- DAINIK SAMACHAR 06-09-2009
मनाला सावरणाऱ्या गोष्टी…
गेल्या काही वर्षांमध्ये अनुवादीत साहित्याला मराठी रसिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. विविध विषयांवरील अन्य भाषातील पुस्तके मराठी अनुवादित झाली आणि त्याला वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभला, विशेषत: इंग्रजी भाषेतील अनुवादित पुस्तकांनी मराठीत मोठी बाजारपेठ काबीज केली. अशाच तीन अनुवादित पुस्तकांचे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊनसने नुकतेच केले आहे. ‘चिकन सूप फॉर द सोल’ ही मालिका इंग्रंजी साहित्यविश्वात खूप लोकप्रिय आहे. याच मालिकेतील ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल.’ ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ आणि ‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ ही तीन पुस्तकं मराठीत अनुवादित झाली आहेत.
‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ या पुस्तकाचा अनुवाद श्यामला घारपुरे यांनी केला असून अन्य दोन पुस्तकं सुप्रिया वकील यांनी अनुवादित केली आहेत. ‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ या पुस्तकात कामाच्या ठिकाणचं धैर्य, अनुकंपा आणि सर्जनशीलता यांच्या कथा आहेत. ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’ या पुस्तकात वयात येणाऱ्या मुलांना जीवनमूल्य कळावीत या दृष्टीने जीवन, प्रेम आणि शिकणं या विषयीच्या कथा आहेत तर ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ या पुस्तकात ‘आईपण जागवणाऱ्या कथा आहेत. वेगवेगळ्या घटकांचा विचार करून पुस्तकं लिहिण्यात आल्यामुळे त्या त्या घटकांना प्रेरणा देणाऱ्या अशा या कथा आहेत. मनाला सावरणाऱ्या, धीर देणाऱ्या आधाराचा खंबीर हात देणाऱ्या कथा ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’ या पुस्तकातून भेटीस येतात. ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ या पुस्तकातील कथा ‘आई’पणा भोवती गुंफलेल्या आहेत. ‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ या पुस्तकातून आदर्श जात, सुप्रिया वकील आणि श्यामला घारपुरे यांनी ओघवत्या भाषेत या मूळ इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद केला आहे.
‘चिकन सूप’ मालिका…
जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन हे ‘चिकन सूप’ या पुस्तकमालेचे संस्थापक सदस्य आणि निर्माते. या दोघांनी ‘चिकन सूप’ या मालिकेंतर्गत जवळजवळ २०० शीर्षकांची पुस्तके लिहिली.
किम्बर्ली किर्बर्जर यांनीही त्यांना सहकार्य केले. तसेच जेनिफर हॉथॉर्न, मॅसी शिमॉथ या दोघींनीदेखील या पुस्तकमालेच्या लेखनात सहभाग घेतला आहे. छोट्या छोट्या कथांचे संकलन असलेली ही मालिका जगभर लोकप्रिय ठरली. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येदेखील या पुस्तकाची नोंद झालेली आहे.
मेहता पब्लिशिंग हाऊसने ही पुस्तके मराठीत आणली आहेत. ही पुस्तके म्हणजे निराश मनाला प्रेरणा देणारी आणि जीवनाकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला शिकवणारी अशी आहेत. चिकन सूप फॉर टीनएज सोल हे पुस्तक जीवन, प्रेम व शिकणे याविषयी मार्गदर्शन करतील, तर चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क हे कामाच्या ठिकाणी घडणाऱ्या अनुभवांचे संकलन आहे. चिकन सूप ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली असून, या मालिकेत आतापर्यंत ६८ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. दरवर्षीयामध्ये आणखी पुस्तकांची भर पडतच आहे.
