- अमोल दादा काळे
रेड फ्लॅग नोटीस जारी केलेल्या फोनवरुन
केला गेलेला एकच फोन.
छापा मारल्यावर लॅपटाॅप हातात पडु नये
म्हणुन त्याची मोडतोड करायचा प्रयत्न,
स्वत: पकडले जाऊ नये म्हणुन
चौथ्या मजल्यावरुन घेतलेली उडी—
ब्रिटीश आणि अमेरिकन इन्टेलिजन्स एजन्सीजची
एवढीच खात्री पटते की,
जगाला थक्क करेल अशा भयानक घातपाताचा कट
अल् कायदाने रचला आहे.
पण तो कोणत्या स्वरुपाचा आहे, कधी घडणार आहे.
आणि लक्ष्य काय आहे याचा थांगपत्ता लागत नाही.
अल् कायदा मधे स्वत:चा माणुस घुसवून
कुठल्याही तर्हेची माहिती काढणे आजपर्यत
त्यांना कधीही जमलेले नाही. अफगान आहे इजमत खान,
ग्वाटेनामो बे इथे पाच वर्षे तुरुंगात असलेला तालिबान कमांडर—आणि अफगान आहे इराकमधे जन्मलेला,
पंचवीस वर्षे जगाच्या कानाकोपर्यात लढल्यागेलेल्या
युद्धाचा अनुभव असलेला कर्नल माईक मार्टीन.
जबरदस्त पुर्वतयारी आणि दैवावर भरवसा ठेऊन,
जिथल्या भीषण गोष्टींची कल्पना करणेही केवळ अशक्य आहे.
अशा अंधार्या अरब जगतात अरब म्हणून—इझमत खान म्हणून—वावरत कर्नल माईक मार्टीन त्या कटाचा छडा लावू शकेल ???
- Ravindra Chavan
वाचा वाचा वाचा . . . मस्तच पुस्तक आहे . . ☺
- Kiran Borkar
अतिशय सुंदर पुस्तक
- Vaibhav Mahajan
ड फ्लॅग नोटिस जारी केलेल्या फोनवरून केला गेलेला एकच फोन, छापा मारल्यावर लॅपटॉप हातात पडू नये म्हणून त्याची मोडतोड करायचा प्रयत्न, स्वत: पकडले जाऊ नये म्हणून चौथ्या मजल्यावरून घेतलेली उडी ब्रिटिश आणि अमेरिकन इन्टेलिजन्स एजन्सीजची एवढीच खात्री पटते की, जगाला थक्क करेल अशा भयानक घातपाताचा कट अल काईदाने रचलेला आहे. पण तो कोणत्या स्वरूपाचा आहे, कधी घडणार आहे आणि लक्ष्य काय आहे याचा थांगपत्ता लागत नाही. अल काईदामध्ये स्वत:चा माणूस घुसवून कुठल्याही त-हेची माहिती काढणे आजपर्यंत त्यांना कधीही जमलेले नाही.
अफगाण आहे इझमत खान, ग्वाटेनामो बे इथे पाच वर्षे तुरुंगात असलेला तालिबान कमांडर आणि अफगाण आहे इराकमध्ये जन्मलेला, पंचवीस वर्षे जगाच्या कानाकोप-यात लढल्या गेलेल्या युद्धांचा अनुभव असलेला कर्नल माईक मार्टिन. जबरदस्त पूर्वतयारी आणि दैवावरच भरवसा ठेवून, जिथल्या भीषण गोष्टींची कल्पना करणेही केवळ अशक्य आहे, अशा अंधा-या अरब जगतात अरब म्हणून इझमत खान म्हणून वावरत कर्नल माईक मार्टिन त्या कटाचा छडा लावू शकेल ?
- DAINIK DESHDOOT 07-06 -2009
`दहशतवादाचा चटका`...
दहशतवादाला चेहरा नसतो, धर्म नसतो. दहशतीची कमाल पातळी गाठून शांततेला मूठमाती देण्याचं कसब दहशतवाद्यांकडे असतं. ‘अल-कायदा’ ही दहशतवाढी संघटना. या संघटनेचं जाळं तण वाढावं तसं सर्वदूर पसरलंय. इराकमध्ये जन्मलेला अफगाण इझमतखान ग्वाटेनामो बोईथे पाच वर्ष तुरूंगवासात असलेले तालिबान कमांडर.
पंचवीस वर्षे जगाच्या कानाकोपऱ्यात लढल्या गेलेल्या युद्धांचा अनुभव असलेला कर्नल माईक मार्टिन.
अत्यंत भीषण क्रूर, अशक्यप्राय वाटावं अशा परिस्थितीचं वर्णन ‘द अफगाण’ या पुस्तकात आहे.
अल कायदा संघटनेच्या वरिष्ठ बँकर तौफिक अल क्रूरला पकडण्यासाठीचे कर्नल रझ्झाकांनी पार पाडलेले थरारनाट्य वाचून अचंबित व्हायला होते. या पकडनाट्यात तौफिक चाळीस फूट उंचीवरुन उडी मारून मृत्यु पत्करतो. लॅपटॉप फोडून टाकतो. पेशावरचं वर्णन एरवी कुठे वाचायला मिळणार? यात पेशावर शहराचे चपखल वर्णन केलंय. पुला इ चरखी हा काबूलच्या पूर्वेला असलेला तुरूंग. यातून पळ काढलेला कैदी आणि पिक अप व्हॅनमधली चार पे्रतं यांना घेऊन जाणारा ब्रिगेडियर युसूफ यांचे थरारक वर्णन. पुढे कंदाहारच्या रस्त्याचे, ट्रक्सचे वर्णन... गोठवणारी थंडी आणि प्रवास अशा अनेक घटना आपल्यासमोर घडताहेत असं तंतोतंत वर्णन लेखकाने समर्थपणे उभं केलंय. अजूनही आपल्याला ललित, कथा, स्फुट अशाच वाचनाची सवय आहे. युद्ध, कारवायांचे वर्णन अशा वास्तव लिखाणाच्या वाटेला आपण फारसे जात नाही. कटाक्षाने आपल्या वाचनाच्या सवयीत या प्रकारचं वाचन सामील करायला हवं. ‘द अफगाण’ हे फ्रेडरिक फॉर्सिथ यांचे मूळ लिखाण. बाळ भागवत यांनी त्याचा अनुवाद केलाय. ही कादंबरी तुम्हाला खिळवून ठेवते.
- वंदना चिकरूर