Tanmay Mandarekarआनंद,भावना,प्रेम,विश्वास या चर्तुश्वांनी जोडलेल्या भावरथाचा `नंदीघोष` पाहिला. भरधाव वेगाने दौडणारा ,कपिध्वज फडकणारा ` नंदीघोष` दुरून ही नजरेत येत होता. क्षणार्धात रथाचे आवेग आवळले.. एक गौरवर्णी गांडीवधारी व्यक्ती रथातून अलगद उतरली अन भूमातेला स्पर्श करून निश्चल अवस्थेत बसली. त्या नीलवर्णी शांतमूर्तीतून बासरीचे मंजुळ स्वर येऊ लागले की सुदर्शनाचे तेज वाढू लागले.अजितंजय धनुची प्रत्यंचा ओढली गेली .पाहता पाहता नीलवर्णी देह चराचर व्यापून टाकला. विश्वाच्या कानाकोपऱ्यातून दोन शब्दांनी जयघोष मांडला.. कृष्ण ..कृष्ण..कृष्ण..
या मुरलीधर गिरीधारीचे विराट रूप पाहता अर्जुनाच्या ही डोळ्याचे पारणे फिटावे. असा हा मनमोहन, सुदर्शनचक्रधारी समजावा तरी कसा ? ज्याने राधाराणीसह प्रेमयोग मांडला तर दारूका सह सारथ्ययोग खेळला.. त्या भगवद्गीतेने अर्जुन पावन झाला तर श्रीमदभागवताने उद्धव उद्धरला.त्याने प्रेम भावनांचे प्रतीक असे `भाववृंदावण` निर्मिले.पश्चिम सागराच्या तटावर सुवर्णी द्वारीका स्थापिली.या विश्वाच्या नियंत्याला जाणून घेण्यास युगानेयुगे पार पडावी, हेच त्या विश्वनारायनाचे भाग्य!!
या विश्वनिर्मात्याला एकेरी नावाने उद्बोधण्यात स्वारस्य वाटावे,अशी त्या मधुसूदनाची महती..त्याचे जीवन म्हणजे हजारो पाकळ्यांनी बहरलेले कमलपुष्पच. जिच्या प्रत्येक पाकळीवर त्याच्या प्रत्येक कृतीचा भावार्थ लपला आहे.या भावविश्वाचे कमल दल उमलावे अन त्या भावरसात आकंठ वहावे.
या भावरसात गीतेचे अमृत बोल आहे ..तर भागवत पुराणाचे अगाध ज्ञान ..
हे मनमोहना, जरी देवांच्या पदी क्षीरसागरात विराम करीत असलास, तरी आजही या पृथ्वीवर वावरताना दिसतोस.. तुझ्या बाळलीलांनी गोकुळ बहारतोस. जिथं मुरलीचे धून चरचरांत मधुर स्वर निर्माण करतात,तर तू मांडलेला भावरास आजही भाववृंदावणात फेर धरीत आहे.
तुझा जन्म जरी त्या बंदिवानांच्या कैदेतील असला,तरी लटक्या बोलांनी सारं गोकुळ खेळवलंस.अपार लीलांनी असुरांचा लीलया वध केला.पण तुझी कोणतीही कृती अतिशयोक्ती नव्हती, मानवजातीच्या आवाक्याबाहेरची नव्हती.तुझा जन्म हेच नमूद करीत होता की ," तू मनुष्यरूप धारण केलं आहे, तुझी कृत्ये ही मनुष्यकसोटीस उतरणारी असावी". तरी तुला अवतारी मानण्यापेक्षा तुझं महान मनुष्यपण जाणणे, योग्य वाटावे. जरी देवाचा अवतार असला,तरी आपलेपणाची भावना हेच तुझं मोठेपण.. भावार्थ काय? तर माणूस हा देवाला देव्हाऱ्यात पुजून त्याच्या चरित्रास केवळ देवालाच शक्य होते , असे म्हणून त्याच्या सर्व लीलांची एकाधिकारशाही देवत्वावर सोडून मोकळा असतो.. पण तुझी महान कृत्ये ही देवत्वापेक्षा श्रेष्ठ मनुष्यासम भासतात. म्हणूनच तू नर श्रेष्ठ असून युगानुयुगे तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन तुझ्या सत्मार्गावर चालणे, हेच मनुष्यकर्म.
तू कधीही कोणत्या राजसिंहासनावर बसला नाही. कधी कोणतं उत्तरदायित्व स्वीकारले नाही. केवळ कर्तव्य केलं. प्रेमयोग मांडला.कंस वधानंतर उग्रसेन यांना मथुरेचं महाराज पद बहाल केलं. द्वारीका निर्मिली.पण राजपद वसुदेवांकडे दिलं. करवीरच्या श्र
श्रुंगाला वधलं.नरकासुराचा वध केला. जरासंध भीमाकरवी मारला तर शिशुपालाचा शिरच्छेद केला..पण कधी राजगादी हस्तगत केली नाही.अन्यायकारी राजांचा वध करून तेथील जनतेस मुक्त करणे,हेच आद्यकर्तव्य. त्यांच्याच पुत्रांच्या खांद्यावर राज्य सोपवून पुढील कर्तव्यास मार्गक्रमण करणे,हीच तुझी नीती..!!
