सई (पुस्तकप्रेमी समूह)दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान अमेरिकेच्या पाणबुडीने जपानी प्रवासी असलेले एक निमलष्करी जहाज हलगर्जीपणाने नष्ट केले होते व २५०० निष्पाप जीवांना जलसमाधी मिळाली होती. ही एक खरी घटना.
त्याभोवती या जपानी लेखिकेने एक कथा चपखलपणे गुंफली. पण खरंच किती कुटुंबांची होरपळ झाली असेल.
एक जपानी मुलगी , क्योको. तिची आई चिएको शेवटच्या क्षणी तिला एक रहस्य सांगण्याचा प्रय्तन करते.
मुलीला एक जुना फोटो मिळतो . तो सिंगापुरचा असतो. प्रचंड उतसुकतेपोटी ती पती च्या पाठिंब्यामुळे सिंगापूरला रवाना होते.
एक जुनापुराणा फोटो या व्यतिरिक्त तिच्याकडे काही असत नाही. सिंगापूरच्या जपानी समिती मध्ये ती जाते.
तिथे शोध घेताना काही धागेदोरे हाती लागतात . त्यातून तिला समजतं की जिला ती इतकी वर्षे तिची आई समजत होती ती तिची आई नाही आहे. आता मात्र तिला धक्का बसतो.
मग पुढचा प्रश्न कि ती कोणाची मुलगी आहे ? तिचे आई वडिल कोण ? आता ते कुठे आहेत?
टॅक्सीमधून प्रवास करताना तिला दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान सिंगापूरमधे असलेल्या “जपानी वसाहती बद्दल कळतं,, ती तिथे पोहोचते आणि नवीनच कोडी तसेच धूसर आठवणी सोबत घेऊन येते.
अजून काही खटपटीनंतर जपानी समिती कडून तिला एक यादी मिळते,,, ती यादी असते,,,,, अशा लोकांची कि जे दुसऱ्या महायुद्ध शेवटच्या टप्प्यात असताना सिंगापुरहून जपानला आपल्या मायदेशी परतण्याच्या आशेने एका “आवा मारू” नावाच्या जहाजावर चढले होते.
या जहाजाला चीनच्या जवळ समुद्रात जलसमाधी मिळते. या यादीमुळे तिला कळतं कि आपल्याला एक भाऊ ही आहे.
आता ती पुन्हा एकदा आपल्या जुन्या जपानी वसाहतीतल्या घराला भेट देते.
तिथे तिची बालमैत्रीण जी या सर्व इतिहासाची साक्षीदार आहे.
ती (मेइलिन) कथा सांगते , तेव्हा तिला सर्व उलगडा होतो..,,,,,, तिचे वडिल (शिगे) जपानी सेनेमधील गुप्तहेर असतात. त्यांना सिंगापूरमधे पाठवल्यावर ते गरोदर पत्नीसहित येतात , जिला आपला थंड जपान सोडून यायचे नसते.
तिथे येताना प्रवासात त्यांची एका जपानी कुटुंबासोबत ( तनाका कुटुंब) मैत्री होतो ती कायम टिकते.
सिंगापूरच्या उष्ण हवामानाशी जुळवून घेत, जपानच्या आठवणीत झुरत इतर अनेक जपानी लोकांना सोबत घेऊन वसाहत वसवतात. कुटुंब वाढवतात. सवादा आणि तनाका कुटुंबीय यांचे संबंध दिवसेंदिवस गहिरे होतात.वसाहतीला ते अगदी जपानचं प्रतिरूप करतात.
हे करताना चिनी वंशाचा स्थानिक कल्पक हुशार सुतार या कुटुंबाच्या संपर्कात येतो. वसाहतीसाठी मदत करताना तो त्यांचाच होऊन जातो. त्याची मुलगी मेइलिन या मुलांसोबत वाढते , खेळते.
क्योको , तिचा भाऊ आणि मेइलिन हे कायम एकत्र खेळतात. चिएको आणि मोरी क्योको ला आपल्या मुलासारखेच प्रेम करतात. कारण तिला मूल नाही.
