PurvaThis book is written by Sudha Murthy, who is very famous for her simple writing but with the impact. There are 23 heartwarming short stories (mostly based in and around Karnataka). So like her other books, this book is also about the different good and bad situations in the person`s life, wherein it gives a lot of insights about life, experiences, expectations, and so on. It focuses on: to achieve something, be grounded, be patient be a good listener, be defensive or attack whenever needed. All these stories are full of emotions, interesting and inspiring. The author has described various: प्लेसिस, characters, places, situations. It`s an easy read for anyone and everyone.
Abhijit Jaysing AngneWith every story that I read from this book..I kept giving claps for your exemplary Marathi Translation.
Pawan Chandakआयुष्याचे धडे गिरवताना
हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले.
इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्ती यांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते.
मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी "`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले।
धन्यवाद सुधाताई🙏
Rajesh Javir
सुधामूर्तीं लिखीत पुस्तक आयुष्याचे धडे गिरवताना पुर्ण वाचुन झाली, कळलंच नाही केव्हा वाचून संपलं इतके अतिशय साधं,सोपं आणि छान लिखाण.
त्यांच्या जीवनात आलेल्या प्रत्येक लहान-मोठे अनुभव सुधामूर्तींनी सांगितले आहे.आपल्या आयुष्यात येणारा जवळपास प्रत्येक व्यक्ती काहीतरी आपल्या प्रत्येकाला काहीन काही शिकवून जातो हे मात्र अगदी खरं.
सूधा मूर्ती यांची पुस्तकं अतिशय छान. ती पुस्तके सोपी आणि लगेच समझणारी असतात. जीवनात आलेले अनुभव लहान मोठ्या प्रसंगातून ते उलगडवून दाखवतात. त्यांचे स्वत:चे अनुभव सांगताना त्यात कुठेही मोठेपणा नसतो.
इन्फोसिस फाउंडेशन च्या माध्यमातून सामजिक कार्य करतांना तसेच आयुष्याचे धडे गिरवितांंना त्यांच्या आयुष्यात आलेल्या व्यक्ति तसेच ऐतिहासिक वास्तू यांच्या कडे एका नैतिक स्टोरी च्या माध्यमातून मांडलेले विचार म्हणजे ही कादंबरी आहे.
ट्रेन मध्ये मिळालीली एक अनाथ गरीब मुलगी जिला दत्तक घेऊन उच्च शिक्षण देऊन त्या बळावर तिने अमेरिके पर्यंत घेतलेली झेप. अश्या 23 वेगवेगळ्या व्यक्ति रेखेला एका नैतिक निर्णायक प्रारूप मध्ये सुधा मुर्तींंनी मांडले आहे...
सुधा मूर्तींना आपल्या विविध टप्प्यांवर भेटललेली माणसं काहीतरी शिकवून जातात. हे पुस्तक मरगळ दूर करते आणि जीवनाचे पैलू उलगडवून दाखवते. ..
Vaibhav Todkar"Infosys Foundation" च्या अध्यक्षपदी असलेल्या सुविख्यात सामाजिक कार्यकर्त्या आणि कुशल लेखिका सुधा मूर्ती लिखित हे अप्रतिम पुस्तक.प्रस्तुत पुस्तकात त्यांना भेटलेल्या माणसांची व्यक्तिचित्रे ही कथरूपात त्यांनी सादर केली आहे.अतिशय सरळ सोपी भाषा आणि प्रत्येक गोष्टीत एक गहिरा अर्थ ,शिकवण असा छान मेळ आहे.
ATUL LAMBADEसुधा मूर्ति यांचे आयुष्याचे धडे गिरवतना ह्या पुस्तकाचे अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे, अतिशय स्पष्ट आणि छान मराठी शब्दांची मांडणी केली आहे.
ह्या पुस्तकात सुधा मूर्ति यांनी त्याच्या जीवनात गरीब व गरजू लोकांना केलेली मदत व ते माणसे पुन्हा अचानक भेटल्यावर त्यांची प्रतिक्रिया आणि सुधा मुर्ति यांना त्यावेळी झालेला आनंद, दुःख, आणि त्यातून आलेला अनुभव त्यांनी या पुस्तकात दिला आहे...✍🏻
BHAUSAHEB PAWARसुधा मूर्ती नचे एक पुस्तकं नुकतेच वाचनात आले.
खूप सुंदर लिखाण या पुस्तकात त्यांनी केले आहे.
