Kiran Borkar अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्या युद्धातील ही एक गोष्ट आहे .मी लाय या क्वांग अंगै खेड्याजवळील छोट्या वस्तीत अमेरिकन सैनिक शिरतात आणि एकूण एक रहिवाश्यांना मारून टाकतात . त्यांच्या अत्याचारातून लहान मुले वृद्ध स्त्रियाही वाचत नाहीत. त्यांच्याबरोबर असलेला सरकारी छायाचित्रकार चोरून या संपूर्ण घटनेचे फोटो घेतो . योगायोगाने एक सहा वर्षाची मुलगी यातून वाचते पण तिला आपल्या आईवडिलांची प्रेते पहावी लागतात . अमेरिकन छायाचित्रकार ही सगळी माहिती प्रसारमाध्यमाला देतो आणि अमेरिकेत मोठी खळबळ उडते . सरकारला जनतेचा प्रचंड रोष सहन करावा लागतो. वरिष्ठ पातळीवरून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतो .खरे तर ही एक सत्यघटना आहे आणि लेखकाने यात कल्पनाविस्तार केला आहे .मन सुन्न करणारी कादंबरी .
Kiran Borkar Vachan Vedaअमेरिका आणि व्हिएतनाम यांच्या युद्धातील ही एक गोष्ट आहे .मी लाय या क्वांग अंगै खेड्याजवळील छोट्या वस्तीत अमेरिकन सैनिक शिरतात आणि एकूण एक रहिवाश्यांना मारून टाकतात . त्यांच्या अत्याचारातून लहान मुले वृद्ध स्त्रियाही वाचत नाहीत. त्यांच्याबरोबर असलेला सरकारी छायाचित्रकार चोरून या संपूर्ण घटनेचे फोटो घेतो . योगायोगाने एक सहा वर्षाची मुलगी यातून वाचते पण तिला आपल्या आईवडिलांची प्रेते पहावी लागतात . अमेरिकन छायाचित्रकार ही सगळी माहिती प्रसारमाध्यमाला देतो आणि अमेरिकेत मोठी खळबळ उडते . सरकारला जनतेचा प्रचंड रोष सहन करावा लागतो. वरिष्ठ पातळीवरून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतो .खरे तर ही एक सत्यघटना आहे आणि लेखकाने यात कल्पनाविस्तार केला आहे .मन सुन्न करणारी कादंबरी .
Vaibhav Mahajanमी-लाय या क्वांग अंगैजवळच्या खेड्यामध्ये 16 मार्च, 1969 च्या सकाळी जे काही घडलं त्यावर आधारलेली ही कहाणी आहे. उद्ध्वस्तमधली काही व्यक्तिमत्त्वं आज वास्तवातली, हयात असलेली आणि काही नसलेली आपल्याला भेटतील. अशा व्यक्ती प्रत्यक्षात तत्सम प्रसंगी जशा वागल्या-बोलल्या असत्या, तशाच त्या आहेत. या कथानकामध्ये वास्तव आणि कल्पित यांचा संयोग साधून आधुनिक इतिहासातला एक अविश्वसनीय वाटावा असा विदारक आणि हृदयभेदक अध्याय, चित्तवेधक आणि नाट्यपूर्ण रीतीने मराठी वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
Vaibhav Mahajanमी-लाय या क्वांग अंगैजवळच्या खेड्यामध्ये 16 मार्च, 1969 च्या सकाळी जे काही घडलं त्यावर आधारलेली ही कहाणी आहे. उद्ध्वस्तमधली काही व्यक्तिमत्त्वं आज वास्तवातली, हयात असलेली आणि काही नसलेली आपल्याला भेटतील. अशा व्यक्ती प्रत्यक्षात तत्सम प्रसंगी जशा वागल्या-बोलल्या असत्या, तशाच त्या आहेत. या कथानकामध्ये वास्तव आणि कल्पित यांचा संयोग साधून आधुनिक इतिहासातला एक अविश्वसनीय वाटावा असा विदारक आणि हृदयभेदक अध्याय, चित्तवेधक आणि नाट्यपूर्ण रीतीने मराठी वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
Kiran Borkar सुंदर.
Suhas Birhadeमे १९६९. व्हिएतनाम येथील मी लाए या गावात अमेरिकेन सैनिकाच्या चार्ली कंपनीच्या एका तुकडीने हल्ला केला. निरपराध १४० ग्रामस्थांवर अत्याचार करून त्यांची क्रूर हत्या केली. लोकं दयेची भीक मागत होते. तरुण मुलींवर बलात्कार कऱण्यात आले. आई वडिलासंमोर चिमुकल्यांना गोळ्या घालण्यात आल्या. गावातील एकही व्यक्ती जिवंत ठेवण्यात आली नव्हता. जगाच्या पाठीवर ही घटना कधीच उघडकीस आली नसती. पण.. पण नियती आपलं काम करत असते..