महाभारत या महागाथेचा कर्ता, करविता अन कर्मयोगी म्हणजे श्रीकृष्ण.. महाभारत हे केवळ महायुद्ध नव्हते तर महायज्ञ होता. तिथं रक्ताची,त्यागाची,नात्यांची,प्रेमाची ,भावनांची समिधा अर्पण करावी लागली.या महायज्ञातून निष्पन्न झाली महातेजाची ,महाज्ञानाची कर्मगाथा.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥
हे पद्मनाभा ,जिथं अर्जुन सारखा महारथी हताश होऊन समरभूमीवर बसला,तेव्हा कृष्णबोलीतून कर्मगीता सांगितली.कर्माची जाणीव करून दिली. सारा आर्यावर्त ज्या युद्धासाठी कुरुक्षेत्र व्यापला होता ,त्या महायज्ञाचा यज्ञकर्ता तूच होता. तसं दुर्योधन, दुशासन,शकुनी यांचा एका क्षणात शिरच्छेद करता आला असता,द्रौपदीचे वस्त्रहरण घडताना लज्जारक्षणासोबत सुदर्शनाचे प्रक्षेपण करून उभा हस्तिनापूर रक्तरंजित करण्याची तुझी शक्ती होती.पण तसं तू केलं नाही.कारण तुला या महायज्ञाचे महत्त्व पटवून द्यायचं होतं. युगानेयुगे जगाला शिकवण द्यायची होती. जिथं नाती गोती,आपलं-परकं बाजूला सारून जीवन सार द्यायचं कर्तव्य तुला पार पाडायचे होते . या महासंग्रामात तू कधीच शस्त्र हाती घेतलं नाही, केवळ भूषविले सारथ्यपद..हा सारथ्य योग जीवनाचे दर्शन घडवण्यासाठी केला होता,हे तुलाच ठाऊक!!
तू जलपुरुष आहेस,असं म्हणतात. म्हणजे मथुरेची यमुना वा द्वारकेचा दर्या.जिथं पाणी तिथं तू..युद्धानंतर मात्र तू द्वारकेत विसावलास.त्या उत्तर कृष्ण अध्यायात मात्र उन्मत यादवांचा विध्वंस झाला.तुझे प्राण प्रिय पुत्र ,यादवसेन सारे यादवीत मारले गेले.. बलरामाने ही दर्याजलात प्राणार्पण केला. त्या प्रभास पावन क्षेत्री तुझा अध्याय संपवण्याचा काळ आला..जाता जाता उद्धवाला `उद्धव गीतेचे` भावामृत देऊन गेलास अन अश्ववृक्षाच्या घनदाट सावलीत पायाच्या तळव्यात तीर घुसला अन या कृष्ण जीवनाचा अंत केलास..
या वासुदेवाला जाणून घेण्यास हा जीवन यज्ञ ही अपुरा पडावा. युगानेयुगे जन्म घेतला,तरी तू कळणार नाहीस रे..
अनंत हस्ते द्यावे या सर्वेश्वराने..
घ्यावे किती या दो कराने...
परम अवतारी..सुदर्शन चक्रधारी.. तुझं एक रूप जाणायला हे जीवन अपूरे पडावं,तिथं त्या पार्थाने कसं विश्वरूप जाणलं असावं.तू परम अवतारी आहेस. तुझ्या इशाऱ्यावर या कळसूत्री बाहुल्या नाचतात..अखेर तूच सुत्रधार.. तुला शोधायचं तरी कुठं? मथुरा,वृंदावन, गोकुळ,द्वारका,कुरुक्षेत्र सारं धुंडाळलं. पण तू गवसला नाहीस.. तू चराचरात आहे असं म्हणतात. पण तू दिसत नाहीस.नजरेत येत नाहीस.जाणवते ते तुझं `अस्तित्व`. कानी पडतात तुझ्या भावमुरलीचे सुरेल स्वर..कदाचित त्या स्वररागात तू लपला असावा!!!
असा युगानुयुगे शिरी धारण करावा असा युगंधर नक्की वाचा
Sanjay Dhote अरे जबरदस्त! मी वाचली आहे ही कादंबरी .
Atul Junnarkar पुस्तक वाचून झाल्यावर आनंद म्हणजे काय ? हे समजले व डोळे पानावले खूप सुंदर
Rutuja Pardeshiइतकी देखणी भाषा की सहजच वाचणारा तिच्यात गुंतत जातो!
Nandini Deshpandeबर्याच वर्षांपूर्वि शालेय सुट्यां मध्ये वाचलेलं....फार सुंदर पुस्तक...खरे तर अशा पुस्तकां मुळेच वाचनाची आवड जोपासली आहे असे वाटते...
Kamal Bhandari Nice book
Raj Bhanushali Khup sundar ahe.. 2 vela vachala..
Archana Netke Bansodechan ahe
Bhawana Kothawale Khup khup sundar pustak ahe ....