शाळेतील प्रसंगा पासुन ते परदेशातील घेडलेलं प्रसंग त्यांनी इकडे नमूद केले आहे. फौंडेशन च्या माध्यमातून समाजात काम करताना आलेलं अनेक बरे वाईट अनुभव त्यांनी इकडे लिहिले आहेत.
लेखन खूप सुंदर आहे.पुस्तकाचे नावा मधेच समजते पुस्तकात काय लिखान केले असेल.
Suhas Birhadeसूधा मूर्ती यांची पुस्तकं मला आवडतात. ती पुस्तके हलकी फुलकी असतात. जीवनात आलेले अनुभव लहान मोठ्या प्रसंगातून ते उलगडवून दाखवतात. स्वत:चे अनुभव सांगताना त्यात कुठे बडेजाव नसतो. हे अनुभव बरंच काही शिकवून जातात. "आयुष्याचे धडे गिरवताना" हे मूर्ती यांचे अशाच पठडीतले एक पुस्तक. हे पुस्तक देखील एका दिवसात वाचून संपवलं.
या पुस्तकात २३ लहान प्रकरणं आहेत. लेखिकेला विविध टप्प्यांवर भेटललेली माणसं काहीतरी शिकवून जातात. जी मरगळ दूर करते आणि जीवनाचे पैलू उलगडवून दाखवते. मेहता प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलं असून लीना सोहोनी यांनी अनुवाद केला आहे
Pradeep Kambleजागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्ताने.....
कोरोना च्या सक्तीच्या समाधी अवस्थेत असणाऱ्या सर्व वाचकांच्या साठी, बसून बसून कंटाळा आलेल्या सर्व साधकांच्या साठी, काय वाचावे आणि काय वेचावे, अशा सर्व वेच्या साठी....
दहा जून 2013 हा आमच्या लग्नाचा वाढदिवस. या दिवशी आम्हाला अनेक जणांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या शुभेच्छा दिल्या, आप्तस्वकीय व मित्रांनी काही वस्तूही दिल्या.
पण सार्या शुभेच्छा पेक्षा अक्षरधारा या प्रकाशन संस्थेच्या लक्ष्मण राठीवडेकर यांनी दिलेली ही भेट... आयुष्यभर लक्षात राहीली. त्यांनी आमच्या हातामध्ये सुप्रसिद्ध लेखिका, कुशल प्रशासक, सुधा मूर्ती यांचे आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक दिले.
1950 साली कर्नाटकात जन्माला आलेल्या सुधा मूर्ती यांनी कर्तुत्वाच्या पटांगणामध्ये असामान्य कर्तुत्व करून दाखवून स्त्री शिक्षणाचा, समाज उद्धाराचा, उपेक्षितांचे अंतरंग शोधून काढण्याचा यशस्वी प्रयोग केलेला दिसून येतो. हे पुस्तक वाचत असताना महाभारतातल्या संजयाला मिळालेली दिव्यदृष्टी आदरणीय सुधा मूर्ती यांना लाभली आहे याची प्रचिती येते. आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये अनेक व्यक्ती आपल्याला भेटतात, प्रत्येकाचे अनुभव वेगळे. प्रत्येकाचा प्रत्येक माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. प्रत्येकाची सुखदुःख वेगळी. प्रत्येकाचे भावना विश्व वेगळे. त्या भेटलेल्या प्रत्येक माणसाकडून काही ना काहीतरी शिकावं, आणि आपलं आयुष्य समृद्ध करावं ही शिकवण या पुस्तकांमध्ये आहे. ही माणसं आपल्या आजूबाजूला भेटत असतात पण साहित्यिक मूल्य म्हणून आपण त्यांच्याकडे पहात नाही. आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक अनुभवांना सुधा मूर्ती यांनी कथारूप दिले आहे. विलक्षण चमत्कारांनी भरलेल्या गुंतागुंतीच्या आयुष्याचा जीवनपट गिरवले याशिवाय तुम्ही एकजीव होऊ शकत नाही.... हा या पुस्तकाचा मतितार्थ आहे.
कोरोनाच्याआणीबाणीच्या काळात, पूर्वायुष्यातील धडे गिरवता गिरवता भावी आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघून नव्या पिढीसाठी हे धडे गिरवत गिरवत आठवणीदीपस्तंभ व्हाव्यात व जगण्याचे
आणि हे गिरवलेले आयुष्य समृद्ध व्हावे
म्हणून हे पुस्तक आपण जरूर वाचावे.. ही अपेक्षा. जागतिक ग्रंथ दिनाच्या सर्व वाचकांना शुभेच्छा..
.... प्रदीप कांबळे सातारा.....