या हत्याकांडानंतर काय अमेरिकेत आणि जगात काय घडामोडी घडल्या? अमेरिकेचे अध्यक्षाचे स्थान कसे हादरले, नियतीचे फासे कसे पडत गेले ते उलगडत जातं. सिनेमात घडाव्यात तशा विश्वास बसणार नाही अशा अनेक नाट्यमय घडामोडी घडत गेल्या. अमेरिकेला व्हिएतनामधून आपले सैन्य मागे घ्यावे लागले. पण एवढ्यावरच हे पुस्तक नाही. उमेश कदम यांनी वेगळ्या धाटणीने लिहिलेलं हे पुस्तक आहे. हे पुस्तक युध्द कथा नाही. संवेदनशील वाचकाला बांधून ठेवेल अशा कथेची गुंफण आहे. वाचतना वाचक इतका एकरूप होतो की पुस्तक मग सोडवत नाही. पुढे काय असा सतत विचार वाचक करत असताना अनेक धक्कादायक गोष्टी घडतात आणि मन हेलावून जातं.
पुस्तकाचे नाव उध्दवस्त असले तरी ते संवेदनशील मनाला उध्दवस्त करतं. पत्रकारितेची ताकद काय असते, नियती काय खेळ खेळते हे पुस्तकातून उलगडतं.
केवळ इतिहासातील काळे सत्य जाणून घेण्यासाठी नव्हे तर अमानुषतेचे काय परिणाम होतात आणि नियती कसा सूड घेते हे पाहण्यासाठी पुस्तक नक्की वाचावं असं मला वाटतं.
पत्रकारांनी, छायाचित्रकारांनी आपल्या लेखणीची ताकद काय असते, शोध पत्रकारिता काय परिणाम घडवू शकते हे जाणून घेण्यासाठी अभ्यास म्हणून तरी वाचावं असं पुस्तकं
DAINIK TARUN BHARAT 30-10-2011व्हिएतनाममधील अमेरिकन अत्याचारावर प्रकाशझोत...
सुप्रसिद्ध कादंबरीकार बाबा कदम या आपल्या वडिलांकडून लिखाणाची प्रेरणा प्रा. (डॉ.) उमेश कदम यांनी घेतली. शालेय शिक्षण बार्शी, जयसिंगपूर व कोल्हापूर येथे तर आंतरराष्ट्रीय कायद्याचे उच्च शिक्षण व प्रशिक्षण लंडन, हॉलंड, स्वित्झर्लंड व ग्रीस येथे झाले. १९९८ मध्ये त्यांची आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसचे दक्षिण आशिया विभागाचे कायदा सल्लागार या पदावर दिल्ली येथील विभागीय कार्यालयात निवड झाली. २००४ पासून २००८ पर्यंत आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसच्या क्वालालंपूर, मलेशिया येथील विभागीय कार्यालयात पूर्वेकडील पंधरा राष्ट्रांचे वरिष्ठ कायदा सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. सध्या त्यांची नेमणूक पूर्वं आफ्रिकेतील इथिओपिया येथे झाली आहे.
`नी-लाय’ या क्वांग अंगै (व्हिएतनाम) जवळच्या खेड्यामध्ये १६ मार्च, १९६९च्या सकाळी जे काही घडलं त्यावर आधारलेली ही कहाणी आहे. या कथानकामध्ये वास्तव आणि कल्पित यांचा संयोग साधून आधुनिक इतिहासातला एक अविश्वसनीय वाटावा असा विदारक आणि हृदयभेदक अध्याय, चित्तवेधक आणि नाट्यपूर्ण रीतीने मराठी वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. उद्ध्वस्त मधली काही व्यक्तिमत्त्वं आज वास्तवातली, हयात असलेली आणि काही नसलेली आपल्याला भेटतील. अशा व्यक्ती प्रत्यक्षात तत्सम प्रसंगी जशा वागल्या-बोलल्या असत्या, तशाच त्या आहेत.
व्हिएतनाम निसर्गाचा वरदहस्त असलेल्या या रम्य भूमीतली जनता जवळ जवळ दोन हजार वर्षापासून कमी अधिक प्रमाणात युद्ध आणि हिंसाचार यांनी होरपळून गेलेली होती. १९५० पासून अमेरिकेने व्हिएतनाम मधल्या फ्रेंच सरकारला मदत करायला सुरुवात केली. निक्सन प्रशासन लोकशाहीच्या नावाखाली आणि साम्यवादाचा प्रसार रोखण्याच्या कारणास्तव युद्ध समर्थनीय आहे, असं जनतेला पटवून द्यायचा आटोकाट प्रयत्न करत होतं. १९६७च्या डिसेंबर महिन्यात चार्ली
कंपनी या एका तुकडीला अमेरिकन सैन्याच्या व्हिएतनाम इथल्या बाराव्या ब्रिगेडमध्ये दाखल करुन घेण्यात आलं. त्यावेळी त्यांची नेमणूक अमेरिकेचा मध्य व्हिएतनाममधला उपतळ क्वांग अंगै इथे केली गेली होती. चार्ली कंपनीच्या काही अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना मी लाय या क्वांग अंगै जवळच्या खेड्याकडे एका मोहिमेवर पाठवण्यात आलं होत़ं १६ मार्च १९६९.
