त्याची साक्ष देत आहे. आवर्जून वाचावी अशी ही कहाणी.
- NAVPRABHA 20-7-2009
धीरूभाईझम आणि प्रतिकूलतेवर मात या ए. जी कृष्णमूर्ती लिखित दोन पुस्तकांचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. दोन्ही पुस्तकांमधून धीरूभाई अंबानी यांचे कार्यविषयक असामान्य तत्त्वज्ञान आणि प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या शौर्याची, अथक प्रयत्नांची विलक्षण कहाणी रेखाटण्यात आली आहे. वस्तुत: धीरूभाई अंबानी हेच एक विद्यापीठ आहे. ज्या उमेदीने त्यांनी व्यवसाय केला, अनेक संकटावर मात केली आणि ‘आम्ही माणसांच्या भरवशावर धोका पत्करतो’ हे जीवनसूत्र मानले त्याची स्पष्ट झलक धीरूभार्इंवरील दोन पुस्तकांमुळे मिळते. दोन्ही पुस्तकांना ज्येष्ठ उद्योगपती आणि सुपुत्र मुकेश अंबानी यांची प्रस्तावना लाभली आहे. संपूर्ण हयातीत धीरूभाई ‘आशा हे तुमचं सर्वात शक्तीमान शस्त्र आहे, तर आत्मविश्वास हे सर्वात मोठी जमेची बाजू आहे’ असं सांगत राहिले. मुकेश अंबानी यांनी हे सूत्र उचलून धरताना धीरूभार्इंच्या आयुष्यातील अनेक टप्पे जवळून वर्णन केले आहे. ‘गुरू’ या चित्रपटातून धीरूभार्इंना समांतर असे एक व्यक्तिमत्व चितारण्यात आले आणि त्यामुळे त्यांची यशोगाथा रूपेरी कहाणी बनून जगापुढे आली. या कहाणीचा तपशिलवार घेतलेला मागोवा दोन पुस्तकांमधून पहायला मिळतो. ‘प्रतिवूâलतेवर मात’ या पुस्तकातील प्रतिकूलता असूनही, किशोरवयीन स्वातंत्र्यसेनानी, संपूर्ण विश्वास-एक जीवनमार्ग, आव्हानं, अशक्य? - ते काय असतं? विशालहृदयी नेता आदी टप्प्यांमधून धीरूभार्इंचे नेमकं व्यक्तिमत्त्व उलगडतं. धीरूभार्इंनी म्हटलं होतं, ‘आपण स्वप्न बघण्याचं धाडस केलं पाहिजे आणि तेसुद्धा भव्य स्वप्न बघण्याचं,’ हे स्वप्न त्यांचे दोन्ही सुपुत्र आज अंमलात आणत आहेत. या संपूर्ण परिवाराने अशा ठराविक गृहितकांवर अढळ श्रद्धा ठेवत मिळवलेलं यश आवर्जून तपासून पाहण्याजोगं आहे. दोन्ही पुस्तके सुमारे ७० पानांची असून त्यांची किंमत अनुक्रमे ८० आणि ७० रुपये अशी आहे.
- JYOTI GRANTH WARTA 15-8-2009
धीरूभाई अंबानींनी स्वप्नपूर्तीच्या मार्गात आलेल्या अनंत अडथळ्यांवर मात करत ‘रिलायन्स’चं भव्य साम्राज्य उभारलं. धीरूभाई व रिलायन्सचं यश इतकं अपूर्व आहे की, बऱ्याच जणांना त्यांच्या संपत्तीच्या झगमगाटापलीकडचं पाहताच येत नाही. पण त्याचं यश असं सहजी लाभलेलं नव्हतं. ते कष्टसाध्य होतं. या कहाणीतून वाचकांना केवळ स्वप्नं पाहण्याची स्फूर्तीच नव्हे, तर त्यावर पकड मिळवण्याचं धाडसही लाभेल.
