- Sumitabh SP
केजीबी ही रशियन गुप्तचर संघटना अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला एका तोतया व्होरा नामक नटीबरोबर replace करतात. ती तोतया स्त्री देखील ही भूमिका न चुकता पार पाडते. प्रत्येक मिनिटाला उत्कंठा आणि थरार वाढवणारी ही एक जबरदस्त कादंबरी आहे. ह्या कादंबरी मधील एक-एक कथानकावर लेखकाने केलेले वर्णन वाचकाला खिळवून ठेवते.
आपण जीच्याबरोबर संसार करतो , ती आपली पत्नी प्रत्यक्षात कुणी दुसरीच आहे असं समजलं तर आपणांस केवढा जबर धक्का बसेल? पण इथं खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा त्या वस्तुस्थितीवर विश्वास बसत नाही,त्यांचं कामजीवनही नेहमीच्याच परिचित क्रीडाप्रमाणे यत्किंचितही संशय न घेता सुरळीतपणे चालू राहतं, अशी ही नाजूक,पण मनाची गुंतागुंत व मती गुंग करणारी कादंबरी.
बर्याच दिवसांनी चांगली रहस्यमय कथा वाचायला मिळाली. शेवट विचार करायला लावणारा आहे .
- Komal Jadhav
बर्याच दिवसांनी चांगली रहस्यमय कथा वाचायला मिळाली.
शेवट विचार करायला लावणारा आहे .
- Amit Sutar
सगला क्षीण नाहीसा झाला.
- Santosh Saknur
सेकंड लेडी,,एक उत्कंठावर्धक कादंबरी
केजीबी ही रशियन गुप्तहेर संघटना चक्क अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या पत्नीची हुबेहूब दुसरी तोतया पत्नी म्हणून व्होरा नावाच्या नटीला जबाबदारी देतात,,आणि ती ही बिली या फस्ट लेडीची भूमिका बिनचूकपणे निभावते,, क्षणाक्षणाला उत्कंठा व थरार वाढवणारी खूप विलक्षण कादंबरी आहे,,,अमेरिकन डावपेच, रशियन राजकीय खेळी,,,,,राझिन, बिली व व्होरा यांचा प्रेमाचा त्रिकोण,,,तसेच कथानकातील बारीकसारीक गोष्टींचे लेखकाने केलेलं वर्णन(अगदी राष्ट्राध्यक्ष आणि व्होराचा व राझिन आणि बिलीचा प्रणय सुद्धा) वाचकाला मंत्रमुग्ध करून सोडतं,,, पुढे काय घडेल याचा जराही थांगपत्ता लेखक वाचकाला लागू देत तर नाहीच पण कथानक जसजसे पुढे सरकते तसतशी उत्कंठाही वाढतंच जाते,,अमेरिकेत घडलेल्या सत्यघटनेवर आधारित अशी कादंबरी आहे व या कादंबरीवर आधारित एक चित्रपटही प्रकाशित झालेला आहे,,
प्रत्येक वाचकाने वाचावीच अशी ही कादंबरी आहे,,लेखक आयरविंग वलेस असून त्याचा मराठी अनुवाद रविंद्र गुर्जर यांनी केला आहे
आपण जीच्याबरोबर संसार करतो , ती आपली पत्नी प्रत्यक्षात कुणी दुसरीच आहे असं समजलं तर आपणांस केवढा जबर धक्का बसेल? पण इथं खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा त्या वस्तुस्थितीवर विश्वास बसत नाही,त्यांचं कामजीवनही नेहमीच्याच परिचित क्रीडाप्रमाणे यत्किंचितही संशय न घेता सुरळीतपणे चालू राहतं,,,,,
अशी ही नाजूक,पण मनाची गुंतागुंत व मती गुंग करणारी कादंबरी,,,,,,,,,
- SANDIP CHAVAN
सेकंड लेडी ही आयर्विंग वॅलेस या अमेरिकन लेखकाची गाजलेली रहस्यकथा (कादंबरी) आहे. याचा मराठी अनुवाद रवींद्र गुर्जर यांनी केलेला आहे.