`वॉशिंग्टन पोस्ट’ मधील खळबळजनक बातमी १६ मे १९६९ या दिवशी सकाळी अमेरिकेच्या बाराव्या ब्रिग्रेडच्या पूर्व व्हिएतनाममधल्या क्वांग अंगै या तळावरच्या चार्ली कंपनी या तुकडीने, तळापासून पंचवीस मैलावरच्या नी लाय या खेड्यातल्या जवळजवळ एकशेचाळीस निरपराध स्त्रिया, वृद्ध आणि लहान मुलांची निर्घृण हत्या करुन आपल्या क्रूरतेचा कळस गाठला.’
युद्ध वार्ताहर सायमन हडसन साऱ्या नी लायमध्ये फिरत होता. तिथला हिंसाचार आणि अत्याचार असहायतेने पाहत होता. पुढे सायमनने नी-लाय मधले अत्याचार जगाच्या समोर आणण्यास मदत केली. सुआन ही एक लहान मुलगी योगायोगानेच या हिंसाचारातून वाचली होती. एकमेव साक्षीदार पुढे कोर्ट मार्शल होऊन हॅले निकोत्सन आणि पार्कर या त्रिकुटावर सदोष मनुष्यवध, शारीरिक छळवणूक, लैंगिक अत्याचार, हाताखालच्या सैनिकांना बेकायदेशीर आदेश देणे, त्यांना बेकायदेशीर कृत्यं करण्यास उद्युक्त करणे, खासगी मालमत्तेचा नाश करणे आणि युध्दविषयक मानवतावादी कायद्यांच्या नियमांचे उल्लंघन करणे असे आरोप ठेवण्यात आले होते. सर्व आरोप शाबीत होऊन त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु पुढे कोर्ट मार्शलची प्रक्रियाच घटनाबाह्य घोषित केल्यामुळे तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
इकडे सुआनचे पालनपोषण बिंताय गावातले एक जोडपे करते. ते दोघे तिचे आई वडीलच होतात. परंतु वडील वियेनचे अपघाती निधन होऊन हे कुटुंब देशोधडीला लागते. सुआनला खूपच हालअपेष्टा सोसाव्या लागतात. दरम्यान लेखक एका शिबिरानंतर युद्धविषयक मानवतावादी तत्त्वे आणि नियम या विषयांसदर्भात कार्यक्रम आयोजित करतो. त्याला भेटतात डॉ. तुंग. नी लाय हत्याकांडावर त्यांनी बराच अभ्यास केलेला आहे. दोघांमध्ये चर्चासत्रे घडतात. बऱ्याच घटना उजेडात येतात. कॅथरिन बर्टन हे त्यापैकीच एक नाव, कॉलिन बर्टन यांच्या कन्या. युद्धाने होरपळलेल्या जनतेच्या पुनर्वसनासाठी त्यांनी विविध उपक्रम हाती घेतले. अमेरिकेने आपल्या सैन्याला व्हिएतनाममधून परत बोलावल्यावर त्यांनी असे उपक्रम हाती घेतले. त्यासाठी त्यांनी अमेरिकी व्यवसायिक, उद्योगधंदे, ट्रस्ट आणि धर्मार्थ संस्था यांच्याकडून देणग्या जमा करुन व्हिएतनाम मदतनिधी उभा केला होता. डॉ. तुंग लेखकाला सांगतात ``डॉ. कदम कॅथरिन बर्टन यांच्याविषयी एक धक्कादायक गोष्ट मी तुम्हाला तुम्ही त्यांचं पुस्तक वाचल्यानंतर सांगेन. त्यांनी त्या पुस्तकासाठी जे सखोल संशोधन केलं त्याच्याशी ती गोष्ट निगडीत आहे.’’ डॉ. तुंग कोणती धक्कादायक गोष्ट सांगणार आहेत याचा काहीच अंदाज लेखकाला येत नाही.
लेख वाचून त्यांना कळते, कॅथरिन यांनी आधुनिक इतिहास या विषयात फिलाडेल्फिया विद्यापीठाची पदवी संपादन केली होती. कॉलिन बर्टन यांनी संपूर्ण युद्धविराम होण्याची वाट न पाहता मायेचा हात या प्रकल्पाच्या यशासाठी त्यांनी अमेरिकेतल्या संवेदनशील परोपकारी लोकांना व्हिएतनाम युध्दात अनाथ झालेल्या बालकांना दत्तक घेऊन त्यांना उत्तम शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे करण्याची जबाबदारी घ्यावी, असं आवाहन केलं होतं.