४ वर्षांनी दोस्त राष्ट्रांची सरशी व जपानची पिछेहाट सुरू होते
मासाको (शिगेची पत्नी )कुटुंबाची चिंता करत जपानला जाण्यासाठी पाठपुरावा करत राहते. अचानक एके दिवशी बातमी कळते कि “आवा मारू“बोट जपानी लोकांना घेऊन जपानला चालली आहे.या बोटीला दोस्त राष्ट्रांचे अभय आहे व ती बोट सुखरूपपणे जपानला पोहोचणार आहे . जीवाचे रान करून मासाको तिथे सावादा आणि तानाका या कुटुंबांसाठी जागा मिळवते. मेइलिन व तिच्या सुतार वडिलांना हे लोक परत जाणार म्हणून अपरिमित दुःख होते. ( नंतरच्या आयुष्यात पण त्यांना वाटत राहते कि हे लोक कधीतरी परततील.)
असंख्य आशा , स्वप्नं घेऊन दोन हजारांहून अधिक माणसे बोटीवर चढतात. प्रवास सुरू होतो. सर्व आलबेल असताना दूरवर एक धडाका होतो, अमेरिकी पाणबुड्या सर्वत्र असतात. त्यामुळे जीव मुठीत धरून सगळे प्रवास करत असतात.त्यांचा आशेचा किरण एकच असतो. त्यांचा कॅप्टन , ज्याची यशस्वी सफरींची नोंद आहे. एक गरोदर स्त्री जिचा नवरा आर्मीत आहे ती निराशावादी बोलत राहते. मासाको अजून घाबरते पण मुळची ती खंबीर आहे. अचानक काही कारणाने बोटीचा ठरलेला रस्ता बदलतो. जपानी आर्मीवाला आणि शिगे दोन्ही घाबरतात. इथेच फासे फिरतात. अमेरिकी पाणबुडीकडून निष्काळजीपणा प्रदर्शित होतो. संदेश चुकीचा वाचला जातो. आणि जे नको व्हायला होतं ते होतं,,, पाणतीर डागले जातात. ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
एक भयानक शेवट!!!!
आशाआकांक्षा, स्वप्नं, वर्तमान , भविष्य सगळ्यांचा चक्काचूर!
या विनाशातून क्योको (मासाको शिगेची मुलगी)आणि चिएको वाचतात. चिएको तिला मुलीप्रमाणे वाढवून मोठी करते,,, पण एक भळभळणारी जखम उराशी घेऊन.
क्योको ऐकून सुन्न होते,, स्वतः ला सावरते,, मेइलिन ला उराउरी भेटते
परत आपल्या आधीचे आयुष्य सुरू करते. आपल्या पतीला हे काही न सांगण्याचा निर्णय घेते.
दरवर्षी टोकियोतील झोजोजी मंदिराच्या आवाजातील एका कोपरयात विसावलेल्या स्मारकाला मात्र नित्य भेट देते.
एक प्रकरण वर्तमान आणि एक प्रकरण भूतकाळ लिहिला आहे.
वर्तमानात क्योको चे आताचं जीवन तिचा सिंगापुरमधील शोधप्रवास दाखवलाय.
भूतकाळात शिगे , मासाको सवादा ( क्योको चे खरे आई वडिल)आणि चिएको,मोरी तनाका यांचा सिंगापूर निवास, जहाजगमन , जलसमाधी हा प्रवास दाखवला आहे. बोटीवर जे काही घडते ते कोणालाच माहिती नाही.
चिएको क्योको ला जपानमध्ये वाढवते.
मेइलिन ला उशीरा कळतं बोट बुडल्याचं. तिचे वडील घराची काळजी घेतात. सिंगापूरवासियांचा जपानवर रोष असल्यामुळे मेइलिन व तिच्या वडिलांना समाजरोष सहन करावा लागतो. जपानी समिती ने मात्र शक्य तेवढी माहिती , कागदपत्रे जपून ठेवली आहेत.
(((((((((सवादा कुटुंब—- शिगे व मासाको. त्यांची दोन मुले क्योको व तिचा भाऊ
तनाका कुटुंब—- मोरी व चिएको जी क्योको ला आयुष्यभर सांभाळते.
चिनी सुतार व मुलगी मेइलिन)))))
पाणबुडीच्या कॅप्टन वर काही विशेष कारवाई झाली नाही.
युद्धाचे असे किती साइडइफेक्ट्स असतील आणि युद्ध संपल्यानंतर कितीकाळ अस्तव्यस्त असेल सर्व!
‘विनाशकाले विपरीत बुदधी ‘हेच खरं
पूर्वकाळातील राक्षसांचा पुनर्जन्म होतो की काय जाणे?
सर्वांचे आभार!!