- Ravindra Parse
दिग्विजय, नेपोलीयन बोनापार्ट... ही कादंबरी वाचायला घेतली आणि काय सांगु मित्रांनो ती ख़ाली ठेवलीच जात नव्हती.. या पुस्तक़ात मी अक्षरशः गुन्तलो होतो. नेपोलीयन ग्रेट होता ही माहीत होतं पण या कादंबरी नंतर तर मी त्याचा फ़ैनच झालोय. ४ दिवसात वाचुन संपावलेली कादंबरी आनी बोनापार्ट चे आयुष्य यावर अजुनहि विचार चालू आहें ज़णूकाही बोनापार्ट फ़ीवरच चढलाय मला....
- Shrikant Adhav
DIGVIJAY by B. D. KHER, RAJENDRA KHER
ज्या माणसाच्या शब्दकोषात "अशक्य" नावाचा शब्दच नाही असा दूर्दम्य इच्छाशक्ती असणारा माणूस म्हणून नेपोलियन बोनापार्ट कडे पाहिलं जातं !! आज आपण जगभर ज्या फ्रेंच राज्यक्रांतीचे दाखले देत असतो ,ज्या राज्यक्रांतीने राजेशाही नष्ट झाली आणि लोखशाही मूल्ये रुजी .....खरं तर ही राज्यक्रांती फसली आणि या फसलेल्या राज्यक्रांतीमुळेच नेपोलियनला बळ मिळालं आणि एक दिवस त्याने फ्रान्सच्या गादीवर बसून स्वतः चा राज्याभिषेक केला..... नेपोलियनच्या बाबतीत आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो जन्माने फ्रेंच नव्हता.....फ्रान्सच्या अंकित असणार्या दक्षिणेतील कॉर्सिका बेटावरचा त्याचा जन्म....याच नेपोलियनच्या वडीलांनी आणि कॉर्सिकावासीयांनी फ्रेंचांच्या सत्तेविरोधात लढा दिला त्याच कॉर्सिकाचा युवक एक दिवस बलाढ्य अशा फ्रान्सच्याच गादीवर बसला..... उंचीने बुटका,ज्याला घोड्यावर नीट मांड टाकता येत नाही.ज्याचा बंदूकीचा निशाणा अचूक नाही मात्र त्याची सैन्यवर भक्कम मांड आहे,त्याचा घोडा ऐन लढाईत सर्वांच्या पुढे असतो अशा नेपोलियनचे सैनिक आपल्या सेनापतीसाठी सूदूर रशियाची मोहीम असो,इजिप्त,इटलीची मोहीम असो जीवावर उदार होऊन लढत असत...... नेपोलियन च्या वैयक्तिक महत्वकांक्षा प्रचंड असल्या तरी त्याने जनतेसाठी मोठे रस्ते,बागा,अनेक शैक्षणिक संस्था उभारणे आशी लोकोउपयोगी कामे केलीच त्याचबरोबर अमिर उमरावांचे वर्चस्व कमी केले....अशा नेपोलियनचं वैयक्तिक आयुष्यमात्र एका अर्थाने दुःखद होतं....पहिल्या प्रेयसीसाठी त्याने केलेला देशत्याग एकीकडे आणि सत्तेच्या जवळ जाण्यसाठी एका विधवा उमराव स्त्री शी केलेला विवाह एकीकडे....ज्या नेपोलियनने फ्रान्सला महासत्ता बनवून जगात उभं केलं त्याच नेपोलियन च्या सख्या बहीणीने सत्तेसाठी त्याचा केलेला विश्वासघात एकीकडे ....अशा प्रकारे निष्ठा,पराक्रम,महत्वकांक्षा फितुरी,विश्वासघात,प्रेम ,विरह अशा रोमांचक गोष्टीने भरलेलं आयुष्य आणि अतिमहत्वकांक्षे पोटी आयुष्याची अखेरची वर्षे इंग्रजांच्या कैदेत सेंट हेलेना बेटावर काढताना खचितस त्याला अशक्य नावाचा शब्द शिवला असेल.....त्याच्या मृत्यू नंतर 19 वर्षांनी त्याचं शव फ्रान्सला नेई पर्यंत त्यांच्या कबरीची देखभाल खरणार्या एका सैनिकाची निष्ठा उदारहरणा दाखल दिली जाते की त्याच्या सैन्यचा त्याच्यावर किती जीव होता.....अशा नेपोलियन बद्दल तो साधा जनरल असताना बोलं जाई कि लवकरच त्याला संपूर्ण सैन्याचा ताबा द्यायला हवा नाही तर तो स्वतः आपल्या हाताने तो घेईल ...अशा महत्वाकांक्षी फ्रेंच नायकाच्या युध्द मोहीमा आशाच अशक्य ,अतर्क्य कोटीतल्या होत्या....त्याच्या लढाईतील सैन्य डावपेचांचा अभ्यास आजही जगभरातील सैनिकी शिक्षण संस्थामधे केला जातो.....अशा नायकावर मराठीत लिहलेली ही कादंबरी त्याच्या कर्तुत्वाला न्याय देणारीच अतिशय छान आशा गुंतून जावं अशा शैलीत लिहली आहे ....प्रेम-विरह, फितुरी-हेरगिरी, डाव-प्रतिडाव, युद्ध-शांती अशा विविध अंगांनी नटलेली नेपोलियन बोनापार्ट याच्या जीवनावरील पिता-पुत्रांनी संयुक्तरीत्या लिहिलेली अद्भुतम्य, रससिद्ध कादंबरी : दिग्विजय!
- शितल घोडके
मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेली ‘दिग्विजय’ ही कादंबरी वाचली. खूप आवडली. खरंच शेवटी नेपोलियन बोनापार्टसाठी डोळ्यांत अश्रू उभे राहिले.
पुस्तकाची उत्तम मांडणी व खूप आपलीशी वाटणारी कादंबरी. त्यासाठी भा. द. खेर आणि राजेंद्र खेर यांना आणि मेहता पब्लिशिंग हाऊसला माझे खूप खूप धन्यवाद!
माझ्या खूप खूप शुभेच्छा!
- Makarand Kalamkar
खुप छान पुस्तक आहे. सर्व तरूणांनी वाचावं असं, स्वकर्तुत्वातुन नेता वराज्य कसं ऊभ रहातं हे नेपोलियन यांच्या कहानितुन कळतं, व प्रेरणा देतं
- प्रणव पाटील
ज्या माणसाच्या शब्दकोषात "अशक्य" नावाचा शब्दच नाही असा दूर्दम्य इच्छाशक्ती असणारा माणूस म्हणून नेपोलियन बोनापार्ट कडे पाहिलं जातं !!
आज आपण जगभर ज्या फ्रेंच राज्यक्रांतीचे दाखले देत असतो ,ज्या राज्यक्रांतीने राजेशाही नष्ट झाली आणि लोखशाही मूल्ये रुजली .....खरं तर ही राज्यक्रांती फसली आणि या फसलेल्या राज्यक्रांतीमुळेच नेपोलियनला बळ मिळालं आणि एक दिवस त्याने फ्रान्सच्या गादीवर बसून स्वतः चा राज्याभिषेक केला.....
नेपोलियनच्या बाबतीत आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो जन्माने फ्रेंच नव्हता.....फ्रान्सच्या अंकित असणार्या दक्षिणेतील कॉर्सिका बेटावरचा त्याचा जन्म....याच नेपोलियनच्या वडीलांनी आणि कॉर्सिकावासीयांनी फ्रेंचांच्या सत्तेविरोधात लढा दिला त्याच कॉर्सिकाचा युवक एक दिवस बलाढ्य अशा फ्रान्सच्याच गादीवर बसला.....
उंचीने बुटका,ज्याला घोड्यावर नीट मांड टाकता येत नाही.ज्याचा बंदूकीचा निशाणा अचूक नाही मात्र त्याची सैन्यवर भक्कम मांड आहे,त्याचा घोडा ऐन लढाईत सर्वांच्या पुढे असतो अशा नेपोलियनचे सैनिक आपल्या सेनापतीसाठी सूदूर रशियाची मोहीम असो,इजिप्त,इटलीची मोहीम असो जीवावर उदार होऊन लढत असत......
नेपोलियन च्या वैयक्तिक महत्वकांक्षा प्रचंड असल्या तरी त्याने जनतेसाठी मोठे रस्ते,बागा,अनेक शैक्षणिक संस्था उभारणे आशी लोकोउपयोगी कामे केलीच त्याचबरोबर अमिर उमरावांचे वर्चस्व कमी केले....