Mahesh Hande`आयुष्याचे धडे गिरवताना` हे पुस्तक म्हणजे सुधा मूर्तींना `आयुष्य गिरवताना मिळालेले धडे` आहेत.यातील सर्व घटना ह्या कुठल्याही प्रकारे साहित्यिक वजन प्राप्त होण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चष्म्याशिवाय लिहलेल्या आहेत.स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी अनुभवलेली दृश्यच त्यांनी शब्द रुपात चितारली आहेत.ही शब्दचित्रे न्याहाळताना आपल्या मानसिक विश्वात विविध रंगांची उधळण सतत चालू असते.हे रंग असतात कारुण्याचे, दुःखाचे,अनुकंपेचे,कृतज्ञतेचे....
तसेच पुस्तक वाचताना शब्दसौन्दर्याच्या सरी बरसत नाहीत तरी पण आपलं मन विविध मानवी भावांनी चिंब होऊन जाते.कारण हा चिंब करणारा कुंभ हा लेखिकेच्या अनुभवाने,औदार्याने भरगच्च भरलेला आहे म्हणूनच.
या पुस्तकात लेखकीने त्यांच्या आयुष्यातील २३ अनुभव सांगितले आहेत. ह्या अनुभवांतून आपण काय शिकलो व मनाच्या प्रतलावर कुठले तरंग निर्माण झाले याच वर्णन केलेलं आहे.
यातील `गुणसूत्रे` या अनुभवात आपल्या उद्विग्न मनाने म्हणतात `माणसाला त्याच्या गुणसूत्रांमधून त्याच्या पूर्वजांची अनुवंशिक दुखणी तेवढी मिळतात; पण प्रामाणिकपणा, सचोटी असे गुण अनुवंशिकतेनं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अजिबात जात नाहीत, हेच खरं.` तर `मदत` मध्ये दुःखी अंतःकरणाने लिहतात `जर एखाद्या व्यक्तीला योग्य वेळेस मदत मिळण्याचं खरं मोल कधी कळूच शकलं नाही, तर त्या मदतीचं ओझं आयुष्यभर त्याच्या मनावर राहतं.` त्याचप्रमाणे `दुःखी सुख` यात मनाच्या ओलावा किती आवश्यक असतो हे सांगताना त्या म्हणतात`यश, पुरस्कार, पदव्या आणि पैसा यांपेक्षा उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करणं, सहानुभूती, सहवेदना आणि मनःशांती या गोष्टी आयुष्यात कितीतरी जास्त महत्त्वाच्या आहेत.’
थोडक्यात काय तर लेखणीच्या आयुष्यातील काही पानचं या पुस्तकात एकत्रित केलेली आहेत. वाचायला हरकत नसावी.
महेश्वरी सुग्रीव गव्हाणेआदरणीय लीनाताई,
स.न.वि.वि.
मी इयत्ता ८वीत शिकणारी विद्यार्थीनी आहे. मी तुमचे ‘आयुष्याचे धडे गिरवताना’ हे पुस्तक वाचले. हे पुस्तक मला खूप आवडलं. त्यात मला ‘गंगेचा घाट’ ही गोष्ट खूप आवडली. या गोष्टीतून मला खूप काही शिकायला मिळालं. घंगाने त्या व्यक्तीला पाणी दिले, असंच बऱ्याच व्यक्तींना पाणी दिले. ती व्यक्ती तिला लाकडे व पाणी आणून देत व गंगा पाणी तापवून देत अशी तिच्या बऱ्याच व्यक्तींची रांग लागली होती. या गोष्टीतून मला अशी प्रेरणा मिळाली, की एकमेकांना मदत केली पाहिजे. थुम्हाला माझी अशी विनंती आहे, की तुम्ही आमच्या शाळेत यावे व आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.
कळावे,
आपली विश्वासू,
महेश्वरी सुग्रीव गव्हाणे
हरंगुळ, लातूर
रिया लक्ष्मण देवकरआदरणीय लीनाताई
साष्टांग नमस्कार.
मी सुधा मूर्ती यांनी लिहिलेले ‘आयुष्याचे धडे गिरवताना’ हे पुस्तक वाचले. या पुस्तकात त्यांनी आयुष्याच्या प्रवासात आपल्याला विविध प्रकारच्या व्यक्ती भेटतात, अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते. यातूनच आपल्याला काही अनुभव येतात ते अनुभव वेगवेगळ्या प्रकारचे असतात. हे सांगितले आहे.