चिकन सूप या मालिकेतील पुस्तकांमध्ये आईविषयीचेही पुस्तक आहे. या तिन्ही पुस्तकांमधील छोट्या छोट्या कथा या अनुभवांवर आधारलेल्या असून, त्या प्रत्येक कथेतून एक वेगळा संदेश निश्चितच मिळतो. ‘वपुर्झा’ हे व. पु. काळे यांचे पुस्तक जसे कधीही, कुठूनही, कुठल्याही पानापासून वाचण्याचा आनंद घेता येईल, अशा धर्तीचे आहे, तसेच या तीन पुस्तकांचे आहे. अनेक लोकांनी आपल्याला आयुष्यात आलेले अनुभव या लेखकांकडे पाठविले, त्याचे उत्कृष्ट संकलन व संपादन करून ही पुस्तके आकारास आली आहेत. मराठीमध्ये आपल्याकडे पंचतंत्र किंवा हितोपदेश यामध्ये जो संदेश छोट्या छोट्या गोष्टींतून मिळतो, त्याची आठवण ही पुस्तके वाचताना आवर्जून होते. या पुस्तकांमधील सर्व कथा या आजच्या काळातील असून, अत्यंत व्यक्तिगत अशा असल्याने प्रत्येक वाचक त्याच्याशी आपले नाते जोडू शकतो.
‘चिकन सूप’च्या ‘लज्जत’दार कथा…
इंग्रजी साहित्यविश्वात ‘चिकन सूप फॉर द सोल’ ही पुस्तकांची मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकांना छोट्या छोट्या कथांमधून मार्गदर्शन करणारी ही पुस्तकं जगभर प्रसिद्ध आहेत. या मालिकेतील ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’, ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ आणि ‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ ही पुस्तकं मराठीत अनुवादित झाली असून मेहता पब्लिशिंग हाऊसने ती प्रकाशित केली आहेत.
धकाधकीच्या आयुष्याचा प्रवास करताना प्रत्येकालाच स्वत:ची अशी एक ‘स्पेस’ हवी असते. ती मिळाली नाही तर मानसिक आणि शारीरिक पातळीवर अनेक समस्या उभ्या राहू शकतात. संवाद, शेअरींग ही प्रत्येक जीवमात्राची नैसर्गिक गरज आज बदलत्या जीवनशैलीत पूर्णत्वास जातेच असं नाही. वेगवेगळ्या विषयांवर, स्वत:च्या समस्यांबद्दल कोणाशी तरी बोलावं, असं वाटत असलं तरी प्रत्येकवेळी ते शक्य होतंच असं नाही. किंबहुंना एखाद्याचे प्रश्न ऐकण्यामध्ये दुसऱ्या व्यक्तिला क्वचितच रस असतो. त्यामुळे बहुतेकवेळा मनातले प्रश्न मनातच राहतात. दबून ठेवलेले हे प्रश्न मग कधी अन्य मार्गाने डोकं वर काढतात. मनातल्या या विचारांना मोकळी वाट मिळावी, यासाठी आवश्यक असणारं ‘आउटलेट’ मिळण्यासाठी पुस्तकांसारखा दुसरा पर्याय नाही. आपल्याकडे ग्रंथांना गुरू मानलं जातं. ते खरंही आहे. वेगवेगळ्या विषयांवरही पुस्तकं आपली संवादाची, ज्ञानवृद्धीची भूक भागवत असतात. यातून आपल्या मनातील भावनांना वाटही मिळत असते आणि माहिती-ज्ञानाच्या कक्षाही रुंदावत असतात. एका नव्या जगाची ओळख यातून आपल्याला होते आणि आपण स्वत:कडे तटस्थ वृत्तीने पाहू शकतो. यातून स्वत:मधील गुण, अवगुण, व्यक्तिमत्त्वातील दोष यांचीही जाणीव होते. ते दूर करण्यासाठी काय करता येईल, याचं मार्गदर्शन पुस्तकातून होतं. त्यामुळेच ग्रंथ हे गुरु असतात तसेच ते मागर्दशक मित्रही असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या वेगवेगळ्या समस्या असतात, वेगवेगळ्या नात्यांची जबाबदारी पार पाडताना, वेगवेगळ्या भूमिका निभावताना तारेवरची कसरत करावी लागते. या प्रत्येक घटकाला मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरलेली ‘चिकन सूप फॉर द सोल’ ही मालिका इंग्रजी साहित्यविश्वात खूप लोकप्रिय आहे. जॅन कॅनफिल्ड आणि मार्क व्हिक्टर हॅन्सन यांनी ही मालिका लिहिली असून त्यामध्ये प्रेरणा देणाऱ्या, वेगवेगळ्या प्रसंगातून यशाचा मंत्र सांगणाऱ्या छोट्या छोट्या कथा आहेत. या मालिकेअंतर्गत वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. ‘चिकन सूप फॉर द प्रिझनर्स सोल’, ‘चिकन सूप फॉर द व्हॉलेंटिअर्स सोल’, ‘चिकन सूप फॉर द ओशन लव्हर्स सोल’, ‘चिकन सूप फॉर द हॉर्स लव्हर्स सोल’ अशी वेगवेगळी पुस्तकं याआधीच बरीच लोकप्रिय झाली आहेत. जगभरातील विविध भाषांमध्ये या पुस्तकांचे अनुवाद करण्यात आले असून त्यांनाही ही चांगली लोकप्रियता लाभली आहे. याच मालिकेतील ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’, ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ आणि ‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ ही तीन पुस्तकं मराठीत अनुवादित झाली असून मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे ती प्रकाशित करण्यात आली आहेत.
‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ या पुस्तकाचा अनुवाद श्यामला घारपुरे यांनी केला असून अन्य दोन पुस्तकं सुप्रिया वकील यांनी अनुवादित केली आहेत. ‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ या पुस्तकात कामाच्या ठिकाणचं धैर्य, अनुकंपा आणि सर्जनशीलता यांच्या कथा आहेत. ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’ या पुस्तकात वयात येणाऱ्या मुलांना जीवनमूल्य कळावीत या दृष्टीने जीवन, प्रेम आणि शिकणं याविषयीच्या कथा आहेत तर ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ या पुस्तकात ‘आई’पण जागवणाऱ्या कथा आहेत.
जॉन कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन हे चिकन सूप मालिकेचे निर्माते आणि संस्थापक आहेत. या दोघांनी लेखन आणि संकलन केलेल्या ‘चिकन सूप’ मालिकेची सध्या दोनशे शीर्षकं आहेत आणि जगभरातील चाळीस भाषांमधील वाचकांपर्यंत ती पोहोचली आहेत. आता मराठीतही ही पुस्तकं आल्याने मराठी वाचकांना त्याचा आनंद घेता येईल. छोट्या छोट्या गोष्टींतून जीवनाची मूल्य सांगणं हे मालिकेचं वैशिष्ट्य. समाजातील वेगवेगळ्या घटकांचा विचार करून पुस्तकं लिहिण्यात आल्यामुळे त्या त्या घटकांना प्रेरणा देणाऱ्या अशा या कथा आहेत.
आयुष्याच्या प्रवासात किशोरवय हा नाजूक टप्पा असतो. एकीकडे जाणिवा उमलत असतात, डोळ्यात नवी स्वप्नं हसत असतात. त्याच वेळी व्यवहारी जगाचं करकरीत वास्तवही समोर येतं. अशा वेळी मनाला सावरणाऱ्या, धीर देणाऱ्या आधाराचा खंबीर हात देणाऱ्या कथा ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’ या पुस्तकातून भेटीस येतात. ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ या पुस्तकातील कथा ‘आई’ पणाभोवती गुंफलेल्या आहेत. जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी ‘आईपण’ सारखंच असतं. या कथांमधून स्थळ, काळ या साऱ्या भेदाच्या पलीकडे जाऊन आईच्या वात्सल्याचा स्पर्श घडतो.
‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’या पुस्तकातून आदर्श कार्यपद्धती उलगडत जाते. माणसं काम करताना पाट्या टाकतात, असं म्हटलं जात असलं तर सर्वसामान्य माणूस प्रसंगी प्राणही पणाला लावून अंत:करणापूर्वक सेवावृत्तीने काम करतो. त्या कामाचं कार्यात रुपांतर होतं. त्याचा आदर, गौरव अभिनव पद्धतीने करणं ही उदात्त कार्यसंस्कृती आहे. या पुस्तकातून याच संस्कृतीची ओळख होते. या तिनही पुस्तकातून जीवनविषयक आगळी मूल्यं प्रत्ययास येतात. सुप्रिया वकील आणि श्यामला घारपुरे यांनी ओघवत्या भाषेत या मूळ इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद केला आहे.
समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांचे अनुभव वेगवेगळे असतात, त्याचबरोबर त्यांच्या समस्याही वेगवेगळ्या असतात. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधण्याचं काम या मालिकेतील पुस्तकांनी केलं आहे. शाळकरी मुलं, नुकताच कॉलेजच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलेले विद्यार्थी, वयात येणाऱ्या मुली, कॉलेज शिक्षण संपवून बाहेर पडणारे विद्यार्थी अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर ही पुस्तकं मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना होणारी तारांबळ, आई, वडील, पती, भाऊ, बहीण अशा भूमिका पार पाडताना होणारी कसरत, कामावरचे ताण-तणाव, सहकाऱ्यांशी असणारं वर्तन, वेगवेगळ्या कारणाने सतावणारी असुरक्षितता अशा वळणांवर ‘चिकन सूप’ मालिकेतील पुस्तकं प्रेरणादायी ठरतात. छोट्या छोट्या कथांमधून मिळणारी उर्जा वाचकाला एक नवी दृष्टी देते. या पुस्तकांचे अनुवाद आता प्रसिद्ध झाल्याने मराठी वाचकांना त्याची खुमारी अनुभवता येणार आहे.
- LOKSATTA 13-10-2009
जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन हे `चिकन सूप` या पुस्तकमालेचे संस्थापक सदस्य आणि निर्माते. या दोघांनी `चिकन सूप` या मालिकेअंतर्गत जवळजवळ २०० शीर्षकांची पुस्तके लिहिली.
किम्बर्ली किर्बर्जर यांनीही त्यांना सहकार्य केले. तसेच जेनिफर हॉथॉर्न, मॅसी शिमॉथ या दोघींनीदेखील या पुस्तकमालेच्या लेखनात सहभाग घेतला आहे. छोट्या छोट्या कथांचे संकलन असलेली ही मालिका जगभर लोकप्रिय ठरली. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येदेखील या पुस्तकांची नोंद झालेली आहे.
मेहता पब्लिशिंग हाऊसने ही पुस्तके मराठीत आणली आहेत. ही पुस्तके म्हणजे निराश मनाला प्रेरणा देणारी आणि जीवनाकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला शिकवणारी अशी आहेत. चिकन सूप फॉर टीनएज सोल हे पुस्तक जीवन, प्रेम व शिकणे याविषयी मार्गदर्शन करतील, तर चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क हे कामाच्या ठिकाणी घडणाऱ्या अनुभवांचे संकलन आहे. चिकन सूप ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली असून, या मालिकेत आत्तापर्यंत ६८ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. दरवर्षी यामध्ये आणखी पुस्तकांची भर पडतच आहे.
चिकन सूप या मालिकेतील पुस्तकांमध्ये आईविषयीचेही पुस्तक आहे. या तिन्ही पुस्तकांमधील छोट्या छोट्या कथा या अनुभवांवर आधारलेल्या असून, त्या प्रत्येक कथेतून एक वेगळा संदेश निश्चितच मिळतो. `वपुर्झा` हे व.पु. काळे यांचे पुस्तक जसे कधीही, कुठूनही, कुठल्याही पानापासून वाचण्याचा आनंद घेता येईल, अशा धर्तीचे आहे, तसेच या तीन पुस्तकांचे आहे. अनेक लोकांनी आपल्याला आयुष्यात आलेले अनुभव या लेखकांकडे पाठविले, त्याचे उत्कृष्ट संकलन व संपादन करून ही पुस्तके आकारास आलेली आहेत. मराठीमध्ये आपल्याकडे पंचतंत्र किंवा हितोपदेश यामध्ये जो संदेश छोट्या छोट्या गोष्टींतून मिळतो, त्याची आठवण ही पुस्तके वाचताना आवर्जून होतो. या पुस्तकांमधील सर्व कथा या आजच्या काळातील असून, अत्यंत व्यक्तिगत अशा असल्याने प्रत्येक वाचक त्याच्याशी आपले नाते जोडू शकतो.
