- MAHARASHTRA TIMES 07-12-2003
भारताचे बारावे राष्ट्रपती म्हणून डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी २५ जुलै २००२ रोजी शपथ घेतली, तेव्हा या सर्वोच्च पदावर आरूढ होणारी राजकीय क्षेत्राबाहेरची दुसरी व्यक्ती अशी नोंद इतिहासात झाली. यापूर्वी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् या थोर तत्वज्ञाची या पदी निवड झाली होती. डॉ. कलाम हे मुळातले एक योद्धा शास्त्रज्ञ. ‘सामर्थ्य सामर्थ्याचा आदर करते’ हे सूत्र मनाशी बाळगून त्यांनी भारताला संरक्षणदृष्ट्या समर्थ करण्याचे स्वप्न उरी बाळगले. १९८२ ते १९९२ या अवघ्या दहा वर्षांत ‘एकात्मिक लक्ष्यवेधी क्षेणास्त्र विकसन योजना’ पूर्ण केली आणि त्रिशूल, पृथ्वी, अग्नी, नाग आणि आकाश या पंचास्त्रांचा उदय झाला. देशाचा सर्वोच्च नेता बनलेल्या या थोर शास्त्रज्ञाच्या आयुष्याचा, विचारसरणीचा जुजबी परिचय सर्वसामान्यांना व्हावा म्हणून माधव मोर्डेकर यांनी लिहिलेले त्यांचे छोटेखानी चरित्र रोचक व लहानथोरांसाठी उपयुक्त आहे. डॉ. कलाम यांचा जीवनपट थोडक्यात विशद करतानाच त्यांच्या उत्तुंग कार्याचा सुरेख आढावाही घेतल्याने पुस्तक वाचनीय झाले आहे.
योद्धा शास्त्रज्ञ राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम
- MAHARASHTRA TIMES 07-12-2003
रोचक परिचय...
भारताचे बारावे राष्ट्रपती म्हणून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी २५ जुलै २००२ रोजी शपथ घेती, तेव्हा या सर्वोच्य पदावर आरूढ होणारी राजकीय क्षेत्राबाहेरची दुसरी व्यक्ती अशी नोंद इतिहासात झाली. यापूर्वी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् या थोर तत्वज्ञाची या पदी निवड झाली होती. डॉ. कलाम हे मुळातले एक योद्धा शास्त्रज्ञ. ‘सामर्थ्य सामर्थ्यांचा आदर करते’ हे सूत्र मनाशी बाळगून त्यांनी भारताला संरक्षणदृष्ट्या समर्थ करण्याचे स्वप्न उरी बाळगले. १९८२ ते १९९२ या अवघ्या दहा वर्षांत ‘एकात्मिक लक्ष्यवेधी क्षेपणास्त्र विकसन योजना’ पूर्ण केली आणि त्रिशूल, पृथ्वी, अग्नी, नाग आणि आकाश या पंचास्त्रांचा उदय झाला. देशाचा सर्वोच्च नेता बनलेल्या या थोर शास्त्रज्ञानाच्या आयुष्याचा, विचारसरणींचा जुजबी परिचय सर्वसामान्यांना व्हावा म्हणून माधव मोर्डेकर यांनी लिहिलेले त्यांचे छोटेखानी चरित्र रोचक व लहानथोरांसाठी उपयुक्त आहे. डॉ. कलाम यांचा जीवनपट थोडक्यात विशद करतानाच त्यांच्या उत्तुंग कार्याचा सुरेख आढावाही घेतल्याने पुस्तक वाचनीय झाले आहे.
- DAINIK TARUN BHARAT 28-09-2003
असामान्य कर्तृत्वाचा छोटेखानी आढावा...
‘अशी सृजनशील साहसे हवी आहेत
की जी बीजे पेरून वाट पाहू शकतील
जी भान ठेवून योजना आखतील
आणि बेभान होऊन त्या अमलात आणतील...
भारताचे भविष्य घडविणाऱ्या अशा सृजनशील साहसांपैकीच एक नाव म्हणजे डॉ. ए. पी. अब्दुल कलाम.
भारताचे बारावे राष्ट्रपती म्हणून डॉ. ए. पी. अब्दुल कलाम यांची निवड झाली. यापूर्वी ते एक जगद् विख्यात शास्त्रज्ञ म्हणून लोकांना परिचित होते. एक साधं परंतु बुद्धिमान व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची भारतीयांवर छाप आहे.
अशा या महान व्यक्तिमत्त्वाचा वेध माधव मोर्डेकर यांनी ‘योद्धा शास्त्रज्ञ राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम’ या पुस्तकाद्वारे घेतली आहे. तामीळनाडू राज्यातील रामेश्वरम् या लहानशा गावात जन्मलेल्या डॉ. कलामांनी एक जगद्विख्यात शास्त्रज्ञ म्हणून कशी झेप घेतली याची आढावा लेखकाने या पुस्तकातून घेतला आहे. डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म, बालपण व शिक्षण कसे व कुठे झाले याबद्दल सुरुवातीला संरक्षण लेखकाने माहिती दिली आहे.
डॉ. कलामांचा मूळ पिंडच संशोधकाचा. संरक्षण खात्यात त्यांच्याकडे ‘डार्ट’ या युद्धात वापरायच्या विमानाचा आराखडा सोपवला. पुढे डॉ. विक्रम साराभाई यांच्या रुपाने कलामांना एक परिपूर्ण विज्ञानसंशोधक लाभला. डॉ. साराभार्इंच्या आश्वांसक छायेखाली त्यांच्यातील शास्त्रज्ञाची प्रगती झाली.
थुंबा येथील अवकाशतळाच्या कार्यालयाची जबाबदारी, नासामध्ये प्रशिक्षणाची संधी, नाईके-अपाची भारताची पहिल्या वहिल्या अंतराळयानाच्या जुळवा-जुळवीत कमालांचा सहभाग, साऊंड रॉकेटस् आणि लाँचिंग रॉकेट्स, पृथ्वी, त्रिशूल, आकाश, नाग व अग्नी या क्षेपणास्त्र निर्मितीपर्यंतचा अब्दुल कलाम यांच्या कारकिर्दीचा आलेख लेखकाने शब्दबद्ध केला आहे.
या वाटचालीत त्यांच्यावरील आघात आणि आजवर त्यांना मिळालेले मानसन्मानाबद्दलही लेखक लिहितो. डॉ. कलामांनी संशोधन हा व्यवसाय बनू दिला नाही. संशोधन हा त्यांचा ध्यास, ध्येय, धर्म बनलं. भारताचे राष्ट्रपतीपद हे कलामांच्या कारकिर्दीतील मानाचा मुकुट म्हणावा लागेल.
डॉ. अब्दुल कलामांकडे पाहिले की जाणवते ‘या पंखांना क्षितीज नाही.’ त्यांच्या कार्यकतृत्वाची कमान नेहमीच चढती राहील.
डॉ. कलामांच्या असामान्य कतृत्वाचा छोटेखानी पुस्ताकात घेतलेला आढावा सिमित वाटला तरी लेखकाने जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
- DAINIK SAMANA 05-10-2003
हिंदुस्थानचे विद्यमान राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे छोटेखानी चरित्र माधव मोर्डेकर यांनी लिहिले आहे. डॉ. कलाम हे नामवंत शास्त्रज्ञ असून संशोधकाचा होत. संरक्षण खात्यात त्यांना विमानाचा आराखडा तयार करण्याचे काम मिळाले. यानंतरच्या कामगिरीचा त्यांच्याविषयी लोकांत खूप कुतूहल आहे. रामेश्वरम येथे संपन्न कुटुंबात जन्मलेल्या डॉ. कलाम यांना घरची फार मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी नसूनही शिक्षण घेण्याची संधी मिळाली. त्याबरोबरच त्यांच्यावर कुटुंबात उत्तम संस्कार झाले. त्यांचा मूळ पिंड आलेख सतत चढताच राहिला. तरुण पिढीने त्यांच्या चरित्रापासून प्रेरणा घ्यावी.
- DAINIK LOKMAT 13-11-2016
थोर शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याचा छोट्या मुलांना परिचय करून देण्यासाठी हे छोटेखानी पुस्तक लिहिले आहे. यात डॉ. कलाम असे घडत गेले, त्यांचे बालपण, घरचे वातावरण, संशोधनाची आस, यशपूर्तीच्या दिशेने, कीर्तीशिखराच्या वाटेवर आदी शीर्षकांतर्गत माहिती देण्यात आली आहे. डॉ. कलाम यांच्या स्वप्नातील भारत, बालकांना उद्देशून त्यांनी दिलेला संदेश आदीची माहिती या पुस्तिकेतून देण्यात आली आहे. ‘एक प्रेरणादायक पुस्तिका’ असेच तिचे वर्णन करावे लागेल.