मी या पुस्तकातून असा बोध घेतला की आपल्या आयुष्यात वेगवेगळी संकटे येतात त्याला आपण कसे सामोरे जावे हे कळाले. आपल्याला आलेले अनुभव हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ते काही वेळेस सुख देणारे तर काही वेळेस दु:ख देणार व काही चमत्कारिक असतात. हे पुस्तक आमच्यापर्यंत आपण मराठीत अनुवाद केल्यामुळे आम्हाला वाचायला मिळाले. त्यामुळे धन्यवाद!
कळावे,
रिया लक्ष्मण देवकर
हरंगुळ, लातूर
Pritam Katkarपुस्तक = "आयुष्याचे धडे गिरवताना"
मूळ लेखिका = सुधा मूर्ती
अनुवाद =लीना सोहोनी
आज सुधा मूर्ती यांचं "आयुष्याचे धडे गिरवताना" हे लीना सोहोनी यांनी अनुवाद केलेलं पुस्तक वाचून पूर्ण झालं.
पुस्तकांच्या नावाप्रमाणेच आयुष्यबाबत अनेक धडे सदर पुस्तक शिकवते.
सुधा मूर्ती या "इन्फोसिस फाऊंडेशन" (सेवाभावी संस्था) च्या चेअरपर्सन असून इंग्रजी आणि कन्नड या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी विपुल लेखन केलं आहे.
सदर पुस्तकामध्ये सुधा मूर्ती यांच्या आयुष्यात घडलेल्या या सर्व सत्य घटना आहेत.
एक बुद्धिमान, संवेदनाक्षम लेखिका आणि समाजसेविका या नात्यानं त्यांनी त्याचं चित्रण करून वाचकांसमोर ते मांडलं आहे.
सदर पुस्तकामध्ये एकूण २३ लघुकथा आहेत.
★ पहिलीच कथा "बॉबे टू बंगळूर" हिने मनाचा ठाव घेतला.
ह्यामध्ये चित्रा नावाच्या मुलीची कहाणी आहे.
ही मुलगी सुधा मूर्ती यांना मुबई ते बंगळूर असा प्रवास करताना रेल्वे मध्ये भेटते, आई च्या मृत्यूनंतर वडील दुसरं लग्न करतात आणि सावत्र आई चित्राला घरातून बाहेर काढते. कोणताही सहारा नसणारी ही मुलगी नशीब आणि आयुष्य घेऊन जाईल तिकडे जायला घरातून निघालेली असते.
पुढे सुधा मूर्ती यांची गाठ आणि त्यांनी तिच्या आयुष्याला दिलेलं वळण वाचताना अंगावर शहारे येतात.
★बदलता भारत- ह्या कथेमध्ये साधारण लेखिका १९७९ साली जेव्हा पहिल्यांदाच अमेरिकेला गेल्या होत्या तेव्हाच्या कटू आठवणी बद्दल लिहलं आहे.(भारत म्हणजे गरीब आणि राजे रजवडे ह्यांच्या मध्ये खूप मोठी दरी असणारा देश, माकड, हत्ती पाळणाऱ्यांचा देश, विधवांना जाळणाऱ्याचा देश असा समज करून घेतला असताना, भारत म्हणजे काय आहे ते सुधा मूर्ती सांगतात.)
आणि पुढे जेव्हा भारतामध्ये संगणक क्रांती झाली, सॉफ्टवेअर च्या मोठ्या मोठ्या कंपन्या उभ्या राहिल्या आणि भारतातील तरुण कामधंद्या साठी परदेशी जाऊ लागले, त्यावेळी भारताबद्दल बदलेला दृष्टिकोन वाचताना मन अभिमानाने भरून येत.
Aditi Agharkar फारच छान आहे रादर सगळीच पुस्तके वाचनीय आहेत. सुधा मूर्तींची,
Sunita Bhoyarमी वाचले आहे खूप सुंदर व ओघवती भाषाशैली आहे
Rahul Sapikeभारी पुस्तक आहे , जास्त जड भाषा नाही, जड तत्वज्ञान नाही पण पुस्तक छान आहे.