- DAINIK DESHDOOT NASIK 28-3-2010
चिकन सूपच्या मालिकेतले आणखी एक पुस्तक मध्यंतरी वाचले. याचं शीर्षक होतं ‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ काम करणं काही जणांसाठी कंटाळवाणं, पाट्या टाकण्याचं काम असतं, तर काही जणांसाठी जास्तीत जास्त स्वत्त्व ओतून उत्तम परिणाम साधणे हे असतं. काही सामान्य लोक सामान्य आणि रोजच्या कामकाजातून अलौकिक अशी कामगिरी पार पाडतात की ज्यामुळे कंपनीचं, संस्थेचं हित जपलं तर जातंच पण त्याबरोबर तो माणूस सगळ्यांच्या माणूसपणाच्या जाणिवा समृध्द करून जातो. चिकन सूप मालिकेच्या लेखक मंडळाने सतत कार्यरत असणाऱ्या माणसांना, त्यांच्या मेहनतीला, सेवाभावी वृत्तीला, उच्च उद्दिष्टांना सलाम किंवा मानाचा मुजरा म्हणूनच या गोष्टी लिहिल्या. जगभरातल्या काम करणाऱ्या लोकांना हे पुस्तक अर्पण केलंय गोष्टी वाचताना पुन्हा एकदा आपण भावनाविभोर होतो हे नक्की. त्यांच्या पध्दतीप्रमाणे त्यांनी महत्त्वाचे विचार मांडून त्यावर स्पष्टीकरणाची उदाहरणे दिली आहेत; उदा. खऱ्याखुऱ्या सेवाभावनेने केलेले कोणतेही काम म्हणजेच खरी ईश्वरभक्ती किंवा विन्स्टन चर्चिल यांच्या मते, ‘तुम्हाला जे मिळतं त्यावर तुमचा उदरनिर्वाह होऊ शकतो; पण तुम्ही जे देता, त्यामुळे एकूण जीवन सफल होते.’
खलील जिब्रान म्हणतात की, ‘आपल्या कामातूनच आपण इतरांचे प्रेम (मन) जिंकू शकतो.’ या पुस्तकात नऊ विभागांतून लघुकथांची विभागणी केलेली आहे. काही कथा तर डोळ्यात पाणी आणि मनाला उभारी देणाऱ्या आहेत. दोन पिकलेली केळी, उंबरठ्यावरील देवदूत, हेटाळणीतून यशप्राप्ती, अपेक्षेच्या पलीकडे, गिऱ्हाईकांची भाषा या आणि अशाच प्रकारच्या दाखल्यातून लोकांच्या कामाप्रती असलेलय निष्ठेचा प्रत्यय येतो. ज्या क्षणी आपल्याला वाटतं सगळं संपलं त्या वेळेसही एखाद्या पानासारख्या क्षीण भासणाऱ्या गोष्टीमुळे पुनर्जन्म होऊ शकतो. इच्छाशक्ती पणाला लावली तर काहीही अशक्य नाही. वाचकांनी हे पुस्तक जरूर वाचावं. मनाला तरतरी येते. या पुस्तकात दिलेल्या घटना परकीय भाषेत किंवा जमिनीवर घडल्या असल्या तरीही मानवी हृदय सगळीकडे एक आहे, भावना एक आहेत. म्हणून चटकन हृदयाला भिडतात श्यामल घारपुरे यांनी भाषेच्या सोप्या, ओघवत्या शैलीत त्या आपल्यापुढे मांडल्या आहेत. चिकन सूप मालिकेची आजपर्यंत ६८ विषयांवरची पुस्तकं बाजारात उपलब्ध आहे. सगळीच वाचण्यासारखी आहेत.
- SAKAL TODAY PUNE 2-9-2009
‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ या पुस्तकात ‘कचरा व्यवस्थापन’ या विषयावर एक स्वतंत्र लेख आहे. कार्यसंस्कृतीची उदात्तता सर्वसामान्यांना शिकविण्यासाठी जगभर अनेक पुस्तके लिहिले गेली आहेत.