- PUNYANAGARI 5-2-2009
आयुष्यात आपण बरेचदा कोड्यात पडतो. स्पर्धेत अपेक्षित यश मिळेल का ? प्रतिकूल परिस्थितीत तग धरता आला का ? स्वत:ला सिद्ध करण्यात कमी पडलो का असे प्रश्न आपल्याला अनेकदा पडतात. त्यामुळे वेळ येते ती आत्मपरिक्षणाची. ते करताना आजूबाजूला विविध मातब्बरांची मातब्बरी पहायला मिळते. ही माणसं मोठी कशी झाली आणि त्यांनी पाहता पाहता आकाशाल गवसणी कशी घातली हे तपासून पाहताना आश्चर्य वाटतं. म्हणूनच अशा विलक्षण उमेद लाभलेल्या व्यक्तिमत्वांची जीवनगाथा पडताळून पाहण्याची संधी मिळाली की गमवावीशी वाटत नाही. ’मेहता प्रकाशन तर्फे अलीकडेच अशी चार पुस्तके बाजारात आणण्यात आली आहेत. धीरुभाईझम, प्रतिकूलतेवर मात, नवभारताचे शिल्पकार आणि इट हॅपन्ड इन इंडिया या चार पुस्तकांनी प्रत्येक सामान्य माणसाची जिगर जागवल्यास नवल नाही. ’धीरुभाईझम’ आणि ’प्रतिकूलतेवर मात’ या ए.जी. कृष्णमूर्ती लिखित दोन पुस्तकांचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. दोन्ही पुस्तकातून धीरुभाई अंबानी यांचे कार्यविषयक असामान्य तत्वज्ञान आणि प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या शौर्याची, अथक प्रयत्नांची विलक्षण कहाणी रेखाटण्यात आली आहे. वस्तुत: धीरुभाई अंबानी हेच एक विद्यापीठ आहे. ज्या उमेदीने त्यांनी व्यवसाय केला, अनेक संकटांवर मात केली आणि ’आम्ही माणसांच्या भरवशावर धोका पत्करतो’ हे जीवनसूत्र मानले त्याची स्पष्ट झलक धीरूभार्इंवरील दोन पुस्तकांमुळे मिळते. दोन्ही पुस्तकांना ज्येष्ठ उद्योगपती आणि सुपुत्र मुकेश अंबानी यांची प्रस्तावना लाभली आहे. संपूर्ण हयातीत धीरुभाई ‘आशा हे तुमचं सर्वात शक्तीमान शस्त्र आहे, तर आत्मविश्वास हे सर्वात मोठी जमेची बाजू आहे’ असं सांगत राहिले. मुकेश अंबानी यांनी हे सूत्र उचलून धरताना धीरुभार्इंच्या आयुष्यातील अनेक टप्पे जवळून वर्णन केले आहे. ’गुरु’ या चित्रपटातून धीरुभार्इंना समांतर असे एक व्यक्तीमत्व चितारण्यात आले आणि त्यामुळे त्यांची यशोगाथा रुपेरी कहाणी बनून जगापुढे आली. या कहाणीचा तपशीलवार घेतलेला मागोवा दोन पुस्तकांमधून पहायला मिळतो. ’प्रतिकूलतेवर मात’ या पुस्तकातील प्रतिकूलता असूनही, किशोरवयीन स्वातंत्र्यसेनानी, संपूर्ण विश्वास - एक जीवनमार्ग, आव्हानं, अशक्य ? - ते काय असतं?, विशालह्रदयी नेता आदी टप्प्यांमधून धीरुभार्इंचं नेमकं व्यक्तीमत्व उलगडतं. धीरुभार्इंनी म्हटलं होतं, आपण स्वप्न बघण्याचं धाडस केलं पाहिजे आणि तेसुद्धा भव्य स्वप्न बघण्याचं.’ हे स्वप्न त्यांचे दोन्ही सुपुत्र आज अंमलात आणत आहेत. या संपूर्ण परिवाराने अशा ठरावीक गृहितकांवर अढळ श्रद्धा ठेवत मिळवलेलं यश आवर्जून तपासून पाहण्याजोगं आहे.
- LOKASHA 19-7-2009
रिलायन्स उद्योगसमूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी हे आता जगभरातील कोट्यवधी तरुण-तरुणींसाठी एक आदर्श झाले आहेत. कमी काळात अधिकाधिक पैसा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणारे तरुण धीरूभाई अंबानी यांच्या आयुष्यपटाचा अभ्यास करीत असतात. १९५६ साली पापड, लोणचे विकणारे धीरूभाई अंबानी १९८० साली देशातील प्रमुख उद्योगपती झाले आणि २००३ साली त्यांचा उद्योगसमूह जगातील एक प्रमुख उद्योगसमूह झाला. जगभरातील पहिल्या पन्नास श्रीमंत उद्योजकात रिलायन्स ग्रुपचा समावेश झाला.
खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यापासून दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृतीचे किंवा विचाराचे बाजारीकरण सुरू झाले आहे. आता धीरूभाई अंबानी यांच्या नावाचेच मार्केट होत आहे. धीरूभाई अंबानी यांचे नाव त्यांची जन्मकथा रिलायन्स उद्योगाची जन्मकथा, वाढ या साऱ्या बाबी बाजारात चांगल्या किमतीला विकल्या जात आहेत. त्याचा फायदा भांडवलदार मंडळी घेणार नाहीत तरच नवल म्हणावे लागेल. अलीकडेच धीरूभाई अंबानी यांच्यासंबंधी ए. जी. कृष्णमूर्ती यांनी दोन पुस्तके लिहिले असून या पुस्तकांचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. ही दोन्ही पुस्तके बाजारात मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशन संस्थेने आणली आहेत. या दोन्ही पुस्तकांना मुकेश अंबानी यांची प्रस्तावना आहे.
धीरूभाई अंबानी पापड, लोणचे विक्रीच्या व्यवसायापासून रिलायन्स कापड उद्योग उभारण्याकडे वळले. पाताळगंगा येथील रिलायन्स कपडा निर्मिती प्रकल्प उभारताना त्यांना काय अडचणी आल्या आणि त्या अडचणी सोडविण्यासाठी धीरूभाई अंबानी यांनी काय केले याची माहिती या पुस्तकातून मिळते. रिलायन्स कपडा उद्योग उभा राहिला आणि धीरूभाई अंबानी इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्सुक होते, परंतु त्यांनी नव्या प्रकल्पासाठी दिलेले प्रस्ताव बँका कर्ज देण्यासाठी मान्य करेनात. त्यावर धीरूभाई अंबानी यांनी सर्वसामान्य लोकांकडूनच पैसा उभारण्याचा निर्णय घेतला आणि देशातील लोकांना पहिल्यांदा शेअर मार्केटची ओळख करून दिली.
लोकांनी रिलायन्सचे शेअर घेतले पण परतावा किती मिळतो त्याबद्दल लोकांना शंका होती त्यावेळची सेबीची स्थापना झालेली नव्हती. लोकांनी फक्त धीरूभाई अंबानी यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून शेअर्स घेतले ही बाब धीरूभाई ओळखून होते. आपण शेअर्स धारकांना योग्य परतावा देऊ शकत नाही तर देशात शेअर बाजार उभा राहणार नाही याची जाणीव त्यांना होती. धीरूभार्इंनी शेअर्स विकताना दिलेले आश्वासन पाळले. पाच रुपयाचा शेअर्स विकत घेणाऱ्याला त्यावेळी दरवर्षी पन्नास रुपयापेक्षा अधिक परतावा मिळाला. या एकाच घटनेमुळे रिलायन्सची लोकप्रियता आकाशाला पोहोचली आणि पुढील काळात रिलायन्सला भाग भांडवलासाठी कधीच कसलीही अडचण आली नाही. रिलायन्स म्हणजे योग्य परतावा देणारी कंपनी. रिलायन्स म्हणजे फसवणुकीची भीती नसलेली कंपनी अशी प्रतिमा तयार झाली. धीरूभाई अंबानीने तयार केलेल्या या प्रतिमेचा फायदा आजही मुकेश आणि अनिल या अंबानी बंधूंना मिळतो आहे.
धीरूभाई अंबानी हे एक अजब व्यक्तिमत्व होते. त्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. या माणसाने भारताच्या विकासासाठी दिलेले योगदान खूपच महत्त्वाचे ठरते. गुजराती माणसे कोणताही व्यवसाय प्रचंड निष्ठेने करतात त्यामुळे त्याचा फायदा गुजराती माणसाला मिळतो ही बाब धीरूभाई अंबानी यांनी दाखवून दिली. धीरूभाईचे अनुकरण आज सर्वच स्तरावर होत आहे. अनेक मोठे उद्योजक धीरूभाईच्या चरित्र आणि स्वभावाचा अभ्यास करतात. या पार्श्वभूमीवर त्यांच्याविषयी आलेली ही दोन्ही पुस्तके सर्वार्थाने महत्त्वाची ठरतात. तरुण मंडळींनी या दोन्ही पुस्तकाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. जीवनातील यश हे सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी खडतर प्रयत्न करावे लागतात. धीरूभाईचे चरित्र याच बाबी सांगत असते. या दोन्ही पुस्तकांची किंमत ८० आणि ७० रुपये आहे. ही दोन्ही पुस्तके समाजाला निश्चितच मार्गदर्शक करणारे ठरतील याबद्दल शंका नाही.