अशा नेपोलियनचं वैयक्तिक आयुष्यमात्र एका अर्थाने दुःखद होतं....पहिल्या प्रेयसीसाठी त्याने केलेला देशत्याग एकीकडे आणि सत्तेच्या जवळ जाण्यसाठी एका विधवा उमराव स्त्री शी केलेला विवाह एकीकडे....ज्या नेपोलियनने फ्रान्सला महासत्ता बनवून जगात उभं केलं त्याच नेपोलियन च्या सख्या बहीणीने सत्तेसाठी त्याचा केलेला विश्वासघात एकीकडे ....अशा प्रकारे निष्ठा,पराक्रम,महत्वकांक्षा फितुरी,विश्वासघात,प्रेम ,विरह अशा रोमांचक गोष्टीने भरलेलं आयुष्य आणि अतिमहत्वकांक्षे पोटी आयुष्याची अखेरची वर्षे इंग्रजांच्या कैदेत सेंट हेलेना बेटावर काढताना खचितस त्याला अशक्य नावाचा शब्द शिवला असेल.....त्याच्या मृत्यू नंतर 19 वर्षांनी त्याचं शव फ्रान्सला नेई पर्यंत त्यांच्या कबरीची देखभाल खरणार्या एका सैनिकाची निष्ठा उदारहरणा दाखल दिली जाते की त्याच्या सैन्यचा त्याच्यावर किती जीव होता.....अशा नेपोलियन बद्दल तो साधा जनरल असताना बोलं जाई कि लवकरच त्याला संपूर्ण सैन्याचा ताबा द्यायला हवा नाही तर तो स्वतः आपल्या हाताने तो घेईल ...अशा महत्वाकांक्षी फ्रेंच नायकाच्या युध्द मोहीमा आशाच अशक्य ,अतर्क्य कोटीतल्या होत्या....त्याच्या लढाईतील सैन्य डावपेचांचा अभ्यास आजही जगभरातील सैनिकी शिक्षण संस्थामधे केला जातो.....अशा नायकावर मराठीत लिहलेली ही कादंबरी त्याच्या कर्तुत्वाला न्याय देणारीच अतिशय छान आशा गुंतून जावं अशा शैलीत लिहली लिहली आहे ....
- Sheetal Ghodke Lonand, Satara
दिग्विजय वाचली. खूप आवडली. खरंच नेपोलियन साठी डोळ्यात अश्रू उभे राहिले. उत्तम मांडणी होती आणि खूप आपलीशी वाटली. माझ्या खूप शुभेचछा. Best Wishes....!
- DAINIK KESRI 22-09-1996
दिग्विजय – एक दस्तऐवज…
प्रेम, विरह, फितुरी, हेरगिरी, डाव-प्रतिडाव, युद्ध-शांती अशा विविध अंगांनी नटलेली नेपोलियन बोनापार्ट याच्या जीवनावरील भा. द. खेर आणि राजेंद्र खेर या पिता-पुत्रांनी संयुक्तपणे लिहिलेली अद्भुतरम्य आणि रससिद्ध कादंबरी– दिग्विजय!
हा झाला ‘दिग्विजय’ या कादंबरीचा थोडक्यात परिचय, मलपृष्ठावर करून दिलेला. परंतु या ६२० पानांच्या भव्य कादंबरीचा परिचय मर्यादित जागेत करून देणं केवळ अशक्य आहे. पण छे! असं म्हणून चालणार नाही. कारण ‘अशक्य’ या शब्दाचा तर आपल्या ‘दिग्विजय’ या कादंबरीच्या नायकाला मनस्वी तिटकारा होता. नेपोलियन बोनापार्ट, शारीरिक क्षमतेच्या दृष्टीने सर्वसामान्यतच मोडणारा होता. परंतु रूतची मानसिक ताकद आणि अमर्याद आत्मविश्वास मात्र अद्भुत असाच होता. अन् हेच त्याचं असामान्यत्व होय. एक साधारण कार्सिकन सैनिक केवळ दुर्दम्य आत्मविश्वासावर आणि महत्त्वाकांक्षेच्या बळाव फ्रान्सचा बादशहा होतो ही गोष्ट कल्पिताहून अद् भुत अशीच आहे. एक प्रकारे सदरहु कादंबरी कुणा एका व्यक्तीचे चरित्र वर्णन करणारी नसून साक्षात आत्मविश्वासाचे मानवी रूप कादंबरीभर वावरताना दिसते. इतिहास चरित्र आणि कादंबरी असा त्रिवेणी संगम या साहित्यकृतीत झाला आहे.
