- दिपक पांडे पुणे
भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले.
१९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलपटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो.
प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात.
आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे.
- प्रा. हर्षद देशमुख, अमरावती.
भीमराव खेळाडू म्हणून महान तर होतेच पण माणुसकी व दिलदार पणाचा महामेरू होते.. लेखकाने अत्यंत चिकाटी व जिद्दीने पुस्तकाचे लेखन पूर्णत्वास नेले.. त्यांच्या पितृप्रेमास सलाम...
- प्रवीण बर्दापूरकर ... ज्येष्ठ संपादक/लेखक/ब्लॉगर
`महारुद्र` हे पुस्तक कांही वर्षांपूर्वी अपघातानेच हाती आलं आणि अमरावतीच्या भीमराव देशमुख यांनी फुटबॉलच्या क्षेत्रात बजावलेली कामगिरी वाचून अचंबितच झालो . भीमराव देशमुख यांचं विस्मरणात गेलेलं कर्तृत्व `महारुद्र`मुळे पुन्हा एकदा लोकांसमोर आलं . पुस्तक वडिलांबद्दल लिहिलेलं असलं तरी त्यात केवळ भक्तीभाव नाही तर निमशहरी भागात राहून कांही तरी करण्याची उमेद बाळगणाऱ्यांसाठी ती एक प्रेरणा आहे . क्रीडाविषयक अभ्यासक्रमात शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावर `महारुद्र`चा समावेश आवर्जून व्हायला हवा , असं वाटतं .
`महारुद्र`ची तिसरी आवृत्ती आणि तिही मेहता पब्लिशिंग हाऊसच्यावतीने प्रकाशित झाली आहे हे वाचल्यावर आनंद झाला .
- दिलीप देशमुख, देऊळघाट
मी हे पुस्तक वाचलं आहे. मी माझ्या संग्रही ठेवलं आहे.अगदी प्रवाही शब्द रचना व त्यवेळच्या परिसथितीचं वर्णन खुपच सुंदर केलेलं आहे. आपल्या संग्रही असावं असं हे पुस्तक आहे.त्याच्या तिसर्या आवृत्ती प्रकाशनाला माझ्या लाख लाख शुभेच्छा. परिस्थिती वर मात करून आपले ध्येय साध्य करण्यासाठी काय व किती मेहनत घेतली पाहीजे ते, संदर्भित पुस्तक वाचून कळते. नवीन खेळाडू साठी प्रेरणादायी असे हे पुस्तक आहे.पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा.
- प्रा.डाॅ. किशोर देशमुख, अमरावती.
काही कलाकृतीच अशा असतात की ज्याने चेतन्य निर्माण होते...
जेंव्हा कधी `चक दे ईंडीया` सिनेमा लागतो तेंव्हा अनेकदा पाहीला असला तरी मी पाहतो.
तसेच महारुद्र हे पुस्तक...
पारायणं झालीत तरी आवर्जून वाचाव वाटतं..
स्व.भिमरावांना मी पाहीलं आहे.
तेंव्हा हा पराक्रम कळण्याचं वय नव्हतं माझं.
पण या पुस्तकाने मामांची एक नविन ओळख दिली मला व सर्वांना...
ईतकी ओघवती शैली, उत्कृष्ट मांडणी असलेलं साहित्य
व त्या निर्मीती बद्दल तुमचे खरंच कौतूक वाटते. अभिमान वाटतो.
तुमचं अभिनंदन .....
- सौ. प्रतिभा देशमुख, चांदूर बाजार.
जी.बीं.चे लिखाण वास्तवच असते.त्यांची सर्व पुस्तके मी कितीदा, पुन्हा पुन्हा वाचत असते.सर्व पुस्तके मी अशीच वाचते.वाचनातुन प्रेरणा,उर्जा मिळते. नॉट विदाउट माय डॉटर हे ही मी मनभरून वाचले.शोकांतिका आहे पण अनुभव म्हणून आवडली.अभिमान वाटावा असेच आंतरराष्ट्रीय फुटबॉल पटु श्री भिमराव देशमुख होते, तेवढेच ते समाजाभिमुख, समाजा सोबतच मानवावर प्रेम, परोपकार करणारे व्यक्तित्व होते. वडिलांवर पुत्राने लिहिलेले हे चरित्रात्मक पुस्तक वास्तव इतिहास आहे.अभिनंदन.
- डाॅ. पुष्पा हांडे, संगमनेर
. पितृप्रेमापोटी कुठेही झुकते माप न देता, वास्तवच वाचकांसमोर मांडताना पितृ प्रेमाच्या चाचणीत बुचकळून काढल्यासारखे वाटते हे पुस्तक.
हेवा वाटावा असंच हे व्यक्त होणं आहे !👍
- Abdul Gaffar Ansari
G.B. Deshmukh k zariye Kiya Gaya prayas sarahniye hai. Mein apni ore se aur kamptee k sabhi foot ball club visesh roop se Rabbani club kamptee ki ore se Shri Deshmukh ko Mubarakbad pesh karta hoon.
- Harshraj Deshmukh
One of the best books I have read so far.
- सुरेखा केवले, अमरावती.
अभिनंदन , पुस्तक खूपच छान लिहिले आहे , वडील म्हणून अवास्तव स्तुती नाही तर तेव्हाचे वातावरण व परिस्थिती याचा मागोसा घेतलेला आहे.असेच झाकलेले माणक प्रकाशात यायला पाहिजे 👍