- LOKPRABHA - 10-11-2017
रहस्यकथा हा वाचकांचा आवडता साहित्यप्रकार. मेहता ग्रंथजगतने यंदाच्या दिवाळी अंकात रहस्यकथांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. सतीश भावसार यांनी केलेले अंकाचे मुखपृष्ठ आकर्षक आहे. अंकाच्या आतलीही त्यांनी केलेली चित्रे उत्तम आहेत. अंकाच्या सुरुवातीलाच एडगर अॅलन पो याची द टेल टेल हार्ट ही सुश्रुत कुलकर्णी यांनी अनुवादित केलेली कथा आहे. दे रेड सिल्क स्कार्फ ही मॉरिस ब्लॉक यांची वर्षा वेलणकर यांनी अनुवादित केलेली लाल मखमली स्कार्फ ही कथा आहे. चेकमेट या जेफ्री आर्चरच्या कथेचा लीना सोहोनी यांनी केलेला अनुवाद वाचनीय आहे. जे.के. चेस्टरटन च्या द ब्ल्यू क्रॉस कथेचा अनुवाद वाचनीय आहे. जे.के. चेस्टरटन च्या द ब्ल्यू क्रॉस कथेचा अनुवाद शुचिता फडके यांनी केला आहे. मास्टरस्ट्रोक्स या सदरात मुकेश माचकर यांनी गूढकथांचे मतकरी मॉडेल हा रत्नाकर मतकरींवर लिहिलेला लेख चांगला आहे. मनस्विनी लता रवींद्र यांनी एका शिलेदाराची शोकांतिका या लेखात गुरुनाथ नाईक यांच्यावर लिहिलं आहे. वामन देशपांडे यांनी रहस्यकथांचे सम्राट बाबूराव अर्नाळकर यांच्या लिखाणाचा आढावा घेतला आहे. पडद्यावरचे रहस्य, गावोगावच्या गोष्टी हे विभाग वाचनीय आहेत.
- स्नेहल जोशी
रहस्यकथांना वाहून घेतलेला हा दिवाळी अंक खरोखरच खूपच वाचनीय झालेला आहे. मुखपृष्ठच हा अंक रहस्यकथांना वाहलेला आहे ही जाणीव देतो. मुखपृष्ठ खूपच सुंदर आहे आणि एकूण सर्वच अंक वाचनीय झालेला आहे. आता पूर्वीसारखे रहस्यकथा हे वाङ्मय उपेक्षित राहिलेले नाही. तरीही आपला हा उपक्रम स्तुत्य आहे.
- samana 24/10/2017
मेहता पब्लिशिंग हाउसचा यंदाचा दिवाळी अंक रहस्य, गूढ आणि भयकथांचा विशेषांक आहे. काळाच्या ओघात झोकाळत गेलेला हा एक साहित्यप्रकार या अंकाच्या निमित्ताने पुन्हा प्रकाशात आणण्याचा प्रकाशकांनी प्रयत्न केला आहे. ज्येष्ठ साहित्यिक गुरुनाथ नाईक, बाबूराव अर्नाळकर, रत्नाकर मतकरी, वर्षा वेलणकर, मनस्विनी प्रभुणे, लीना सोहोनी, सुशृत कुलकर्णी, डॉ. अनमोल कोठाडिया, श्रीकांत पवार, समीर वेंगुर्लेकर या दिग्गज लेखकांच्या लेखांचा या अंकामध्ये समावेश असल्याने अंक अधिक दर्जेदार झाला आहे. क्षणोक्षणी उत्कंठा, श्वासांची गती वाढवणारं रहस्य आणि शब्दांमध्ये दडलेलं भय अनेक लेखांमध्ये सामावलेलं आहे. रहस्यमय कथांबरोबरच या कथांना साजेशी अशी चित्रे अंकामध्ये रेखाटण्यात आल्याने रहस्याच्या भीती आणि गुढतेला अधिकच खोली मिळाल्याचे जाणवते; तसेच अनेक कथा चित्रांच्या स्वरूपामध्ये जिवंत होतात. रहस्यकथेतील थरार, गुढकथेतील आणि भयकथेतील गोठावून टाकणारं भय वाचकांना आकर्षित करते. रहस्यकथा वाचकाला गुन्हेगार, पोलीस आणि गुप्तहेर यांच्या जगात घेऊन जातात, तर भयकथा, गूढकथा वाचकाला अतक्र्य घटनांद्वारे एका अज्ञात प्रदेशात घेऊन जातात. मानवी भावनांचे सूक्ष्म चित्रण करणारे साहित्य हेसुद्धा महान असतं, हेच या दिवाळी अंकामधून दिसून येते.