Abhay Kulkarniजरुर वाचावे अप्रतिम पुस्तक आहे
Yashshri Rahalkarएखाद्या मैत्रिणीकडे गेल्यावर तिची साडी खरेदी पाहण्यापेक्षा माझे सारे लक्ष तिच्या पुस्तक खरेदीकडे असते. तिच्या पुस्तकांच्या ओळींमधून नवी पुस्तके चमकू लागली की तोंडावरचे हावरे भाव मला लपवताच येत नाहीत. काही मैत्रिणी माझ्या या दुर्गुणाशी प्रेमाने जुळवून घेत पुस्तक खरेदी केली की सारे फोटो मला पोस्ट करतात आणि घे बाई ! तू आधी वाच म्हणून पुस्तके देतात. त्या नव्या कोऱ्या पुस्तकांचा वास ... आहाहा! तर थोडक्यात काय हे पुस्तक असच रश्मी अंधारे ह्या प्रेमळ मैत्रिणीच... मुखपृष्ठ पाहूनच प्रेमात पडता 💝 पूर्वी शाळेची काळी पाटी असायची अन त्यावर रंगीत लेखणी/ पेन्सिल ने एकाच वेळी अनेक रंगी अक्षरे उमटावीत तसे... ही शाळा आयुष्याची आहे.
सुधा मूर्तीजींच्या आयुष्यातील 23 प्रसंग गुंफून त्यांनी ह्या कथा विणल्या आहेत. प्रत्येक प्रसंगातून त्या काहीतरी शिकल्या आहेत आणि त्यातून बनलेल्या कथा वाचून आपण खूप काही शिकतो . प्रत्येक कथेबद्दल लिहावं तेव्हढं थोडं आहे . या स्वरूपाचे अनुभव कमी अधिक फरकांनी आपल्या पैकी अनेकांना येतात फक्त आपण त्यातून धडे घेत नाही😊
अविस्मरणीय कथा म्हणजे * रहमानचीअव्वा * :- हिंदू अशिक्षित मजुरी करणाऱ्या स्त्रीने एका शेजारच्या पोरक्या पोराला वाढवलं पण त्याची धर्म ओळख न पुसता. भुताबरोबर वाटणी ... मस्तच रंगली आहे. श्राद्ध मध्ये स्त्रियांनी वडील वा पतीचे श्राद्ध करण्याचे उचललेले पाऊल अंतर्मुख करून जाते.गंगेचा घाट आणि मृतांसाठी मदतीचा हात ह्या कथा सामान्यांचे असामान्यत्व अधोरेखित करतात . नो मॅनस गार्डन आणि मदत नैतिकतेचे धडे देतात...... प्रत्येक कथा विलक्षण ताकदीने साकार होत जाते.
प्रचंड आवडलं पुस्तक ... जरूर जरूर वाचावे असेच👍
मधुकर धाकराव व्वा चिंतनशील।
Sheetal Mehta Ho chan ahe farch
Dnyaneshwar Tundare क्या बात... टाईटलच खुपकाही सांगुन जात...
Ranga Joshi अगदी डोळ्यापुढे चित्र उभे राहते...... प्रवाही अनुवाद
Archana Mali Khup mast aahe
NEWSPAPER REVIEWसाधेपणाने जगण्याचे शहाणपण सांगणाऱ्या गोष्टी
लेखकाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या लेखनातून कळत-नकळत प्रतिबिंबित होत असते. प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्या नुकत्याच मराठीत अनुवादित झालेल्या ‘आयुष्याचे धडे गिरवताना’ या कथासंग्रहामध्येही त्यांच्या साध्या, निर्मळ स्वभावाचे प्रतिबिंब पडल्याचे जाणवते.
‘आयुष्याचे धडे गिरवताना’ हा मूर्ती यांना भेटलेल्या माणसांच्या, आलेल्या अनुभवांच्या २३ गोष्टींचा संग्रह आहे.
या संग्रहाच्या प्रस्तावनेत त्या म्हणतात की, ‘हे पुस्तक तुमच्याविषयी आहे, माझ्याविषयी आहे आणि जीवन नावाच्या या विलक्षण चमत्कृतीपूर्ण आणि गुंतागुंतीच्या गोष्टीविषयी आहे.’
आयुष्यात अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. यातल्या काही गोष्टी सुखकारक, तर काही दुःखदायक असतात. काही अनुभव चमत्कारिक, तर काही मन थक्क करून सोडणारे असतात. हे अनुभव खूप काही शिकवतात, समृद्ध आणि परिपक्व बनवतात. त्यांचे चित्रण साध्यासोप्या व थेट शैलीत केले आहे. जणू सुधाताई हे अनुभव आपल्या लेखनातून पुन्हा सांगून, त्याचे धडे गिरवून पक्के करत आहेत! काळ्या पाटीवर गिरवल्यासारखे सुलेखन केलेले मुखपृष्ठ बोलकं आणि नेमकं आहे.
सुधातार्इंच्या समर्थ लेखणीतून साकारलेल्या या गोष्टींचा सरस व उत्तम मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे.