Pranav SurvaseNSA या संस्थेने महासंगणकाच्या सहाय्याने कोणत्याही गुप्त मजकूराचा भेद करून उलगडा करणारी यंत्रणा निर्माण केली. एका गूढ मजकूराचा भेद मात्र त्यांना करता येईना. पाच मिनिटांत संपणारे त्याचे काम दिवस उलटून गेला तरी संपेना. ह्या संस्थेत सुसान नावाची एक सुंदर गणिततज्ञ स्त्री होती. तिला त्यावेळी जे सत्य सापडले ते हादरवणारे होते; सत्तेच्या महामार्गावर भूकंप घडवणारे होते. NSA संस्थेला ओलीस धरले होते. बॉम्बने नव्हे, शस्त्रांनी नव्हे तर एका अगम्य अशा सॉफ्टवेअरच्या कार्यक्रमाने ओलीस धरलेले होते.
सुसान संस्था वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होती. सारे अमेरिका जवळजवळ पांगळे होण्याची वेळ आली होती. शेवटी तिलाच आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ करावी लागली, तिची सर्व बाजूंनी फसवणूक झाली होती. तिला आपल्या प्रियकराची काळजी वाटू लागल्याने ती बेभान झाली होती. शेवटची लढाई कमालीची रोमहर्षक ठरली.
डॅन ब्राऊन यांची ही पहिली निर्मिती नक्की वाचा 👍👍
SURESH PHADNISDan brown यांची अशोक पाध्ये यांनी अनुवादित केलेली आणि मेहता प्रकाशन यांनी २०११ मध्ये प्रकाशित केलेली ही कादंबरी नुकतीच वाचली .छान आहे . कॉम्प्युटर मध्ये व्हायरस घुसवला तर काय अनर्थ होईल आणि सगळी गुपित कशी बाहेर पडतील या भीतीने केलेली धावपळ खूपच छान रंगवली आहे.९ भाषेत ही कादंबरी अनुवादित केली आहे.वाचताना मजा येते.जीव धडधडते.पाठलाग ,यंत्रणेचे वर्णन सुरेख आहे .शेवटही छान आहे नक्की वाचा .
Prasad Shelakeशेवटचं पासवर्ड प्रकरण मला बिलकुल पटलेलं नाही....
Bhagyashree Chalke Very good book. All Dan Brown books are good....
Rohan Dudhale खूप सुंदर आहे कथा
Sangeeta Deshmukh-Deshpandeअमेरिकेच्या एन.एस.ए.या संस्थेने एका महासंगणकाच्या साहाय्याने कोणत्याही गुप्त मजकुराचा भेद करून उलगडा करणारी यंत्रणा तयार केली.एका गुढ मजकुराचा भेद मात्र त्यांच्या महासंगणकाला करता येईना .पाच मिनीटात होणारे काम,२४तास उलटले तरी पूर्णत्वास जात नव्हते.या संस्थेत सुसान नावाची सुंदर व हुशार गणितज्ञ होती.तिने याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला व त्यात तिला जे सत्य सापडले ते हादरवून टाकणारे होते.एन.एस.ए.संस्थेला बॉम्बने, शस्त्राने नव्हे ,तर एका अगम्य अशा सॉफ्टवेअरच्या कार्यक्रमाने ओलीस धरले होते.सुसान संस्था वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होती.संपूर्ण अमेरिका राष्ट्र पांगळे होण्याची वेळ आली होती.सुसानचा प्रियकरही यात ओढला गेला होता.तिला त्याची काळजी वाटत होती.तिची सर्व बाजूंनी फसवणूक झाली होती.हे सगळ सोडवण्यासाठी ती बेभान झाली, आणि शेवटची तिची लढाई कमालीची रोमहर्षक ठरली.
Kiran Borkarएन. एस. ए. या अमेरिकेच्या सरकारी संस्थेने महासंगणक बनविला आहे जो जगातील कोणत्याही स्वरूपाच्या सांकेतिक मजकुराचा भेद करू शकतो कोणत्याही कॉम्पुटरमध्ये घुसून त्यातील माहिती चोरू शकतो .त्या संस्थेत काम करणारा जपानी प्रोग्रॅमर टंकाडो याचा ह्या गोष्टीला विरोध आहे . मानवाच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारी ही गोष्ट आहे असे त्याचे म्हणणे आहे . म्हणून त्याला काढून टाकण्यात येते . बाहेर जाऊन तो असा प्रोग्रॅम बनवितो ज्यामुळे हा महासंगणक काम करू शकणार नाही . सुसान ही त्या संस्थेत काम करणारी प्रमुख अधिकारी आणि भाषातज्ञ . तिच्यावर ह्या संकटातून बाहेर काढण्याची कामगिरी सोपवली जाते . पण स्पेनमध्ये टंकाडो मारला जातो . त्या प्रोग्रॅमची की पासवर्ड त्याच्याजवळ असतो आणि ते आणण्यासाठी सुसानच्या प्रियकराला डेव्हिडला स्पेनमध्ये पाठविले जाते . टंकाडोच्या हातातील सोन्याच्या अंगठीत त्या कीची अक्षरे आहेत हे त्याला कळते पण उशीर झालेला असतो . ती अंगठी त्याच्या बोटातून नाहीशी झालेली असते . आता डेव्हिडला लवकरात लवकर ती अंगठी शोधायची आहे .त्या एका सॉफ्टवेअरने महासंगणकाला ओलीस धरले आहे . आता सुसानचा जीव ही धोक्यात आहे . .
डॅन ब्राऊनची ही पहिली कादंबरी . त्याच्या नेहमीच्या वैशिष्ट्यांप्रमाणे चोवीस तासात घडते . या चोवीस तासात अनेक घटना ,खून, पाठलाग , थरार घडून जातात .
Aniruddha R. Kulkarniनुकतेच वाचून झाले .
रोमांचक कथानकाचे जर तुम्ही चहाते असाल तर डॕन ब्राऊन तुम्हाला टाळता येणे केवळ अशक्य . अमेरिकेच्या अत्यंत गुप्त मोहिमेअंतर्गत संपूर्ण विश्वातील गुप्त माहिती एका महाकाय संगणकात साठवलेली व त्या संगणकाच्या उभारणीत हातभार लावलेल्याच एका व्यक्ती द्वारे त्याच्या विनाशाचा प्रयत्न व संपूर्ण गोपनीय माहिती सर्व जगासमोर येण्याची भिती . डॕन ब्राऊनची नेहमीप्रमाणे लेखन शैली व अत्यंत वेगवान कथानक .
निव्वळ अप्रतिम !!