Sagar Apuneद ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या संजय बारु यांच्या पुस्तकामध्ये, डॉक्टर मनमोहन सिंग यांचे चित्रदर्शी आणि ओघवत्या शैलीत त्यांच्या प्रत्येक कामाचे प्रसंगाचे चित्रीकरण केलेले आहे.
त्याद्वारे लेखकाने सरकारचा कारभार कसा चालतो? नेत्यांचे जन- माणसासमोर विशिष्ट प्रतिमा कशी उभी केली जाते.? राजकारण्यांच्या कृतीमागे कोणत्या प्रेरणा असतात.? ते प्रसारमाध्यमांचा स्वतःच्या स्वार्थासाठी कसा वापर करून घेतात.? याचा पट वाचकांसमोर त्यांनी उलगडून दाखवला आहे.
दिल्लीच्या घडामोडींकडे नजर लावून बसलेल्यांना रंजक वाटतील असे अनेक छोटे-छोटे किस्से सुद्धा यात आहेत.
अणू कराराच्या संदर्भात पंतप्रधानांच्या आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या देशांतर्गत तसेच अमेरिकेतील मुद्द्यांशी ज्या अनेक चर्चा झाल्या. त्याचप्रमाणे डॉक्टर सिंग यांच्या पाकिस्तानशी वेळोवेळी झालेल्या वाटाघाटी, इतिहासकारांना अत्यंत मौल्यवान वाटतील यात शंकाच नाही. अशा प्रकारच्या माहितीचा खजिनाच लेखकाने या पुस्तकातून वाचकांसाठी खुला केला आहे. ---
----- हिंदुस्तान टाइम्स
Sandeep Gadhikar ज्या सरकारमध्ये दोन सत्ताकेंद्रं होती, अशा सरकारमध्ये काम करणं, डॉ. सिंग यांच्यासाठी किती कठीण काम होतं, याचं समग्र दर्शन या पुस्तकातून संजय बारु यांनी घडवलं आहे. वाचकाला एक नवी दृष्टी देणारं संजय बारु यांचं हे पुस्तक, भारतीय राजकारणातील ‘आतल्या गोटातील’ माहिती सांगणारं आहे. हे पुस्तक डॉ. मनमोहन सिंग यांच्या युगाचा एक सुंदर आलेख आपल्यासमोर ठेवतं.
Kiran Borkarसंजय बारु जून 2004 ते ऑगस्ट 2008 या कालावधीत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार म्हणून काम पाहत होते . पंतप्रधानांचा अतिशय जवळून अभ्यास केला त्यांनी.सरकारचा कारभार कसा चालतो.त्यांच्यावर दबाव कोण ?? कसे ?? टाकू शकतात.नेत्यांची सर्वसामान्य जनतेत कशी प्रतिमा उभी केली जाते .तर प्रसारमाध्यमांचा स्वतःच्या स्वार्थासाठी कसा उपयोग केला जाऊ शकतो याचे वर्णन आपल्या ओघवत्या शैलीत केले आहे .मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीत घडलेल्या महत्वाच्या घटनांचा खजिनाच लेखकाने आपल्या पुढ्यात खुला केला आहे .
Ashok Malik.. बारू यांचं पुस्तक इतकं महत्वपूर्ण, वाचनीय आणि खिळवून टाकणारं झालं आहे याचं मुख्य कारण असं की पंतप्रधान कार्यालयाच्या आत , तेही इतकं वरचं पद भूषवणा-या एका व्यक्तीचा हा दृष्टीकोन आहे. आजपर्यंत आपण सर्वसामान्य लोकांनी ज्या गोष्टी केवळ अंदाजानं समजून घेण्याचा प्रयत्न केला होता , त्या गोष्टीमागचं सत्य या पुस्तकामुळे आपल्यासमोर उघड होऊ शकलं. आपले काही अंदाज अचूक सुद्धा ठरले. सरकारी कार्यालयात, उच्च राजकीय वर्तुलात कार्यरत असलेल्या एखाद्या उच्चपदस्थ अधिका-याने निवृत्तीनंतर इतक्या नजिकच्या भूतकाळात घडलेल्या घटनांविषयी इतक्या तपशीलवार आठवणी लिहिणं हे आपल्या देशात अजून तरी दुर्मीळ आहे/ विरळाच आहे.
M V Kamatसंजय बारू हे डॉ मनमोहन सिंग यांचे केवळ माध्यम सल्लागारच नव्हते, तर पंतप्रधान कार्यालयात सिंग यांच्यासाठी काम करणा-या उच्चपदस्थ अधिका-यांच्या गटातील एक महत्वपूर्ण अधिकारी होते. या सर्व अधिका-यांचे आपापसात सत्तेसाठी सतत संघर्ष चालू असायचे. बारू यांना ते अगदी जवळून पाहायला मिळाले होते. त्या सर्व परिस्थितीचं त्यांनी या पुस्तकामधून यथार्थ दर्शन घडवलं आहे. नोकरशाही मधील विविध अधिका-यांचे परस्परसंबंध, त्यांचे डॉ सिंग यांच्याशी असलेले संबंध, त्याच प्रमाणे सोनिया गांधी आणि डॉ सिंग, किंवा डॉ सिंग आणि लेखक अशी विविध समीकरणं लेखकाने जशीच्या तशी, कोणताही आडपडदा न ठेवता अत्यंत प्रामाणिकपणे चित्रित केली आहेत.
Gurcharan Das "द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर" ही एक शोकांतिका आहे....... खरं तर मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीचा उदय आणि अस्त याचा आलेख मांडणा-या या कहाणीमध्ये एखाद्या प्राचीन साहित्यातील शोकांतिकेचे सर्व घटक आहेत. एका निस्पृह सदाचरणी माणसाला आयुष्यात अत्यंत उलट सुलट अनुभवांमधून जावं लागलं, असाध्य ते साध्य करण्यासाठी धडपडावं लागलं. पण अखेर त्यांची ही धडपड फोलच ठरली, एक मोठी चूक ठरली. मनुष्यस्वभावाच्या मुळाशी जो एक कमकुवतपणा असतो, तोच डॉ सिंग यांना शेवटी घातक ठरला.
DAINIK AIKYA SATARA 11-01-2015संजय बारू यांनी या पुस्तकात चित्रदर्शी, ओघावत्या शैलीत अनेक प्रसंगाचं चित्रीकरण केलेलं आहे. त्याद्वारे सरकाचा कारभार कसा चालतो, नेत्यांची जनमानसासमोर विशिष्ट प्रतिमा कशी उभी केली जाते, राजकारणांच्या कृतीमागे कोणत्या प्रेरणा असतात, ते प्रसारमाध्यमांचा स्वत:च्या स्वार्थासाठी कसा वापर करून घेतात, याचा पट वाचकांसमोर उलगडत जातो. दिल्लीच्या घडामोंडीकडे नजर लावून बसलेल्यांना रंजक वाटतील असे अनेक छोटे-छोटे किस्सेसुद्धा यात आहेत. अनुकराराच्या संदर्भात पंतप्रधानांच्या आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या देशांतर्गत तसंच अमेरिकेतील मुत्सद्यांशी ज्या अनेक चर्चा झाल्या, त्याचप्रमाणे डॉ. सिंग यांच्या पाकिस्तानशी वेळोवेळी झालेल्या वाटाघाटी इतिहासकारांना अत्यंत मौल्यवान वाटतील, यात शंकाच नाही. अशा प्रकारच्या माहितीचा खजिनाच लेखकानं या पुस्तकातून वाचकांसाठी खुला केला आहे.
– सुशील आरॉन
हिंदुस्तान टाइम्स