नेपोलियन बोनापार्ट हा लढाईखोर होता, असाच आपला पूर्वग्रह आहे. परंतु ‘युद्ध व्हावं ते लोककल्याणाकरता व्हावं असं मला वाटतं, युद्धामुळे काही प्रश्न सुटणार असतील तर जरूर युद्ध करावं. तसं युद्ध करायला मला आवडेल’ हे त्याचं मत वाचल्यानंतर नेपोलियनच्या चरित्राची दुसरी बाजू जाणू घेण्याची जिज्ञासा वाटते आणि नकळत वाचक कादंबरीच्या अंतरंगात ओढला जातो. कादंबरीच्या असंख्य पात्रांची अपरिचित नावे आणि घटनास्थळे याची गल्लत वाचताना होऊन वाचन समाधी भंग पावते. परंतु काही पृष्ठ वाचून झाल्यावर त्या गोष्टीची सवय होते व बगल देऊन वाचक पुढील वाचनाकडे वळतो. कारण कादंबरीची ओघवती भाषा, सतत पुढील वाचनाकडे प्रवृत्त करणे हे या कादंबरीच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
‘फेड् इन, फेड् आऊट’ या चित्रपटाचा उपयोग प्रत्येक प्रकरणाच्या लेखनात केला आहे. संपूर्ण प्रकरण एकाच वेळी वाचनीय आणि प्रेक्षणीय होईल असा कटाक्ष ठेवला आहे. ज्या वेळी प्रत्यक्ष पात्रांचा सहभाग नसेल त्या वेळी त्या काळच्या फ्रान्सची आणि इतर देशांची सामाजिक, राजकीय परिस्थिती वेगवेगळ्या दृश्यांतून परिणामकारकपणे दाखविली आहे. बऱ्याचवेळा मॉन्टेज तंत्राचा उपयोग करून होऊन गेलेल्या घटनांचा आढावा त्या त्या दृश्यमालिका दाखवून घेतला आहे. काही ठिकाणी ‘फ्लॅश बॅक’ तंत्र सफाईने अवलंबिले आहे. त्यामुळे एका अभिजात चित्रपटाचा आस्वाद निश्चितच मिळतो.
कादंबरीतील युद्धप्रसंगांची वर्णने वास्तवदर्शी आहेत. त्यातून नेपोलियनच्या युद्धनीतीची ओळख करून दिली आहे. चक्रवर्ती पदाच्या महत्त्वाकांक्षेइतकीच त्याची विविध भावभावनांची रूपेही लेखकाने प्रभावीपणे रंगविली आहेत. मातृप्रेम, उत्कट प्रेमिक, वारसासाठी अगतिक होणारा पिता, सैनिकांच्या जखमांवर स्वत: मलमपट्टी करणारा, हळव्या मनाचा शूर योद्धा, युद्धनितीएवढाच रतीयुद्धात पारंगत होता. अशा विविध रूपात नेपोलियन परिचित होत गेला आहे. त्याच्या नातेवाईकांनी आणि आप्तेष्टांनी केलेली गद्दारीच केवळ नेपोलियनच्या ऱ्हासाला कारणीभूत झाली. परंतु कोणत्याही बिकट परिस्थितीत विचलित न होण्याचा एक दुर्मिळ गुण नेपोलियनच्या अंगी होता. त्यामुळे तो शांतपणे त्यातून मार्ग काढीत असे आणि पुढील डावपेच आखण्यात रंगून जात असे. प्रत्येक लढाई त्याने स्वत: अग्रभागी लढून जिंकली हे विशेष.
या कादंबरीच्या घटना कपोलकल्पित नाहीत. प्रत्येक घटनेला इतिहासाचा आधार आहे. तशी संदर्भ सूचीच लेखकाने दिली आहे. ऐतिहासिक कादंबरीचे वाचक मोठे चोखंदळ असतात. त्यामुळे लेखकाला आपले कौशल्य पणाला लावावे लागते. लेखक प्रत्यक्षाकडे अधिक झुकला तर कादंबरीचा इतिहास व्हायला वेळ लागत नाही. त्या दृष्टीने कादंबरी ललित कृतीबरोबरच ऐतिहासिक दस्तावेजही आहे.
- NEWSPAPER REVIEW
इतिहासाशी इमान राखणारी कादंबरी...
मराठीत चरित्रात्मक कादंबरी लिहिण्यासाठी आणि प्रवासवर्णत्माक कादंबरी लिहिण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रसिद्ध असलेले भा. द. खेर यांची नेपोलियन बोनापार्टवर लिहिलेली ‘दिग्विजय’ ही चरित्रात्मक कादंबरी मेहता प्रकाशनतर्फे नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. भ. द. खेर व त्यांचे पुत्र राजेंद्र खेर या दोघांनी मिळून ही कादंबरी लिहिली आहे. असा संयुक्त प्रयोग चरित्र विंâवा चरित्रात्मक कादंबरी लिहिण्यासाठी करणे योग्य आहे. कारण त्यात सृजनतेपेक्षा इतिहासाच्या अभ्यासाला जास्त महत्त्व असते.
नेपोलियनचा जन्म १५ ऑगस्ट १७६९ला फ्रान्सजवळील कॉर्सिका बेटावर झाला. कॉर्सिका फ्रेंच सत्तेखाली भरडले जात होते. तिथली जनता फ्रान्सच्या विरोधात होती. कॉर्सिकात गरिबीत दिवस काढणे अशक्य झाल्याने नेपोलियनचे वडील फ्रेंच सैन्यात भरती झाले. सर्व बोनापार्ट कुटुंब कॉर्सिका सोडून पॅरीसला आले. सर्वांत मोठा नेपोलियन पंधरा वर्षाचा झाल्यावर त्याला वडिलांनी सैनिकी शाळेत घातले. त्या काळात नेपोलियनने प्लेटोच्या तत्त्वज्ञानापासून अनेक तत्त्वज्ञानपर ग्रंथ, त्याचप्रमाणे इतिहासाचे, भूगोलाचे ग्रंथ वाचले. सोळाव्या वर्षी तो युद्धशास्त्रातील परीक्षा पास झाला.
दरम्यान, जुर्लै १९८९मध्ये तो जगप्रसिद्ध फ्रेंच राज्यक्रांती झाली. जनतेने राजेशाहीविरुद्ध उठाव करून लुई बादशहा, त्याची राणी, त्यांचे इतर असंख्य नातेवाईक यांना कुप्रसिद्ध गिलेटिनखाली मृत्युदंड दिला. त्यावेळी नेपोलियन ऑस्ट्रियाच्या सीमेवर होता. वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी नेपोलियनने पहिला युद्ध मोहीम गाजवली व ऑस्ट्रियन सैन्याचा पराभव केला. त्यावेळी त्याचे अप्रतिम युद्धकौशल्य दिसून आले. शत्रूच्या प्रदेशाचा संपूर्ण अभ्यास करून गनिमी काव्याने त्याने युद्ध जिंकले. त्याची ही प्रगती त्याचा नेता रॉबेस्पियर याला सहन झाली नाही. त्याने काही खुसपट काढून नेपोलियनला जनरल या हुद्यावरून साध्या सैनिकाचा हुद्या दिली. नेपोलियन राजीनामा देऊन आपल्या गावी गेला.
मध्यंतरी ही क्रांतीची लाट इतकी उलटली की आपापसातल्या हेवेदाव्यावरून क्रांतीकारक आपल्याच लोकांना गिलोटिन दाखवू लागले. अनेक निष्पाप लोकांना गिलेटिनची शिकार व्हावे लागले. नेपोलियनचा नेता रॉबेस्पियर यालाही क्रांतीकारकांनी गिलोटिनखाली दिले. सर्वत्र बजबजपुरी माजली. त्याचा फायदा घेऊन परकीय सैन पॅरीसवर येत असल्याचे पाहून क्रांतिकारी मंडळाने – ज्याला ‘कन्व्हेक्शन’ म्हणत त्यांनी नोपोलियनला जनरल बनवून पुन्हा बोलावले.
पॅरीसला परत आल्यावर त्याने मोठे सैन्य उभारून प्रथम ऑस्ट्रिया व प्रशियावर हल्ले चढवले. तिथे गनिमी काव्याने युद्धकौशल्याने अनेक लढय्या जिंकल्या. शत्रूकडील संपत्ती खंडणीच्या स्वरूपात फ्रान्समध्ये आणली. ऑस्ट्रिया, प्रशिया, इटली, स्पेन, हॉलंड त्यानंतर इजिप्तपर्यंत त्याच्या सैन्याने धडक मारली. अवघ्या दहा-बारा वर्षात त्याने अध्र्याहून अधिक युरोप आपल्या ताब्यात आणला.
त्याचा पराक्रम पाहून राजेशाही नष्ट केलेल्या फ्रान्सच्या जनतेने नेपोलियनला आपण होऊन राजपद दिले. लढाया मारताना त्याने फ्रान्समध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा केल्या.
इंग्लंडवर नेपोलियन विजय मिळवू शकला नाही. रशियावर त्याने स्वारी केली. पण ती इतकी यशस्वी झाली नाही मॉस्कोच्या लढाईपासून त्याची घसरण सुरू झाली. पुन्हा शत्रूंनी उचल खाल्ली. नेपोलियनला त्यांनी इटलीजवळच्या एल्बा बेटात पाठवला व फ्रान्सचे राज्य पुन्हा लुईच्या वंशजाना दिले. पण नेपोलियन एल्बाहून सुटला आणि फ्रान्सला परत आला. त्याला आता फ्रेंच जनतेचा पाठिंबा मिळाला. परंतु हे वैभव जास्त काळ टिकले नाही. १८१७ मध्ये नेपोलियनला इंग्रजांनी अटलांटिकमधील सेंट हेलिना येथे पाठवले. युरोपपासून सहा हजार मैल दूर असलेल्या या बेटात तो चार वर्षे जगला आणि १८२१ मध्ये वयाच्या अवघ्या ५२व्या वर्षी तिथेच मृत्यू पावला. त्याच्या अस्थी त्यानंतर २० वर्षांनी पॅरीसमध्ये आणल्या गेल्या.
चरित्र लिहिताना लेखकाने कादंबरीचे भान सोडलेले नाही. आपल्या आईवर निरतिशय प्रेम करणारा नेपोलियन, आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी आपल्या प्रेयसीशी लग्न न करता राजघराण्यातील जोसेफाईनबरोबर लग्न करणारा नेपोलियन, आपल्या सैनिकांच्या जखमेवर स्वत: मलमपट्टी करणारा, शत्रूच्या घायाळ सैनिकाचीही विचारपूस करणारा, त्याला पदक बहाल करणारा नेपालियन ही त्याची रूपे लोभावून टाकतात. ‘युद्धात लढत असताना माझं शत्रूराष्ट्राशी वैर असतं, समोर लढणाऱ्या सैनिकाशी नसतं. एखाद्या माणसाने माझ्याशी शत्रुत्व केलं तर मी त्याच्या राष्ट्राशी शत्रुत्व करीत नाही. जो परिणाम समाजावर नीतीशास्त्राच्या पुस्तकांनी होणार नाही तो संगीताने घडवून आणता येतो, असं म्हणणारा, रसिक नेपोलियन, राज्याला वारस पाहिजे म्हणून आवडत्या राणीला घटस्फोट देणारा नेपोलियन अशी त्याची अनेक रूपं लेखकाने रंगवली आहेत.
अर्थात कादंबरीच्या विषयाशी वाचक तादात्म्य पावू शकत नाही. कारण चरित्रनायक त्याला सर्वस्वी अनभिज्ञ असतो. लढाईच्या जागा त्याला परिचित नसतात. त्यामुळे ‘स्वामी’, ‘पानिपत’ वगैरे ऐतिहासिक कादंबऱ्या वाचताना जो एक भावनि आनंद मिळतो तो इथे मिळत नाही. लेखकाचा तो हेतूच नसावा ही कादंबरी जरी असली तरी इतिहासाशी इमान राखून लिहिल्याने त्यात फ्रान्सचा व नेपोलियनने जिंकलेल्या प्रदेशाचा नकाश घातला असता तर वाचकांना फायदा झाला असता.
-ग. ल. कर्वे