रशियाची गुप्तचर संस्था केबिजी, अमेरिकेच्या अध्यक्षांच्या पत्नीची हुबेहूब नक्कल (डमी) तयार करते. अमेरिका अध्यक्षांची खरी पत्नी जेव्हा एका ठरलेल्या कार्यक्रमासाठी मॉस्को मध्ये येते तेव्हा तिच्या जाग्यावर नकली व्यक्ती अतिशय योजनाबद्ध रीतीने बदलवली जाते. या कामासाठी केबिजीने तीन वर्षे मेहनत घेतलेली असते. या योजनेचा हेतू काय असतो? ही गोष्ट अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला समजते का? अमेरिकी अध्यक्षांना या गोष्टीचा सुगावा लागतो की नाही? केबीसीला हवी असणारी माहिती मिळते की नाही? आणि शेवटी व्हाईट हाऊसमध्ये राहते ती अध्यक्ष्यांची खरी पत्नी असते की खोटी? हे जाणून घ्यायला ही कादंबरी वाचायला हवी.
ही कादंबरी वाचताना क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या रहस्यकथेत आपण इतके हरवून जातो की काळ- वेळेचे भानही आपल्याला राहत नाही. समोर एखादा हॉलिवूड चित्रपट पाहतोय अशी रंगत ही कादंबरी वाचताना येते. पुढे काय होणार याची उत्कंठा शेवटापर्यंत राहते हे या कथेचे यश आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची पत्नी बदलणे आणि तिच्या जागी खोटी व्यक्ती पत्नी म्हणून पाठवणे हे काम म्हणजे थोडी अतिशयोक्ती वाटते. परंतु पूर्वग्रह न ठेवता पुस्तक वाचल्यास वाचक त्यामध्ये हरवून जातो हे निश्चित!
ही काल्पनिक कथा वाचत असताना पाश्चात्य लेखकांच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावीशी वाटते. अनुवादकाने घेतलेली मेहनतही कौतुकास्पद आहे.
- Dhanashree Kulkarni
खूप छान आहे, मी 2007 साली वाचलं होतं, आता पुन्हा एकदा वाचायची इच्छा झाली!
- Vyankatesh Krambelkar
जबरदस्त पुस्तक आहे, मूळ इंग्रजी वाचायला जास्त मजा येते.
- Eknath Marathe
सेकंड लेडी हा आयर्विन वॅलेस यांच्या गाजलेल्या रहस्यकथेचा , रवींद्र गुर्जर यांनी केलेला ओघवता अनुवाद नुकताच वाचून पूर्ण गेला.
रशियाची केजीबी ही गुप्तहेर संघटना अमेरिकेच्या अध्यक्षांच्या पत्नीची हुबेहूब नक्कल तयार करते व तिला व्हाईट हाऊस मध्ये स्थापित सुद्धा करते फर्स्ट लेडी म्हणून ! 3 वर्षे हे काम निष्णात हेर करीत असतात व अध्यक्षांची खरी पत्नी जेव्हा मॉस्को मध्ये येते तेव्हा ही अदलाबदल बेमालूम पार पाडली जाते ! हा सर्व भाग अतिशय रोमांचक उतरला आहे पण खरी मती गुंग होते पुढचे कथानक वाचून ! अमेरिकेत कोणाला तरी या योजनेची शंका येते का ? केजीबी आपल्या योजनेप्रमाणे गुप्त माहिती काढण्यात यशस्वी होते का ? पहिल्या पत्नीचे काय होते ? व शेवटी जी व्हाईट हाऊस मध्ये राहते ती खरी असते की तोतया ? या प्रश्नांची उत्तरे कादंबरी वाचूनच मिळवायला हवीत !
रहस्य कथा या प्रातांत पाश्चात्य लेखकांनी जी झेप घेतली आहे तिची आपण बरोबरी करूच शकत नाही. आपण अनुवाद वाचूनच आपली तहान भागवायला हवी ! जे मराठी रहस्यकथा लिहिणारे आहेत त्यांची चोरी व प्रेरणा काय होती ते इंग्रजी कथा वाचल्या की उघडी पडते ! असो !
- Pooja p
उत्कंठावर्धक!! खूपच छान आहे!!
- Vaibhav Mahajan
वास्तव हे कल्पिताहून अद्भूत असू शकतं, याचे दाखले जगात नेहमीच मिळत असतात. एकासारखी एक दिसणारी माणसं दुर्मीळ असतात, परंतु तशी असू शकतात. `क्लोनिंग`च्या आजच्या जमान्यात तर अशा शेकडो व्यक्ती निर्माण करता येती, इतकी मजल विज्ञानानं गाठलेली आहे.