Vishal Deshmukh खूप सुंदर आहे , कृष्णात दंग होतो आपण
सुनिल शांताबाई सूर्यवंशी जबरदस्तच् लेखणी. बहुदा करवीर नगरीची स्थापणाही त्यात असेल. #युगंधर ला पुस्तक म्हणता येणारच नाय... एक महान विचारानी जगाला एका नायकाची जानिव करुण देणारा ग्रंथ नव्हे... महाग्रंथच् !!
Jija Patil शिवाजी सावंत ह्या नावातच सर्व काही आहे .
संतोष काशीद शिवाजी सावंत म्हणजे चालता बोलता ग्रंथ.....
Ramdas Karad ग्रंथराज श्री.शिवाजी सावंत यांच्या लेखणीला तोड नाही आणि जोडही नाही...
मी वाचलं आहे संतोष दादा.. #युगंधर गवळ्याचं पोरं ते श्रीकृष्ण... प्रवास खूप छान शब्दांत लिहला आहे...👌😊
संतोष काशीदश्रीकृष्ण...... भारतीय मनांवर गेली तब्बल पाच हजार वर्षे आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक अन सांस्कृतीक राज्य करणारा एक महतज्ञानी. आपल्या अस्तित्वाने जगभरातील मानव जातीला आत्मिक सुखाचं परमोच्च सुख देणारा युगपुरुष.
आपल्या कर्तुत्वाने ` नारायणपदाला ` पोहोचलेल्या या नारायणाची जीवनगाथा शब्दांत मांडणे म्हणजे सूर्यभास्कराला कवेत घेण्याचा प्रकार, ज्यात कर्ता भस्मसात व्हावयाचा. पण तरीही महाभारत कालीन व्यक्तिचित्रणात सर्वात उच्च स्थानी विराजमान असलेल्या या राजकुशल सेनानीची यशोगाथा सर्वसामान्य श्रीकृष्ण प्रेमींपुढे आणन्याचे महत्कार्य करणे गरजेचेच.....
आपल्या वैविध्यपूर्ण कादंबरीमय लेखनाने वाचन प्रेमींच्या हृदयात स्थान निर्माण केलेल्या शब्दगंधर्व श्री शिवाजी सावंत सरांनी उभा केलेला #श्रीकृष्ण शब्दांच्या दुनियेतील कसदार सोनं म्हणावं इतके लाघवी......
इतरांच्या घरामधल्या शिंकाळ्यातील तूप लोणी चोरून खाऊन गोपिकांच्या मागे त्यांची थट्टा करत कृष्णलीला करणारा माधव तर आपल्या मस्तिष्कात आहेच. पण हाती सुदर्शन घेऊन समरांगणात उतरलेला विरोत्तम श्रीकृष्ण मात्र काहीसा बाजुलाच राहिला. शंभर अपराध माफ़ करून एकशे एक अपराध होताच शिशुपालचा वध करणारा कठोर श्रीकृष्ण आपण केव्हा आत्मसात केलाच नाही.
या द्वाराकाधिशाला आठ पत्नी, ऐंशी पुत्र, चार कन्या अन नरकासुराच्या कैदेतून सोडवलेल्या सोळा सहस्त्र अबलांचं स्वामित्व पत्करलेल्या हा पालनकर्त्याला समजून घ्यायचे असेल तर ` समग्र श्रीकृष्ण चरित्राचा ` अभ्यासास पर्याय नाही........
शिवाजी सावंत सरांनी कादंबरी स्वरुपात उभारलेला आणि प्रचंड संदर्भाची रास ओतून साकारलेला सर्वव्यापी श्रीकृष्ण म्हणूनच आपल्याला अधिक जवळचा वाटतो. तसे तर या प्रातःचरणी वंदनीय व्यक्तिमत्वाचं चरित्र आजन्म अभ्यासले तरीही न संपणारे. पण सावंत सरांनी आपल्या शब्दप्रभुत्वाच्या जोरावर हजारभर पानांत आपल्याला हा नायक मोठ्या खुबीने समजावून दिला अआहे......
प्रत्येकाने वाचावी अन संग्रही ठेवावी अशी एक अजोड़ कलाकृती........
Er Sachin Lande इतका छान रंगवलाय, म्हणण्यापेक्षा किती छान होता कृष्ण;खरंच खूप भावला मला.ज्याला त्याला त्याच्या-त्याच्या बौद्धिक म्हणा,आध्यात्मिक पातळीनुसार समजेल येईल तो..👌👌
Pranita Chougule-Todkar My favourite one..
Pranali Kumawat Khup Chan ahe book
Shantanu Adhav मी वाचलंय, नितांत सुंदर
Varsha Sidhaye Chhan ahe book गीतेवर फार छान लिहिलय् ! फक्त व्यक्तिरेखांची नावे लक्षात ठेवणे अवघड आहे, इतकी नावे आहेत.
लक्ष्मी पवारहे पुस्तक श्री.कृष्णाचा जीवनावर आथारीत आहे .फार सुंदर आहे.