सध्या अशा पुस्तकांना वाढती मागणी आहे. व्यवस्थापनकौशल्य शिकविणाऱ्या संस्थाही सध्या दैनंदिन जीवनातील विविध पैलूंचा बारकाईने विचार करतात. अशा पुस्तकांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबतचे विवेचन समाविष्ट होणे हे आधुनिक माणूस सर्वांगीण व्यवस्थापनाकडे निघाल्याचे निदर्शक आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या या अनुवादित पुस्तकात कामाच्या ठिकाणाचे धैर्य, अनुकंपा आणि सर्जनशीलता यांच्या कथा आहेत. जॅक कॅनाफिल्ड, मार्क व्हिक्टर हॅन्सन, मार्टीन रूट, मायदा रॉजरसन व टीम क्लूस यांनी लिहिलेल्या व संकलित केलेल्या या कथांचा मराठी अनुवाद श्यामल घारपुरे यांनी केला आहे.
या पुस्तकातील ‘कचरा व्यवस्थापन’ या लेखात ब्राझीलमधली एक गोष्ट सांगितलेली आहे. वास्तुतज्ज्ञ जॅमी लेर्नर ब्राझिलच्या क्यूरीटोबाचा नगराध्यक्ष झाला. प्रथम छोटासा कसबा असलेले ते गाव हळूहळू पाच लाखांची वस्ती वाढलेल्या शहरात परिवर्तित झाले होते.
तेथे सुका कचरा शहरात आणण्यासाठी बसचा प्रवास फुकटात होता. त्यामुळे शहरात उद्योगधंद्यांसाठी येणे त्यांना सोपे झाले. उद्योग नसलेले शहरात येऊन रोजगार मिळवू शकत होते. ओल्या कचऱ्यापासून खत तयार होऊ लागले.’ हे वर्णन मुळातून वाचण्याजोगे आहे.
- SAKAL 27-3-2010
‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे, यातील कथा कामाच्या ठिकाणचं धैर्य, अनुकंपा आणि सर्जनशीलता या गुणांनी परिपूर्ण आहे. त्याचा अनुवाद श्यामला घारपुरे यांनी केला आहे. ‘चिकन सूप’ मालिकेची सध्या दोनशे शीर्षके आहेत आणि जगभरातील चाळीस भाषांमधील वाचकांपर्यंत ती पोचली आहेत. चिकन सूप मालिकेत दरवर्षी भर पडते आहे. या मालिकेतील कथांमध्ये जगभरातील कवी, विचारवंत, कलावंत, तसेच प्रसिद्ध व्यक्तींनी मांडलेले सुविचार, अवतरणे यांचा उपयोग केला आहे. माणसाचे यश म्हणजे त्याची आर्थिक बाजू नसून, त्याची सेवावृत्तीशी असलेली बांधिलकी हे विचार मार्टिन ल्यूथर किंग यांचे आहेत. मदर तेरेसा म्हणतात. ‘प्रेम हे सदाबहार ऋतूतील फळ आहे आणि ते प्रत्येकाच्या हाताच्या आवाक्यात आहे’. ‘प्रेमळपणे वागा, कारण तुम्हाला भेटणारा प्रत्येक जण अधिकाधिक अवघड लढ्यांना तोंड देत असतो’. हे प्लेटोचे विचार. जॉर्ज अॅडम्स यांच्या मते, ‘माणसाच्या जीवनात काही उत्तुंग बिंदू असतात आणि त्यापैकी बहुतेकसे कुणीतरी दिलेल्या प्रोत्साहनामुळे घडलेले असतात.’ असे या मालिकेतील सुविचार आणि त्यानंतर अनुभवकथन वाचल्यानंतर वाचक म्हणून आपल्या मनात काही प्रतिक्रिया उमटतात. थोरामोठ्यांच्या विचारांची अवतरणे, सुविचार आपल्याला काय देतात एक चांगला विचार एक आदर्श जग दाखवितो. बोध करून देतो. आदर्श जग/जगणे कसे असावे, असे मनोवांछित जग सुविचार निर्माण करतात. जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यापासून मिळतो. आवडलेले सुविचार आपण डायरीत लिहून ठेवतो किंवा हल्ली ‘एसएमएस’च्या रूपाने इतरांना पाठवतो. हळूहळू जगताना वेगवेगळे अनुभव येतात. मग कळतं, सुविचार वेगळंच सांगतात आणि अनुभव काही वेगळाच आहे. आपला भाबडेपणा संपतो आणि सुविचारांचा संगत सुटते. आपली दुनिया आणि सुविचारांचे जग वेगवेगळे आहे, हे पटते. ‘चिकन सूप’मधील अनुभवकथने, कविता, सुरुवातीचे सुविचार आपल्या जगण्याशी ताडून पाहता येत नाहीत. जगताना होणारे निरनिराळे व्यवहार, त्यातून दिसणारे माणूसपण ‘चिकन सूप’मधून व्यक्त होत नाही. ‘चिकन सूप’ वाचून आपण एका भाबड्या सुरक्षित कोशात जगत असल्याची सुखद गुंगी मात्र जरूर येते.