भोवाल संन्याशाचा या शतकातील गाजलेला खटला आपल्याला आठवत असेल. तर एका फार मोठ्या संस्थानातील गायब झालेला गृहस्थ काही वर्षांनी अचानक घरी दाखल होतो. नातलगांना तो संपत्ती लाटण्यासाठी आलेला भोंदू वाटतो. पुढं कित्येक वर्षं त्याच्यावर खटला चालू राहतो...वगैरे.
पेशवाईच्या काळात पानिपतच्या युद्धानंतर असाच एक तोतया सदाशिवराव भाऊ म्हणून पुण्यात हजर होतो. नाना फडणीसांच्या अक्कलहुशारीनं त्याची लबाडी उघडकीस येते.
सेकंड लेडी ही तशीच एक विलक्षण कथा आहे.
आपण जिच्याबरोबर संसार करतो, ती आपली पत्नी प्रत्यक्षात दुसरीच स्त्री आहे, असं समजलं, तर आपल्याला केवढा जबर धक्का बसेल? पण इथं तर खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा त्या वस्तुस्थितीवर विश्वास बसत नाही. त्यांचं सर्व यत्किंचितही संशय न येता सुरळीतपणे चालू राहतं...
अशी ही नाजूक; पण गुंतागुंतीची, मती गुंग करणारी कादंबरी...
सेकंड लेडी !
- Pramod Dhamangaonkar
फार मस्त आहे
- Kanchan Potdar
वाचली आहे मी, खूप छान, गुंतत जातो आपण वाचताना.
- Sanjay Joshi
नक्की वाचा !! छान आहे !! उत्कंठावर्धक !!!
- Madhavi Deshpande
मस्तच आहे. वाचलंय मी. संग्रही आहे
- Sunita Keskar Pathade
Mast ahe he pustak
- Meena Kharolkar Munde
Kup chan ahe pustak me read kel
- Yogesh Nagine
खूप मस्त भाषा आहे या पुस्तकाची
- Kiran Borkar
एक थरारक कथा
- Sanjay Joshi
मस्त आहे !!!
- Manjiri Karambelkar
अप्रतिम पुस्तक
- Swati Kulkarni Bapat
खूपच सुंदर पुस्तक
- कांचन पोतदार
खूप छान, गुंतत जातो आपण वाचताना
- वैभव महाजन
वास्तव हे कल्पिताहून अद्भूत असू शकतं, याचे दाखले जगात नेहमीच मिळत असतात. एकासारखी एक दिसणारी माणसं दुर्मीळ असतात, परंतु तशी असू शकतात. `क्लोनिंग`च्या आजच्या जमान्यात तर अशा शेकडो व्यक्ती निर्माण करता येती, इतकी मजल विज्ञानानं गाठलेली आहे.
भोवाल संन्याशाचा या शतकातील गाजलेला खटला आपल्याला आठवत असेल. तर एका फार मोठ्या संस्थानातील गायब झालेला गृहस्थ काही वर्षांनी अचानक घरी दाखल होतो. नातलगांना तो संपत्ती लाटण्यासाठी आलेला भोंदू वाटतो. पुढं कित्येक वर्षं त्याच्यावर खटला चालू राहतो...वगैरे.
पेशवाईच्या काळात पानिपतच्या युद्धानंतर असाच एक तोतया सदाशिवराव भाऊ म्हणून पुण्यात हजर होतो. नाना फडणीसांच्या अक्कलहुशारीनं त्याची लबाडी उघडकीस येते.
सेकंड लेडी ही तशीच एक विलक्षण कथा आहे.
आपण जिच्याबरोबर संसार करतो, ती आपली पत्नी प्रत्यक्षात दुसरीच स्त्री आहे, असं समजलं, तर आपल्याला केवढा जबर धक्का बसेल? पण इथं तर खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा त्या वस्तुस्थितीवर विश्वास बसत नाही. त्यांचं सर्व यत्किंचितही संशय न येता सुरळीतपणे चालू राहतं...
अशी ही नाजूक; पण गुंतागुंतीची, मती गुंग करणारी कादंबरी...
सेकंड लेडी !