मायेचा हात उपक्रमाची सुरुवात त्यांनी स्वत:पासून केली. बारा वर्षाचा एक मुलगा असतानाही त्यांनी कोंतुमच्या अनाथाश्रमातून एका नऊ वर्षाच्या मुलीला दत्तक घेतलं आणि तिचं नाव कॅथरिन ठेवलं. कॅथरिन यांचं पूर्वाश्रमीचं नाव सुआन. त्यांच्या आईवडिलांचं १९६९च्या सुमारास बिंताय या खेड्याजवळ भूसुरुंगाच्या स्फोटात निधन झालं होतं... (हीच ती हिंसाचाराची एकमेव साक्षीदार सुआन.) अशी ही एका निष्पाप खेड्याची उद्ध्वस्त कहाणी आहे.
Dainik Deshdoot 2-1-2011उमेश कदमांना त्यांच्या कामानिमित्त आशियाई देशांचा अभ्यास करायला मिळतो. काम करत असताना तिथले भौगोलिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक अनुभव घेताना त्यांच्यातला संवेदनशील माणूस सतत जागा असतो. प्रश्नांच्या मुळाशी असलेली माणसं, त्यांची परिस्थिती, घटना, घटनेचे पडसाद आणि परिणाम यांचा ते बारकाईने विचार करतात आणि लेखणीतून स्वत:ला प्रकट करतात. व्हिएतनाममधल्या एका छोट्या खेड्यात अमेरिकन सैनिकांनी घातलेला धुमाकूळ त्यांना अस्वस्थ करतो. निर्दयी आणि अमानुष कत्तलीचं वर्णन वाचून अंगावर शहारा येतो. नी-लाच नावाच एक समुद्रकिनाऱ्याजवळचं फक्त चाळीस-पंचेचाळीस घराचं खेडं. एवाद्या चित्रकाराने सुंदर खेड्याचं चित्र काढावं असं ते गाव असतं. नारळाची झाडं, समुद्र, भाताची पोपटी डुलणारी रोपं, काळ्या धष्टपुष्ट म्हशी, निळे डोंगर, आंबा, केळी, फणस बागा, मातीची कौलारू घरं आणि अगदी साधी माणस! हे सगळं उद्ध्वस्त होतं. अगदी होत्याचं नव्हत होऊन जातं. अमेरिकेच्या ध्येयधोरणांनी व्हिएतनामची लावलेली वाट तशी वृत्तपत्र, रेडिओमधून जनतेपर्यंत पोहोचली होती. व्हिएतनामी जनतेला वेठीस धरून स्वत:चे घोडे पुढे दामटणाऱ्या अमेरिकन सैनिकांनी केलेली धूळधाण सदर पुस्तकात वर्णन केली आहे. वास्तविक ‘सर्वसामान्य नागरिक, स्त्रिया, मुलं, वयोवृद्ध लोक, शरण आलेले व जखमी लोक यांची कुठल्याही परिस्थितीत हत्या करू नये’ असं आंतरराष्ट्रीय कायद्याने संमत केलेलं आहे. त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून माजलेल्या सैनिकांनी स्वत:चे सैतानी रुप जनतेला दाखवले आणि माती केली. सुआन उणीपुरी पाच वर्षांचीसुद्धा नव्हती तेव्हा तिला माणसातल्या पाशवी वृत्तीचे बळी व्हावे लागले. स्वत:च्या मृत आई-वडिलांना शेवटचं बघून ती प्रगल्भ झाली आणि अथक चालत राहिली जंगल, नदी पार करून इतर लोकांपर्यंत पोहोचली. हे आणि असे अनेक हृदयद्रावक प्रसंग या वर्णनात वाचायला मिळतात.
सुआनला वियेन आणि किमसारखे माता-पिता मिळतात ही त्याताल्या त्यात जमेची बाजू आहे. त्यातूनही वियेनचा मृत्यू आपल्याला दु:ख देऊन जातो. हे ‘उद्ध्वस्त’ पुस्तक म्हणजे इतिहासाचं एक असं दालन आहे ज्याकडे कुणाचंही फारस लक्ष नव्हतं. या पुस्तकाच्या निमित्ताने बलाढ्य, हेकेखोर अमेरिकेची काळी बाजू पुन्हा उजेडात येते. दुर्बलांवर राज्य गाजवण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी माणूसपणाला टाचेखाली कसे चिरडले जाते याचे विदारक वर्णन ‘उद्ध्वस्त’मध्ये आहे.