KIRAN BORKARआपल्या दोन जिवलग मैत्रिणींबरोबर लंच करून केसी बाहेर पडली आणि भरधाव वेगाने येणाऱ्या कारने तिला उडवले .अनेक ठिकाणी फ्रॅक्चर व डोक्याला मार घेऊन केसी कोमात गेली . आई वडिलांच्या प्रचंड संपत्तीची मालकीण केसी आज असहाय्य होती . तिचा नवरा आणि अमली पदार्थाचे व्यसन असलेली तिची बहीण दोघेच तिचे नातलग . ती लवकरच शुद्धीवर येईल असे समजून तिच्या मैत्रिणी ,नातलग ,नर्सेस तिच्याशी बोलत असतात आणि त्यांच्या बोलण्यातूनच अनेक रहस्य उलगडायला लागतात . केसी मनाने भानावर आहे आणि ती प्रत्येक गोष्ट ऐकतेय . या ऐकण्यातूनच तिला स्वतःविषयी एक रहस्य कळले आहे . आणि तिचा जीव परत धोक्यात आलाय . या सर्वाचा ती कशी सामना करेल ???? एक थरारक कादंबरी
Sidhi Bidkar चांगलं आहे पुस्तक, कोमात गेल्यानंतर एका मुलीची स्थिती स्टील लाईफ चित्रसरखीच होते....स्टील लाईफ चित्राचे वैशिष्ट्य हे की त्यातल्या वस्तू या एका जागीच ठेवलेल्या असतात पण बघणारा ज्या कोनातून त्या चित्राकडे बघतो ती बाजू त्याला दिसते,कोन बदलले की वेगळी बाजू ध्यानात येते.या कथानकातल्या नायिकेचेही काहीसे असेच झालेय....
Pratibha Khare-Kulkarni mi pan anuvad vachala, tichi mansthiti aani sthiti, donhi janvun denyat lekhak yashsvi !
Kishor Ghaisas अनुवाद वाचला मस्त आहे
Rupali Siddhapathaki-Pethkar अप्रतिम पुस्तक मी वाचलंय
मधुकर धाकराव मनातील उलगडलेले धाग्यांचे अप्रतिम चित्रण..
Kiran Borkarआपल्या दोन जिवलग मैत्रिणींबरोबर लंच करून केसी बाहेर पडली आणि भरधाव वेगाने येणाऱ्या कारने तिला उडवले .अनेक ठिकाणी फ्रॅक्चर व डोक्याला मार घेऊन केसी कोमात गेली . आई वडिलांच्या प्रचंड संपत्तीची मालकीण केसी आज असहाय्य होती . तिचा नवरा आणि अमली पदार्थाचे व्यसन असलेली तिची बहीण दोघेच तिचे नातलग . ती लवकरच शुद्धीवर येईल असे समजून तिच्या मैत्रिणी ,नातलग ,नर्सेस तिच्याशी बोलत असतात आणि त्यांच्या बोलण्यातूनच अनेक रहस्य उलगडायला लागतात . केसी मनाने भानावर आहे आणि ती प्रत्येक गोष्ट ऐकतेय . या ऐकण्यातूनच तिला स्वतःविषयी एक रहस्य कळले आहे . आणि तिचा जीव परत धोक्यात आलाय . या सर्वाचा ती कशी सामना करेल ???? एक थरारक कादंबरी
DAINIK GOMANTAK SHABDSOHALA 21-09-2014प्रभावशाली व तितकाच थरारक आनंद देणारी कादंबरी...
कोमात गेलेले अनेक पेशंट, कित्येक वर्षांनंतर परत शुद्धीवर आलेले आपण ऐकले, पाहिले आहेत. परंतु, जॉय फिल्डिंग या लेखिकेची ‘स्टिल लाइफ’ ही अशी कादंबरी आहे, ज्यात पेशंट कोमाच्या अवस्थेत असते, जिथे तिचे शरीर निश्चल व मन जागृत असते. तिच्या शरीराची जराही हालचाल होत नाही, परंतु तिला सर्वांची बोलणी ऐकू येत असतात. अशा, कोमात गेलेल्या पेशंटला ऐकू येणाऱ्या संवादांनी लिहिलेली कादंबरी. लिखाणाचा हा साचा नक्कीच नवा, आकर्षक व खिळवून ठेवणार आहे.
केसी मार्शल या कादंबरीच्या नायिकेकडे सर्व असतं. उत्तम चालणारा व्यवसाय, राजबिंडा प्रेमळ पती व गडगंज संपत्ती. त्यात आता तर ती मूल होऊ देण्याचं स्वप्न बघत असते. तेवढ्यात तिला अपघात होतो. रस्ता क्रॉस करत असताना एक ट्रक तिला उडवतो. हवेत उंच उडून ती क्राँक्रिटच्या रस्त्यावर डोक्यावर आदळते. मेंदूला प्रचंड मार बसतो. त्यातून ती कोमात जाते, पण ऐकू येण्याची संवेदना जागृत राहते.
हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या संवादातून उभी केलेली कादंबरी अफलातून आहे. प्रथमपुरुषी निवेदनातून, नायिक केसीचं अनुभवविश्व, तिच्या दृष्टीतून विश्लेषण केलेली पात्रं, अनेक वेळा त्यांचं वेगळेच रूप प्रकट होणं, त्यातून केसीला बसलेले धक्के, हे सर्व, रहस्यमय कादंबरी असल्यामुळे अपेक्षितच होतं. पण कथन शैली, संवादशैली, घटनाक्रमावर लेखिकेची पकड जबरदस्त असल्यामुळे ३५८ पानांच्या या कादंबरीत कुठेही ढिसाळपणा, फाफटपसारा, गलथान विस्तार वा कंटाळवाणी वर्णने यांना थारा मिळालेला नाही. उलट थरारक घटनांची गुंफण व त्यायोगे रहस्याच्या चक्रव्यूहात वाचकाला शेवटपर्यंत गुंतवून ठेवणे हे लेखिकेला उत्तम जमले आहे.
नायिकेला बोललेलं समजत आहे अशी शंका येताच तिची बहीण - ड्य्रू - ज्या एकेक गुपचुपरित्या अफलातून उपाययोजना योगते त्या वाचकांना प्रभावित करून जातात. ड्य्रूला नायिकेच्या नवऱ्याचाच संशय आलेला असल्यामुळे व ती जे सांगते (की नायिकेला बोललेलं कळतंय) यावर डॉक्टर कोणाचाच विश्वास नसल्यामुळे व त्यात नायिकेचं शरीरही प्रतिसाद देत नसल्यामुळे - ह्या सर्व उपाययोजना तिला अत्यंत चुपचापपणे कराव्या लागतात. त्यात ती सफल होते का? नायक-नायिकेचं काय होतं? ही सर्व उत्तरं मिळवण्याकरता, मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेली ही कादंबरी मुळातूनच वाचायला हवी. जगणं आणि मरणं यामध्ये कुठेतरी एखाद्या भयंकर स्वप्नासारखा अनुभव घेत दुष्टचक्रात अडकलेल्या एका तरूणीच्या, खिळवून ठेवणाऱ्या रहस्यकथेचा माधव कर्वे यांनी तितकाच प्रभावशाली व तितकाच थरारक आनंद देणार उत्तम अनुवाद केला आहे.