श्री संभाजी सदामतेमी माणूस शोधतोय....
व.पु काळे यांचा चांगुलपणाचा शोध घेणारा कथासंग्रह...
मराठी साहित्यातील चिंतनशील साहित्यिक म्हणजे.. व पु काळे साहित्याला विचारांची जोड व भावनांचा बंद जोडणारा साहित्यिक म्हणून व पु काळे यांच्याकडे पहावे लागेल.. त्यांनी लिहिलेला मी माणूस शोधतोय.. हा कथासंग्रह नुकताच वाचून पूर्ण झाला या कथा संग्रहा मध्ये व पू नी समाजामध्ये अनेक माणसे छंदानी किंवा वेडानी भारावून गेलेली असतात ..आपले छंद जोपासण्यासाठी अशी माणसे अविरत श्रम करीत असतात.. अनेकांना भेटीत असतात.. चर्चा.. विचारविनिमय.. करीत असतात.. अशाच वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देणाऱ्या.. वेगवेगळ्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या.. समाजातील अनेक क्षेत्रात चमकणार्या लोकांना शुभेच्छा पत्र लिहिणे त्यांच्यासमवेत फोटो काढणे आणि आपले हे वेड किंबहुना छंद या मित्रांना माहित देखील होऊ न देणे असे आपल्या प्रियजनांना अनाहूतपणे शुभ संदेश रुपी पत्र लिहिणारे कौतुक सप्तर्षी आणि व पुं ची भेट कशी होते.. त्यांचा पत्ता माहीत नसताना.. ते सप्तर्षींना कसे भेटतात.. आणि सप्तर्षीनी जोपासलेला छंद आणि त्यातून लोकांशी झालेला संपर्क आणि त्या लोकांना अनाहूतपणे त्यांनी पाठवलेले शुभ संदेश रुपी भेट कार्ड प्रत्यक्ष न भेटता या भेटकार्डच्या शुभ संदेशाच्या जोरावर त्यांनी अनेकांची जिंकलेली मने. त्यातून त्यांना प्राप्त झालेली नोकरी त्यांचा जीवन प्रवास असे अनाहूतपणे पत्राद्वारे भेटणारे कौतुक सप्तर्षी दोन तप या छंदासाठी त्यांनी कशी घालवली आणि अनेकांच्या मनावरती त्यांनी आपल्या छंदाचा प्रभाव कशारीतीने पाडला व त्यातून त्यांनी अनेकांची मने कशी जिंकली त्यांच्या छंदाचा परीघ कसा वाढत गेला हे सर्व होत असताना ही त्यांनी आपल्या अंगी विनम्र भाव कसा जोपासला आणि शेवटी हा अवलिया अपघाताने कसा निघून गेला हे सहज साध्या शब्दांत त्यांनी मांडले आहे..
अनेक माणसं जन्माला येतात जीवन जगतात आणि नाहीशी होतात.. पण सप्तर्षी सारखी छंद वेडी माणसं मरून सुद्धा त्या छंदाने कायम जिवंत राहतात.. हेच माणसाच्या जगण्यातील मोठेपण आहे.. ही सांगणारी कथा म्हणजे मी माणूस शोधतोय.. या पहिल्या कथेचे शीर्षक व पु नी या कथासंग्रहाला दिले आहे त्यांचा हा कथासंग्रह म्हणजे त्यांना भेटलेल्या त्यांनी वाचलेल्या त्यांनी अनुभवलेल्या माणसांचा कथासंग्रह आहे.. समाजामध्ये अनेक माणसं आपल्याला भेटतात आपल्या वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्यांनी आपलं व्यक्तित्व सिद्ध करणारी अनेक माणसं समाजामध्ये असतात अशा चांगुलपणाने युक्त माणसांची संख्या समाजामध्ये जास्त आहे.. व पु नी अशाच माणसांचा शोध.. मी माणूस शोधतोय.. या कथासंग्रहात केला आहे..
या कथासंग्रहात हप्ता ,अंतर, हुतात्मा, रमी, मुहूर्त, टाहो ,टेरीलिन, शोध, ऋतू बसंती रुठ गयी. नालायक या कथा आहेत
यातील शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असताना खोडकर खट्याळ पोरांना नालायक म्हणून ओरडतात.. या नालायक शब्दांचा मुलांच्या मनावर कसा वाईट प्रभाव होतो व आपण कोणतीही चांगली गोष्ट करण्यास कसे लायक नाही ..या मुळे मुलांच्या मनात कसा न्युनगंड तयार होतो व मुलं कशी वाहत जातात तर कांहीं मुलांच्या मनावर याचा चांगला प्रभाव पडतो शैक्षणिक प्रवाहापासून दुर होणारी मुलं या रागवण्यान नालायक म्हण्यान कशी सुधारतात असा नालायक शब्दाचा सकारात्मक व नकारात्मक प्रभाव नालायक या कथेतून मांडला आहे
सहज साध्या सोप्या शब्दांतून व.पु नी अनेक माणसं आपणास भेटवली आहेत. व समाजातील चांगुलपणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे..
श्री संभाजी सदामते.