- MAHARASHTRA TIMES 26-10-2017
‘रहस्यकथा’ हा काहीसा बाजूला पडलेला विषय या दिवाळी अंकातून समोर आला आहे. त्यामुळे या माध्यमातून रहस्यकथेच्या संदर्भातील विविध पैलू समोर आले आहेत. अनुवादित रहस्य कथा, मास्टर्स स्ट्रोक्स, पडद्यावरचे रहस्य, गावोगावच्या गोष्टी वाचनीय आहेत.
- DAINIK PUNYANAGARI 24-10-2017
‘रहस्यकथा’ सध्या साहित्याच्या प्रांतात अडगळीत गेलेला विषय. कोणेएकेकाळी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाचकवर्ग असलेल्या या साहित्यप्रकाराचे वर्चस्व टिकून होते. कालांतराने ते कमी झाले. मात्र, मेहता मराठी ग्रंथजगतने पुन्हा या विषयाला आपल्या दिवाळी अंकात स्थान दिले आहे. या अंकात बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक यांनी रहस्यकथांसाठी दिलेले योगदान, रत्नाकर मतकरींच्या भयकथांना लाभलेले वाङ्मयीन मूल्य, रहस्यकथाकारांची लोकप्रियता, समीक्षकांनी रहस्यकथांविषयी दाखविलेली उदासीनता, मराठी साहित्यात रहस्यकथांना आणि रहस्यकथाकारांना मिळणारे दुय्यमस्थान या विषयांना दिवाळी अंकात स्थान दिले आहे. याशिवाय पुनर्जन्म, अंधश्रद्धा, माणसाचे अतर्क्य मनोव्यापार, सूडकथा, दरोड्याचा तपास, असे वैविध्यपूर्ण विषय हाताळण्यात आले आहेत. साता समुद्रापारची रहस्ये, मास्टर्स स्ट्रोक्स, पडद्यावरचे रहस्य, गावोगावच्या गोष्टी, यात रहस्य, गूढकथांची मांडणी करण्यात आली आहे.
- DAINIK SAKAL 17-10-2017
स्वागत दिवाळी अंकांचे...
रहस्य कथेतील थरार आणि गूढ व भयकथेतील गोठवून टाकणारं भय, या दोन्ही गोष्टी वाचकांना आकर्षित करतात. रहस्यकथा वाचकाला गुन्हेगार आणि गुप्तहेर, पोलीस यांच्या जगात घेऊन जातात, तर भयकथा, गूढकथा वाचकाला अतक्र्य घटनांद्वारे एका अज्ञात प्रदेशात घेऊन जातात. नियती, आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांच्या भावना-वासना-इच्छा-आकांक्षा आणि आपलं स्वत:चं मन यावर नियंत्रण नसल्यामुळे माणूस अगतिक असतो. हे वास्तव गूढकथा, भयकथांमधून अधोरेखित होत राहतं. शेवटी मानवी भावभावनांचं सूक्ष्म चित्रण करणारे कथा अंकात आहेत. गावोगावच्या गोष्टी, खुनी घड्याळाचे रहस्य, मर्सी डेथ, सूड नावाची डिश, एक बँक दरोड्याचा तपास, गेस्ट हाऊस, असे विविध गूढकथा आहे. श्रीकांत काळे, समीर वेंगुर्लेकर, श्रीकांत पवार, सुरेश पाथरकर, डॉ. संजय ढोले, नीलेश मालवणकर, सुरेश देशपांडे यांच्या गूढकथा अंकात आहेत.