योग्य सादरीकरण, ग्राहकपसंत, मोकळ्या वेळाची पोकळी भरून काढण्यासाठी अशी पुस्तके उपयुक्त असतात.
- SAMNA 8-10-2009
आता माणसांचं जीवन आणखी यांत्रिक बनलं आहे. स्पर्धा जीवघेणी बनली आहे. त्यामुळे ‘डिप्रेशन’सारखे मनोविकार अतोनात वाढले आहेत. अशा काळात नव्या पिढीच्या वाचकांना नवा आत्मविश्वास, नवा उत्साह देण्यासाठी यशाची नवी गुरुकिल्ली घेऊन पुढे सरसावलेत जॅक कॅनफिल्ड व मार्क व्हिक्टर हॅन्सन, नोकरदार लोक, महिला, मुलं, तरुण, माता अशा वेगवेगळ्या गटांच्या समस्या ध्यानी घेऊन त्यांनी त्या समस्यांवर मात करण्याचे मार्ग सुचविलेत. या गुरुकिल्ली मालेला त्यांनी नाव दिलंय चिकन सूप माला. मग ‘चिकन सूप फॉर मदर्स’, ‘चिकन सूप फॉर द वुमन्स सोल’, ‘चिकन सूप फॉर द टीन्स’ अशा पुस्तकांमधून प्रत्यक्ष घटना, घडलेले प्रसंग यांच्या वर्णनाद्वारे त्यांनी वाचकांसमोर समस्यांची उत्तरं मांडली आहेत.
प्रस्तुत ‘चिकन सूप फॉर द सोल अॅट वर्क’ या पुस्तकात त्यांनी नोकरदार लोकांच्या समस्यांची गुरुकिल्ली दिलीय. नोकरीच्या ठिकाणी कसं तरी काम एकदाचं उरकून टाकणं, डोक्यावरचा भार खांद्यांवर करणे इत्यादी प्रकार कमी - अधिक प्रमाणात सर्वत्र आहेतच. लेखकांनी इथे अशा घटना सांगितल्यात की जिथे सामान्य माणसांनी प्राणपणाला लावून आपलं काम केलं. एकदाच नव्हे, तर सातत्यानं. मग त्याचं काम साधं न राहता त्याचं महान कार्यात रूपातंर झालं.
या पुस्तकातल्या घटना अर्थातच अमेरिकेतल्या आहेत. पण त्यातली प्रेरणा, उत्साह देण्याची शक्ती या नक्कीच सार्वदेशिक, जागतिक आहेत. चिकन सूप पुस्तकांची संपूर्ण मालाच अतिशय प्रेरक आहे, अशी पुस्तकं मराठीत यायलाच हवीत.
श्यामला घारपुरे यांचा मराठी अनुवाद व मेहता प्रकाशनाची निर्मिती, मांडणी, मुखपृष्ठ दर्जेदार.